Maharashtra

Kolhapur

CC/14/112

Vinayak Shankar Walvekar - Complainant(s)

Versus

M/s.Shivnandi Construction through Prop. Amar Baburao Patil - Opp.Party(s)

S.M.Potdar

17 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/14/112
 
1. Vinayak Shankar Walvekar
'Shivanandi Prasad' Apartment, C.S.No.1869/A/1, B Ward, Kasaba Karvir
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. M/s.Shivnandi Construction through Prop. Amar Baburao Patil
64823/1, B Ward, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
For the Complainant:S.M.Potdar, Advocate
For the Opp. Party:
O.P. Absent. Exparte.
 
ORDER

नि का ल प त्र:- (श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष) (दि .17-09-2014) 

1)   प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे वि. प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे. 

     प्रस्‍तुत तक्रार अर्ज स्विकृत करुन वि.प. यांना  नोटीसीचा आदेश झाला.   वि.प. गैरहजर.  तक्रारदार यांचे वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. 

  2)    तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

        वि.प. हे बिल्‍डर व डेव्‍हलपर्स आहेत.  कोल्‍हापूर  शहर महानगरपालिका हद्दीतील  सि.स. नं. 1869/ए/1,  बी वॉर्ड, कोल्‍हापूर ही मिळकत श्री. रणजित मुलचंद शहा यांची मिळकत विकसित करुन तेथे ‘शिवनंदी प्रसाद ‘या नावाची अपार्टमेंट उभारलेली आहे.  तक्रारदार यांना स्‍वत:करिता व कुटुंबाकरिता राहणेसाठी फलॅटची आवश्‍यकत असलेने वि.प. यांनी डेव्‍हलप केलेली ‘शिवानंदी प्रसाद’ मध्‍ये फलॅट विक्रीकरिता असलेचे समजलेने तक्रारदार यांनी वि.प. बरोबर बोलणी करुन त्‍यानुसार वि.प. यांनी तक्रारदारास शिवानंदी प्रसाद अपार्टमेंट मधील रो टाईप फॅमिली युनिटपैकी तळमजल्‍यावरील फॅमिली युनिट नं. 4, क्षेत्र- 47-39 चौ. मी.  बिल्‍टअप व सोबत 22.30 चौ.मी. खुली जागा याची चतु:सिमा पूर्वी- सि.स. नं. 1924, पश्चिमेस- युनिट नं. 5, व खुली जागा, दक्षिणेस – युनिट नं. 3 व खुली जागा व उत्‍तरेस महानगरपालिकेची शाळा असे युनिट तक्रारदाराने वि.प. कडून खरेदी केलेला आहे.  सदर युनिटचा तक्रारदारांशी खरेदीपूर्व रजि. करार  करणेपूर्वी सदर युनिट दि. 10-12-2004 रोजी रजि. अॅग्रीमेंट टू सेल दस्‍त नं. 7495/2004या नोंदणीकृत दस्‍ताअन्‍वये श्री. निवास दौलतराव कुंभार यांचेकडून रक्‍कम रु. 4,20,000/- इतकी रक्‍कम स्विकारुन  त्‍यांना विक्री करणेचे ठरविलेले होते.  मात्र सदर श्री. निवास कुंभार यांनी सदर युनिट खरेदी करणेचे रद्द केलेने  वि.प. यांनी सदर युनिटचा व्‍यवहार तक्रारदारांबरोबर निश्चित केला व  सदर श्री.निवास दौलतराव कुंभार यांची रीतसर मान्‍यता घेऊन वि.प. यांनी सदर युनिटचे रजि. अॅग्रीमेंट टू सेल दस्‍त नं. 2078/2005 तक्रारदारास दि. 14-06-2005 रोजी करुन दिलेले आहे.  सदर करारपत्रात ठरलेप्रमाणे श्री. निवास दौलतराव कुंभार ने त्‍यांचेकडून स्विकारलेली रक्‍कम रु. 4,20,000/- व वाढीव रक्‍कम रु. 1,00,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 5,20,000/- ही तक्रारदाराने अदा केलेली आहे.  सदर मोबदला व करारपत्राप्रमाणे अन्‍य रक्‍कमा भागविल्‍यामुळेच वि.प. यांनी सदर मिळकतीचा ताबा तक्रारदार यांना दिलेला आहे.  सदर मिळकतीचा ताबा मिळालेनंतर तक्रारदाराने  वेळोवेळी  कोल्‍हापूर महानगरपालिका यांचेकडील घरफाळा, पाणीपटटी तसेच महावितरणची वीज बिलदेखील वेळोवेळी भरणा केलेली आहेत व करत आहेत.  वि.प. यांनी सदर युनिटचे खरेदीपत्र तक्रारदारास करुन दिलेले नाही.  तक्रारदारांनी वारंवार विचारणा करुन व भेटूनही वि.प. यांनी नमूद युनिटचे खरेदीपत्र करुन देणेस टाळाटाळ करत केली आहे.  वि.प. यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांना प्रचंड मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास भोगावा लागलेला आहे.   वि.प. यांनी तक्रारदारांना फलॅट नोंद खरेदीपत्र पूर्ण करुन न दिलेमुळे तक्रारीस सततचे कारण घडलेले आहे.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज मुदतीत आहे.  सबब, तक्रारदार यांना नमूद फलॅट युनिटचे खरेदीपत्र करुन मिळावे व सदर फलॅट युनिटचे नोंद खरेदीपत्र करुन देणेस वि.प. यांनी टाळाटाळ केल्‍यामुळे नोंद खरेदीपत्र करणेसाठी जो खर्च येईल तो सर्व खर्च वि.प. यांनी करणेचे आदेश व्‍हावेत. व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु. 50,000/- वि.प. कडून तक्रारदारांना मिळावेत.   व सदर तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- वि.प. कडून देणेत यावा अशी विनंती तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केली आहे.                             

3)     तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत.  अ.क्र. 1  कडे  तक्रारदाराने वकिलांमार्फत वि.प. ला दिलेली रजि.ए.डी. नोटीस दि. 20-02-2014, अ.क्र.2 कडे सदर नोटीस वि.प. यांनी नोटीस न स्विकारलेने परत आलेला लिफाफा दि. 25-02-2014, अ.क्र. 3 कडे वि.प. ने तक्रारदारास करुन दिलेले रजि.खरेदीपूर्व करारपत्र – अॅग्रीमेंट टू सेल दि. 14-06-2014, अ.क्र. 4 कडे तक्रारीचा विषय असणा-या युनिटची कोल्‍हापूर महानगरपालिकेकडील तक्रारदारांचे नावची मिळकत पत्रिका दि. 17-05-2006, अ.क्र. 5 कडे  म्‍युन्सिपल व महाराष्‍ट्र शासनाचे कराची पावती दि. 19-01-2012, अ.क्र. 6 कडे तक्रारदाराचे नावचे जल आकारणी देयक दि. 17-12-2012, अ. क्र.7 कडे तक्रारदाराचे नावचे वीज आकारणी देयक दि. 02-02-2014 इत्‍यादी प्रती दाखल केलेल्‍या आहेत.     

4)      वि.प. यांना मंचाची नोटीसीची लागू होऊन ते प्रस्‍तुत कामी मंचापुढे हजर नाहीत त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि. 28-08-2014 रोजी एकतर्फा” आदेश पारीत करणेत आले.

5)   तक्रारदारांची तक्रार, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदारांनी दाखल केलेली  पुरसीस, व तक्रारदारांचे वकिलांचा युक्‍तीवादाचा विचार करता पुढील  मुद्दे निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.

               मुद्दे                                                                            उत्‍तरे                      

 

1.   सदरची तक्रार मुदतीत आहे का ?                                       होय.

2.   वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत

     त्रुटी ठेवली आहे का ?                                                          होय.

3.   तक्रारदार‍ मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम

     मिळणेस पात्र आहेत का ?                                                 होय.             

4.   आदेश काय ?                                                              तक्रार अशंत: मंजूर. 

 

कारणमीमांसा:-

मुद्दा क्र. 1  :

             तक्रारदार व वि.प. यांचे दरम्‍यान ‘शिवानंदी प्रसाद अपार्टमेंट मधील ‘रो टाईप फॅमिली युनिटपैकी तळमजल्‍यावरील फॅमिली युनिट नं. 4, क्षेत्र- 47-39 चौ. मी.  बिल्‍टअप व सोबत 22.30 चौ.मी. खुली जागा याची चतु:सिमा पूर्वी- सि.स. नं. 1924, पश्चिमेस- युनिट नं. 5, व खुली जागा, दक्षिणेस – युनिट नं. 3 व खुली जागा व उत्‍तरेस महानगरपालिकेची शाळा  या मिळकतीचे  अॅग्रीमेंट टू सेल दि. 14-06-2005 रोजी दस्‍त क्र. 2078/2005 प्रमाणे नोंदणीकृत अॅग्रीमेंट टू सेल करुन दिले आहे.   तक्रारदारांना मिळकतीचा ताबा वि.प. कडून मिळालेला आहे असे तक्रारीत नमूद आहे.   तक्रारदार यांनी सदरची तक्रार सन 2013 साली दाखल केली आहे.  त्‍यामुळे सदरची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदाराने वेळोवेळी वि.प. यांचेकडे तोंडी वर नमूद मिळकतीचे खरेदीपत्र पूर्ण  करुन देणेची मागणी केली.  तरीदेखील वि.प. यांनी खरेदीपत्र पुर्ण करुन दिलेले नाही.  तक्रारदारांनी दि. 20-02-2014 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली व त्‍या नोटीसीमध्‍ये सदर मिळकतीचे खरेदीपत्र पुर्ण करुन देणेबाबत मागणी केली.   वि.प.यांनी सदरची नोटीस न स्विकारता परत आली आहे.   वि.प. यांनी तक्रारदारांना मिळकतीचे खरेदीपत्र आजतागायत करुन दिलेले नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणेस सततचे कारण (continuous cause of action) घडले आहे. सबब, सदरची तक्रार मुदतीत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी देत आहे.       

मुद्दा क्र. 2  :

                    तक्रारदार व वि.प. यांचे दरम्‍यान ‘शिवानंदी प्रसाद अपार्टमेंट मधील ‘रो टाईप फॅमिली युनिटपैकी तळमजल्‍यावरील फॅमिली युनिट नं. 4, क्षेत्र- 47-39 चौ. मी.  बिल्‍टअप व सोबत 22.30 चौ.मी. खुली जागा याची चतु:सिमा पूर्वी- सि.स. नं. 1924, पश्चिमेस- युनिट नं. 5, व खुली जागा, दक्षिणेस – युनिट नं. 3 व खुली जागा व उत्‍तरेस महानगरपालिकेची शाळा  या मिळकतीचे  अॅग्रीमेंट टू सेल दि. 14-06-2005 रोजी दस्‍त क्र. 2078/2005 प्रमाणे नोंदणीकृत अॅग्रीमेंट टू सेल करुन दिले आहे.    सदर अॅग्रीमेंट टे सेल ची प्रत या कामी  अ.क्र. 3 कडे दाखल आहे यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार यांनी वि.प. यांना  रक्‍कम रु. 4,20,000/-  व वाढीव रक्‍कम रु. 1,00,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 5,20,000/- दिलेली आहे असे तक्रारदारांनी तक्रारीत कथन केले आहे.   तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.   तक्रारदार यांना मिळकतीचा ताबा मिळालेला आहे असे तक्रारदारांन तक्रार अर्जात कथन केले आहे.  तक्रारदाराने वेळोवेळी तोंडी वि.प. यांचेकडे खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे अशी विनंती केली आहे.  तरीदेखील वि.प. यांनी कोणतीही दखल घेतली नाही असे दिसून येते.  तदनंतर  तक्रारदारांनी वकिलामार्फत दि. 20-02-2014 रोजी रजि. नोटीस पाठवून खरेदीपत्र पूर्ण करुन द्यावे अशी मागणी केली आहे. त्‍याबाबतची नोटीसीची प्रत या कामी अ.क्र. 1 कडे दाखल आहे.   वि.प. यांनी सदरची नोटीस स्विकारलेली नाही.  तसा सदरचा पोस्‍टाचा परत आलेला लखोटा या कामी दाखल आहे.  तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे व शपथपत्र याचा विचार करता वि. प. यांनी तक्रारदारांकडून रक्‍कम रु. 5,20,000/- स्विकारुन आजतागायत वर नमूद मिळकतीचे रजि. सेल डीड तक्रारदारांना करुन दिलेले नाही.  वि.प. यांनी तक्रारदारांना वर नमूद केलेल्‍या मिळकतीचे नोंद खरेदीपत्र पुर्ण करुन न देऊन सेवेत त्रुटी केली आहे व वि.प. यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्‍कर्षाप्रत  हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर  हे मंच होकारार्थी देत आहे. 

मुद्दा क्र. 3   

     प्रस्‍तुतची तक्रार ही वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवलेमुळे   तक्रारदारांना दाखल करावी लागलेने तक्रारदारांना  मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला तसेच तक्रार दाखल करण्‍यासाठी खर्च करावा लागला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु. 3,000/- मिळण्‍यास पात्र आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र. 3  चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र. 4   सबब, मंच या प्रकरणी  खालीलप्रमाणे आदेश  पारीत करीत आहे.

                  

                                   दे

1.    तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.    वि. प. यांनी कोल्‍हापूर  शहर महानगरपालिका हद्दीतील सि.स. नं. 1869/ए/1,  बी वॉर्ड,  येथील ‘शिवानंदी प्रसाद अपार्टमेंट मधील ‘रो टाईप फॅमिली युनिटपैकी तळमजल्‍यावरील फॅमिली युनिट नं. 4, क्षेत्र- 47-39 चौ. मी.  बिल्‍टअप व सोबत 22.30 चौ.मी. तक्रारदारांना रजि. खरेदीपत्र पुर्ण करुन द्यावे.   

3.      वि.प.  यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) अदा करावेत.

4.     वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.