Maharashtra

Sindhudurg

CC/15/33

Shri. Ganpat Tukaram Shirodkar - Complainant(s)

Versus

MSEB Cooprative Society Ltd,Kudal - Opp.Party(s)

14 Aug 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Sindhudurg
C-Block, Sindhudurgnagari,Tal-Kudal,Dist-Sindhudurg,Pin-416812
 
Complaint Case No. CC/15/33
 
1. Shri. Ganpat Tukaram Shirodkar
Birodkar Temb,Sawantwadi
Sindhudurg
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. MSEB Cooprative Society Ltd,Kudal
Near ST Stand,Kudal
Sindhudurg
Maharashtra
2. Shri. Vilas Ramchandra Sawant
Kudal
Sindhudurg
Maharashtra
3. Shri. Vasant Narayan Aadelkar
Kudal
Sindhudurg
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. K.D.Kubal PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. V.J. Khan MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Exh.No.12

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग

तक्रार क्र.33/2015

                                       तक्रार दाखल झाल्‍याचा दि. 23/06/2015

                                      तक्रार निकाल झाल्‍याचा दि. 14/08/2015

श्री गणपत तुकाराम शिरोडकर

वय 63 वर्षे, व्‍यवसाय - सेवानिवृत्‍त,

रा.बिरोडकर टेंब, सावंतवाडी,

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग                                 ... तक्रारदार

     विरुध्‍द

1) वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्‍था मर्यादीत, कुडाळ,

एस.टी.स्‍टँड नजिक, मु.पो. कुडाळ,

ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग         

2) श्री विलास रामचंद्र सावंत

वय-45 वर्षे, धंदा- नोकरी,

वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्‍था मर्यादीत कुडाळ

करीता सचिव,

रा.महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनी, कुडाळ

सेक्‍शन ऑफिस, कडावल,

मु.पो.कडावल, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

3) श्री वसंत नारायण आडेलकर

वय-45 वर्षे, धंदा- नोकरी,

वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्‍था मर्यादीत कुडाळ

करीता व्‍हाईस चेअरमन,

रा.महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनी, कुडाळ

सेक्‍शन ऑफिस, कुडाळ,

पो.ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग                     ... विरुध्‍द पक्ष.

 

                                                                 

                        गणपूर्तीः-  1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्‍यक्ष                     

                                 2) श्रीमती वफा ज. खान, सदस्‍या.

 

तक्रारदार- स्‍वतः                                                             

विरुद्ध पक्ष क्र.1 ते 3 तर्फे प्रतिनिधी श्री अनिल रा.कुडपकर.

 

निकालपत्र

(दि. 14/08/2015)

द्वारा : श्रीमती वफा जमशीद खान, सदस्‍या.                       

   1) तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष क्र.1 वीज मंडळ कर्मचारी ग्राहक संस्‍था, कुडाळ या संस्‍थेचे  ग्राहक सभासद असून विरुध्‍द पक्ष क्र.2 सदर संस्‍थेचे सचिव व विरुध्‍द पक्ष क्र.3 हे अध्‍यक्ष आहेत. तक्रारदार यांचे विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेकडे शेअर्सपोटी व सभासद ठेव म्‍हणून रक्‍कम जमा असलेबाबत तसेच तक्रारदार यांनी संस्‍थेचा राजीनामा दिलेबाबत  विरुध्‍द पक्ष संस्‍थेने दिलेले पत्र नि.3/1 कडे दाखल केलेले आहे. सदर संस्‍थेकडे तक्रारदार यांची रक्‍कम रु.10,700/- शेअर्सपोटी व रु.3,800/-  सभासद ठेव मिळून रु.14,500/- जमा आहे. सदर रक्‍कमांची मागणी करुन देखील विरुध्‍द पक्ष हे रक्‍कमांची परतफेड करण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍यामुळे तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल केला आहे. 

      2) विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 तर्फे अधिकारपत्रान्‍वये श्री अनिल कुडपकर हजर होऊन त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.10 वर म्‍हणणे दाखल केले. विरुध्‍द पक्ष संस्‍थेकडे तक्रारदार यांची सभासद ठेव व  शेअर्सची रक्‍कम मिळून एकूण रक्‍कम रु.9,675/- जमा असल्‍याचे विरुध्‍द पक्षातर्फे मान्‍य केलेले आहे. तक्रारदार यांचे संस्‍थेजवळ रु.4,825/-  एवढया रक्‍कमेचे कर्ज असून ते जमा करण्‍यात आले असून संस्‍था तक्रारदार यांना रु.9,675/- देणे लागते असेही नमूद केलेले आहे. मागील तीन वर्षांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीतून की जे संस्‍थेचे सभासद आहेत अशा 114 सभासदांनी राजीनामा दिल्‍यामुळे संस्‍था अडचणीत आली. त्‍यामुळे सभासदांना शेअर्सची रक्‍कम देणे संस्‍थेला शक्‍य झाले नाही. विरुध्‍द पक्ष संस्‍थेवर जिल्‍हा बँकेकडून घेणेत आलेल्‍या कर्जाचा बोजा आहे. तसेच सभासदांना दिलेल्‍या कर्जाची वसूली कमी प्रमाणात होत असल्‍याने ग्राहकांना रक्‍कमा परत करणे अडचणीचे होत आहे असे म्‍हणणे मांडले. तसेच तक्रारदार यांना शेअर्सची रक्‍कम सप्‍टेंबर 2015 पासून थोडी थोडी देणेत येईल असेही कबुल केले.

      3)  विरुध्‍द पक्षातर्फे नि.10 वर असेही कथन केले आहे की, सप्‍टेंबर 2015 पासून दरमहा तक्रारदार यांना रु.500/- देण्‍यात येतील. 

      4) तक्रार प्रकरणाचे कामी उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला.  विरुध्‍द पक्षातर्फे इतरही गाहकांना रक्‍कमा अदा करण्‍याच्‍या असल्‍यामुळे  तक्रारदार यांचे खाती दरमहा रु.500/- भरणेत येतील असे सांगण्यात आले. विरुध्‍द पक्ष आर्थिक संकटात असल्‍याने आणि ब-याच सभासदांनी एकाच वेळी मागणी केली असल्‍याने दरमहा रु.500/- भरणेची मुभा दयावी असे युक्‍तीवादा दरम्‍यान विरुध्‍द पक्षातर्फे सांगणेत आले. तर विरुध्‍द पक्ष यांचेकडून तक्रारदार यांना एकरक्‍कमी रक्‍कम मिळावी किंवा सदरची रक्‍कम तीन हप्‍त्‍यात दयावी व तसे शक्‍य नसल्‍यास किमान दरमहा रु.5000/- मिळावेत असे तक्रारदार यांनी लेखी अर्जाद्वारे तसेच युक्‍तीवादा दरम्‍यान सांगितले. विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदार यांची एकूण रक्‍कम रु.9,675/- जमा असल्‍याचे म्‍हटले आहे व तक्रारदार यांचा सदरचे कर्ज रक्‍कमेस कोणताही आक्षेप नाही. विरुध्‍द पक्ष यांनी लेखी म्‍हणणे हाच पुरावा असल्‍याचे तोंडी सांगीतले.  तक्रारदार स्‍वतः आणि विरुध्‍द पक्षातर्फे श्री अनिल कुडपकर यांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व केलेला तोंडी युक्‍तीवाद विचारात घेता तक्रारदार या ग्राहकाला सेवा देण्‍यात विरुध्‍द पक्षातर्फे कमतरता ठेवल्‍याचे व त्‍यांच्‍या रक्‍कमा मुदतीत दिल्‍या नसल्‍याचे स्‍पष्‍ट होत असल्‍याने व विरुध्‍द पक्ष यांनी तसे कबुल केल्‍याने हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत  आहे.

                   आदेश

1)

2)

3)

4)% 

5)

 

ठिकाणः सिंधुदुर्गनगरी

दिनांकः 14/08/2015

 

 

 

 

(वफा ज. खान)                    (कमलाकांत ध.कुबल)

सदस्‍या,               प्रभारी अध्‍यक्ष,

जिल्‍हा  ग्राहक तक्रार निवारण  मंच,  सिंधुदुर्ग

 

प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.

प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. K.D.Kubal]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MRS. V.J. Khan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.