(पारीत दिनांक : 09 जानेवारी 2009)
आदेश पारीत व्दारा – अनिल एन. कांबळे, अध्यक्ष (प्रभारी)
... 2 ...
... 2 ...
1. अर्जदाराने, सदरची तक्रार, गैरअर्जदार कंपनीचे विरुध्द, ग्राहक संरक्षण कायद्याचे तरतुदी अंतर्गत दाखल केलेली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे.
2. अर्जदार ही चॉरीटेबल संस्था असून, धमार्थ दवाखाना चालवितो. अर्जदाराने पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीकरीता गैरअर्जदार कंपनीकडून नोव्हेंबर 2006 मध्ये मशीन खरेदीचा ऑर्डर दिला. त्यानुसार, गैरअर्जदार कंपनीने 5 डिसेंबर 2006 मॅपलॅब मशीन बसवून दिली. मशीनीची किंमत रुपये 2,50,250/- एवढी असून, 1 वर्षाची गॅरंटी गैरअर्जदाराकडून देण्यात आली. सदर मशीनवर ब्लड शुगर, युरेया, प्रोटेनिअम, सोडीअम पोटॅशिअम इ. रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीकरीता घेण्यात आली.
3. गैरअर्जदाराने लावून दिलेली मॅपलॅब मशीनच्या रिजल्टमध्ये चुकीचे परिणाम येत होते. वारंवार ब्रेकडाऊन गॅरंटी कालावधीत होत आहे. येणा-या दोषाबद्दल गैरअर्जदार कंपनीला कळविण्यात आले. गैरअर्जदार कंपनीने आपला इंजिनीअर पाठवून दुरुस्त करुन देत होते. खराब झालेले पार्ट दुस-यांदा बसवून देत होते, तरी सुध्दा मशीन योग्यप्रकारे काम करीत नाही. गैरअर्जदार कंपनीने मशीनच्या क्षमतेबद्दल खोटी माहिती पुरविली. विशेषतः अचुकता व उच्च लेवलची क्षमता सोडीअम आणि पोटॅशिअम तपासणी करीत असल्याचे सांगण्यात आले. गैरअर्जदार कंपनीने प्रथमतः लाऊन दिलेल्या मशीनमध्ये वारंवार दोष येत असल्यामुळे व योग्य परिणाम देत नसल्यामुळे, अर्जदाराने तक्रार दिल्यानंतर, गैरअर्जदार कंपनीने ती मॅपलॅब मशीन बदलवून, दूसरी मशीन बसवून दिली. गैरअर्जदार कंपनीने योग्यप्रकारे सेवा दिली नाही व दोष युक्त मशीन लावून दिली. गैरअर्जदार कंपनीने बसवून दिलेल्या मशीनमध्ये खराबी आल्यामुळे व योग्यप्रकारे काम करीत नसल्यामुळे पुन्हा दुसरी मशीन दिनांक 24/10/07 ला बदलवून दिली. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीला मशीनच्या येणा-या दोषाबद्दल दिनांक 19 एप्रिल 2007, 22 जुन 2007, 29 जुन 2007, 30/8/2007 ला कळविले. गैरअर्जदार कंपनीने मशीन दुरुस्त करुन दिल्यानंतरही दिनांक 29/8/2007 ला मशीनने पूर्णपणे काम करणे बंद केले. सुचना
... 3 ...
... 3 ...
दिल्यानंतर दिनांक 30/8/2007 ला कंपनीच्या इंजिनीअरने मशीन दुरुस्त करुन दिले. परंतु, परत दूस-याच दिवशी म्हणजे 31/8/07 मशीन पूर्णपणे बंद पडली. अर्जदाराने, 7 सप्टेंबर 2007 ला ईमेलव्दारे कंपनीच्या रिजनल सेल मॅनेजरला मशीनमध्ये आलेला दोषाबद्दल कळविले, त्यात मशीन बदलवून देण्याची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे, गैरअर्जदार कंपनीने ईमेलला रिसपॉन्स करुन 10 सप्टेंबर 2007 ला बदलवून देण्याचे मान्य केले. 24 ऑक्टोंबर 2007 व 26 ऑक्टोंबर 2007 कंपनीच्या सर्वीस इंजिनिअरने मॅपलॅब मशीन सिरीयल नं. 60137 बदलवून दिला व नविन मशीनची पुन्हा 12 महिन्याची ग्यारंन्टी दिली. नविन बदलवून दिलेली मशीनमध्ये 15 नोव्हेंबर 2007 ला योग्य काम करीत नसल्याचे निदर्शनास आले, त्यानुसार, गैरअर्जदार कंपनीला कळविण्यात आले. त्याप्रमाणे, कंपनीच्या इंजिनिअरने 6 डिसेंबर 2007 ला तक्रारीचे निराकरण करण्याकरीता आला. नविन मशीन योग्यप्रकारे सोडीअम, पोटॅशिअम व GHB चे परिणाम देत नव्हते. अर्जदार, गैरअर्जदारास मशीनमध्ये येणा-या दोषाबद्दल कळविले. गैरअर्जदार कंपनीने कि-बोर्ड बदलविले, तरी सुध्दा मशीन मधील दोषाचे निराकरण झाले नाही. अर्जदाराने, गैरअर्जदार कंपनीला कळवून, मशीनची किंमत परत करण्याची मागणी करुनही, कंपनीने मागणी पूर्ण केली नाही. अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करुन, गैरअर्जदाराकडून मशीनची किंमत व्याजासह एकुण 3,00,250/-, 18 % टक्के व्याजाने वसुल करुन देण्याची मागणी केलेली आहे.
4. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 3 नुसार एकुण 31 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. सदरची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर झाला नाही. परंतु, पोष्टाने आपला लेखी बयाण पाठविला.
5. गैरअर्जदाराने, आपल्या लेखी बयाणात, अर्जदाराची तक्रार ही बनावटी व खोटी आधारहीन असल्यामुळे खारीज करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने, सदर तक्रार ही 1 वर्ष 6 महिन्यानंतर दाखल केलेली आहे. अर्जदाराने, मशीनचा उपयोग ब-याच कालावधी पर्यंत घेतल्यानंतर ही तक्रार दाखल केलेली असल्यामुळे खारीज होण्यास पाञ
... 4 ...
... 4 ...
आहे. मॅपलॅब मशीन ही ‘बायो केमीकल सिस्टीम इंटरनॅशनल, इटली’ यांनी तयार केली आहे व सदर उत्पादन कंपनीने ISO, 13485-2004/CE प्रमाणपञ घेतले असून, जगातील चांगली उत्पादक कंपनी आहे. अर्जदाराने तक्रारीत उत्पादक कंपनीला पक्ष केली नाही, त्यामुळे विद्यमान न्यायमंचाला तक्रार निकाली काढता येणे शक्य नाही. गैरअर्जदार कंपनी ही ‘मे.बायो केमीकल सिस्टीम इंटरनॅशनल, इटली’ यांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे भारतातील वितरक आहे. उत्पादक कंपनीने उत्पादन केलेले सामान जवळपास 55 देशात विक्री करतो. जागतीक आरोग्य संघटना अनेक आंतरराष्ट्रीय संस्था, NGO यांनी मशीन घेतली आहे, त्यांचेकडून कुठलीही तक्रार नाही. तसेच, नॅशनल इन्स्टीटयूट इमेनोलॉजी नवी दिल्ली, निजाम हैद्राबाद, इंडियन आर्मी, राज्य सरकार, इंडियन मेडिकल कौन्सील, प्रॉयव्हेट लेबॉर्टीज व डायग्नोस्टीक सेंटर इत्यादींनी मॅपलॅब मशीन घेतले आहे, त्याची कुठलीही तक्रार नाही. परंतु, अर्जदाराने मशीन वापरात दोष असल्याचे सांगून कोणताही सबळ पुरावा नसतांना, तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
6. अर्जदाराच्या खरेदी ऑर्डरनुसार MLP Sr. No. 60806 ही मशीन अर्जदाराच्या दवाखान्यात दिनांक 5/12/2006 रोजी लावून देण्यात आली. त्यावेळी, गैरअर्जदाराच्या प्रतिनीधीने प्रात्याक्षिक करुन दाखविले. मॅपलॅब मशीन योग्यप्रकारे, अचूक परिणाम देत असल्याचे अर्जदाराने मान्य केले व त्यानंतरच मशीनची पूर्ण किंमतची रककम अदा केली आहे. अर्जदाराने, मशीनची हाताळणी ही अप्रशिक्षीत, अकुशल व्यक्तीकडून हाताळणी केलेली आहे. गैरअर्जदाराने प्रात्याक्षीक करुन दिल्यानंतर 5 महिने, म्हणजेच 6 डिसेंबर 2006 ते 17 एप्रिल-07 पर्यंत मशीन योग्यप्रकारे काम केली आहे व त्यानंतर 22/6/07 ला अर्जदाराकडून तक्रार आल्यानंतर, दिनांक 29/6/07 ला अटेंड करण्यात आले. त्यानंतर दिनांक 30/8/07, 7/9/07, 12/9/07 आलेल्या तक्रारीचे दिनांक 31/8/07, 11/9/07, 21/9/07 ला अटेंड करण्यात आले. अर्जदाराने, गैरअर्जदाराच्या इंजिनियरला हेतुपुरस्परपणे अटेंड करु दिले नाही. गैरअर्जदाराने मानवतेच्या दृष्टीकोनातून मशीन बदलवून दिली व त्या ठिकाणी Sr. No.
... 5 ...
... 5 ...
60137, दिनांक 26/10/07 ला बदलवून देण्यात आले. अर्जदाराने, दुस-या मशीनची किंमत दिलेली नाही. त्यामुळे, अर्जदार हा ग्राहक होत नाही. अर्जदाराची तक्रार ही बनावटी, बिना कागदोपञी पुराव्याने दाखल केली असल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.
7. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणासोबत पोष्टाने दस्ताऐवजाच्या झेरॉक्स प्रती सादर केलेल्या आहेत. गैरअर्जदार हजर झाला नाही व आपला युक्तीवादही केलेला नाही.
8. अर्जदाराने, आपले तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ निशाणी 7 नुसार शपथपञ दाखल केले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन आणि अर्जदारानी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
(1) गैरअर्जदाराने दोष युक्त मॅपलॅब मशीन होकारार्थी
पुरवून सेवा देण्यात ञृटी केली आहे काय ?
(2) अर्जदार मॅपलॅब मशीनची किंमत मिळण्यास होकारार्थी
पाञ आहे काय ?
(3) अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे होकारार्थी
काय ?
(4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
// कारणे व निष्कर्ष //
मुद्दा क्रमांक 1 ते 3 :-
9. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून मॅपलॅब मशीन सिरीयल नं. 60806 सेमी ऑटो अॅनालायझर मशीन गैरअर्जदार मे. तुलीप डायग्नोस्टीक प्रा.लि., गोवा यांचेकडून रुपये 2,50,250/- सर्व टॅक्ससह विकत घेतले होते, याबद्दल वाद नाही. अर्जदाराने, विकत घेतलेल्या मशीनमध्ये दोष
... 6 ...
... 6 ...
होता व त्या दोषाचे निराकरण गैरअर्जदार कंपनीचा सर्व्हीस इंजिनियरने वेळोवेळी दुरुस्त करुन दिले असल्याचे, दाखल दस्ताऐवजावरुन दिसून येते. गैरअर्जदाराने पुरविलेल्या मशीन मध्ये वारंवार ब्रेक डाऊन होत असल्यामुळे व अचूक परिणाम येत नसल्यामुळे मॅपलॅब मशीन बदलवून दिली व त्या ठिकाणी दुसरी मॅपलॅब मशीन सिरीयल नं. 60137 दिनांक 26/10/07 ला बदलवून देण्यात आले, याबद्दलही वाद नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन एक बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदाराकडून घेतलेल्या सेमी ऑटो अॅनॉलायझर मॅपलॅब मशीनमध्ये दोष येत होता, सोडीअम, पोटॅशिअमचे अचूक परिणाम मिळत नव्हते, ही बाब सिध्द होतो. त्यामुळे, गैरअर्जदार कंपनीने दूसरी मशीन बदलवून दिली, तसेच कि-बोर्ड काम करीत नसल्यामुळे बदलवून दिले असल्याची बाब सिध्द होतो. गैरअर्जदाराने, बदलवून दिलेली मशीन योग्यप्रकारे काम करीत नाही, त्यातही दोष निर्माण झाला, त्यामुळे अर्जदाराने, गैरअर्जदारास तक्रार नोंदवून त्या तक्रारीचे निराकरण करण्यास गैरअर्जदाराचे सर्व्हीस इंजिनिअर आले व त्यांनी मशीनमधील दोष असल्याचे, त्याचे निदर्शनास आले असल्याची बाब, गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणासोबत दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन Annecture E-1, E-2 वरुन दिसून येते. गैरअर्जदाराचे दिनांक 31/7/08 चया पञात, (1) Consistency of the factor, (2) Problem of measuring calcium is solved programme is set on position 49, (3) Fan is working now but as per the explanation it starts only when the the temperature exceeds 37 degree Celsius. (4) Programme for GHb is set now. या दोषाचे निराकरण केल्याचे नमुद केले आहे. परंतु, त्याच रिपोर्टमध्ये “Strip error” हा दोष असल्याचे मान्य केले आहे. यावरुन, मशीनच्या गॅरंटी कालावधीत दोष निर्माण झाला होता, ही बाब सिध्द होत असल्यामुळे गैरअर्जदार मशीनची पुर्ण किंमत परत करण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. ‘आदरणीय राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली’, यांनी ‘सोनी ईरिक्शन इंडिया लि. –विरुध्द – आशिष अग्रवाल’, 2008- सी.टी.जे. 34 (CP) (NCDRC), याप्रकरणात आपले मत दिले आहे. त्यात दिलेले मत याप्रकरणाला तंतोतंत लागु पडतो, त्यातील महत्वाचा भाग खालीलप्रमाणे.
... 7 ...
... 7 ...
Mobile – Defect—Consumer Protection Act, 1986—Section 2(1)(f)—Deficiency in service—Complainant purchased a Sony Ericsson handset Carrying a warranty of one year – It Started troubling him within the warranty period itself and the petitioners replaced its battery and charger to set it right and when he complained to them about its Keypad, they replaced it by giving him a new handset – Even the new handset allegedly failed to work properly – Complaint to the District forum allowed, directing the petitioner to give him a new handset with compensation and cost – Appeals by both the parties to state Commission – Handset of that particular model already withdrawn by the petitioner from the market –Petitioner’s appeal dismissed while that of the complainant allowed directing the petitioner to refund him the cost of the handset—Revision petition to National Commission – Deficiency in service on the part of the petitioner writ large in their case – State Commission rightly directed for refund of the amount paid as consideration for purchasing the handset – Revision petition dismissed.
******* ******** ******** ********
10. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडून घेतलेल्या मॅपलॅब मशीन मध्ये वारंवार दोष निर्माण होऊन, अचुक रक्ताच्या चाचणीचे परिणाम मिळत नाही, वारंवार मशीन ब्रेकडाऊन होऊन त्याचा उपयोग अर्जदाराला घेता आला नाही. तसेच, औषध उपचाराकरीता आलेल्या रुग्णाना त्याचा फायदा मिळवून देता आला नाही. त्यामुळे, अर्जदाराने ञासुन गैरअर्जदारास मॅपलॅब मशीनची किंमत परत करावी अशी मागणी ईमेलव्दारे केली. परंतु, गैरअर्जदाराने मशीनची किंमत परत केली नाही व ती नादुरुस्त स्थितीत कायम ठेवली. गैरअर्जदाराने पुरविलेली मशीन ही दोषयुक्त असल्यामुळे, त्याची किंमत रुपये 2,50,250/-, व्याजासह परत मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. आदरणीय छत्तीसगड, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, रायपूर यांनी डॉ. सुषमा वर्मा –विरुध्द - मे.गेनवेल मेडीमार्ट लि., 2008- सी.टी.जे.-106 (CP) (SCDRC), याप्रकरणात आपले मत दिले आहे, त्यात दिलेले मत याप्राकरणातील बाबीशी तंतोतंत जुळतात. त्या प्रकरणात दिलेले मत खालीलप्रमाणे.
Defect—laser machine – Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(f)—Complainant, a doctor by profession purchased one S.L.T.C.L. 60 laser machine (demonstration model ) from the
... 8 ...
... 8 ...
opposite party for carrying out laser surgery – An advance payment of Rs. 5,00,000/- made as part of its market price of Rs.12,20,000/- -- Opposite party agreed if it gave any trouble to provide free service agreed – After its installation several defects noticed when put into operation – It also appeared to be an old model as averred by a service engineer of the opposite party though they had represented it to be a new one – Malfunctioning of the machine brought to the opposite party’s notice but defects not removed due to non-availability of spare parts – Opposite party made an offer to supply a new machine on the same cost of Rs. 12,20,000 minus the amount of Rs. 5,00,000 already paid – Complainant expressed reservation regarding the offer – Hence, the refund sought alongwith compensation for financial loss and mental harassment – Machine purchased long back in the year 1997 and used by her during this period though, it was not trouble free—Complainant asked to return the machine on the condition that the opposite party paid her Rs. 4,00,000.
Dr. Sushma Verma
-V/s.-
Gainwell Medimart Ltd.
2008-CTJ-106 (CP)(SCDRC)
****** ****** ****** ******
11. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केलेला आहे की, अर्जदाराने तक्रारीत उत्पादक कंपनी, बायो केमीकल सिस्टीम इंटरनॅशनल, इटली याला पक्ष न केल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी. परंतु, गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाण हा शपथपञावर दाखल केला नाही, तसेच लेखी बयाणातील कथना पृष्ठयर्थ शपथपञही दाखल केलेला नाही. त्यामुळे, भारतीय पुरावा कायद्याच्या तरतुदी नुसार, गैरअर्जदाराचे म्हणणे मान्य करण्यास पाञ नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने, पोष्टामार्फत लेखी बयाण बिना शपथपञाने पाठविला, तो निशाणी 6 वर दाखल आहे.
12. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात पुढे असा मुद्दा उपस्थित
केला आहे की, अर्जदारास मशीन लावून दिल्यानंतर 5-6 महिने पार केल्यावर पहिल्यांदाच दिनांक 18/4/2007 ला तक्रार केली. वास्तविक,
... 9 ...
... 9 ...
गैरअर्जदाराने MLP मशीन 5/12/06 ला लावल्यानंतर गॅरंटी कालावधी हा 5/12/07 पर्यंत होता. त्याच कालावधीत मशीनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे वारंवार गैरअर्जदाराशी पञ व्यवहार करण्यात आला. त्याच्या प्रती अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या आहेत. तसेच, गैरअर्जदाराने, लेखी बयाणासोबत सर्व्हीस रिपोर्ट दाखल केलेल्या आहेत. त्यानुसार वेळोवेळी मशीनमध्ये दोष निर्माण झाला होता. त्यामुळे, गॅरंटी कालावधीतच दोष निर्माण झाल्यामुळे व पहिली दिलेली मशीन योग्यप्रकारे काम न केल्यामुळेच दूसरी 26/10/07 ला बसवून देण्यात आली. त्या मशीनची सुध्दा गॅरंटी 12 महिन्याची देण्यात आल्याचे व्हाऊचर नुसार सर्व्हीस रिपोर्ट नं. 219, दि. 30/6/07 च्या सर्व्हीस रिपोर्टमध्ये अंडर वॉरंटीवर मार्क (चिन्ह) केला असल्याचे दिसुन येते. त्याची प्रत Annecture-7 वर अर्जदाराने दाखल केलेला आहे. Annecture - 13, 14 वरुन मशीन ही वॉरंटी कालावधीत असल्याची बाब स्पष्ट होते. सर्व्हीस रिपोर्टवर अर्जदार व गैरअर्जदाराच्या प्रतीनीधीच्या सहया आहेत. गैरअर्जदाराने आपले लेखी बयाणात घेतलेला मुद्दा शपथपञावर नसल्यामुळेच, ग्राहय धरण्यास पाञ नाही. तरी तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याचे दृष्टीने नैसर्गीक न्यायाचा विचार केल्यास गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. गैरअर्जदाराने, पुरविलेली मशीन दोषयुक्त असल्यामुळे त्याची पुर्ण किंमत व्याजासह परत करण्यास पाञ आहे. गैरअर्जदाराने, आपले लेखी बयाणात उपस्थित केलेला मुदतीचा मुद्दा ग्राह्य धरण्यास पाञ नाही. गैरअर्जदाराचे लेखी बयाणानुसार अर्जदाराने तक्रार ही 1 वर्ष 6 महिन्याचे नंतर म्हणजेच वॉरंटी कालावधीनंतर दाखल केली असल्यामुळे खारीज करण्यास पाञ आहे. परंतु, गैरअर्जदाराचे वरील म्हणणे संयुक्तीक नाही. गैरअर्जदाराने, पहिल्या मशीनच्या ऐवजी दूसरी मशीन 26/10/07 ला बसवून दिल्यानंतर, त्यात निर्माण झालेला दोष निर्माण होऊन, योग्यप्रकारे काम करीत नसल्यामुळे, सदर तक्रार ही दिनांक 22/9/08 ला दाखल केलेली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24-ए नुसार तक्रार ही मुदतीत आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. याच आशयाचे मत, आदरणीय, उत्तरांचल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, लखनौ यांनी ‘ओनीडा साका लिमिटेड अॅन्ड इतर –विरुध्द–
... 10...
... 10 ...
डॉ.एस.सी. जैन’, III (2000) CPJ-313, या प्रकरणात आपले मत दिले आहे. त्यात दिलेले मत याप्रकरणाला लागु पडतो, त्यातील महत्वाचा भाग खालीलप्रमाणे.
(i) Consumer Protection Act, 1986—Section – 2(1)(f) – Defect—V.C.R.—Purchased by complainant – Defect – Replaced by another V.C.R. – That too defective – Could not be rectified by opposite party – Opposite party liable to refund cost of V.C.R.
(ii) Consumer Protection Act, 1986 --- Section 17/12 --- Complaint – Limitation --- V.C.R. purchased on 15.1.1991 --- Replaced on 2.6.1992 --- Again sent for repairs – Returned unrepaired on 15.9.1995 --- Complaint filed in 1996 --- Complaint is not barred by limitation.
Onida Saka Limited & Ors.
-V/s.-
Dr. S.C. Jain
III (2000) CPJ-313
****** ****** ****** ******
13. अर्जदाराकडून कमीश्नर फी म्हणून रुपये 500/- न्यायमंचात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. परंतु, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांनी निशाणी 10 नुसार पञ देऊन, मॅपलॅब मशीन उपलब्ध नाही व तसा तज्ञ नाही. त्यामुळे, तपासणी करता येत नाही असे कळविले असल्याने, कमीश्नर फी अर्जदारास परत करणे उचीत होईल. गैरअर्जदार यांनी आपले लेखी बयानात मॅपलॅब मशीन ही शासकीय रुग्णालयात, सैनीक दवाखान्यात इत्यादी ठिकाणी पुरविल्याचे म्हटले आहे. परंतु, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे म्हणणे नुसार सदर प्रकारची मशीन नाही आणि तंज्ञ नाही. त्यामुळे कंपनीशी व्यवहार करावा यावरुन ही गैरअर्जदार यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही.
14. गैरअर्जदाराने, अर्जदारास पुरविलेल्या मॅपलॅब मशीनने योग्यप्रकारे काम केले नाही. वारंवार गैरअर्जदाराशी पञ व्यवहार करावा लागले असल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन दिसुन येत आहे. गैरअर्जदारास वारंवार मशीनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानसिक, शारीरीक ञास सहन
... 11 ...
... 11 ...
करावा लागला. गैरअर्जदाराने, अर्जदारास योग्यप्रकारे सेवा दिली नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे, मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 :-
15. वरील मुद्दा क्र. 1 ते 3 चे विवेचनावरुन अर्जदाराची तक्रार मंजुर करुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
(2) गैरअर्जदाराने, मॅपलॅब मशीनची किंमत रुपये 2,50,250/- तक्रार दाखल केल्यापासून दिनांक 22/9/08 पासून 9 % टक्के व्याज दराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(3) अर्जदारास, मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) कमीश्नर फी पोटी न्यायमंचात जमा केलेले रुपये 500/- अर्जदारास, प्रबंधक यांनी द्यावे.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
चंद्रपूर.
दिनांक – 9/1/2009.