आदेश (दिः 18/01/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- त्याने 27/08/1997 रोजी विरुध्द पक्षाकडुन स्वयमचलीत धुण्याचे यंत्र 16,490/- रुपयांना विकत घेतले. हे वादग्रस्त यंत्र विरुध्द पक्ष 1 ने उत्पादीत केलेले होते. या यंत्राचा हमी कालावधी श् वर्ष होता. मात्र विकत घेतल्यापासुन त्यात कंम्फोमोटरचा आवाज येणे, हिटर, ड्रायर, दरवाजा यात सातत्याने दोष निदर्शनास आले. वेळोवेळी विरुध्द पक्षाकडे याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. जानेवारी 2004 पासुन या यंत्रात मोठ्या स्वरुपाचा दोष निदर्शनास आला. यंत्राचा बॅलंस, बॅटर हिटर व मोठया प्रमाणात आवाज व तत्सम दोष आढळले, तक्रार नोंदवुनही विरुध्द पक्ष 1 ने दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष 1 ला दि.03/08/2004 रोजी नोटिस पाठविण्यात आली. दि.08/09/2004 रोजी विरुध्द पक्ष 1 च्या अभियंत्याने यंत्राची पहाणी केली व दुरूस्तीचे 1,750/- रुपये मांगितले. दुरूस्ती केल्यानंतर परत डिसेंबर 2004 मध्ये यंत्र बिघडले तेव्हाही तक्रार नोंदविण्यात आली. या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही. दि.10/07/2005 रोजी विरुध्द पक्ष1 ला नोटिस पाठविण्यात आली. सदर यंत्रात उत्पादनातील दोष आहे, सद्यास्थितीत ने निकामी अवस्थेत पडलेले आहे, त्यामुळे प्रार्थनेत नमुद केल्यानुसार यंत्राची किंमत रु.16,490/- विरुध्द पक्ष 1 ने त्याला परत करावी. दुरुस्ती खर्चाचे रु.4,740/- द्यावे. तसेच रु.25,000/- नुकसान भरपाई व न्यायिक खर्च त्याला द्यावा असे त्याचे म्हणणे आहे. निशाणी 2(1) ते 2(8) अन्वये कागदपत्रे दाखल आहेत. त्यात खरेदी पावती दि.27/08/1997 व सर्विस स्लीप तसेच विरुध्द पक्षाला पाठविलेल्या नोटिसींच्या प्रतींचा समावेश आहे.
... 2 ... ( तक्रार क्र.350/2007) 2. विरुध्द पक्ष 1 ने आपला लेखी जबाब तसेच प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- त्यांनी तक्रारकर्त्याला विकलेले यंत्र दि.27/08/1997 ते डिसेंबर 2004 म्हणजेच 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत चांगल्यारितीने काम करत होते. त्यामुळे यंत्रात उत्पादनातील दोष आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे चुक आहे. 7½ वर्षानंतर त्याने तक्रार केलेली आहे. इतका कालावधी यंत्र वापरल्यानंतर स्वाभाविकपणेच त्यात साततच्या वापरामुळे यंत्राच्या काही भागांची तुटफुट होते. त्यांची दुरूस्ती करणे अथवा ते भाग बदलणे आवश्यक असते. 7½ वर्षानंतर देखील विरुध्द पक्ष 1 ने यंत्राची दुरूस्ती करुन दिलेली होती. यंत्र विकत घेण्याचे 20 दिवसाचे आत तक्रारकर्त्याने हमीपत्र विरुध्द पक्षाकडे पाठविणे आवश्यक होते, मात्र ते पाठविल्या गेले नाही. त्यामुळे मोफत सेवा मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नव्हता. तक्रारकर्त्याचे इतर आरोप विरुध्द पक्षाने अमान्य केले. सदर तक्रार निराधार व चुक असल्याने मंचाने तक्रार खर्चासह खारीज करावी असे त्यांचे म्हणणे आहे. 3. विरुध्द पक्ष 1 ने लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने उभय पक्षांचे म्हणणे विचारात घेतले तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. त्याआधारे खालील मुद्दयांचा विचार करण्यात आला. 1.वादग्रस्त यंत्रात उत्पादनातील दोष आहे काय? उत्तर – नाही. 2. विरुध्द पक्ष सदोष सेवेसाठी जबाबदार आहे काय? उत्तर – नाही. 3. तक्रारकर्ता नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहेत काय? उत्तर – नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 1- मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केले असता असे स्पष्ट होते की तक्रारर्त्याने विरुध्द पक्ष 1 निर्मित स्वयमचलित धुण्याचे यंत्र विरुध्द पक्ष 2 कडुन दि.27/08/1997 रोजी 16490/- रुपयांना विकत घेतले. या यंत्राचा हमी कालावधी 2 वर्ष होता. तक्रारीसोबत ’सर्विस कॉल स्लिपच्या’ प्रती जोडलेली आहेत त्यांची नोंद खालील प्रमाणे आहे. 11/10/2007 – Complaint - Ratmesh to be fitted. Customer’s remark - OK 05/11/2007 – Complaint - Heater problem Customer’s remark – Complaint attended satisfactorily 29/11/1997 – Complaint - Heater problem Job carried out – Heater check up Customer’s remark – Ok 03/05/1998 – Complaint – Noise Job carried out – pump motor level adjusted, Next time pump should be replaced. Customer’s Remark – Complaint attended satisfactorily 09/06/1998 – Dryer Problem Job carried out – Drain Pump changed Customer’s remark – Complaint attended satisfactorily.
... 3 ... (तक्रार क्र.350/2007) 22/11/1998 – Complaint – not working. Customer’s remark – Complaint attended satisfactorily. 13/12/1998 – Complaint – Water inlet problem Customer’s remark – No problem in the machine, working properly. 02/08/1999 – Complaint – Door below to be changed. Job Carried out – Door below changed 11/11/1999 – Complaint – drum not rotating. Job Carried out – V-Belt tested. दि.29/08/1997 ते 28/08/1999 या दोन वर्षासाठी हमी कालावधी होता. या हमी कालावधीत एकाच प्रकारच्या दोषासाठी तक्रारकर्त्याला वारंवार तक्रारी कराव्या लागल्या असे आढळत नाही. तक्रारीचे या दोन वर्षाचे स्वरुप विचारात घेतले, तसेच या नंतरच्या तक्रारी दि.16/02/2000, 14/12/2001, 31/12/2003, व 08/09/2004 या तक्रारींने विरुध्द पक्षाकडे नोंदविलेल्या सर्व तक्रारींचा विचार केला असता मंच या निष्कर्षाप्रत आला की वादग्रस्त यंत्रात उत्पादनातील दोष नाही. तक्रारीचे स्वरुप लाक्षात घेतले असता त्याने वेगवेगळया कारणासाठी विरुध्द पक्षाकडे संपर्क साधला व वेळोवेळी विरुध्द पक्षाने त्याला आवश्यक सहकार्य केल्याचे आढळते. सबब वादग्रस्त यंत्रात उत्पादनातील दोष आढळुन आला नाही या निर्षकर्षाप्रत मंच आलेला आहे. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2 - मुद्दा क्र. 2 चे संदर्भात विचार केला असता असे आढळते की यंत्र विकत घेतल्यापासुन 2 वर्षाच्या हमी कालावधीत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला आवश्यक सेवा दिलेली आहे. ज्यावेळेस त्याने विरुध्द पक्षाकडे यंत्रातील अडचणीसंदर्भात तक्रारी नोंदविल्या, त्यावेळेस त्यांनी दखल घेतली व त्यांच्या अभियंत्यामार्फत आवश्यक ती दुरुस्ती करुन दिली. या तक्रारीचे स्वरुप विचारात घेतले असता कोणताही मोठा दोष आढळुन येत नाही. तक्रारीची दुरूस्ती झाल्याने समाधानकारक शेरा तक्रारकर्त्याने दिल्याबाबत आढळते. सबब विरुध्द पक्ष हा दोषपुर्ण सेवेसाठी जबाबदार आढळत नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 3- विरुध्द पक्ष 1 अथवा 2 हे कोणत्याही यंत्रातील दोषासंदर्भात अथवा सदोष सेवा पुरवीली असल्याचे तक्रारकर्तास सिध्द करता न आल्याने तो नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र नाही. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.तक्रार क्र. 350/2007 खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 18/01/2010 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |