Maharashtra

Additional DCF, Thane

CC/10/53

Mr.Dinkar Kothari - Complainant(s)

Versus

M/s.Hari Om Developers - Opp.Party(s)

Vandana

08 Nov 2012

ORDER

ADDITIONAL THANE DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room No.428 & 429, Konkan Bhawan Annexe Building,
4th Floor, C.B.D., Belapur-400 614
 
Complaint Case No. CC/10/53
 
1. Mr.Dinkar Kothari
Flat No.105,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane
Maharastra
2. Mrs. G.V.Makhwane
Flat No.202,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
3. Mr.Suresh Kuveshkar
Flat No.203,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
4. Mr.Santosh Patil
Flat No.204,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
5. Mr.Dahku Choudhary
Flat No.103,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
6. Mr. Jayawant Mane
Flat No.302,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
7. MR.Yuvraj Sakpal
Flat No.304,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
8. Mr.Gautam Kamble
Flat No.404,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
9. Mr.Sahebrao Mor
Flat No.405,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
10. Mr.Dattaram Mulik
Flat No.301,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
11. Mr.Ashok Kamble
Flat No.403,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
12. Mr.Harshal Patil
Flat No.406,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
13. Mrs.S.M.Salunkhe
Flat No.206,M/s.Hari Om Apt.Sahakari Grinirman Sanstha (Niyojit) Plot No.303,G.E.S. Turbhe, Navi Mumbai
Thane Additional
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. M/s.Hari Om Developers
Office at Malbari wadi,Shivaji Nagar,Naupada,Thane (W)
Thane
Maharastra
2. Mr.Shashikant Vithoba Kadam
D-6,Kolungadi Estate thane
Thane Additional
Maharastra
3. Mr.Rajan Kamlakar Kulkarni
Block no.17.Near Bedekar hospital rammaruti rd, thane
Thane Additional
Maharastra
4. Mrs.Rupa Ravikiran Shinde
7th floor,near satyam society station rd,Kalwa, Tal & Dist-thane
Thane Additional
Maharastra
5. Mrs.Prajoti Pratap Yerunkar
bldg. no.6,block no.201,Kharegaon-Kalwa Thane
Thane Additional
Maharastra
6. Mr.Sunil Vedprakash Sharma
Shop no.1 & 2 Plot no.303,G.E.S,Turbhe,Navi Mumbai-400705
Thane Additional
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Jyoti A.Mandhle PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smita. L. Desai MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार व त्‍यांचे वकील वंदना हजर
......for the Complainant
 
विरुध्‍द पक्ष 1 ते 5 गैरहजर, विरुध्‍द पक्ष 6 व त्‍यांचे चे वकील हजर
......for the Opp. Party
ORDER

 (दि.  / /2012)

द्वारा : मा. सदस्‍या, श्रीमती. ज्‍योती अभय मांधळे 

1.     प्रस्‍तुतची  तक्रार ही तक्रारदारांनी विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी सहकारी संस्‍था स्‍थापन करुन दिली नाही, अभि‍हस्‍तांतरणाचा लेख करुन दिला नाही तसेच सदोष सेवा दिली याकरिता तक्रारदाराने तक्रार दाखल केली आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांनी इमारतीखालील जागा अडकवुन ठेवलेली असल्‍याने त्‍यांनी ती रिकामी करुन द्यावी या करिता तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली आहे. मयत ठकीबाई बाला मढवी यांनी दि.28/09/1981 मध्‍ये सिडको यांचेकडुन भाडे तत्‍वावर भुखंड क्र. 303 ज्‍याचे चौ.मी.500 आहे. तुर्भे गावठाण ता. जि.-ठाणे, नवी मुंबई यांचे कडुन प्राप्‍त केला आहे. मयत श्रीमती मढवी यांनी विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांचे सोबत दि.11/09/2011 रोजी Agreement of Assignment cum-Sale-Cum Development चा करार केला आहे या करारानुसार श्रीमती मढवी यांनी विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांच्‍याकडुन मोबदला घेऊन मालकी दिली होती. त्यानुसार विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी विरुध्‍द पक्ष 6 यांचे सोबत दि.25/07/2002 रोजी Agreement of Assignment cum-Sale-Cum Development चा करार केला होता. त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी सदर भुखंडावर्ती हरीओम अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्‍था अशी इमारत बांधली सदरची इमारत रेसिडेंनशियल अॅन्‍ड कमर्शियल या स्‍वरुपाची होती. विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी सदरची सोसायटी नियोजित स्‍वरुपाची स्‍थापन केली होती परंतु त्‍यानंतर त्‍यांनी सदरची सोसायटी नोंदणीकृत करुन मालमत्‍ता हस्तांतरण लेख करुन दिलेला नाही.

