जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र. 207/2008. अंतरिम आदेश दिनांक.16/06/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य दगडु पि.लक्ष्मण सोनटक्के, रा.अर्धापुर ता.अर्धापुर जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, गैरअर्जदार. द्वारा- सहायक अभियंता, अर्धापुर, ता.अर्धापुर जि.नांदेड. अंतरिम अर्जावरील आदेश (द्वारा- श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, याला अचानक रु.9,250/- विजेचे बिल देण्यात आले जे त्यांचे एकंदरीत विजेच्या तुलनेत अतशय जास्त आहे आणि त्यास ते बिल भरावयास सांगण्यात आले ते न भरल्यास त्यांचा विज पुरवठा खंडीत करण्याची भिती आहे. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन अंतरीम आदेश प्राप्त व्हावा यासाठी अर्ज केला आहे. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यात आले त्यांना नोटीस बजावले मात्र ते हजर झाले नाही म्हणुन अंतरिम अर्जावर हा आदेश पारीत करण्यात येत आहे. यातील वादग्रस्त बिल ते दि.16/04/2008 चे आहे, त्यामध्ये दि.31/03/ 2008 ला 2514 युनिटचा वापर दर्शविण्यत आला आहे जेव्हा की, लाईन हेल्पर ए.एच.पठाण यांनी दिलेल्या प्रमाणपत्रा प्रमाणे दि.07/04/2008 रोजी 1230 एवढे वाचन होते. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, दि.10/04/2008 रोजी त्यांचे मीटर तपासण्यात आले. अर्जदाराचे म्हणण्यात सकृतदर्शनी तथ्य दिसते व त्यांना देण्यात आलेले बिल चुकीचे आहे असे दिसुन येते. अर्जदाराने मीटर तपासणीची मागणी सुध्दा केली आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता अर्जदाराची गैरसोय टळावी नुकसान होऊ नये. यास्तव आम्ही खालील प्रमाणे अंतरिम आदेश पारीत करीत आहोत. अंतरिम आदेश. 1. अर्जदाराचा अंतरिम अर्ज मंजुर. 2. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विज पुरवठा पुढील आदेशापर्यंत खंडीत करु नये. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघुलेखक. |