जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 63/2010. तक्रार दाखल दिनांक : 10/02/2010. तक्रार आदेश दिनांक :12/01/2011. श्री. यल्लप्पा दुर्गप्पा पवार, वय 62 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. प्रियदर्शिनी हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर. तक्रारदार विरुध्द कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., जुनी मील कंपाऊंड, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांचे अभियोक्त्यांनी पुरसीस दाखल केलेली असून तक्रारदार यांना वारंवार कळवूनही ते तक्रारीमध्ये हजर राहण्यास तयार नाहीत आणि त्यांच्याशी संपर्क ठेवला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी त्यांना पुढील सूचना दिलेल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन तक्रारदार यांना त्यांची तक्रार पुढे चालविण्यामध्ये स्वारस्य नसल्याचे निदर्शनास येते. सबब, त्यांच्या गैरहजेरीमुळे तक्रार रद्द करण्यात येते. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/12111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |