रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.20/2009. तक्रार दाखल दि.31-1-2009. तक्रार निकाली दि.13-4-2009.
श्रीमती प्रभावती पांडुरंग कोरपे, फ्लॅट नं.301, तिसरा मजला, ओंकार बिल्डिंग, प्लॉट नं.86, सेक्टर 14, कामोठे, नवी मुंबई 410209. ... तक्रारदार.
विरुध्द 1. मे.नाईक डेव्हलपर्स, सिनेट ए-401, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली-ईस्ट, मुंबई 400 101. 2. श्री.प्रदीप सखाराम नाईक, सिनेट ए-401, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली-ईस्ट, मुंबई 400 101. ... विरुध्दपक्षकार. -ः अंतिम आदेश ः- 1. ही तक्रार तक्रारदारानी यातील सामनेवाले क्र.1,2 यांचेविरुध्द तक्रारअर्जात नमूद केलेल्या कारणास्तव सामनेवालेनी योग्य सेवा दिलेली नाही म्हणून दाखल केली होती. सामनेवालेना नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाले हजर झाले. त्यांनी आपसात तडजोड होणार असल्याचे मंचाला कळविले व त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवालेनी नि.11 अन्वये अर्ज दाखल केला व त्याप्रमाणे आपसात तडजोड झाली असल्याचे मंचाला कळविले व त्या तडजोडीनुसार तक्रारदारानी तक्रार मागे घेण्यासाठी- काढून घेण्यासाठी(Withdraw) परवानगी मागितली आहे. मंचाने नि.13चा अर्ज वाचला व तक्रारदार व सामनेवालेची आपसात तडजोड झाली असल्यामुळे तक्रार पुढे चालू ठेवण्याचे काही कारण नाही असे मंचाचे मत आहे व तक्रारदारानी तक्रार काढून घेण्याची परवानगी मागितल्यामुळे नि.11च्या तडजोड मसुदयास अनुसरुन तक्रारदाराना ही तक्रार काढून घेण्यास संमती देण्यात येत आहे.
2. तक्रारदार व सामनेवालेना आदेशित करण्यात येते की, नि.11ची पुरसीस ही अंतिम आदेशाचा एक भाग समजण्यात यावा व त्याप्रमाणे उभय पक्षकारानी वर्तन ठेवावे. असा आदेश देऊन ही तक्रार अंतिमतः निकाली करण्यात येत आहे. सदर आदेशाच्या सत्यप्रती नि.11च्या प्रतीसह तक्रारदार व सामनेवालेना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड-अलिबाग. दि. 13-4-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Shri B.M.Kanitkar | |