(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार त्रिषा व्हेंचर्स हे व्ही.एल.सी.सी. इन्स्टिटयुट ऑफ ब्युटी हेल्थ अड मॅनेजमेंटचे फ्रँचायजी असून कॅनाट प्लेस, औरंगाबाद येथे ग्राहकांना हेल्थ आणि ब्युटी ट्रीटमेंट देण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने व्ही.एल.सी.सी. इन्स्टिटयुटचे सुचनेप्रमाणे स्वतःच्या इन्स्टिटयुटमधे चांगल्या प्रतिचे फर्निचर, फाल्स सिलींग, इंटिरिअर वॉल्स (2) त.क्र.25/09 डेकोपेंटसह, वुलन कार्पेट, व 4 कॉम्प्युटर बसवले. गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादीत केलेले नऊ Air Condition Units गैरअर्जदार क्र.1 अधिकृत विक्रेते यांच्याकडून दि.26.10.2007 आणि दि.27.10.2007 रोजी रक्कम रु.1,93,500/- मधे खरेदी केले होते. गैरअर्जदारांनी सदर Air Condition Units चांगल्या प्रतिचे असल्याचे सांगितले व 12 महिन्याची exclusive वॉरंटी आणि कॉम्प्रेसरची 4 वर्षाची वॉरंटी दिली. त्यांचे इन्स्टिटयुटचे इमारतीतील 230 volts चा विद्युत पुरवठा असला तरी त्याने प्रत्येक A/c unit ला एक या प्रमाणे 9 स्टॅबिलायजर बसवले. दि.14.07.2008 रोजी 1.5 टन कॅपॅसिटीचे A/c unit बर्स्ट झाले आणि आग लागली, त्यामधे इतर A/c unit बर्स्ट झाले व इन्स्टिटयुटचे रु.1,56,580/- आणि व्यावसायीक रु.1,75,000/- एवढे नुकसान झाले. त्याने गैरअर्जदारांकडे A/c units बदलून द्यावेत अथवा नुकसान भरपाई मिळावी म्हणून वारंवार पत्रव्यवहार केला परंतू गैरअर्जदारांनी प्रतिसाद दिला नाही. सदर घटनेनंतर तक्रारदाराने इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर श्री.जयंत मुळे यांना बोलावले त्यांनी A/c units व स्टॅबिलायजरची तपासणी करुन विद्युत पुरवठयाचा दोष नसल्याचे सांगितले. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.7,31,580/- व्याजासह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 लैमर एअर टेक्नॉलॉजी यांनी गैरअर्जदार क्र.2 ब्लु स्टार लिमिटेड यांनी दाखल केलेले लेखी निवेदन स्विकारले आहे. गैरअर्जदार क्र.2 ब्लु स्टार लिमिटेड यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांनी प्राथमिक असा मुद्या उपस्थित केला आहे की, तक्रारदार त्रिषा व्हेंचर्स यांनी व्यापारी कारणासाठी आणि त्यातून भरपूर नफा कमावण्यासाठी 9 A/c unit मशीन्स खरेदी केलेल्या असून तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्यामधील तरतुदीनुसार “ग्राहक” होऊ शकत नाही. तक्रारदाराने ऑक्टोबर 2007 मधे 9 A/c unit मशीन्स खरेदी केल्या होत्या आणि जुलै 2008 मधे आगीची घटना घडलेली आहे. तक्रारदाराने हया 8 महिन्याच्या कालावधीत मशीन्समधे दोष असल्याबाबत कोणतीही तक्रार केली नाही. आग A/c unit मधील दोषामुळे लागलेली नसून शॉर्टसर्किट, ओव्हरलोड, हाय करंट मुळे लागलेली असू शकते. गैरअर्जदाराने मशीन्सची तपासणी केली परंतू मशीन्सला पुरवला जाणारा व्होल्टेज सप्लाय तपासला नाही. मशीन्सच्या Indoor Unit मधील PCB मधून हाय व्होल्टेज सप्लाय गेल्यास आग लागू शकते. मशीन्सचे Outdoor Unit व्यवस्थित आहे. तक्रारदाराने फिर्याद व पंचनाम्याची प्रत दाखल केली नाही. गैरअर्जदारांनी दि.08.08.2008 रोजी तक्रारदारास Indoor Units विना मोबदला बदलून देऊन मशीन्स पुन्हा चालू करुन देऊ (3) त.क्र.25/09 असे पत्र पाठवले व दि.11.09.2008 रोजी स्मरणपत्र देखील पाठवले परंतू तक्रारदाराने प्रतिसाद दिला नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षाच्या वतीने युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदार त्रिषा व्हेंचर्स यांनी व्यापारी कारणासाठी आणि त्यातून भरपूर नफा कमावण्यासाठी 9 A/c unit मशीन्स खरेदी केलेल्या असल्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) मधील व्याख्येनुसार “ग्राहक” होत नाही असा मुद्या गैरअर्जदार क्र.2 ब्लु स्टार लिमिटेडने उपस्थित केला. गैरअर्जदार क्र.2 ब्लु स्टार लिमिटेडने उपस्थित केलेला मुद्या योग्य असून तक्रारदार त्रिषा व्हेंचर्स हे व्ही.एल.सी.सी. इन्स्टिटयुट ऑफ ब्युटी, हेल्थ अड मॅनेजमेंटचे फ्रँचायजी असून कॅनॉट प्लेस औरंगाबाद येथे व्यवसाय करतात हे तक्रारदाराने स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे सदर इन्स्टिटयुट ही मोठी व्यापारी संस्था असल्याचे स्पष्ट दिसून येते. व्यापारी कारणासाठी खरेदी केलेल्या वस्तु आणि त्या अनुषंगाने दिली जाणारी सेवा हया व्यापारी कारणासाठीच दिलेल्या असतात त्यामुळे व्यापारी कारणासाठी वस्तु खरेदी करणारा किंवा सेवा घेणारा हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) नुसार ग्राहक होत नाही. या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालय यांनी Birla Technologies Ltd. Vs. Newtral Glass & Allied Industries Ltd. 2011 CTJ 121 या प्रकरणातील निवाडयाद्वारे हे स्पष्ट केले आहे की, व्यापारी कारणासाठी सेवा घेणारा ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 2 (1) (ड) नुसार “ग्राहक” होत नाही आणि म्हणून अशा प्रकारची तक्रार या मंचात चालू शकत नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2) तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी आपापला सोसावा.. 3) उभयपक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |