निकालपत्र :-(दि.06/10/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला सदर मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला स्वत: यांचा युक्तीवाद ऐकणेत आला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की – तुकडी व जिल्हा कोल्हापूर पोट तुकडी व तहसिल करवीर येथील कोल्हापूर महानगरपालीका हद्दीतील सी वॉर्ड येथील सि.स.नं.574/एच, 574/5, 574/6 या तीन एकमेकांस लागून असलेल्या मिळकतीचे एकूण क्षेत्र 160.78 चौ.मि. ही मिळकत बांधकाम व्यवसायीक यांनी विकसन केलेली आहे. सदर जागेमध्ये अपार्टमेंट इमारत असून त्यामधील अप्पर ग्राउंड फ्लोअरवरील सदनिका युनिट नं.एफ 2 क्षेत्र 400 चौ.फुट. म्हणजेच 37.17 चौ.मि. बिल्ट-अप आणि 550 चौ.फु. सुपर बिल्ट-अप क्षेत्राचे सदनिका युनिट खरेदी करणेबाबतचे करारपत्र झालेले आहे. करारपत्राप्रमाणे रक्कम रु.3,00,000/- सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांना अदा केलेले आहेत. परंतु सदर मिळकतीचे बांधकाम कराराप्रमाणे पूर्ण करुन दिलेले नाही. उर्वरित रक्कम रु.2,50,000/- सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी स्विकारुन सदनिकेचा ताबा दयावा व खरेदीपत्र करुन दयावे अथवा सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी स्विकारलेली रक्कम रु.3,00,000/- बॅंकेच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना लिहून दिलेले करारपत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांनी नाकारलेने परत आलेला लखोटा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी आपले लेखी म्हणणेत तक्रारदारांची तक्रार नाकरलेली आहे. (5) तक्रारदारांचे वकील श्री पी.बी. जाधव व सामनेवाला बांधकाम व्यावसायिक श्री राजन कामत यांनी युक्तीवाद केलेला आहे. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी रक्कम रु.3,00,000/- स्विकारलेचे प्रतिपादन केले आहे. तसेच सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी सदरची रक्कम तक्रारदाराने दिलेचे कबूल केलेले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदाराचे वकीलांनी सदरची रक्कम व्याजासहीत मिळावी अशी विनंती केलेली आहे. तसेच नुकसान भरपाईबाबत कोणतीही मागणी तक्रारदाराने केलेली नाही. सबब सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी रक्कम रु.3,00,000/- तक्रारदारांना व्याजासहीत अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांनारक्कम रु.3,00,000/- अदा करावेत. सदर रक्कमेवर एप्रिल-2009 पासून द.सा.द.शे. 6 % व्याज दयावे. 3) सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |