सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 31/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.23/06/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.28/07/2015
श्री नंदलाल विश्वनाथ माळवदे
वय 65 वर्षे, व्यवसाय- सेवानिवृत्त व शेती
रा.कट्टा, ता.मालवण, जिल्हा - सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्यादित
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,
उप वि भाग, मालवण कार्यालय, देवूळवाडा,
ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग. पिन-416 606 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष – गैरहजर.
आदेश नि.1 वर
(दि.28/07/2015)
द्वारा : श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
- तक्रारदार यांनी त्यांचे घराचे बांधकामासाठी तात्पुरता घेतलेल्या विदयूत मीटरसाठी भरलेली अनामत रक्कम वारंवार तोंडी व लेखी विनंती करुनही विरुध्द पक्ष यांनी परत न केल्याने सदरची तक्रार मंचात दाखल करण्यात आलेली आहे.
- तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यावर विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. त्याप्रमाणे सदरचे प्रकरण दि.28/07/2015 रोजी विरुध्द पक्ष यांचे म्हणणे दाखल करणेसाठी ठेवण्यात आलेले होते. विरुध्द पक्ष यांना नोटीस बजावणी होऊनही ते मंचात हजर राहिलेले नाहीत.
- दि.27/07/2015 रोजी तक्रारदार यांनी नि.5 अन्वये अर्ज दाखल करुन प्रकरण बोर्डवर घेण्यासाठी विनंती केली. तसेच नि.6 अन्वये तक्रारदार यांनी अर्ज दाखल करुन विरुध्द पक्ष यांचेकडे विदयूत मीटरसाठी भरलेली अनामत रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) चा धनाकर्ष विरुध्द पक्ष यांचेकडून मिळालेला असून आता त्यांचेविरुध्द कोणतीही तक्रार उरलेली नाही असे कथन केले व सदरचे प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या पुरसीसला अनुलक्षून हे प्रकरण निकाली काढणेत येत असून खालीलप्रमाणे आदेश पारीत करणेत येतात.
आदेश
- तक्रारदाराचे नि.6 चे पुरसीसला अनुलक्षून सदरचे प्रकरण निकाली काढणेत येते.
- खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/07/2015
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.