Maharashtra

Akola

CC/14/168

Nilkantha Purushottam Shevalkar - Complainant(s)

Versus

Ms.Sadguru Construction through Prop.Parshuam Paraskar - Opp.Party(s)

Sudhir Kane

12 Sep 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/14/168
 
1. Nilkantha Purushottam Shevalkar
R/o.New Tapadiya Nagar,Pathak Lay Out, Akola
Akola
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Ms.Sadguru Construction through Prop.Parshuam Paraskar
Office at Near Gajanan Maharaj Mandir,Dabaki Rd. Old City, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 HON'BLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 12 Sep 2016
Final Order / Judgement

::: आ दे श :::

( पारीत दिनांक :12.09.2016 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

           सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.

      तक्रारकर्ता क्र. 1 व  विरुध्दपक्ष हे न्यु इंग्लीश शाळेत नोकरी करीत होते,  तेंव्हा पासून त्यांच्यात घनीष्ठ संबंध आहेत.  विरुध्दपक्ष हे मे. सदगुरु कन्स्ट्रक्शन, या नावाने सदर संस्थेचे प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय करतात व बांधकाम करण्याचा ठेका घेऊन ठरल्याप्रमाणे बांधकाम करुन देण्याचा व्यवसाय करत असतात. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांच्या मालकीच्या न्यु तापडीया नगर येथील प्लॉट क्र. 44 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 1600/- चौ. फुट इतके आहे, त्यावर तळ मजल्यावर बांधलेल्या घराचे वरील पहील्या माळयावर, दोन खोल्या, संडासचे बांधकाम व पॅरोपीट वॉल, तसेच इतर बांधकाम करण्याचा ठेका विरुध्दपक्षाला दिला.  तळ मजल्यावरील बांधकाम हे अंदाजे 850 ते 900 चौ. फुट इतके केलेले आहे.  सदर बांधकामाबाबतच्या कराराचा व्यवहार हा तोंडी स्वरुपात ठरला होता. बांधकामाच्या संपुर्ण खर्चापोटी अर्जदाराने रु. 5,78,000/- देण्याचे ठरविले होते, ज्यामध्ये बांधकामाचे संपुर्ण साहीत्य व कराराप्रमाणे संपुर्ण बांधकाम करुन द्यावयाचे विरुध्दपक्षाने कबुल केले. तक्रारकर्त्यांचे बांधकामाचे साहीत्य आणून व बांधकामावर स्वत: देखरेख करुन बांधकाम करण्याचे अशक्य असल्याने व विरुध्दपक्ष यांचेशी असलेले संबंध लक्षात घेवून बांधकामाच्या साहीत्यासह पहील्या मजल्याचे बांधकाम विरुध्दपक्ष करुन देतो, असे आश्वासन विरुध्दपक्षाने दिले. विरुध्दपक्षाने करुन द्यावयाच्या बांधकामाचे वर्णन तक्रारीमध्ये केलेले आहे दि. 28/5/2014 रोजी विरुध्दपक्षाने पहील्या माळयाचे बांधकाम पुर्ण झाल्याचे सांगुन वापर करण्यास सांगतले.  त्यानंतर तक्रारकर्त्याने आवश्यकते नुसार स्वयंपाकाकरिता ओटा, सामान ठेवण्याचे दगडाचे रॅक व इतर अंतर्गत बांधकाम स्वत: अतिरिक्त खर्च करुन विरुध्दपक्षाच्याच ठेकेदाराकडूनच करवून घेतले. त्यावेळी विरुध्दपक्षाने निकृष्ट दर्जाचे साहीत्य वापरुन असंख्य त्रुटी असलेले चुकीचे बांधकाम केले असल्याचे दिसून आले. विरुध्दपक्षाने अप्रत्यक्षरित्या सदर त्रुटी मान्य केल्या, परंतु त्या दुरुस्त करुन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. सदर त्रुटी तक्रारीमध्ये सविस्तरपणे नमुद केलेल्या आहेत.  तक्रारकर्त्यांने विरुध्दपक्षाला दि. 24/9/2014 रोजी नोटीस पाठविली. परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीसला चुकीचे उत्तर पाठवून त्याची पुर्तता करण्यास नकार दिला.  अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली व त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने प्रार्थना केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व  तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु. 5,00,000/- देण्याचा आदेश व्हावा व तसेच नमुद केलेल्या बांधकामातील त्रुटी ज्या दुरुस्त करुन देता येतात त्या विरुध्दपक्षाने करुन द्याव्यात असा आदेश विरुध्दपक्षास द्यावा.  तक्रारकर्त्याने तक्रारीत दुरुस्ती करुन प्रार्थना केली की, अहवालानुसार स्लॅब्च्या दुरुस्तीकरिता कराव्या लागणाऱ्या खर्चापोटी रक्कम रु. 5,00,000/- द्यावी.

      सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 02 दस्तऐवज   पुरावे म्हणून  जोडण्‍यात आले आहेत.

विरुध्‍दपक्ष यांचा लेखीजवाब :-

2.        विरुध्दपक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याकडून विरुध्दपक्षाने कोणताही मोबदला न घेता सेवा प्रदान केलेली आहे.  त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक ठरु शकत नाही. तक्रारकर्ता यांनी  बांधकाम करण्यापुर्वी कोणत्याही प्रकाराचा नकाशा नियमाप्रमाणे संबंधीत खात्याकडून मंजुर करुन घेतला नव्हता.  विरुध्दपक्ष यांनी बांधकाम क्षेत्रातील तज्ञ असणाऱ्या ठेकेदार, गवंडी व सुतार कडून त्याची कामे करवुन घेण्याचे सांगीतले. तक्रारकर्त्याच्या विनंतीनुसार विरुध्दपक्षाने, तक्रारकर्ते यांनी केलेल्या कामावर फक्त लक्ष ठेवण्याचे काम केले.  तक्रारकर्ते यांनी ठेकेदार, गवंडी यांच्यासोबत परस्पर बोलणी करुन बांधकाम करण्याचा ठराव केला व बांधकाम केले.  तक्रारकर्त्यास सर्व बांधकाम त्यांच्या मनाप्रमाणे करावयाचे होते व या करीता ते कोणत्याही प्रकारच्या तांत्रिकतेला महत्व देण्यास तयार नव्हते. तक्रारकर्त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे अनेक त्रुटी निर्माण झाल्या.  तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष यांचे संबंध आर्थिक बाबीवरुन बिघडू नये, या उद्देशाने विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना मजुरीकरिता दिलेल्या पैशांच्या पावत्या दिल्या व बांधकाम साहीत्य सुध्दा अत्यंत प्रतिष्ठीत दुकानामधुन अत्यंत किफायतशिर दरात विकत मिळवून देण्यास सर्वोतोपरी मदत केली. विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपामुळे कधीही न बरा होऊ शकणारा मधुमेह आजार जडला आहे.  त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार रु. 5000/- खर्च बसवून खारीज करण्यात यावी.

3.    त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखावर पुरावा दाखल केला. तसेच  उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.

::: का र णे  व  नि ष्‍क र्ष :::

4.        सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त,  मंचाने नेमणुक केलेल्या कमीश्नरचा अहवाल व फोटोग्राफ, यांचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.

  1.  विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांकडून कुठलाही मोबदला न घेता, सेवा प्रदान केलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक ठरु शकत नाही.  हा मुद्दा विचारात घेतांना दाखल दस्तांचे अवलोकन मंचाने केले असता, पृष्ठ क्र. 40, 41 व 42 वर विरुध्दपक्षाने तक्रारकर्ते यांचेकडून स्विकारलेलेल्या मोबदला रकमेच्या पावत्या दिसुन आल्या.  यातील किती रक्कम मजुरांना व बांधकाम साहीत्यासाठी खर्च केली, याचा स्पष्ट उल्लेख विरुध्दपक्षाने केलेला नाही अथवा तक्रारकर्ते यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा कशा रितीने विनियोग केला, त्याच्या पावत्याही दाखल केलेल्या नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्यांकडून घेतलेल्या रकमेतील एकही पैसा विरुध्दपक्षाने त्याचा मोबदला म्हणून स्विकारला नाही, हे सिध्द होत नसल्याने विरुध्दपक्षाच्या वरील म्हणण्यात मंचाला तथ्य आढळत नाही.  त्यामुळे दाखल दस्तांच्या आधारे तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
  2. तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्ता क्र. 1 व 2 विरुध्दपक्ष हे न्यु इंग्लीश शाळेत नोकरी करीत होते,  तेंव्हा पासून त्यांच्यात घनीष्ठ संबंध आहेत.  तसेच विरुध्दपक्ष हे मे. सदगुरु कन्स्ट्रक्शन, या नावाने त्या संस्थेचे प्रोप्रायटर म्हणून व्यवसाय करतात व बांधकाम करण्याचा ठेका घेऊन ठरल्याप्रमाणे बांधकाम करुन देण्याचा व्यवसाय करत असतात. त्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांच्या पहील्या माळयावर, दोन खोल्या, संडासचे बांधकाम व पॅरोपीट वॉल, इतर बांधकाम करण्याचा ठेका विरुध्दपक्षाला दिला.  त्या बांधकामाबाबतच्या कराराचा व्यवहार हा तोंडी स्वरुपात ठरला होता. बांधकामाच्या संपुर्ण खर्चापोटी अर्जदाराने रु. 5,78,000/- देण्याचे ठरविले होते, ज्यामध्ये बांधकामाचे संपुर्ण साहीत्य व कराराप्रमाणे संपुर्ण बांधकाम करुन द्यावयाचे विरुध्दपक्षाने कबुल केले.  दि. 28/5/2014 रोजी विरुध्दपक्षाने पहील्या माळयाचे बांधकाम पुर्ण झाल्याचे सांगुन वापर करण्यास सांगतले.  त्यानंतर तक्रारकर्त्याने आवश्यकते नुसार स्वयंपाकाकरिता ओटा, सामान ठेवण्याचे दगडाचे रॅक व इतर अंतर्गत बांधकाम स्वत: अतिरिक्त खर्च करुन विरुध्दपक्षाच्याच ठेकेदाराकडूनच करवून घेतले. त्यावेळी विरुध्दपक्षाने निकृष्ट दर्जाचे साहीत्य वापरुन असंख्य त्रुटी असलेले चुकीचे बांधकाम केले असल्याचे दिसून आले. विरुध्दपक्षाने अप्रत्यक्षरित्या सदर त्रुटी मान्य केल्या, परंतु त्या दुरुस्त करुन देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार या मंचासमोर दाखल केली आहे.
  3. यावर, विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याकडून विरुध्दपक्षाने कोणताही मोबदला न घेता सेवा प्रदान केलेली आहे.  त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक कदापीही ठरु शकत नाही.  तक्रारकर्ता यांनी  बांधकाम करण्यापुर्वी कोणत्याही प्रकारचा नकाशा नियमाप्रमाणे संबंधीत खात्याकडून पास करुन घेतला नव्हता.  विरुध्दपक्ष यांनी त्या क्षेत्रातील तज्ञ असणाऱ्या ठेकेदार, गवंडी व सुतार कडून त्याची कामे करवुन घेण्याचे सांगीतले.  विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्याने केलेल्या विनंतीमुळे, तक्रारकर्ते यांनी केलेल्या कामावर फक्त लक्ष ठेवण्याचे काम केले.  तक्रारकर्ते यांनी ठेकेदार, गवंडी यांच्यासोबत परस्पर बोलणी करुन बांधकाम करण्याचा ठराव केला.  तक्रारकर्त्यास सर्व बांधकाम त्यांच्या मनाप्रमाणे करावयाचे होते व या करीता ते कोणत्याही प्रकारच्या तांत्रिकतेला महत्व देण्यास तयार नव्हते. त्यांच्या स्वत:च्या चुकीमुळे अनेक त्रुटी निर्माण झाल्या व विरुध्दपक्षाविरुध्द बेकायदेशिर तक्रार दाखल केली आहे.  तक्रारकर्ते व विरुध्दपक्ष यांचे संबंध आर्थिक बाबीवरुन बिघडू नये, या उद्देशाने विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना मजुरीकरिता दिलेल्या पैशांच्या पावत्या दिल्या व बांधकाम साहीत्य सुध्दा अत्यंत प्रतिष्ठीत दुकानामधुन अत्यंत किफायतशिर दरात विकत मिळवून देण्यास सर्वोतोपरी मदत केली. विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याने केलेल्या आरोपामुळे कधीही न बरा होऊ शकणारा मधुमेह आजार जडला आहे.  त्यामुळे तक्रारकर्ते यांची तक्रार रु. 5000/- खर्च बसवून खारीज करण्यात यावी.
  4. उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्त व तज्ञाच्या अहवालाचे अवलोकन केले.  विरुध्दपक्षाने त्याच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणतेही पुरावे सादर केले नाही, तसेच मंचाने नियुक्त केलेल्या तज्ञाने स्थळ निरीक्षणासाठी हजर राहण्यासंबंधीची नोटीस पाठवूनही विरुध्दपक्ष व त्यांचे वकील स्थळ निरीक्षणाच्या वेळी गैरहजर राहीले व त्यांच्या गैरहजेरीत तज्ञाने स्थळनिरीक्षण केले.

     तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यात केवळ तोंडी करार झाला असल्याने त्यांच्यात नेमका काय करार झाला होता, याचा लिखीत पुरावा मंचासमोर नाही.  त्यामुळे विरुध्दपक्षाने केलेल्या बांधकामातील त्रुटी, सामानाचा दर्जा, या संबंधीचे तज्ञाचे निरीक्षणच मंचाने विचारात घेतले.  तसेच तक्रारकर्ता यांचे बांधकाम दि. 28/5/2014 रोजी पुर्ण झाले होते व तज्ञाने स्थळ निरीक्षण दि. 14/2/2016 रोजी केले.  त्यामुळे जवळपास पावणेदोन वर्षाचा कालावधी सदर बांधकामास झाला होता, हे ही मंचाने विचारात घेतले आहे.

    तज्ञाच्या स्थळ निरीक्षणातील खालील मुद्दयांवरुन तक्रारकर्त्याच्या बांधकामात त्रुटी असल्याचे आढळून येते.

  1. The present floor (from Vitrified Tiles) to ceiling height is 8 ft. 11.5 inch. In first floor rooms.  One vetrified tiles was dismantled to observed whether the slab of Ground floor was chiseled to increase the height of First floor slab.  It was observed that, the waterproof layer and concrete layer on that slab was chiseled and technically it is not advisable to do such type of work.  It leads to start the leakages in the slab and due to leakages rusting of reinforcement in the slab starts.
  2. Due to chiseling of Ground floor slab, defiantly water leaks through this slab and about 40% colouring of rooms are deteriorated as per my observations.  Also electric connection was short-circuited and due to which there washing machine also get damaged as per oral information given by complainant, sir I am not electrical Engg. So I am anable to give the cost of damages due to this resion.

    vi)    Quality of neeru plaster is poor.

    vii)    The complainant has done Ghotai to remaining            portion of slab,  so I am anable to comment on              fixing of door near staircase.  The doors are not fully           open.

   viii)    One window is remaining from moulding of Marble to       sill.

   ix)     No marble strips (Unbertha) are fitted to front and              back doors.

   xii)    The front coloumn is not in plumb bob.

   xiv)    The standard height fo shower in the Bath is 7 ft.              from floor and the ht of shower fitted in the                complainant bathroom is 6 ft.  there is insufficient ht.         of water tank fitted on slab for create proper                  pressure of water in the Gas Gessure. It is on            minimum 7 ft. ht. from first floor slab.

   xv)    The Taps fitted are of poor quality.

   xvi)   The commode is not properly fitted.

   xvii)   The interlock are not used in the pannal between                mosquito net pannal and glass panel. So there is                gap between this two panels.

  xviii)    The chajjas are not casted on the oursides doors.               Only one chajja of Kaddappa is fitted on G.F. door              and not lintel are used while fixing of door frame of       G.F. door

 

    तसेच तक्रारकर्त्याच्या उर्वरित तक्रारी, जसे स्लॅबच्या वेळी रेती ऐवजी डस्टचा वापर झाला,  बांधकामाकरिता वापरलेली वीट ही अत्यंत हलक्या दर्जाची, म्हणजे कच्ची होती,  खोलीतील सज्जा हा तिरपा बांधल्या गेला, त्यामुळे खोलीची समोरील भिंत झुकलेली स्वरुपात आहे, स्लॅब मधुन पाणी गळाल्याने खालच्या मजल्यावरील इलेक्ट्रीक वायरींग संपुर्ण जळाली, या विचारात घेऊन तज्ञाने त्यांच्या अहवालात असे नमुद केले की,

  1. It is impossible for me to comment on the proportion of material used in casting of First Floor slab now just seen from top or bottom of the slab. For the comment on this matter, I have to break the slab and take part of it for testing and it is not possible to break the slab.  Apperlly as per observation, nothing wrong can be seen.

x)   The surfaces of walls are plastered alredy from inside and outside.  So it is difficult to comment that the    dust is used in brick work construction instead of   cement mortar.  It is was used, there is no harm or lacking of strength in the brick the work by using      dust in place of sand.  The cement are more   consumed in using dust in place of sand.  So dust       is used if sand is not available.

xi)       The surfaces of walls are plastered already from            inside and outside.  So it is difficult to comment on               quality of bricks used in first floor construction.  Also         the quality of bricks     cannot be judged by just seen            from open eyes.  The chajja in the room is not in           tube level.

     यावरुन तक्रारकर्त्याच्या वरील आक्षेपास पुष्टी मिळत नसल्याचे मंचाचे निदर्शनास आले. तज्ञाचा अहवाल सादर झाल्यावर तक्रारकर्त्याने तक्रारीत दुरुस्ती करुन रु..5,00,000/- च्या नुकसान भरपाई ऐवजी रु. 10,00,000/- ( दहा लाख ) इतक्या नुकसान भरपाईची मागणी केली.  यासाठी तक्रारकर्त्याने तज्ञाच्या अहवालात नमुद केलेल्या निरीक्षण निष्कर्षांचा आधार घेत असे म्हटले की, अर्जदाराचे तळ मजल्यावरील एकुण बांधकाम हे अंदाजे 900 चौ. फुट इतके होते,  त्यापैकी पहील्या माळयावर 500 चौ. फुटाचे बांधकाम विरुध्दपक्ष यांनी केले, म्हणजेच उर्वरित राहीलेल्या पहील्या माळयावरील गच्चीचा भाग हा पुर्णपणे खुला आहे, ज्यामधुन अहवालात नमुद केल्याप्रमाणे पाणी शिरल्यास त्या स्लॅब्‍ मधील संपुर्ण लोखंडी सळया ह्या सडून जाऊन स्लॅब कोसळु शकतो.  भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वॉटर प्रुफींगचे सर्व काम करुन व प्लॅस्टरींगचे काम करुन दुरुस्ती करणे आवश्यक आहे.  त्यासाठी रु. 5,00,000/- पेक्षा जास्त खर्च लागणार असल्याने तक्रारीत नमुद केलेल्या रु. 5,00,000/- नुकसान भरपाई बरोबर ही अजुन पाच लाख वाढीव नुकसान भरपाई मिळावी.

     तक्रारकर्त्याचा सदर आक्षेप तपासण्यासाठी तज्ञाच्या अहवालातील संबंधीत मजकुर तपासला तो येणे प्रमाणे

  1. The present floor (from Vitrified Tiles) to ceiling height is 8 ft. 11.5 inch. In first floor rooms.  One vetrified tiles was dismantled to observed whether the slab of Ground floor was chiseled to increase the height of First floor slab.  It was observed that, the waterproof layer and concrete layer on that slab was chiseled and technically it is not advisable to do such type of work.  It leads to start the leakages in the slab and due to leakages rusting of reinforcement in the slab starts.

 

    मात्र याचाच आधार घेत, तक्रारकर्त्याने तळमजल्याच्या स्लॅबच्या वॉटरप्रुफींगचा मुद्दा उपस्थित केला जेंव्हा की,तळ मजल्याचा स्लॅब विरुध्दपक्षाने टाकलेला नाही.  पहील्या मजल्याची उंची वाढवण्यासाठी विरुध्दपक्षाने बांधलेल्या खोल्यातील जमीन, जो तळमजल्याचा स्लॅब होता तो दोन इंच फोडून त्यावर टाईल्स लावून दिलेली आहे. तसेच तज्ञाच्या अहवालात 7 व्या क्रमांकाच्या परिच्छेदात स्लॅबच्या उर्वरित भागाची घोटाई तक्रारकर्त्याने स्वत: केल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे तोंडी करारात नसलेल्या, उर्वरित खुल्या भागावरील तळ मजल्याच्या स्लॅबच्या वॉटरप्रुफींगचा व दुरुस्तीचा खर्च, याचा विरुध्दपक्षाचा संबंध नसल्याचे मंचाचे मत आहे.

   त्याच प्रमाणे तक्रारकर्ते यांनी त्यांच्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील बांधकामात मुळीच लक्ष दिले नाही, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचाला तर्कशुध्द वाटत नाही,  त्यामुळे वरच्या मजल्यावर होत असलेल्या बांधकामाबद्दल व त्यात वापरल्या जाणाऱ्या सामानाच्या दर्जाबद्दल तक्रारकर्ता संपुर्णपणे अनभिज्ञ होता, असे ग्राह्य धरता येणार नाही.

    वरील सर्व बाबींचा विचार करता उभय पक्षातील तोंडी करार आणि तज्ञाचा अहवाल विचारात घेता, तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून रु. 30,000/- इतकी नुकसान भरपाई मिळण्यास व रु. 3000/- इतका प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.

  •  
  1. तक्रारकर्ते यांची तक्रार अशंत: मंजुर करण्यात येत आहे.
  2. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 30,000/- ( रुपये तिस हजार फक्त ), तसेच तक्रार खर्चापोटी रु.3000/- ( रुपये तिन हजार फक्त ) द्यावे.
  3. सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आंत करावे.
  4. सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षांना निशुल्‍क देण्‍यात याव्‍या. 
 
 
[HON'BLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.