Maharashtra

Additional DCF, Thane

CC/10/234

Mr. Magaram chenaramji choudhary - Complainant(s)

Versus

M/s. SAi AuT DEvELOpERS THROuGH iTS pROp SiTS pROp. Si MuTi p. pATiL - Opp.Party(s)

adv. K.M. Thacker & S.R. Mohite

13 Jun 2011

ORDER


Consumer FroumThane Additional District Consumer Disputes Redressal Forum, Konkan Bhavan CBD Belapur, Navi Mumbai
CONSUMER CASE NO. 10 of 234
1. Mr. Magaram chenaramji choudhary SHiRvi SupER MARKET, SHiRAvANE viLLAGE, NuL, NAvi MuMbAi.THANEMAH. ...........Appellant(s)

Vs.
1. M/s. SAi AuT DEvELOpERS THROuGH iTS pROp SiTS pROp. Si MuTi p. pATiLAT SHOp NO.2, pLOT NO. 310,NAv vuN cHS ,SEcTOR 21 NR. NuL pOLicE STATiON , NAvi MuMbAiTHANEMAH. ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 13 Jun 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

-ःनिकालपत्र

                         

द्वारा-  मा.सदस्‍या,सौ.ज्‍योती अभय मांधळे,

 

1.           या पाचही तक्रारप्रकरणातील सामनेवाले सारखेच आहेत, तसेच तक्रारदार व सामनेवालेंमधील वादविषयसुध्‍दा समान  आहेत त्‍यामुळे कामकाजाच्‍या सोयीच्‍या दृष्‍टीने ही पाचही तक्रार प्रकरणे एकाच दिवशी निकालासाठी ठेवली आहेत, तसेच या एकत्रित आदेशान्‍वये पाचही तक्रार प्रकरणे निकाली काढण्‍यात येत आहेत.  ही बाब सर्वप्रथम स्‍पष्‍ट करण्‍यात येते. 

 

2.          तक्रारदारांची तक्रार खालीलप्रमाणे-

      तक्रारदर हे नेरुळ, नवी मुंबई येथील रहिवासी असून  सामनेवाले हे डेव्‍हलपर बिल्‍डर आहेत.  सामनेवालेचे ऑफिस नेरुळ, नवी मुंबई येथे आहे.  सामनेवालेनी नवी मुंबई कळंबोली येथे भूखंड क्र.64, सेक्‍टर 17 येथे साईअमृत इमारत बांधण्‍याचे ठरवले.  सामनेवालेनी सदर इमारतीचे काम 18 महिन्‍यामध्‍ये पूर्ण करण्‍याचे आश्‍वासन दिले व ताबा 18 महिन्‍यात देण्‍याचे कबूल केले.  सामनेवालेवर विश्‍वास ठेवून तक्रारदारानी खालीलप्रमाणे सदनिका बुक केल्‍या-

 

अ.क्र. 

तक्रार क्र.     

सदनिका क्र.     

मजला     

रक्‍कम रु.   

एरिया चौ.मी.

1.    

234/10     

बी-704

7वा     

10,08,175/-

सी.31.277  

2.   

235/10     

401 व 403.

4था.     

22,02,425/-

401- सी.30.633

403- सी.31.277

3.   

236/10

ए-703

7वा

10,50,250/-

सी.31.277

4.

237/10.

बी-602

6वा

10,38,000/-

सी.30.622

5.   

238/10

बी-504.

5वा

11,61,600/-

सी. 31.277.

 

2.          तक्रारदारानी दि.14-9-10 चे आवंटित पत्राप्रमाणे सामनेवालेस धनादेशाने रु.दोन लाख जमा केले.  त्‍याप्रमाणे सदर तक्रारीत धनादेश व पावतीची झेरॉक्‍स प्रत दाखल आहे. सामनेवालेनी बाकी रक्‍कम शेडयूलप्रमाणे देणेस सांगितले.  सामनेवालेनी तक्रारदाराना असे सांगितले की, अलॉटमेंट लेटर दिल्‍यास एक आठवडयाने ते तक्रारदाराना करारनामा रजिस्‍टर्ड करणेसाठी बोलावतील.  त्‍यानंतर सामनेवालेनी पुन्‍हा एकदा तक्रारदाराकडून सदनिकेच्‍या उर्वरित रकमेची मागणी केली, तेव्‍हा असे सांगितले की ही रक्‍कम दिल्‍यास ते त्‍वरीत रजिस्‍टर्ड करारनामा करुन देतील.   सामनेवालेच्‍या या आश्‍वासनावर विसंबून तक्रारदारानी सामनेवालेना खालीलप्रमाणे रकमा दिल्‍या-

1.     त.234 मध्‍ये रु.4,04,086/- दोन धनादेशाने दि.19-10-10 च्‍या.

2.    त.235 मध्‍ये रु.9,01,212/- दि.19-10-10 चे धनादेशाने.

3.    त.236 मध्‍ये रु.4,25,124/- दि.19-10-10 चे धनादेशाने.

4.    त.237 मध्‍ये रु.4,19,000/- दि.19-10-10 चे धनादेशाने.

5.    त.238 मध्‍ये रु.4,80,000/- दि.19-10-10 चे धनादेशाने.

3.          तक्रारदार पुढे म्‍हणतात की, ,मोफा कायदाच्‍या कलम 4 चे तरतुदीनुसार करारनामा झाल्‍याशिवाय बिल्‍डर सदनिका घेणा-याकडून 20 टक्‍क्‍याहून जास्‍त रक्‍कम घेऊ शकत नाही.  मोफा कायदयाच्‍या कलम 4 च्‍या तरतुदी मँडेटरी आहेत.  कलम 4 चे तरतुदीनुसार सामनेवालेनी तक्रारदारास त्‍या विहीत नमुन्‍याप्रमाणे करारनामा करुन दयायला हवा.  तक्रारदारानी त्‍याना अनेकदा करारनामा करण्‍यासाठी स्‍टॅम्‍प डयूटीचा खर्च करण्‍यास तयार असल्‍याचे सांगितले.  तसेच करारनामा रजिस्‍टर्ड करुन देण्‍याची मागणी केली परंतु सामनेवालेनी तसे केले नाही.  सामनेवालेवर मोफा कायदयाचे कलम 4 बंधनकारक आहे.  सामनेवालेनी अलॉटमेंट लेटरच्‍या पान 2 वर चुकीने अशी मागणी केली आहे, उर्वरित रकमेचा भरणा तक्रारदारानी दि.20-11-10 च्‍या पूर्वी किंवा त्‍या दिवशीपर्यंतच भरायला हवा, तसेच वेळेत भरणा न केल्‍यास त्‍या रकमेवर 24 टक्‍के व्‍याजाने पैसे घेतले जातील परंतु सामनेवालेनी मोफा कायदयाचा विचार न करता त्‍याचा भंग केला आहे.  करारनामा रजिस्‍टर्ड झाल्‍याशिवाय सामनेवालेना त्‍यांचेकडून  सदनिकेच्‍या उर्वरित रक्‍कम मागण्‍याचा काही अधिकार नाही. सामनेवालेनी तक्रारदाराना ते उर्वरित रकमेचा भरणा करत नसल्‍यामुळे सदनिका विकण्‍याची धमकी दिली.  त्‍यामुळे तक्रारदारानी सामनेवालेस त्‍यांच्‍या नेरुळ येथील कार्यालयात जाऊन खालीलप्रमाणे रकमेचा भरणा सामनेवालेकडे केला. 

1. तक्रार  234 मध्‍ये रु.4,04,088/- दि.15-11-10 चे दोन धनादेशाने जमा.

2. तक्रार 235 मध्‍ये रु.9,03,213/- दि.15-11-10 चे धनादेशाने जमा.

3. तक्रार 236 मध्‍ये रु.4,25,124/- दि.15-11-10 चे धनादेशाने जमा.

4. तक्रार 237 मध्‍ये रु.4,19,000/- दि.15-11-10 चे धनादेशाने जमा.

5. तक्रार 238 मध्‍ये रु.4,80,800/- दि.15-11-10 चे धनादेशाने जमा.

परंतु सामनेवालेनी तक्रारदारांचा अपमान केला व सदरचे धनादेश स्विकारले नाहीत.  सदनिकेबाबत विसरा असे सांगितले तसेच पावती देण्‍यास नकार दिला.  त्‍यामुळे तक्रारदारानी दि.18-11-10 रोजी सामनेवालेना रजि.नोटीस पाठवली.  सामनेवालेनी त्‍यांचे वकीलांतर्फे दि.29-11-10 रोजी सदर नोटिसीला उत्‍तर दिले.  सदर नोटीसीतील उत्‍तरामध्‍ये त्‍यानी मान्‍य केले की, त्‍यांनी तक्रारदाराकडून सदनिकेसाठी अँडव्‍हान्‍स रक्‍कम म्‍हणून 20 टक्‍के जादा घेतले.  त्‍यांनी त्‍यांच्‍या नोटिसीच्‍या पॅरा.10 मध्‍ये असे लिहीले की, त्‍यानी तक्रारदाराकडून सदनिकेच्‍या उर्वरित रकमेची अनेकवेळा मागणी केली.  परंतु सदनिकेचा रजिस्‍टर्ड करारनामा झालेला नव्‍हता.  सामनेवालेनी अलॉटमेंट लेटरमध्‍ये ठरलेल्‍या अटी व शर्तीची पूर्तता करण्‍यास त्‍यांना सांगितले परंतु तक्रारदारानी त्‍याची पूर्तता केली नसल्‍यामुळे सदर अलॉटमंट लेटर रद्द होणेस पात्र ठरले आहे असे त्‍यांनी त्‍यांच्‍या नोटीसीत म्‍हटले आहे.  सामनेवालनी सदर कॉंट्रॅक्‍ट पुरा केला नसल्‍यामुळे तसेच सदनिकेचा ताबा दिला नसल्‍यामुळे तक्रारदार सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी रु.पाच लाख मिळण्‍यास पात्र असल्‍याचे तक्रारदाराचे कथन आहे.  तकारदारांची विनंती की, सामनेवालेनी त्‍यांच्‍या सदनिकेत त्रयस्‍थ व्‍यक्‍तीचा हक्‍क निर्माण करु नये, तसेच सामनेवालेनी त्‍यांच्‍यासोबत रजिस्‍टर्ड करारनामा करावा, तसेच सामनेवालेनी त्‍यांना करारनाम्‍यात दिलेल्‍या तारखेपासून ताबा दयावा तसेच त्‍यांना झालेल्‍या त्रासाबाबत सामनेवालेनी त्‍यांना दोषपूर्ण सेवा दिली असल्‍यामुळे नुकसानभरपाई प्रत्‍येकी रु.50,000/- मिळावी. 

 

4.          तक्रारदारानी नि.2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र दाखल केले.  नि.3 अन्‍वये प्रत्‍येक तक्रारीत तक्रारदारानी खालील कागदपत्रे दाखल केली- दि.14-9-10 रोजीचे अलॉटमेंट लेटर, इमारतीची छायाचित्रे, त्‍यांनी सामनेवालेस दि.18-11-10 रोजी त्‍यांच्‍या वकीलांस पाठवलेली नोटीस, दि.29-11-10 रोजी सामनेवालेच्‍या वकीलांना त्‍यांच्‍या नोटीसीला दिलेले उत्‍तर, तसेच तक्रारदारानी सामनेवालेस खालील कोष्‍टकाप्रमाणे चेकने दिलेल्‍या रकमाचा तपशील दाखल केला आहे.

अ.क्र. 

तक्रार क्र.

धनादेश क्र.     

दिनांक

रक्‍कम रु.   

1.    

234/10

147339

21-9-10 पावती.

1,00,000/-

 

 

388510

21-9-10 पावती

1,00,000/-

 

 

158539

19-10-10   

2,02,043/- 

 

 

401794

19-10-10   

2,02,043/-

 

 

401796

15-11-10

2,02,044/-

 

 

13972

15-11-10

2,02,044/-

2.   

235/10    

369872

12-09-10पावती

4,00,000/-

 

 

141262

19-10-10   

4,50,606/-

 

 

140421

19-10-10   

4,50,606/-

 

 

369844

15-11-10

1,50,000/-

 

 

141264

15-11-10

  77,213/-

 

 

140423

15-11-10

  77,212/-

 

 

369893

15-11-10

  99,394/-

 

 

140422

15-11-10

2,49,697/-

 

 

141263

15-11-10

2,49,697/-

3.   

236/10    

385412

14-9-10पावती     

2,00,000/-

 

 

385414

19-10-10   

2,12,562/-

 

 

400516

19-10-10

2,12,562/-

 

 

385415

15-11-10   

2,12,562/-

 

 

00517

15-11-10

2,12,562/-

4.   

237/10

662911

19-10-10

4,19,000/-

 

 

662915

15-11-10

4,19,000/-

 

 

662907

13-09-10पावती

2,00,000/-

5.

238/10

538579

13-09-10पावती

2,00,000/-

 

 

311888

19-10-10

4,80,800/-

 

 

311890

15-11-10

4,80,800/-

 

5.          मंचाने नि.6 अन्‍वये सामनेवालेस नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्‍याचे निर्देश दिले, त्‍याची पोच नि.7 अन्‍वये उपलब्‍ध आहे.  दि.5-3-11 रोजी उभय पक्षकार गैरहजर होते.  सामनेवालेना तक्रारीच्‍या नोटीसची बजावणी झाली असल्‍यामुळे व प्रत्‍येक प्रकरणी त्‍याची पोच दाखल असल्‍यामुळे, त्‍यांना पुरेशी संधी देऊनही त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे मांडलेले नसल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा चौकशी आदेश पारित करण्‍यात आले.  सामनेवालेनी लेखी जबाब दाखल न केल्‍याने ग्राहक कायदयाचे कलम 13(2) ब(2) अन्‍वये सदर प्रकरण एकतर्फा सुनावणीचे आधारे निकाली करण्‍याचे मंचाने निश्चित केले.  दि.4-6-11 रोजी  उभय पक्षकार गैरहजर होते.   सदर प्रकरण एकतर्फा निकालासाठी नेमण्‍यात आले. 

 

6.          तक्रारदारानी दाखल केलेला अर्ज, प्रतिज्ञापत्र व कागदपत्रांचा विचार करुन मंचाने खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले-

मुद्दा क्र.1-  सामनेवाले तक्रारदाराना दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेसाठी जबाबदार आहेत काय?

उत्‍तर   -  होय. 

 

मुद्दा क्र.2 तक्रारदार सामनेवालेकडून सदनिकेचा ताबा मिळण्‍यास पात्र आहेत काय?

उत्‍तर   -  होय.

 

मुद्दा क्र.3 -  तक्रारदार सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व न्‍यायिक खर्च

           मिळण्‍यास पात्र आहेत काय?

उत्‍तर  -  होय.

 

विवेचन मुद्दा क्र.1-

7.          तक्रार क्र.234/10 मध्‍ये सामनेवालेनी दि.14-9-10 रोजी तक्रारदारास अलॉटमेंट लेटर दिले होते व त्‍यामध्‍ये सामनेवालेनी तक्रारदारास सदनिका क्र.बी-704 साईअमृत इमारतीमध्‍ये रु.10,08,175/- ला देण्‍याचे कबूल केले होते.  अलॉटमेंट लेटरचेवेळी तक्रारदारानी सामनेवालेस धनादेशाद्वारे रु.दोन लाख अदा केले होते.   त्‍याची पावती सामनेवालेनी दिली आहे.  त्‍यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस 19-10-10 रोजी दोन धनादेशाद्वारे रु.2,02,043/- दिलेले आहेत.  येणेप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेस सदनिका क्र.बी-704 साठी रु.6,04,086/- दिल्‍याचे त्‍यांनी नि.3 ते 3/4 अन्‍वये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन तसेच तक्रारीवरुन  दिसून येते.  नि.3/5 वर तक्रारदार दि.15-11-10 ची रक्‍कम रु.2,02,044/- चे दोन धनादेश दाखल केलेले आहेत परंतु तक्रारदारानी तक्रारीत म्‍हटले आहे की, सामनेवालेनी हे दोन धनादेश स्विकारले नाहीत.

            तक्रार क्र.235/10 मध्‍ये सामनेवालेनी दि.14-9-10 रोजी तक्रारदारास अलॉटमेंट लेटर दिले होते व त्‍यामध्‍ये सामनेवालेनी तक्रारदारास सदनिका क्र.401 व 403 साईअमृत इमारतीमध्‍ये रु.22,02,425/- ला देण्‍याचे कबूल केले होते.  अलॉटमेंट लेटरचेवेळी तक्रारदारानी सामनेवालेस धनादेशाद्वारे रु.चार लाख अदा केले होते.  त्‍याची पावती सामनेवालेनी नि.3 अन्‍वये दिली आहे. त्‍यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस वेगवेगळया तारखांना धनादेशाद्वारे रु.9,01,212/- दिलेले आहेत.  येणेप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेस सदनिका क्र.401 व 403 साठी रु.13,01,212/- दिल्‍याचे त्‍यांनी नि.3 ते 3/3अन्‍वये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन दिसून येते.  नि.3/4 ते 3/5 अन्‍वये तक्रारदारानी दि.15-11-10 ची रक्‍कम रु.9,03,213/- चे धनादेशाने दाखल केली आहे परंतु तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, सामनेवालेनी हे 6 धनादेश स्विकारलेले नाहीत. 

                        तक्रार क्र.236/10 मध्‍ये सामनेवालेनी दि.14-9-10 रोजी तक्रारदारास अलॉटमेंट लेटर दिले होते व त्‍यामध्‍ये सामनेवालेनी तक्रारदारास सदनिका क्र.703 साईअमृत इमारतीमध्‍ये रु.10,50,250/- ला देण्‍याचे कबूल केले होते.  अलॉटमेंट लेटरचेवेळी तक्रारदारानी सामनेवालेस धनादेशाद्वारे रु.दोन लाख अदा केले होते.  त्‍यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस वेगवेगळया तारखांना धनादेशाद्वारे रु.4,25,124/- दिले होते.  येणेप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेस सदनिका क्र.703 साठी रु.6,25,124/- दिल्‍याचे त्‍यांनी नि.3 अन्‍वये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन दिसून येते. नि.3/5 अन्‍वये तक्रारदारानी दि.15-11-10 ची रक्‍कम रु.4,25,124/- ची दोन धनादेशाने दाखल केली आहे परंतु तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, सामनेवालेनी हे 2 धनादेश स्विकारलेले नाहीत. 

 

                        तक्रार क्र.237/10 मध्‍ये सामनेवालेनी दि.14-9-10 रोजी तक्रारदारास अलॉटमेंट लेटर दिले होते व त्‍यामध्‍ये सामनेवालेनी तक्रारदारास सदनिका क्र.बी 602 साईअमृत इमारतीमध्‍ये रु.10,38,000/- ला देण्‍याचे कबूल केले होते.  अलॉटमेंट लेटरचेवेळी तक्रारदारानी सामनेवालेस धनादेशाद्वारे रु.दोन लाख अदा केले होते.  त्‍यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस वेगवेगळया तारखांना धनादेशाद्वारे रु.4,19,000/- दिले होते.  येणेप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेस सदनिका क्र.बी 602 साठी रु.6,19,000/- दिल्‍याचे त्‍यांनी नि.3 अन्‍वये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन दिसून येते. नि.3/4 अन्‍वये तक्रारदारानी दि.15-11-10 ची रक्‍कम रु.4,19,000/- ची धनादेशाने दाखल केली आहे परंतु तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, सामनेवालेनी सदरचे धनादेश स्विकारलेले नाहीत. 

