जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 160/2008. प्रकरण दाखल तारीख - 02/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/01/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. गंगाधरराव पि. माधवराव गुर्जर वय, 70 वर्षे, धंदा, - शेती रा. जारीकोट ता. धर्माबाद जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. गैरअर्जदार देगलूर ता. देगलूर जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुनिल निमगोळे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बद्यल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांची मौजे जारीकोट ता.धर्माबाद येथे शेती आहे. पाणी पूरवठयासाठी गैरअर्जदाराकडून ग्राहक क्र.555090130694 द्वारे विज पूरवठा घेतला आहे. दि.22.10.2006 रोजी गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामूळे शेतावरुन गेलेल्या ताराची स्पॉर्कीग झाली व ठीणग्या पडून ऊसाला आग लागली. यात गट नंबर 513 मध्ये 0.80 आर ऊस जळाला. यांची तक्रार संबंधीत पोलिस स्टेशन व तहसिल कार्यालयात दिली. त्याप्रमाणे त्यांनी पंचनामे केलेले आहेत. ऊस जळाला नसता तर त्यांना एकरी 90 टन ऊसाचे उत्पन्न झाले असते म्हणजे 180 टनाचे जवळपास ऊसाचे ऊत्पन्न झाले असते. त्यावर्षी म्हणजे 2006 मध्ये ऊसाचा भाव रु.900/- प्रति टन प्रमाणे रु.1,50,000/- चे उत्पन्नचे नूकसान झालेले आहे. वारंवार गैरअर्जदार यांचेकडे मागणी करुनही त्यांनी नूकसान भरपाई दिली नाही. म्हणून गैरअर्जदार यांचेकडून रु.1,50,000/- 12 टक्के व्याजाने मिळावेत म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदाराकडून कोणतीही सेवेत कमतरता झाली नाही. अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. विज कायदा 2003 च्या कलम 168 प्रमाणे वैयक्तीक पदनामाने अशी तक्रार दाखल करता येत नाही. दि.22.10.2006 रोजी गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामूळे स्पॉर्कीग झाली व ऊस जळाला हे म्हणणे सर्वस्वी खोटे व चूकीचे आहे. एकरी 90 टनाचे उत्पन्न होते हे ही म्हणणे चूक आहे. ऊस जळाल्याची माहीती गैरअर्जदार याना नाही. अर्जदाराने स्वतःच्या सोयीसाठी उपयोगी पडणारे कागदपञ तयार करुन घेतले. सर्व पंचनामे गैरअर्जदार यांना मान्य नाहीत. म्हणून अर्जदार यांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी देखील पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले कागदपञ बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- गैरअर्जदार यांनी एक आक्षेप घेतला आहे तो म्हणजे अर्जदार यांनी तक्रार ही कंपनीच्या अधिका-यांच्या पदनामाने त्यांचे विरुध्द वैयक्तीक केलेली आहे जी की विज कायदा 2003 चे कलम 168 नुसार योग्य नाही. यावर मंचाचे म्हणणे असे की, दाखल तक्रार ही वैयक्तीकरित्या नांवाने नाही, पदनामाने तक्रार दाखल केली आहे यांचा अर्थ कंपनीच्या वतीने पदनाम धारण केलेले व्यक्ती जी कोणी असेल त्यांचे मार्फत असा होतो. त्यामूळे कलम 168 याला लागू होणार नाही. कारण ही तक्रार वैयक्तीक स्वरुपाची नाही व कंपनीचे विरुध्द असून कंपनीच्या मार्फत अधिका-याने जवाब देण्यासाठी त्या पदनामाचा उल्लेख केलेला आहे. यामूळे तक्रारीवर यांचा काहीही परीणाम होणार नाही. अर्जदार यांनी दि.22.10.2006 रोजीला त्यांचे शेतातील ऊस जळाला म्हणून पोलिस स्टेशन धर्माबाद येथे दि.24.10.2006 रोजी तक्रार नोंदविली. त्याचप्रमाणे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला तो घटनास्थळाचा पंचनामा या प्रकरणात दाखल आहे. अर्जदाराच्या नांवाने शेती असल्याबददल 7/12 दाखल आहे व त्यावर ऊस लागवडीची नोंद ही आहे. मंडळ अधिकारी यांनी दि.28.10.2006 रोजी जो पंचनामा केला तो दाखल आहे. यात 2 एकर ऊस दि.22.10.2006 रोजीच्या राञी जळाला असे म्हटले आहे. या सर्व कागदपञावरहफन ऊस जळाला हे जरी स्पष्ट होत असेल तरी नक्की हा ऊस कशामूळे जळाला यांचा बोध होत नाही. शेतावरुन गेलेल्या तारात स्पॉर्कीग होऊन ऊस जळाला असे अर्जदाराचे म्हणणे असेल तरी यांला पूष्टी देण्यासाठी तज्ञ व्यक्तीने यांची तपासणी करुन शॉर्टसर्किट मूळे ऊस जळाला असा अहवाल किंवा रिपोर्ट दयावयास हवा होता. दोन वर्षा नंतर उशीरा विद्यूत निरीक्षक यांनी गैरअर्जदार यांचे विद्यूत वाहनीची तपासणी व केली व अहवाल दि.15.09.2008 रोजी अहवाल दिला. यामूळे नक्की स्पॉर्कीग मूळेच आग लागली का हे सिध्द होऊ शकत नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांना सरळ नूकसान भरपाईची मागणी दि.08.04.2008 रोजीच्या पञान्वये केलेली आहे तोपर्यत काहीही केलेले नाही. इतके दिवस अर्जदार गप्प का बसले व इतके उशिरा तक्रार का केली हा ही प्रश्न निर्माण होतो. आगीचे कारण शोधण्यासाठी अर्जदाराने स्वतः दि.08.09.2008 रोजी विद्यूत निरिक्षक यांना पञ लिहीले आहे. पण पञ एवढे उशिरा का लिहीले होते, दोन वर्षानंतर विद्यूत निरिक्षक तेथे गेला पण दोन वर्षानंतर त्यावेळेची स्थिती काय होती हे विद्यूत निरिक्षक नक्की कसे काय तपासतात म्हणून दोन वर्षानंतर त्यांनी म्हणजे दि.15.09.2008 रोजी जो अहवाल दिला त्यात सर्व्हीस वायर उघडे आहे व तारा ऐकामेकाच्या संपर्कात आल्याने स्पॉर्कीग झाले असे जरी म्हटले असले तरी ही स्थिती दोन वर्षानंतरची आहे. म्हणून हा अहवाल ग्राहय धरता येणार नाही. कारण तो फार उशिराने केलेला आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य. जे.यु.पारवेकर लघूलेखक. |