20. हे स्पष्ट आहे कि, वि.प. 1 व 4 ने त.क. 4 ला सदोष सिलेडरचा पुरवठा करुन सेवेत ञुटी दिली आहे. त्यामुळे त.क.ला नुकसान देणे ही वि.प. 1 व 4 ची जबाबदारी आहे. तक्रारकर्त्याचे त्याचे तक्रारीचे पृष्ठर्थ मा. राष्ट्रीय आयोग, दिल्ली यांचा First Appeal No. 249/2016 Bharat Petroleum Corporation ltd. Vs Shri Dharmpal, First Appeal No. 250/2016 Bharat Petroleum Corporation ltd. Vs Shri Ashok Son of Sairam Lal, First Appeal No. 251/2016 Bharat Petroleum Corporation ltd. Vs Baby Preeti हया न्यायनिवाडयांची प्रत दाखल केलेली असून त्याचे सुक्ष्म अवलोकन केले असता प्रस्तुत प्रकरणास त्यातील तथ्थे तंतोतंत जुळतात.
मयत अनिलचे मृत्युच्या वेळी वय 46 वर्षे होते हे अभिलेखावरील कागदपञांवरुन दिसून येते. त.क.च्या म्हणण्यानुसार टि.व्ही. मेकॅनिक होता व प्रतिमहा 15,000/- रु. कमवित होता. मयत अनिलने टी.व्ही.दुरुस्त करण्याबाबतचे प्रमाणपञ त.क.हयांनी अभिलेखावर दाखल केले आहे. परंतु त्याचे उत्पन्नाबाबत कुठलाही कागदोपञी पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. सद्य परिस्थितीत मजुर हा सुध्दा दिवसाला 250/- रु. कमवितो. त्यानुसार मयत अनिल प्रतिदिन रु. 250/- कमवित होता असे समजणे उचित होईल असे मंचाचे मत आहे. त्यानुसार मयत अनिलचे वार्षिक उत्पन्न (7,500* 12 ) = 90,000/- रु. एवढे होते. त्यातील 1/3 भाग त्याने स्वतः करीता ठेवल्यास तो त्याचे कुटूंबास पालन पोषणाकरीता वर्षाला 60,000/- रु. देवू शकला असता. मयत अनिल ने वयाचे 58 वर्षे पर्यंत काम केले असते असे समजून 12 चा (Factor) घटक लावल्यास (60,000*12) = 7,20,000/- रु. नुकसान भरपाई द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदाराने त.क. 1 व 3ला देणे वि.प. 1 व 2 हे जबाबदार आहे. असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
21. त.क. 4 ने गॅस सिलेंडरच्या भडक्यामुळे लागलेल्या आगीत त्याच्या घरातील सामानाचे नुकसान झाले त्या नुकसान भरपाई करिता रु. 1,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदर आगीमुळे रु. 1,00,000/- ची हानी झाली हे दाखविण्याकरीता कुठलाही कागदोपञी पुरावा त.क.ने अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्यामुळे घटनास्थळ पंचनाम्याचे अवलोकन केले असता त.क. 4 ला आगीमुळे झालेल्या नुकसान भरपाई करिता रु. 20,000/- द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे वि.प. क्रं. 1 व 4 ने दयावे या निष्कर्षाप्रत मंच पोहलेले आहे.
वि.प. 1 ने वि.प. 2 व 3 कडे गॅस अपघातामुळे होणा-या जोखिमेकरिता विमा काढला आहे. त्यामुळे वि.प. 1 व 2 हयांनी सदर नुकसान भरपाईची रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने वि.प. 2 व 3 कडून वसुल करुन घ्यावी.
22. विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारकर्त्याचा नुकसान भरपाईची रक्कम नाकारुन नाकारुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्याला मंचासमोर यावे लागले. यामुळे निश्चितचे तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्याचे स्वरुप पाहता या सदराखाली रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून 5,000/-रुपये मंजूर करणे मंचास योग्य वाटते. वरील मुद्दयाचे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
//अंतीम आदेश//
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 हयांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकपणे
तक्रारकर्ते क्रं.1 ते 3 हयांना रक्कम रु. 7,20,000/- त्यावर
तक्रार दाखल तारखेपासून म्हणजेच दि. 25.01.2014 पासून
द.सा.द.शे. 9 टक्के दराने संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष
तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत व्याजसह द्यावे.
3. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 हयांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकपणे
तक्रारकर्ते क्रं. 4 ला रक्कम रु. 20,000/- त्यावर तक्रार
दाखल तारखेपासून म्हणजेच दि. 25.01.2014 पासून
द.सा.द.शे. 9 टक्के दराने संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष
तक्रारकर्त्याच्या हातात पडेपर्यंत व्याजसह द्यावे.
4. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 4 हयांनी वैयक्तिक किंवा संयुक्तिकपणे
तक्रारकर्ते क्रं.1 ते 3 हयांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास
झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 10,000/- व
तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावेत.
5. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत
प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावी
6. वि.प. क्रं. 1 व 2 हयांनी सदर नुकसान भरपाईची रक्कम
द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने विमा कंपनी वि.प. क्रं. 2 व
3 कडून वसुल करुन घ्यावी.
7. मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत
घेवून जाव्यात.
8. निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व
उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात.
वर्धा.
दि. 31.03.2017