 

                        तक्रार क्र.238/10 मध्‍ये सामनेवालेनी दि.14-9-10 रोजी तक्रारदारास अलॉटमेंट लेटर दिले होते व त्‍यामध्‍ये सामनेवालेनी तक्रारदारास सदनिका क्र.बी 504 साईअमृत इमारतीमध्‍ये रु.11,61,600/- ला देण्‍याचे कबूल केले होते.  अलॉटमेंट लेटरचेवेळी तक्रारदारानी सामनेवालेस धनादेशाद्वारे रु.दोन लाख अदा केले होते.  त्‍यानंतर तक्रारदारानी सामनेवालेस वेगवेगळया तारखांना धनादेशाद्वारे रु.4,80,800/- दिले होते.  येणेप्रमाणे तक्रारदारानी सामनेवालेस सदनिका क्र.बी 504 साठी रु.6,80,800/- दिल्‍याचे त्‍यांनी नि.3 अन्‍वये दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन दिसून येते. नि.3/5 अन्‍वये तक्रारदारानी दि.15-11-10 ची रक्‍कम रु.4,80,800/- ची धनादेशाने दाखल केली आहे परंतु तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, सामनेवालेनी हे धनादेश स्विकारलेले नाहीत. 

            या सर्व तक्रारी पहाता सामनेवालेनी तक्रारदारास प्रत्‍येक तक्रारीत अलॉटमेंट लेटर दिले आहे.  अलॉटमेंट लेटरमध्‍ये सामनेवालेनी सदनिकेचा क्र.,क्षेत्रफळ, तसेच सदनिकेच्‍या ठरलेल्‍या रकमेचा उल्‍लेख केला आहे.  अलॉटमेंट लेटर देतेवेळी सामनेवालेनी प्रत्‍येक तक्रारदाराकडून वेगवेगळी रक्‍कम स्विकारली आहे व असे नमूद केले आहे की, उर्वरित रकमेचा भरणा शेडयूलप्रमाणे करावा.  तसेच सदनिकेच्‍या ठरलेल्‍या रकमेपैकी 15 टक्‍क्‍याची रक्‍कम आल्‍यावर करारनामा करण्‍यात येईल.  तक्रारदारानी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन मंचाचे असे लक्षात येते की, तक्रारदारानी सामनेवालेस सदनिकेच्‍या ठरलेल्‍या रकमेपैकी 15 टक्‍के रक्‍कम जादा दिली असूनही तक्रारदाराना सामनेवालेनी सदनिकेचा करारनामा करुन दिलेला नाही.  तक्रारदारानी अलॉटमेंट लेटर दिल्‍यावर चेकने सामनेवालेस त्‍यांनी मागितल्‍याप्रमाणे रकमा दिल्‍या आहेत, परंतु तरीही सामनेवालेनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दिलेला नाही तसेच करारनामा करुन दिलेला नाही.  सामनेवालेनी तक्रारदाराकडून वरील रक्‍कम घेतली होती परंतु तरीही सामनेवालेनी तक्रारदारास करारानामा करुन दिलेला नाही ही ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 2(1)(ग) अन्‍वये दोषपूर्ण सेवा ठरते. 

 

विवेचन मुद्दा क्र.2-

8.          तक्रारदारानी सामनेवालेस ठरलेल्‍या रकमेपैकी जादा रक्‍कम देऊनही तक्रारदारानी अजूनपर्यंत करारनामा केला नाही, ताबा दिला नाही व उर्वरित रक्‍कम ते देणेस गेले असताना त्‍यांच्‍याकडून सदनिकेची उर्वरित रक्‍कम घेतली नाही.  त्‍यांना असे सांगितले की, आता सदनिकेबाबत विसरा.  तसेच असे सांगून त्‍यांचा अपमान केला.  मंचाचे मते तक्रारदारानी नि.3 अन्‍वये सदनिकेच्‍या खरेदीपोटी खालीलप्रमाणे रकमा दिल्‍या आहेत-

 

      तक्रार क्र.        रक्‍कम रु.

