// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 284/2014
दाखल दिनांक : 17/12/2014
निर्णय दिनांक : 16/06/2015
वासुदेव आत्माराम सावळे
वय .. वर्षे, धंदा – नोकरी
रा. कृष्णाविहार कोंडेश्वर विद्युत कॉलनी,
साईनगर, अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
श्री योगेश नारायणराव राणा (डायरेक्टर)
राणा लॅंड मार्कस् प्रा.लि.,
राणा कॉम्पलेक्स दुसरा मजला, राणानगर
कॉग्रेस नगर रोड, अमरावती
ता.जि. अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. गावंडे
विरुध्दपक्षातर्फे ः एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 16/06/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 284/2014
..2..
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे आरक्षीत केल्या पासुन एक वर्षाचे आत सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन ताबा देण्यात येईल व सदनिकेची किंमत रु. ८,५१,०००/- असल्याचे नमुद केले. त्यानुसार तक्रारदाराने दि. १५.१०.२०१२ रोजी रु. ८५,०००/- धनादेश क्र. ११२९९६ नुसार दिले. विरुध्दपक्ष हे शेगांव टाऊनशिप मध्ये असलेली सदनिका नं. ए 402, विरुध्दपक्षाकडून खरेदी करण्याचा करार दि. १५.१०.२०१२ रोजी केला होता.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष यांनी सदनिकेचे बांधकाम 1 वर्षात पुर्ण करुन त्याचे खरेदी खत तक्रारदाराला करुन द्यावयाचे होते. परंतु विरुध्दपक्ष यांनी काम केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वारंवार विरुध्दपक्षाशी संपर्क साधला असता विरुध्दपक्षाने टाळाटाळीचे उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदाराने वकीला मार्फत दि. ६.९.२०१४ रोजी नोटीस पाठविली परंतु ती न बजावता परत आली. त्यामुळे विरुध्दपक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला त्यामुळे ही तक्रार मा. मंचात दाखल करुन विनंती केली की, रु. ८५,०००/- द.सा.द.शे. 25 टक्के व्याजासह तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई
ग्राहक तक्रार क्रमांकः 284/2014
..3..
रु. १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रु. १०,०००/- देण्याची मागणी केली.
4. विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठविली असता ती अनक्लेम शे-यासह परत आली. त्यामळे दि. १२.५.२०१५ च्या आदेशानुसार प्रकरण एकतर्फा पुढे चालविण्यात आले.
5. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. गावंडे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रार अर्ज, दाखल दस्त विचारात घेतले.
6. तक्रारदाराने दि. १५.१०.२०१२ रोजी रु. ८५,०००/- धनादेश क्र. ११२९९६ नुसार दिल्याचे सिध्द होते. विरुध्दपक्षाला रक्कम मिळून सुध्दा त्यांनी तक्रारदाराचे बांधकाम पूर्ण करुन त्यांच्या सदनिकेचा ताबा दिला नाही व तक्रारदाराने दिलेली रक्कम स्वतःच्या फायद्याकरीता वापरीत आहे. त्यामुळे विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते.
7. तक्रारदाराने केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्तव असल्याने ती मंजूर करता येत नाही. विरुध्दपक्षाने सदनिकेचे बांधकाम 1 वर्षात पूर्ण करुन द्यावयाचे होते. परंतु त्यांनी तसे न केल्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 284/2014
..4..
त्यामुळे तक्रार अर्ज हा अंशतः मंजूर करुन पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला शेगांव टाऊनशिप मधील सदनिकेचे बांधकाम या निकालाच्या तारखेपासुन 6 महिन्याचे आत पूर्ण करुन त्या सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना द्यावा व ताबा घेतांना तक्रारदाराने सदनिकेची राहिलेली संपूर्ण रक्कम विरुध्दपक्ष यांना द्यावी. हे शक्य नसल्यास विरुध्दपक्ष यांनी तक्रारदाराला रु. ८५,०००/- दि. १५.१०.२०१२ पासुन द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह परत करावी.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु. २,०००/- द्यावे व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा.
- आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामुल्य द्यावी.
दि. 16/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष