रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक १६/२०११
तक्रार दाखल दि. २६/०२/२०११
तक्रार निकाली दि. ०५/०१/२०१५
१. श्री. जनार्दन एच. पाटील,
रा. ठी. सदनिका क्र. ३०२,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.
२. श्री. संजय सातप्पा पाटील,
रा. ठी. सदनिका क्र. ४०१,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.
३. श्री. राजेश पांडुरंग भोसले,
रा. ठी. सदनिका क्र. २०४,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.
४. श्री. मधुकर विष्णू सावंत,
रा. ठी. सदनिका क्र. २०१,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.
५. श्री. रामकृष्ण एस. डोंगरे,
रा. ठी. सदनिका क्र. १०१,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९.
६. श्री. सुनिल दलपतभाई पटेल,
रा. ठी. सदनिका क्र. १०२,
नेहा अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४,
कामोठे, नवी मुंबई – ४१०२०९. ..... तक्रारदार क्र. १ ते ६
विरुध्द
१. मेसर्स रॉयल कन्स्ट्रक्शन्स,
प्रोप्रायटरी फर्म, कार्यालय –
सी / १२०२, रामेश्वर, निळकंठ हाईट,
शिवाजीनगर, पोखरण २, ठाणे वेस्ट,
(लक्ष्मी नारायण रेस्टॉरेंटच्या समोर)
२. सौ. नेहा विजय राणे,
मेसर्स रॉयल कन्स्ट्रक्शन्स या
प्रोप्रायटरी फर्मचे प्रोप्रायटर,
रा. ठी.सी. / १२०२, रामेश्वर, निळकंठ हाईट,
शिवाजीनगर, पोखरण २, ठाणे वेस्ट,
(लक्ष्मी नारायण रेस्टॉरेंटच्या समोर) ..... सामनेवाले
उपस्थिती- मा. श्री. उमेश वि. जावळीकर अध्यक्ष.
मा. सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बी. सिलीवेरी,
तक्रारदार क्र. १ ते ६ तर्फे ॲड. आर.एस. जगताप
सामनेवाले १ व २ तर्फे ॲड. किर्ती वैद्य.
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
१. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी न करुन देऊन तसेच संस्थेच्या हक्कात कायम फरोक्तखत न करुन देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असून प्रस्तुत तक्रार सामूहिक स्वरुपाच्या विनंतीसह दाखल केल्याने ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १२ (१) (क) अन्वये न्यायोचित पूर्तता करुन प्रस्तुत तक्रार दाखल करुन घेण्यात आली. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांसोबत केलेल्या नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे सदनिका खरेदी व्यवहाराची संपूर्ण रक्कम स्विकारल्यानंतर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट, १९६३ चे कलम (मोफा कायदा) १० नुसार १०% पेक्षा जास्त ग्राहकांना सदनिका विक्री व्यवहार झाल्यानंतर ४ महिन्यांत विकासकाने मुख्य प्रवर्तक या नात्याने सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन देणे अनिवार्य होते. त्याप्रमाणे सर्व सदनिकांची सन २००७-०८ साली विक्री झाली असून मे २००९ मध्ये ताबा दिला आहे. तरीही सामनेवाले क्र. १ व २ यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करणेकामी तसेच सिडकोकडे पाणी देयक व्यावसायिक ऐवजी घरगुती वर्गवारीमध्ये हस्तांतरित करुन घेण्याबाबत कोणतीही उपाययोजना न करुन सिडकोकडे भरावयाचे शुल्कही अदा न केल्याने व संस्थेची नोंदणी करुन संस्थेच्या हक्कात कायम फरोक्तखत करुन देण्यातही कसूर केला असल्याने तसेच भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यामध्येही त्रुटी ठेवल्याने तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ व २ यांना वरील बाबींची पूर्तता तात्काळ करण्यास आदेशित करावे व नुकसानभरपाईसह तक्रार मान्य करावी अशी विनंती प्रस्तुत तक्रारीत केली आहे.
३. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले क्र. १ व २ यांना मंचाने लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. सामनेवाले क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यावर ते मंचासमक्ष हजर झाले व त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. लेखी जबाबात सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारीतील मुद्दयांचे खंडण करुन तक्रारदारांनी वादकथनात लिहिलेल्या बाबी गुंतागुंतीच्या असल्याने प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी मे. दिवाणी न्यायालयात दाखल करणे आवश्यक होते असे कथन केले आहे. करारनाम्यातील पान क्र. १२ वरील परिच्छेद क्र. ३० मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदनिका किंमती व्यतिरिक्त होणारे अन्य खर्च तक्रारदारांनी स्वत: करावयाचे आहेत. तक्रारदारांनी सदनिकांचा ताबाही कायदेशीरपणे घेतलेला नसून वीज देयकेही नियमितपणे अदा केलेली नाहीत. तक्रारदारांनी मासिक देखभाल खर्चही नियमितपणे अदा केलेला नसून दि. २२/१२/०८ रोजी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त केला असून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीचे पत्र दि. १९/०१/२००९ रोजी प्राप्त आहे. सामनेवाले हे नियमानुसार सर्व बाबींची पूर्तता करीत आहेत व त्याप्रमाणे सिडको यांना रक्कमही अदा केली आहे. सबब, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीत केलेल्या विनंत्या खर्चासह अमान्य करण्यात याव्यात असे कथन सामनेवाले क्र. १ व २ यांनी केले आहे.
४. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले क्र. १ व २ चा लेखी जबाब, उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक १ - सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे कराराप्रमाणे
तक्रारदार सभासदांस कराराप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेची
नोंदणी व संस्थेच्या हक्कात कायम फरोक्तखत न नोंदवून देऊन
सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द करतात
काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक २ - सामनेवाले क्र. १ व २ वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार
सभासदांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक ३ - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमिमांसा :-
५. मुद्दा क्रमांक १ - सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे विहित मुदतीत मोफा कायदा कलम १० प्रमाणे तक्रारदार सभासदांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन सदर संस्थेच्या हक्कात मिळकतीचे कायम फरोक्तखत करुन देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. तसेच तक्रारदारांकडून घेतलेल्या मासिक देखभाल खर्चाचे ताळेबंद देखील तक्रारदारांस दिलेले नाहीत. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस सदर सोयीसुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. सामनेवाले क्र. १ व २ यांनी कागदोपत्री दाखल केलेल्या सिडको व इतर यांच्याकडील आवश्यक त्या परवानगी पत्रामध्ये तक्रारदार यांचा कसलाही संबंध नाही, कारण सदर परवानगी मिळाल्यानंतर सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार यांना सदनिकेच्या कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली असती असे म्हणणे न्यायोचित ठरणार नाही. कारण मोफा कायद्यातील तरतूदीनुसार सामनेवाले क्र. १ व २ यांनी तात्काळ सदर बाबींची पूर्तता करुन तक्रारदारांना सर्व सोयीसुविधांसह सदनिकेचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांनी तक्रारीत केलेली कोणतीही प्रक्रिया पूर्णत्वास नेली नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जात प्रार्थना कलम २ मध्ये सिडको कार्यालयाकडून भोगवटा प्रमाणपत्र सामनेवाले क्र. १ व २ यांनी मिळवून द्यावे अशी विनंती केली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले क्र. १ व २ यांनी सिडको कार्यालयाकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्याने सदरचे प्रार्थना कलम २ मध्ये केलेली विनंती रद्द करण्यात यावी असे दि. ०५/०१/१५ रोजी शपथपत्रासह मंचास कळविले आहे. त्याप्रमाणे सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांच्या तक्रार अर्जामधील प्रार्थना कलम २ मधील विनंतीची पूर्तता केली असून इतर विनंतीची पूर्तता अद्याप केली नसल्याबाबत कागदोपत्री पुरावा मंचात दाखल आहे. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार सभासदांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेसाठी कोणताही प्रयत्न केला नसून संस्थेच्या हक्कात कायम फरोक्तखत करुन देण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
६ मुद्दा क्रमांक २ - तक्रारदार सभासदांचे मिळकतीमधील हितसंबंध कायदेशीर बाबींची पूर्तता विहित मुदतीत न केल्याची बाब वर नमूद निष्कर्षावरुन सिध्द झाली आहे. सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन न करुन देऊन संस्थेच्या नांवे कायम फरोक्तखत न करुन दिल्याने तक्रारदार सभासदांना मिळकतीचा मालक या नात्याने वापर करता आला नाही, तसेच मिळकतीत सोयी सुविधांबाबत हक्कही प्रस्थापित करता आला नाही. एकंदरीत तक्रारदार सभासदांना कायद्याने प्राप्त असलेल्या हक्कांची अंमलबजावणी व फायदे सामनेवाले क्र. १ व २ यांनी विहीत मुदतीत न्यायोचित उपाययोजना न केल्याने मिळू शकले नाहीत. सबब, सामनेवाले क्र. १ व २ तक्रारदार सभासदांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
७. वर नमूद निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
१. तक्रार क्र. १६/२०११ अंशतः मंजूर करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार सभासदांस कराराप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी न करुन देऊन तसेच संस्थेच्या हक्कात कायम फरोक्तखत न करुन देऊन सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
३. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट मधील सर्व तक्रारदार सभासदांची सहकारी गृहनिर्माण संस्था या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसांत स्थापन करुन नोंदणीकृत करुन द्यावी.
४. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार संस्थेच्या हक्कात प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट या मिळकतीचे कायम फरोक्तखत या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांत नोंदणीकृत करुन द्यावे.
५ सामनेवाले क्र. १ व २ यांनी सिडको कार्यालयाकडून प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट या मिळकतीचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याबाबतची पुरशीस तक्रारदारांनी दि. ०५/०१/२०१५ रोजी दाखल केली असल्याने त्याबाबत आदेश नाहीत.
६. तक्रारदार सभासदांनी प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट या मिळकती संबंधात सिडको कार्यालयाकडे भरलेले रक्कम रु. ४०,०००/- (रु. चाळीस हजार मात्र) सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार सभासदांस या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावेत.
७. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट या मिळकतीसाठी लागू असणारे सर्व्हिस चार्जेस सिडको कार्यालयाकडे या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसांत भरावेत.
८. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे प्लॉट क्र. ९२, सेक्टर ३४, कामोठे, नवी मुंबई येथील नेहा अपार्टमेंट या मिळकतीचे थकित बिनशेती कर संबंधीत तहसिलदार यांचेकडे या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसांत भरावेत.
९. सामनेवाले क्र. १ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार सभासदांस कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १,००,०००/- (रु. एक लाख मात्र) या आदेशप्राप्तीच्या दिनांकापासून ३० दिवसांत अदा करावेत.
१०. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक – 05-01-2015.
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.