2.    तक्रारदार पुढे म्‍हणतात की, विरुध्‍द पक्ष क्र. 6 हे सदर नियोजित सोसायटीमध्‍ये दोन दुकानाचे मालक आहेत त्‍यांनी सोसायटीमधील संपुर्ण खालचा भाग व पार्कींबची जागा स्‍वतःच्‍या ताब्‍यात घेतलेली आहे. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी सदरची जागा विरुध्‍द पक्ष 6 यांनी दि.25/07/2002 रोजी झालेल्‍या Agreement of Assignment cum-Sale-Cum Development नुसार दिलेली आहे जी बेकायदेशिर आहे असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. त्‍यानुसार सदर उघडया जागेवर नियोजित सोसायटीमधील सदस्‍यांना त्या जागेवर आपले वाहन उभे करु दिले जात नाही तसेच विरुध्‍दपक्ष क्र. 6 यांनी आपले दुकाने भाडयाने दिले आहे व तो भाडेकरु सदरचे दुकानाचा वापर वाहने दुरूस्‍त करण्‍यासाठी गॅरेज म्‍हणुन करत आहेत. सदरच्‍या गॅरेजमुळे सोसायटीच्या सर्व सभासदांना अतिशय त्रास होत आहे त्‍यामुळे त्‍यांनी मंचाला अशी प्रार्थना केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांनी नियोजित सोसायटीमध्‍ये असलेली सगळी उघडी जागा स्‍टील्‍ट ऐरीया, पार्कींग स्‍पेस रिकामी करुन द्यावी असा आदेश पारित करावा  तसेच विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी सहकारी सोसायटी स्‍थापन करुन द्यावी व मालमत्‍ता हस्‍तांतरणाचा लेख लिहुन द्यावा तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांना त्‍यांनी भाडयानी दिलेले त्‍यांचे गॅरेज बंद असा आदेश पारित करावा व त्‍यांना आलेल्‍या न्‍यायिक खर्चाची रक्‍कम रु.30,000/- विरुध्‍द पक्ष यांचेकडुन मिळावा अशी विनंती मंचासमोर केलेली आहे.

3.    तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जासोबत निशाणी 2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र निशाणी 3 अन्‍वये कागदपत्र दाखल केलेले आहेत. त्‍यात मुख्‍यतः Agreement of Assignment cum-Sale-Cum Developmentची प्रत, दि.07/07/2004 रोजी नवी मुंबई महानगर पालिका यांनी दिलेले भोगवटा प्रमाणपत्र, नवी मुंबई महानगर पालिका याना दिलेले कमेंस्‍मेंट सर्टिफिकेट, ओम अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्‍था (नियोजित) यांनी दि.24/01/2010 रोजी पास केलेल्‍या रिझोल्‍युशनची प्रत इत्‍यादी दस्‍तऐवज दाखल करण्‍यात आलेले आहे. निशाणी 6 अन्‍वये मंचाने विरुध्‍द पक्ष यांना नोटिस पाठवुन आपला लेखी जबाब दाखल करण्‍याचा निर्देश दिला. निशाणी 7 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांनी  पाटवलेली नोटिस ‘सदर पार्टी दिलेल्‍या पत्‍यावर तपास लागत नाही सबब परत रवाना’’ या शे-याने परत आली. निशाणी 8 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांना पाठवलेली नोटिस ‘लेफ्ट’ या शे-यासह परत आली. निशाणी 9 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 5 यांना पाठवलेली नोटिस ‘अनक्‍लेम्‍ड’ या शे-यासह परत आली निशाणी 10 अन्‍वये विरुध्‍द पक्ष 4 यांना पाठवलेली नोटिस ‘लेफ्ट’ या शे-यासह परत आली. विरुध्‍द पक्ष 6 यांना पाठवलेली नोटिसच्या पोच पावतीवर विरुध्‍द पक्ष यांची सही नाही परंतु अभिलेखात पोचपावती दाखल केलेली आहे निशाणी 10A. निशाणी 13 अन्‍वये वकील वाघमारे यांनी विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांचेवतीने आपला वकालतनामा दाखल केला. तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 2, 4 व 5 यांना मंचाच्‍या नोटिसची बजावणी न झाल्‍याने तक्रारदाराने निशाणी 15 अन्‍वये विरुध्‍द पक्ष 2, 4 व 5 यांना मंचाने वृत्‍तपत्राद्वारे जाहीर नोटिस प्रसिध्‍द करण्‍याची परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला व त्‍यानुसार निशाणी 16 अन्‍वये जाहीर नोटिस प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निशाणी 18 अन्‍वये वृत्‍तपत्राचे कात्रण दाखल करण्‍यात आले. निशाणी 19 अन्‍व्‍ये विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांचे वतीने वकील प्रकाश मढवी यांनी आपला वकालतनामा दाखल केला. निशाणी 21 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 3 यांनी आपला वकालतनामा दाखल केला. निशाणी 23 अन्‍वये कागदपत्रांची यादी दाखल केली. निशाणी 24 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांनी आपला लेखी जबाब प्रतिज्ञापत्रासह दाखल केले. निशाणी 28 अन्‍वये तक्रारदाराने छायाचित्र दाखल केलेले आहे. निशाणी 30 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांनी कागदपत्रांच्‍या यादीसह कागदपत्र दाखल केले. निशाणी 33 अन्‍वये विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 3 यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला. निशाणी 34 अन्‍वये विरुध्‍द पक्ष 6 यांनी आपला लेखी युक्तिवाद दाखल केला.

4.    विरुध्‍द पक्ष 1 व 3 आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की त्‍यांनी भुखंड क्र. 303 तर्भे गावात रेसिडेन्‍शीयल अॅन्‍ड कमर्शियल इमारत बांधली. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी तक्रारदारासोबत केलेला करारनाम्‍याच्‍या कलम 17 आणि 30 मध्‍ये उल्‍लेख केलेला आहे सोसायटी नोंदणीकृत करणेसाठी तसेच सोसायटीच्‍या नावाने अभिहस्‍तांतरणाचा लेख लिहुन देण्‍यासाठी येणारा जो खर्च आहे तो सदनिकाधारकांना सोसावा या गोष्‍टीची कल्‍पना तक्रारदाराला असतांनाही तसेच त्‍यांना अनेक वेळा विनंती करुनही त्‍या रक्‍कमेचा भरणा त्‍यांनी त्‍यांचेकडे केलेला नाही. त्‍यामुळे करारनाम्‍याच्‍या कलम 17 आणि 30 चा तक्रारदाराने भंग केलेला आहे.  तक्रारदाराने या अटींचा भंग केल्‍यामुळे ते सहकारी सोसायटी स्‍थापन करणेसाठी तसेच मालमत्‍ता हस्‍तांतरण लेख करणेसाठी जबाबादार नाहीत. विरुध्‍द पक्ष 1 व 3 पुढे म्‍हणतात की, त्‍यांनी करारानाम्‍याच्‍या अटी व शर्तीचा भंगही केलेला नाही तसेच तक्रारदाराला दोषपुर्ण सेवा दिलेली नाही तसेच तक्रारदाराला सदरची तक्रार दाखल करणेसाठी मुदतीची बाधा येत असल्‍याने सदरची तक्रार खारीज करावी असे विरुध्‍द पक्ष 1 व 3 चे म्‍हणणे आहे.

5.    विरुध्द पक्ष क्र. 6 आपल्‍या लेखी जबाबात म्‍हणतात की, तक्रारदाराने त्‍यांनी सदरच्या तक्रारीमध्‍ये चुकीने पक्षकार केलेले आहे. तक्रारदार त्यांचे ग्राहक नसल्‍याने सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.  तसेच सदरची तक्रार दाखल करण्‍यासाठी त्‍यांचे विरुध्‍द कोणतेही कारण घडलेले नसल्‍याने तक्रार फेटाळण्‍यात यावी असें त्‍यांचे म्‍हणणे आहे.

6.    विरुध्‍द पक्ष क्र. 6 पुढे म्‍हणतात की दि.11/09/2001 रोजी मयत श्रीमती मढवी आणि त्यांचेमध्‍ये Agreement of Assignment cum-Sale-Cum Development चा करार केला व त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी रेसिडेन्शीयल अॅन्‍ड कमर्शियल उपभोगासाठी इमारत बांधली व हरीओम अपार्टमेंट सहकारी गृहनिर्मण संस्‍था (नियोजित) च्‍या सभासदांना ती विकली सदरच्‍या इमारतीमध्ये 24 सदनिका व दोन दुकाने आहेत व ही गोष्‍ट खरी आहे की, विरुध्‍द पक्ष क्र. 1 ते 5 यांनी आतापर्यंत सोसायटी नोंदनी‍कृत केलेली नाही व मालमत्‍ता हस्‍तांतरणाचा लेख लिहुन दिलेला नाही.

7.    विरुध्‍द पक्ष 6 पुढे म्‍हणतात की, दि.25/07/2002 च्‍या त्‍यांच्‍यात व विरुध्‍द पक्ष 1 व 5 यांचेमध्‍ये झालेल्‍या Agreement of Assignment cum-Sale-Cum Development च्‍या नुसार ते स्‍वतः दोन्‍ही दुकानाचे मालक आहेत तसेच इमारतीच्‍या अवतीभवती असलेली उघडी जागा पार्कींग स्‍पेसची जागा तसेच त्‍यांना त्‍यांचे दुकान भाडयाने दिले आहे व सदर दुकानामध्‍ये त्‍यांचे भाडेकरुनी वाहन दुरूस्‍तीसाठी एक गॅरेज टाकलेले आहे. ज्‍याच्‍यांनी इमारतीच्‍या कोणत्‍याही सदस्‍यांना त्रास होत नाही.  तक्रारदारानी नाहक त्रास देण्‍याच्‍या हेतुने त्‍यांचे विरुध्‍द खोटी तक्रार दाखल केलेली असल्‍याने ती खारीज करण्‍यात यावी असे विरुध्‍द पक्ष क्र.6 चे म्‍हणणे आहे.

8.    दि.06/10/2012 रोजी सदरची तक्रार अंतीम सुनावणीसाठी आली असता तक्रारदार व त्‍यांच्‍या वकील हजर होते. विरुध्‍द पक्ष क्र. 6 चे वकील हजर होते.

9.    तक्रारदाराने दाखल केलेला तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्‍तऐवज तसेच त्‍यांचे वकीलांनी मंचासमोर केलेले तोंडी युक्तिवाद तसेच विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले लेखी जबाब, दस्‍तऐवज तसेच विरुध्‍द पक्ष क्र. 6 यांच्‍या वकीलांनी मंचासमोर दाखल केलेले लेखी युक्तिवाद या सर्वांचा विचार करण्‍यात आला यावरुन तक्रारदाराने प्रामुख्‍याने तक्रारीतील मागणीमध्‍ये विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांचेकडुन सहकारी संस्था स्‍थापनेबाबत तसेच मालमत्‍ता हस्‍तांतरण सोसायटीच्‍या नावाने लिहुन देण्‍याबाबत तक्रार दाखल केलेले आहे. सदर तक्रारीमध्ये एकुण 13 तक्रारदार आहेत. यासर्व तक्रारदार यांची तक्रार तसेच त्‍यांनी आपल्‍या तक्रारअर्जात परिच्छेद 17 मध्‍ये उल्‍लेख केला आहे की, सदर इमारतीमध्‍ये 24 सदनिका आहेत यावरुन तक्रारदार यांची तक्रार ही प्रातिनि‍धी‍क स्‍वरुपाची आहे हे स्‍पष्‍ट होते, तसेच तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल केल्‍यानंतर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(1)(c) चा अवलंब केलेला नाही असे दिसुन येते. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12(1)(c) प्रमाणे तक्रारदाराची जबाबदारी असतांना मंचाची परवानगी घेतली नाही अथवा सदरची बाब मंचाच्‍या निदर्शनास आणलेली नाही हे स्‍पष्‍ट होते. या संदर्भात मंच मा. राज्‍य आयोग, मुंबई यांचे First Appeal no. 1087 of 2009

In Consumer complaint no 258/2005 District Consumer Forum, Pune

Shri Rajendra Vitthal Thorat

         V/s

Mrs. Nalini Pandurang Limaye & others.

न्याय निवाडा विचारात घेत आहोत त्‍यामुध्‍ये 5. As per provisions of section 12(1)(c), “ One or more consumers, were there are numerous consumers having the same interest , with the permission of the District Forum, on behalf of, or for the benefit of all, consumer so interested, can file the complaint.” Wherever such a complaint is filed section 13(6) requires to follow the procedure as laid down under order 1 rule 8 of the first schedule to the Code of Civil Procedure, 1908(5 of 1908).”

‘’9        This rule is required to be followed in a complaint which is a representative complaint. Therefore, unless and until the procedure as required under Order I rule (8) is followed, the complaint cannot be proceeded. In the present matter complaint is allowed. But if the complaint would have been rejected or dismissed the consumers on whose behalf the complaint was prosecuted, their remedies would have been foreclosed. Possibility cannot be ruled out that one person in collusion with the Opponents may file the complaint in a representative capacity, to get it dismissed, so as to foreclose remedy of the other consumers having same interest.  Therefore, to stop such type of mal-practices, law has provided protection by Order I rule (8) so far as civil matters are concerned. The legislation while drafting the Consumer Protection Act, 1986, being aware of such mal-practices has taken cognizance of it and has provided in the legislation that the Order I rule 8 requies to be followed in case where the complaint is in the representative capacity. This protection is offered to the persons or consumers who are not coming to the Consumer Fora.’’ असे नमुद केले आहे.

      सदर न्‍यायनिवाडयाच्या आधारे तक्रारदार यांच्‍या सदर तक्रारीमध्‍ये एकापेक्षा जास्‍त तक्रारदारांचे हीत असल्‍यामुळे व ते या तक्रारीत शामील नसल्‍याने सदर तक्रारीवर न्‍यायहीतार्थ निर्णय देणे योग्य होणार नाही त्‍यामुळे तक्रारीच्‍या गुणवत्‍तेवर न जाता तक्रारदार यांची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 12(1)(c) चा अवलंब केला नाही या धरतीवर नामंजुर करणे संयुक्तिक होईल अशा निर्णयाप्रत मंच आले आहे.

 

6.    वरील विवेचनाच्‍या आधारे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहेत.

                                         आदेश

1. तक्रार क्र. 53/2010 नामंजुर करण्‍यात येते.

2. खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्‍वतः करावे.

दिनांक - //2012

 

ठिकाण- कोंकण भवन.

 

 
 
[HON'ABLE MRS. Jyoti A.Mandhle]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smita. L. Desai]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.