      234/10           6,04,086/-

      235/10           13,01,212/-

      236/10           6,25,124/-

      237/10           6,19,000/-

      238/10           6,80,000/-

तक्रारदारानी सामनेवालेस दि.13-9-10 ते 19-10-10 चे छोटया कालावधीत रक्‍कम दिली आहे.  सामनेवाले मंचाची नोटीस मिळूनही मंचात हजर राहिले नाहीत, तसेच आपले म्‍हणणेही दाखल केले नाही वा प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही, त्‍यामुळे सामनेवालेनी अलॉटमेंट लेटरमध्‍ये म्‍हटल्‍यानुसार करारनामा करुन दयावा, इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन संपूर्ण सुविधांसह आदेश पारित तारखेच्‍या 45 दिवसाच्‍या आत तक्रारदारास सदनिकेचा ताबा दयावा.  ताबा पावती करुन देताना वादग्रस्‍त सदनिका खरेदीपोटी तक्रारदार सामनेवालेकडे जमा केलेली रक्‍कम समायोजित करुन उर्वरित रक्‍कम तक्रारदारानी सामनेवालेना दयावी.

 

विवेचन मुद्दा क्र.3-

9.          तक्रारदारानी सामेवालेवर विसंबून त्‍यांच्‍याकडे सदनिका बुक केली तसेच ठरलेल्‍या रकमेच्‍या 20 टक्‍क्‍याहून जादा रक्‍कम अदा केली परंतु सामनेवालेनी तक्रारदारास ताबा दिला नाही, परंतु सदनिकेची उर्वरित रक्‍कम घेणेस नकार दिला.  तसेच सदनिकेबाबत विसरणेस सांगून अपमान केला.  साहजिकच तक्रारदाराना त्‍याचा मानसिक त्रास होणे अपरिहार्य होते.  सबब तक्रारदार सामनेवालेकडून नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.50,000/- तसेच तक्रारदाराच्‍या तक्रारीची सामनेवालेनी दखल न घेतल्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या वकीलातर्फे नोटीस पाठवावी लागली तसेच मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली म्‍हणून तक्रारदार सामनेवालेकडून न्‍यायिक खर्चापोटी प्रत्‍येकी रक्‍कम रु.10,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. 

 

10.         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो-

                              -ः आदेश ः-

1.         तक्रार क्र.234 ते 238/10 मंजूर करण्‍यात येत आहेत. 

2.         आदेश पारित तारखेच्‍या 45 दिवसाच्‍या आत सामनेवालेनी खालील आदेशाचे पालन करावे-

     अ)   सामनेवालेनी तक्रारदारास सदनिकेचा नोंदणीकृत करार करुन ताबा दयावा व ताबापावती दयावी तसेच तक्रारदारानी सदनिकेची ठरलेली उर्वरित रक्‍कम सामनेवालेंस दयावी तसेच त्रयस्‍थ व्‍यक्‍तीस तक्रारदाराची सदनिका विकू नये. 

     ब)   प्रत्‍येक तक्रारदारास सामनेवालेनी नुकसानभरपाईपोटी रु.50,000/- व न्‍यायिक खर्चापोटी प्रत्‍येकी रु.10,000/- दयावेत. 

     क)   विहीत मुदतीत सामनेवालेनी आदेशाचे पालन न केल्‍यास तक्रारदार वरील कलम ब मधील रक्‍कम आदेश पारित तारखेपासून ते संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 15  टक्‍के व्‍याजाने सामनेवालेकडून वसूल करणेस पात्र रहातील. 

3.         सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्‍यात याव्‍यात. 

 

ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई.

दि.13-6-2011.

 

                        (ज्‍योती अभय मांधळे)       (आर.डी.म्‍हेत्रस)

                      सदस्‍या                अध्‍यक्ष  

                अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई

 

                       

 

 

 


Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT ,