(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने शेअर्स खरेदी विक्रीसाठी गैरअर्जदार यांच्याकडे खाते उघडले. गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार केला ज्यामुळे अर्जदारास आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे शेअर्स खरेदी विक्री व्यवहारासाठी डिसेंबर 2007 मध्ये डिमॅट खाते उघडले. गैरअर्जदार यांनी क्रेडीट लिमिट वाढविण्यासाठी अनेक वेळेस रक्कम भरण्याची मागणी केली. अर्जदाराने त्यामुळे 2,30,000/- व 2,50,000/- रुपयाचे चेक खात्यात जमा केले. अर्जदारास रकमेची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे त्यांनी डिमॅट अकाऊंटमधून पैसे देण्याची गैरअर्जदार यांना विनंती केली, गैरअर्जदार यांनी ही रक्कम शेअर्स खरेदीसाठी र्ख केली असून, त्यांना त्यातून भरपूर फायदा मिळेल असे आश्वासन दिले. अर्जदाराने काही दिवसानंतर गैरअर्जदार यांना डिमॅट अकाऊंट मधून रक्कम देण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी शेअर्सचा भाव कमी झाल्यामुळे पुन्हा रक्कम भरण्याची विनंती केली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार डिमॅट अकाऊंट मधील व्यवहार नियमाप्रमाणे त्याच्या संमतीने होणे बंधनकारक आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या संमती शिवाय हे व्यवहार केलेले आहेत. अर्जदाराने दिलेला 2,30,000/- व 2,50,000/- रुपयाचा चेक हमी म्हणून दिलेले असून, ते परत करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांच्यातर्फे संयुक्तपणे देण्यात आलेल्या जवाबानुसार अर्जदाराने त्यांच्याबरोबर शेअर्स खरेदी विक्री व्यवहारासाठी करार केलेला असून, करारातील अटी क्र.3 प्रमाणे त्यांनी या व्यवहारातील रिस्क बाबत अर्जदारास जाण दिली असून, अर्जदाराने व्यवहार करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यांनी अर्जदाराकडून हमी रकमेचे चेक मागितलेले नाहीत, तसेच क्रेडीट लिमिट वाढविण्यासाठी मागणी केलेली नाही. अर्जदाराने दिलेले दोन्ही चेक हे शेअर्स खरेदी विक्री व्यवहारापोटी दिलेले आहेत. अर्जदाराने स्वतःच शेअर्स खरेदी केल्यानंतर त्यापोटी दिलेले चेक न वटता परत आलेले असून, त्यांच्या विरुध्द मुंबई न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अक्टमधील कलम 138 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. अर्जदाराने शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी (3) त.क्र.259/09 त्यांच्या नावे पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे. अर्जदारासोबत झालेल्या करारानुसार शेअर्स खरेदी विक्री व्यवहार करण्यात आलेले असून, अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची असल्याचे सांगून खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात शेअर्स खरेदी विक्री व्यवहारासाठी करार झालेला आहे. शेअर्स खरेदी विक्री व्यवहारात रक्कम गुंतविलेली व्यक्ती ही ग्राहक संरक्षण कायद्यातील परिभाषेत येत नाही. म्हणून सदरील तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |