Maharashtra

Nashik

CC/82/2011

K.C.Tiwari - Complainant(s)

Versus

MSEB - Opp.Party(s)

Kiran Chandvadkar

29 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/82/2011
 
1. K.C.Tiwari
Gangapur road,nashik-2
...........Complainant(s)
Versus
1. MSEB
Dwarka ,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Kiran Chandvadkar, Advocate for the Complainant 1
 
ORDER

     ग्राहक तक्रार अर्ज क्र.82/2011

       ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.30/03/2011

        अंतीम आदेश दि.29/09/2011

 

नाशिक जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नाशिक  

                                             

श्री.के.सी.तिवारी व श्रीमती पार्वतीबाई तिवारी अँण्‍ड सन्‍स          तक्रारदार         

तर्फे श्री.अनिल बन्‍सीधर तिवारी,                         (अँड.के.बी.चांदवडकर)

रा.तिवारी महल, हनुमान घाट, गंगापूर रोड, नाशिक-2.

            विरुध्‍द  

1. कार्यकारी अभियंता,                                      सामनेवाला

  महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं. लि.,                   (अँड.ए.जे.कुळकर्णी)

  खरबंदा पार्क, द्वारका नाशिक.

2. उपकार्यकारी अभियंता,

  महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कं. लि.,

  शहर उपविभाग, जुन्‍या टॅक्‍सीस्‍टॅण्‍डसमोर,

  भद्रकाली, नाशिक.1.  

 

           (मा. सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                        नि का ल प त्र

    सामनेवाला यांनी अर्जदार यांना दरमहा 600 ते 700 युनिटस प्रमाणे वीज वापराचे बिल द्यावे. लाखो रुपयांची विजबिलाची थकबाकी व बेकायदेशीर व्‍याजाची रक्‍कम रद्द करण्‍यात यावी, आर्थीक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला यांनी पान क्र.31 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.32 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.

     अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.

1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.

2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे काय?-नाही

3) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

                                                       तक्रार क्र.82/11

विवेचन

     या कामी अर्जदार यांनी पान क्र.43 लगत लेखी युक्‍तीवाद सादर केलेला आहे.  सामनेवाला यांचेवतीने अँड.ए.जे.कुळकर्णी यांनी युक्‍तीवाद केलेला आहे. 

     सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये त्‍यांनी अर्जदार यांना ग्राहक क्र.049013131341 या क्रमांकाने विद्युत पुरवठा केलेला आहे ही बाब मान्‍य केलेली आहे.  अर्जदार यांनी या कामी पान क्र.6 ते 10 लगत विद्युत बिले व बिल भरल्‍याच्‍या पावत्‍या झेरॉक्‍स प्रमाणीत प्रती हजर केलेल्‍या आहेत.  पान क्र.6 ते 10 लगतची कागदपत्रे व सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे कलम  5 मध्‍ये अर्जदार यांचे ग्राहक नंबरवर दोन मिटर असून एक मिटर चोरीला गेल्‍याचे अर्जदार यांनी कळवलेले आहे. जुलै 2006 ते नोव्‍हेंबर 2006 या पाच महिन्‍याच्‍या कालावधीचे 2165 सदोष युनिटची रु.65,118/- इतक्‍या रुपयांची वजावट अर्जदार यांना देण्‍यात आलेली आहे तसेच चोरीस गेलेल्‍या मिटरवरील 4925 च्‍या युनिटची रु.44,783 पैसे 81 इतक्‍या रुपयांची वजावट अर्जदार यांना देण्‍यात आलेली आहे.  माहे जुलै 2006 ते एप्रील 2011 या 58 महिन्‍याच्‍या कालावधीत एकूण 50719 युनिटचा वीज वापर अर्जदार यांनी केलेला आहे म्‍हणजेच दरमहा विज वापर 874 युनिट आढळून आलेला आहे.  अर्जदार यांना योग्‍य ती वजावट बीलामध्‍ये करुन देण्‍यात आलेली आहे. सेवा देण्‍यात कमतरता केलेली नाही. असे म्‍हटलेले आहे.

     अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.17/01/2011 रोजी दिलेल्‍या अर्जाची प्रमाणीत प्रत सामनेवाला यांनी पान क्र.33 चे यादीसोबत पान क्र.35 लगत हजर केलेली आहे.  या पत्राचा विचार होता अर्जदार यांनी विद्युत बिलाची थकबाकी मान्‍य केलेली आहे व बील भरण्‍यास तिन हप्‍ते मिळावेत अशी मागणी केलेली आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.  अर्जदार यांनी या कामी त्‍यांना सामनेवाला यांचेकडून मिळालेला कझुमर पर्सनल लेजरचा उतारा प्रमाणीत प्रत पान क्र.42 लगत दाखल केलेला आहे.  सामनेवाला यांनीही पान क्र.36 लगत कझुमर पर्सनल लेजरच्‍या उता-याची प्रत हजर केलेली आहे.  अर्जदार यांनी पान क्र.40 व पान क्र.41 लगत विद्युत बिलाच्‍या झेरॉक्‍स प्रमाणीत प्रती हजर केलेल्‍या आहेत.

     अर्जदार यांनी दाखल केलेले पान क्र.6, पान क्र.8, पान क्र.40 व पान क्र.41 लगतची विद्युत बिले व त्‍यावरील नोंदी याची तुलना पान क्र.36 व पान क्र.42 चे कंझुमर पर्सनल लेजरवरील नोंदीबरोबर केली असता पान क्र.36 व पान क्र.42 चे

                                                       तक्रार क्र.82/11

कंझुमर पर्संनल लेजरवरील नोंदी बरोबर आहेत हे स्‍पष्‍ट होत आहे. पान क्र.36 लगतचे कंझुमर पर्सनल लेजरवरील पान क्र.6 वरील नोंदीमध्‍ये जुलै 2008 ते ऑक्‍टोबर 2008 या महिन्‍याच्‍या बिलामध्‍ये सामनेवाला यांनी अर्जदार यांना रु.53,495 पैसे 66, रु.2214 पैसे 29 व रु.9408 पैसे 05 इतक्‍या रुपयांची वजावट दिलेली आहे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे.  तसेच पान क्र.36 चे कंझुमर पर्सनल लेजरवरील पान क्र.10 वरील नोदीमध्‍ये ऑगष्‍ट 2010 या महिन्‍याच्‍या बिलामध्‍ये रु.32,860. पैसे49+रु.3846. पैसे25+रु.8077. पैसे07 इतक्‍या रुपयांची वजावट सामनेवाला यांनी करुन दिलेली आहे हे स्‍पष्‍ट होत आहे.

     पान क्र.36 व पान क्र.42 लगतचे कंझुमर पर्सनल लेजर व त्‍यावरील नोंदी या चुकीच्‍या आहेत किंवा बरोबर नाहीत हे स्‍पष्‍ट करण्‍याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्‍य तो पुरावा दाखल केलेला नाही.  पान क्र.36 व पान क्र.42 लगतचे कंझुमर पर्सनल लेजर व त्‍यावरील नोंदींचा विचार करता सामनेवाला यांनी अर्जदार यांचे विद्युत बिलामध्‍ये योग्‍य ती वजावट करुन दिलेली आहे ही बाब स्‍पष्‍ट झालेली आहे. 

     वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.

     अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्‍तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

 

                     दे 

 

तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

 

    

               

               (आर.एस.पैलवान)              (अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)     

              अध्‍यक्ष                            सदस्‍या              

ठिकाणः- नाशिक.

दिनांकः-29/09/2011

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.