जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –178/2010 तक्रार दाखल तारीख –08/12/2010
मिटकर नितीन पि.मधुकर
वय 28 वर्षे,धंदा व्यापार ..तक्रारदार रा.सहयोब नगर, बीड
विरुध्द
मे. सुभाष इण्डेन
इण्डेन गॅस डिस्टीब्युटर्स,सर्व्हे नं.6,
बीड-परळी रोड, बार्शी नाका,बीड. ...सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.एस.एम.देशपांडे
सामनेवाले तर्फे - अँड.एम.के.पोकळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार बीड येथील रहिवासी असून त्यांचे झेन पॅन सर्व्हीसेस या नांवाने बीड शहरामध्ये पॅन कार्डची एजन्सी आहे.
तक्रारदाराने सामनेवालाकडून दि.27.3.2007 रोजी एक रेग्यूलेटर व दोन सिलेंडर असलेले कनेक्शन घरगुती वापरासाठी नियमानुसार रु.1800/-भरुन खरेदी केलेले आहे. त्यांचा ग्राहक क्र.एसआय 9381 असून सामनेवाला यांनी खातेपुस्तक पावती तक्रारदारांना दिलेली आहे. याशिवाय इतर कोणत्याही कंपनचीचे गॅस कनेक्शन तक्रारदाराचे नाही.
तक्रारदारांनी सामनेवाला यांची नियमानुसार दिलेल्या हेल्पलाईनवर दि.5.6.2010 रोजी गॅस सिलेंडरची बुकींग केली. त्यांचा नंबर1032 आहे. तक्रारदाराने त्यांचेकडील रिकामे सिलेंडर टाकी सामनेवाला यांना देऊन नवीन भरलेली टाकी दि.15.6.2010 रोजी घेतली. सामनेवाला यांनी तक्रारदारराचे खातेपुस्तिकेमध्ये दिलेल्या गॅस सिलेंडरची रितसार नोंद करुन घेतली परंतु खातेपुस्तिकेमध्ये गॅस सिलेंडरचा अनुक्रमांकाचा रकाना असताना सूध्दा सिलेंडरचा नंबर सामनेवाला यांनी नमुद केले नाही.त्या वेळचा गॅस सिलेंडरचा सिरियल नंबर 700173 आहे.
गॅस सिलेंडर तक्रारदार वापरीत असताना त्यांचा वॉल लिंक झाला त्यामुळे तक्रारदारांनी गॅस सिलेंडर असताना बाजूला काढून ठेवले व दूसरे गॅस सिलेंडर वापरण्यास सूरुवात केली. दरम्यानच्या काळात तक्रारदारांनी लिंक झालेले वॉल स्वतंत्र दूरुस्त करुन घेतले व सदरचे गॅस सिलेंडर वापरले.
सदर गॅस सिलेंडर संपल्यानंतर दि.25.10.2010 रोजी रितसर गॅसची बूकींग केली. त्यांचा अनुकंमाक 43 होता. त्यानंतर आठ दिवस म्हणजे दि.3.11.2010 रोजी तक्रारदारा त्यांचेकडे दि.15.6.2010 रोजी घेतलेले रिकामे गॅस सिलेंडर घेऊन नवीन गॅस सिलेंडर आणण्यासाठी गेले असता सामनेवाला चे गॅस एजन्सी मध्ये गेले असता सामनेवाला यांनी सिलेंडर देण्यास इन्कार केला. सदरचे सिलेंडर हे आमचे एजन्सी मधून घेतलेले नाही.
तक्रारदारांनी सामनेवाला यांना विनंती की, मी दोन तासापासून लाईनमध्ये उभा आहे माझेकडे आपल्या गॅस कंपनी शिवाय इतर कोणत्याही कंपनीचे गॅस कनेक्शन नाही परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचे काही एक ऐकून घेतले नाही व उलट तक्रारदारास सामनेवाला यांनी उध्दट व उर्मटपणाची भाषा वापरुन आमचे कोणी काहीही करु शकत नाही असे म्हणून सर्व लोकासमोर लाईन मधून बाहेर काढून अपमानित केले.
त्यामुळे तक्रारदाराचे ऐन दिवाळीचा सण काळात गॅस सिलेंडर न दिल्यामुळे तक्रारदारास दिवाळीचा स्वयंपाक चुल व स्टोव्ह वर करावे लागले. तक्रारदारास मित्र परिवार व नातेवाईकासमोर अपमानित व्हावे लागले. स्टोव्हसाठी रु.50/- लिटर प्रमाणे 10 लिटर रॉकेल आणावे लागले व लागत आहे. सामनेवाला यांनी अशा प्रकारे सेवेत कसूर केला. तसेच तक्रारदाराचे पॅनकार्ड एजन्सी बंद राहिल्यामुळे जवळपास रु.10,000/- चे नुकसान झाले आहे व होत आहे. मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला व लागत आहे.
दि.01.11.2010 रोजी तक्रारदारांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली, सदरची नोटीस दि.09.11.2010 रोजी नोटीस स्विकारुन सुध्दा मुदतीमध्ये तक्रारदार यांची मागणी पूर्ण केली नाही. नोटीसचे उत्तर दिले नाही.
झालेल्या आर्थिक मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.10,000/-,व्यवसाय बंद राहिल्यामुळे आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- नोटीस खर्च रु.1,000/- तक्रारीचा खर्च रु.2,000/- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना देण्या बाबत आदेश व्हावेत तसेच गॅस सिलेंडर तक्रारदारास बूकींग केल्यावर घरपोहच आणून दयावे असे आदेश करावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.10.02.2011 रोजी दाखल केला. खुलासात सामनेवाला विरुध्दचे सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. दि.25.10.2010 रोजी तक्रारदाराने अनुक्रमांक नं.43 नुसार सामनेवाला यांचेकडे गॅस बूकींग केल्यानंतर त्यांला सामनेवालेकडून गॅस सिलेंडर देण्यात आले नाही. त्यांचे कारण तक्रारदार यांस नियमानुसार दोन गॅस सिलेंडरचे कनेक्शन दिले गेले होते. दि.16.7.2010रोजी बूकींग अनुक्रमांक 562 नुसार दि.6.8.2010 रोजी तक्रारदाराने सिलेंडर नंबर 734106 सामनेवाला कडून नेले होते. तसेच दि.2.10.2010 रोजी देखील सिलेंडर नंबर 471468 सामनेवालाकडून तक्रारदाराने नेले होते. ज्यावेळी दि.25.10.2010 रोजी तक्रारदार हे सिलेंडर घेऊन जाण्यासाठी पून्हा सामनेवालाकडे आले त्यावेळी त्यांनी आलेले सिलेंडर उपरोक्त दोन्ही अनुक्रमांकापैकी एक सिलेंडर तक्रारदाराने सामनेवालास परत करणे आवश्यक होते परंतु तसेच असे न करता अर्जदाराने या दोन्ही नंबर व्यतिरिक्त तिस-याच क्रमांकाचे सिलेंडर सामनेवाला कडे आणले होते व ते घेऊन मला नवीन सिलेंडर दया अशी तक्रारदार यांची मागणी होती, ती मूळातच बेकायदेशीर आहे.
कंपनीचे नियमावलीनुसार एखादया ग्राहकास सिलेंडर देते वेळेस जे नंबररजिस्टर्ड केले जातात, त्याच नंबरचे सिलेंडर त्यांने नवीन गॅस सिलेंडर घेऊन जाताना परत कंपनीस दिले गेले पाहिजे, जर त्यांने दुस-या क्रमांकाचे सिलेंडर कंपनीकडे घेऊन आलेला असेल ज्याची नोंद कंपनीकडे नसेल, तर कंपनी त्यांस रजिस्टर झालेल्या सिलेंडरच्या व्यतिरिक्त कंपनी नवीन सिलेंडर ग्राहकास देऊ शकत नाही.
तक्रारदारांनी जे सिलेंडर रजिस्टर केले होते ते न आणता दुसरेच सिलेंडर घेऊन सामनेवालाकडे आल्यामुळे सामनेवाला यांनी त्यांससिलेंडर देण्यास इन्कार केलेला आहे. म्हणून यात सामनेवाला यांनी दयावयाच्या सेवेत कसूर केलेला नाही. आजही सामनेवाले तक्रारदाराने रजिस्टर केलेला सिलेंडर आणून दिल्यास, त्यांस सिलेंडर देण्यास तयार आहेत.
तक्रारदाराची तक्रार चूकीची व सामेनवाला कंपनीयांना त्रास देण्याच्या दुषीत हेतूने व कंपनीची ग्राहकामध्ये बदनामी व्हावी यादूष्टीने तक्रार केलचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण खोटी तक्रार दिल्यामुळे विशेष खर्च रु.20,000/-देणे न्यायोचित होईल.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, शपथपत्र, तक्रारदाराचे साक्षीदार शरद प्रकाशराव घोडके यांची शपथपत्र नि.12 व अजय अंकुशराव घोडके यांचे शपथपत्र दि.13, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवालेकडून गॅस जोडणी घेतली असल्याची बाब सामनेवाला यांना मान्य आहे व तसेच दि.25.10.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना, तक्रारदारांनी त्यांचे नियमावालीनुसार नंबर लावलेला असताना देखील गॅस सिलेंडर दिली नाही ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तथापि, सामनेवाला यांचे या संदर्भात म्हणणे की, तक्रारदाराच्या गॅस पूस्तिकेमध्ये दिलेल्या गॅस सिलेंडरच्या नंबरा व्यतिरिक्त सदरचे सिलेंडर असल्यामुळे तक्रारदारांना गॅस सिलेंडर देता आले नाही.
या संदर्भात तक्रारदारांनी गॅस पूस्तिका दाखल केली आहे.सर्वात महत्वाचे की, तक्रारदाराची गॅस जोडणी या वेगळयाच कंपनीची आहे या व्यतिरिक्त दूसरी कोणतीही गॅस जोडणी नाही ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही.
