Complaint Case No. CC/12/50 |
| | 1. M/s.Ayodhya Nagri Bldg No.2, Sahakari Gruh Nirman Sanstha, Through Mr.Deepak Gurav & Other 2. | Flat No.B- 204, M/s.Ayodhya Nagri Bldg No 2 Society, Vijay Nagar, Naringi Rd, Virar(E), Tal vasai, Thane | Thane | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/s.Siddhivinayak Builder & Developers, Through Partners | Shop No 7, Savitri Sadan, Behind Ganpati Temple, Naringi Road, Virar(E), Tq.Vasai, Thane | 2. M/s.Siddhivinayak Builder & Developers, Through Partners | Shop No.7, Savitri Sadan, Behind Ganpati Temple, Naringi Road, Virar(E), Tq.Vasai, Thane. | 3. Mr.Nandkumar Harishchandra Patil | At A- 102/103, Agasti Apt,Varad Vinayak Lane,Virar east ,Tal Vasai Dist Palghar | Palghar | Maharashtra | 4. Mr.Shobhnath Subhedar Yadav | At 103, Saraswati Apt,Near Rice mill, Chandansar Rd, Virar east ,Tal Vasai ,Dist Palghar | Palghar | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | Dated the 29 Jan 2016 न्यायनिर्णय (द्वारा मा.श्री. ना.द. कदम - मा. सदस्य ) - सामनेवाले क्र. 1 ही बांधकाम व्यावसायिक भागीदारी संस्था आहे. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र. 1 या संस्थेचे भागीदार आहेत. तक्रारदार ही विरार येथील सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेच्या लाभांत हस्तांतरणपत्र न करुन दिल्याच्या बाबीतून प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
- तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनानुसार सामनेवाले यांनी विरार येथे अयोध्यानगरी, बिल्डींग नं.2, ए.बी. व सी. विंग असलेल्या इमारती बांधून सदनिका इच्छुक ग्राहकांना विकल्या. यानंतर तक्रारदारांनी सदस्यांची सहकारी संस्था दि. 25/11/2010 रोजी नोंदणीकृत करुन घेतली. त्यानंतर इमारतीसह भूखंडाचे हस्तांतरणपत्र करुन देण्यास सामनेवाले यांना अनेकवेळा लेखी व तोंडी विनंती करुनही सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन संस्थेच्या नांवे हस्तांतरणपत्र करुन मिळावे, मानसिक/शारिरीक त्रासाबद्दल रु. 25,000/- व तक्रार खर्चाबद्दल रु. 15,000/- मिळावेत अशा मागण्या तक्रारदारांनी केल्या आहेत.
- सामनेवाले यांना पाठविण्यात आलेली तक्रारीची नोटीस स्विकारण्यास सामनेवाले यांनी नकार दिल्यामुळे व त्यानंतर त्यांना बराच काळ संधी देऊनही लेखी कैफियत दाखल न केल्याने तक्रार एकतर्फा चालविण्याचे आदेश दि. 18/09/2014 रोजी पारीत करण्यात आले.
- तक्रारदारांनी पुरावा शपथपत्राची पुरसिस दिली व लेखी युक्तीवाद दाखल केला. शिवाय संस्थेच्या इमारतीखालील भूखंडाचे क्षेात्रफळाचे परिगणन करुन त्याबाबत वास्तूविशारदाचे प्रमाणपत्रही आणले. तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणात खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतातः
-
अ. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले यांनी विरार येथील मौजे नारिंगी, सर्व्हे नं. 215, हिस्सा नं. 4 आणि 17 येथे 155 सदनिकेचा समावेश असलेल्या, तळमजला अधिक 4 मजल्याच्या 4 इमारतीचा समावेश असलेला अयोध्यानगरी, हा प्रकल्प विकसित केला. सदर 4 इमारतींपैकी इमारत क्र. 2 ए,बी व सी विंग या इमारतीमधील सदनिकाधारकांनी दि. 25/11/2010 रोजी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. यानंतर तक्रारदारांनी संस्थेच्या नांवे हस्तांतरणपत्र करुन देण्याची अनेकवेळा विनंती केली तसेच कायदेशीर नोटीस देऊनही सामनेवाले यांनी कोणतीही कृती केल्याचे दिसून येत नाही. वास्तविक, मोफा कायदयातील तरतुदीअन्वये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यापासून 4 महिन्यांच्या आंत विकासकाने संस्थेच्या नांवे इमारत व भूखंडासह हस्तांतरणपत्र करुन देणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. तथापि, वर्ष 2010 मध्ये सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर सामनेवाले यांनी आपले वैधानिक कर्तव्य पार पाडल्याचे दिसून येत नाही. ब. तक्रारदारांनी तक्रारीच्या मागणीमध्ये अयोध्यानगरी बिल्डींग नं.2 सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. या संस्थेच्या लाभांत म्हणजे केवळ बिल्डींग नं. 2 चे हस्तांतरण करुन देण्याची मागणी केली आहे. तथापि सिडको प्रशासनाने पत्र क्र. CDCO/VVSR/VV/BP-3660/E/4054 दि. 16/08/2007 नुसार बांधकामाचे कमेंन्समेंट सर्टिफिकेट दिले आहे. त्यामध्ये स.नं. 215 हि.नं.4 आणि 17 या 4320.45 चौ.मी. क्षेत्रफळाचे भूखंडावर 155 सदनिकांचा समावेश असलेल्या 4 इमारती बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. सदर परवानगी ही तक्रारदार संस्थेच्या इमारतीसह अन्य उर्वरीत इमारतीसाठीही असल्याने कमेंसमेंट सर्टीफिकेटमधील क्षेत्रफळ हे सामायिक आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारदारांच्या ताब्यातील भूखंडाची सर्वैशिट दाखल करुन 1475.09 चौ.मी. क्षेत्रफळाचे हस्तांतरण करुन देण्याची विनंती दि. 29/09/2015 रोजी मंचामध्ये केली. उपरोक्त वस्तुस्थिती, अभिलेखावर असलेली कागदपत्रे व तक्रारदारांनी दाखल केलेल्या सर्वेशिटवरुन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः आ दे श - तक्रार क्रमांक 50/2012 अंशतः मंजूर करण्यात येते
- सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेच्या लाभांत हस्तांतरणपत्र करुन न देऊन त्रुटीची सेवा दिलाचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी दि. 15/04/2016 पूर्वी तक्रारदार संस्थेच्या इमारतीसह 1475.09 चौ.मी. क्षेत्रफळ भूखंडाचे हस्तांतरणपत्र तक्रारदार संस्थेच्या लाभांत करुन दयावे. सदर आदेशाची पूर्तता विहीत कालावधीमध्ये न केल्यास दि. 16/04/2016 पासून आदेशपूर्ती होईपर्यंत प्रतिदिन रु. 1,000/- प्रमाणे रक्कम तक्रारदारांना दयावी.
- तक्रार खर्चाबद्दल रु. 20,000/- सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेला दि. 15/04/2016 पूर्वी अदा करावेत.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब/विनाशुल्क देण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.
| |