गॅस पूस्तिका पाहता प्रत्येक ठिकाणी गॅस वितरक कंपनीने सिलेंडरचे नंबर गॅस सिलेंडर देताना लिहील्याचे दिसत नाही. त्या संदर्भात विशेष उल्लेखनिय दिनांक विचारात घेता दि.23.7.2009,10.9.2009,15.10.2009,26.4.2009,9.3.2010,20.4.2010 15.6.2010 या दिनांकाना सदर कंपनीने तक्रारदारांना कोणत्याही नंबरचे सिलेंडर दिले यांचा उल्लेख नाही. दि.6.8.2010, 16.7.2010 रोजीच्या नंबर 562 नुसार तक्रारदारांना गॅस सिलेंडर नंबर 734106 आणि दि.2.10.2010 रोजी नंबर 490 नुसार 471468 असे दोन सिलेंडर दिलेले आहेत.
या संदर्भात तक्रारदाराच्या तक्रारीत स्पष्टपणे त्यांनी नमूद केले आहे की, दि.15.6.2010 रोजी त्यांना सामनेवाला यांनी गॅस सिलेंडर नंबर 700173 चे दिलेले आहे. ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. तसेच सदरचे गॅस सिलेंडर हे त्यांचेकडे असलेल्या गॅस सिलेंडरच्या सिरीजमध्ये नसल्याचेही त्यांचे म्हणणे नाही. रजिस्टर केलेल्या सिलेंडर नंबरप्रमाणे ग्राहकाने कंपनीला तोच सिलेंडर परत केला पाहिजे जे की ही जबाबदारी ग्राहकाची आहे तशीच जर ग्राहकाकडे वितरक कंपनीच्या एजन्सी शिवाय दूसरा कोणत्याही कंपनीचे सिलेंडर नसते आणि जर ज्या कंपनीकडून गॅस सिलेंडर गॅस जोडणी घेतली आहे त्या कंपनीने जर गॅस कार्डावर सिलेंडरच्या नंबरची नोंद केलेली नसेल, संबंधीत ग्राहकाकडे या गॅस वितरक कंपनी दूस-या नंबरचे सिलेंडर येण्याची कोणतीही शक्यता नाही. निश्चितपणे दोन सिलेंडरचे दोन नंबर जरी दिसत असले तरी दि.15.6.2010 रोजी वितरक कंपनीने तक्रारदारांना कोणत्या नंबरचे सिलेंडर दिले यांचा खुलासा गॅस सिलेंडर कंपनी त्यांचे रेकार्डवरुन करु शकत होती व त्यासाठी जरी त्यांची नोंद पूस्तिकेत नसेल तर त्यांची नोंद गॅस वितरक कंपनीकडे असणे आवश्यक आहे.
या संदर्भात सदरचे सिलेंडर वरील पैकी दोन सिलेंडरच्या पावतीवर असल्याने गॅस वितरक कंपनीमध्ये तक्रारदारांना रिकामे सिलेंडर परत घेऊन नवीन भरलेले सिलेंडर त्यांने नियमाप्रमाणे कारवाई केलेली असताना देखील दिलेले नाहीत. यात सामनेवाला तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केले ही बाब स्पष्ट होते.
सामनेवाला यांचे खुलासात संबंधीताचा खुलासा व शपथपत्र या व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्रे त्यांनी दाखल केलेले नाही. सदरचे सिलेंडर गॅस वितरक कंपनीचे नाही असे कंपनीचे म्हणणे नाही. केवळ गॅस पुरवठा त्यांचा उल्लेख केलेला नाही म्हणून संबंधीत कंपनीने सदरचे सिलेंडर नाकारलेले आहे ही बाब निश्चितच गंभीर स्वरुपाची आहे आणि तक्रारदारांना त्यांनी योग्य त-हेने सेवा दिली असे दिसत नाही.त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदाराकडून रिकामे सिलेंडर नंबर 700173 चे रिकामे सिलेंडर घेऊन नवीन सिलेडर देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी त्यामुळे झालेल्या त्रासा बाबत तक्रारदारांनी मागणी केलेली आहे त्या बाबत विचार करता तक्रारदाराकडे दोन सिलेंडर असल्यामुळे दोन्ही सिलेंडर एकाच वेळी रिकामे झाले असे तक्रारदाराचे म्हणणे नाही. परंतु नियमाप्रमाणे कारवाई केलेली असताना व डिलेव्हरीसाठी तक्रारदारांचा नंबर देय असताना सामनेवाला यांनी सिलेंडर न दिल्याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळे मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.2,000/-व तक्रारीचा खर्च रु.1,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतःमंजूर करण्यात येते.
1.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना दि.25.10.2010 रोजीच्या अनुक्रमांक 43 प्रमाणे सिलेंडर नंबर 700173 रिकामे सिलेंडर घेऊन नवीन भरलेले सिलेंडर आदेश प्राप्तीपासून एक महिन्याचे आंत दयावेत.
2.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- आदेश प्राप्तीपासून एक महिन्याचे आंत दयावेत.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना कंपनीचे नियमाप्रमाणे घरपोहच सिलेंडर देण्यात यावे.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड