जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 222/2008. प्रकरण दाखल तारीख - 19/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 13/10/2008 समक्ष – मा.श्री. सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्य दिगंबर पि. विठठल जाधव अर्जदार. वय, 55 वर्षे, धंदा शेती रा. चिवळी ता. मुखेड जि. नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी गैरअर्जदार मार्फत कार्यकारी अभिंयता, वीभागीय कार्यालय, देगलूर 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मार्फत सहायक अभिंयता, उपवीभागीय कार्यालय, मुखेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.आर. मलदोडे गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड. विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) महाराष्ष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांनी बेकायदेशिररित्या विज पूरवठा बंद करुन सेवेतील ञूटी केल्यामूळे ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे चिवळी ता. मुखेड येथे शेतीचा व्यवसाय करुन आपली उपजिवीका भागवतात. गट नंबर 196 मधील 3 हेक्टर 59 आर. क्षेञफळात सोयाबीन, हायब्रीड, उसाची लागवड वर्ष 2007-08 या हंगामात केली. या पिकांना पाणी देण्यासाठी ते 7.5 एच.पी. या कृषी पंपाचा ते वापर करीत होते. अर्जदाराने आजपर्यत व्यवस्थित विज बिल भरले, गैरअर्जदाराने पण विज पूरवठा केला. यानंतर शेतातील नापीकीमूळे अर्जदार विज बिल वेळेवर भरु शकले नाहीत. त्यामूळे गैरअर्जदारांच्या कार्यालयातील थकीत बिलासाठी नेहमीप्रमाणे अडजेस्टमेंट बिल काढून दिले. याप्रमाणे अर्जदाराने रक्कम भरली परंतु डिसेंबर 2007 या महिन्यात गैरअर्जदार क्र.2 च्या कर्मचा-याने विद्यूत कलम 56 (1) अन्वये अर्जदारास कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता थकबाकी बिल न भरल्यापोटी अर्जदारांच्या कृषी पंपाचा विज पूरवठा खंडीत केला व हे करीत असताना अर्जदाराच्या मालकीचे कीटकॅट, स्टार्टर बॉक्स तसेच अंदाजे 200 फूट केबल वायर काढून नेले. सदरील कृत्य बेकायदेशीर असून गैरअर्जदाराच्या कर्मचा-याना अचानकपणे विज पूरवठा खंडीत करण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच थकीत रक्कमेपैकी काही रक्कम जमा केल्यास विज पूरवठा तात्काळ सूरु करावा असे असताना सूध्दा गैरअर्जदाराने विज पूरवठा बंदच ठेवला. गैरअर्जदार यांच्याकडे वारंवार विनंती करुन देखील जप्त केलेले साहित्य त्यांनी परत केले नाही. त्यामूळे अर्जदाराचे अतोनात नूकसान झाले. याबददल दि.25.2.2008 रोजी तहसिलदार यांच्याकडे तक्रार केली व विनंती केली याप्रमाणे तहसील कार्यालयाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला व विज पूरवठा बंद असल्यामूळे ऊसाचे अंदाजे रु.2,40,000/- व गव्हाचे रु.25,000/- नूकसान झाल्याबददल अंदाज घेतला. सदरील पंचनामा गैरअर्जदार यांचे कार्यालयास पंचनाम्याप्रमाणे नूकसान भरपाई मिळण्या बाबत गैरअर्जदार यांच्याकडे मागणी केली परंतु त्यांनी दाद दिली नाही. गैरअर्जदारांनी अर्जदारा विरुध्द पोलिस स्टेशन मूखेड येथे खोटा गून्हा नोंदविला आहे. त्यामूळे अर्जदाराने भितीने मूखेड येथे जाणे सोडून दिले. अर्जदाराने दि.27.7.2008 रोजी माहीतीच्या अधिकाराखाली गांवात कृषी पंपाची संख्या, थकबाकीदाराची यादी व किती कृषी पंपधारकाचा विज पूरवठा खंडीत केला आहे यांची यादी मागितली व खंडीत केलेल्या थकबाकीदाराची यादी निरंक दाखवली. अर्जदाराच्या गांवातील इतर लोकांच्या दूश्मनीस्तव गैरअर्जदाराने आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन पूर्व सूचना न देता विज पूरवठा खंडीत केला. विज पूरवठा बंद केल्यमूळे शेतीतील नूकसान भरपाई म्हणून रु.2,65,000/- व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु,5,000/- अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराने त्यांचे शेतात न लावलेल्या व न येऊ शकणा-या ऊस व गहू या बददल नूकसान भरपाई मागितली आहे. हे पिक येथे येतच नाही त्यामूळे भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदाराने वर्ष,2007-08 या हंगामी वर्षात हायब्रीड, सोयाबीन, ऊस हे पिक घेतले हे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार नापीकीमूळे अर्जदार हे विज बिलाची रक्कम भरु शकले नाहीत. व गैरअर्जदाराने नेहमीप्रमाणे अडजेस्टमेन्ट बिल काढून दिले हे त्यांचे म्हणणे चूकीचे आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्जात परिच्छेद क्र. 11 मधील मजकूर खोटा आहे, अर्जदाराचे म्हणणे की, डिसेंबर 2007 च्या महिन्यात गैरअर्जदार यांच्या कर्मचा-यानी विज कायदा 2003 चे कलम 56 (1) अन्वये अर्जदाराला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता थकबाकी बिल न भरल्यापोटी अर्जदार यांचा विज पूरवठा खंडीत केला व अर्जदाराच्या मालकीचे किटकॅट, स्टार्टर बॉक्स, केबल वायर जबरदस्तीने नेले हे म्हणणे सर्वस्वी चूकीचे व खोटे आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तो चालू थकबाकीदार आहे हे म्हणणे चूक आहे. कलम 56 (1) अन्वये चालू थकबाकीदार असेल तर विज पूरवठा खंडीत करता येत नाही. थकीत रक्कमेपैकी काही रक्कम जमा केल्यास विज पूरवठा तात्काळ सूरु करावा असे असतानासूध्दा अर्जदाराने नियमित बिल भरुन सूध्दा विज पूरवठा बंद केला असे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराच्या नांवे डिसेंबर 2007 अखेर रु.1,19,560/- थकबाकी आहे. तहसिलदार मूखेड यांनी दि.22.2.2008 रोजी घटनास्थळी येऊन पाहणी केली व विज पूरवठा बंद असल्यामूळे ऊसाचे रु.2,40,000/- व गव्हाचे रु.25,000/- चे नूकसान झाले हे ही म्हणणे चूक व खोटे आहे. गैरअर्जदाराने अर्ज वापस घेण्यावीषयी अर्जदारांना धमकी दिली व पोलिसाची भिती दाखवली हे म्हणणे देखील चूकीचे व खोटे आहे. अर्जदार यांचा कोणताही विज पूरवठा खंडीत केलेला नसताना त्यांने हे खोटे प्रकरण दाखल केले आहे. त्यामूळे ते खारीज होण्यायोग्य आहे. बिलाची रक्कम अर्जदाराने भरणे क्रमप्राप्त आहे असे असताना त्यांने केवळ वेळ काढूपणाचे धोरण स्विकारले. त्यामूळे गैरअर्जदार यांची विनंती आहे की, अर्जदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैर अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेला दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय नाही. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार हे चिवळी ता.मूखेड येथील शेतकरी असल्याबददल व त्यांच्याकडे 3.59 हेक्टर जमीन असल्याबददलचा पूरावा म्हणून त्यांनी 7/12 दाखल केला आहे. यातील 2.80 हेक्टर मध्ये ऊस, गहू, ही लागवड केल्याचे दिसते. अर्जदार यांच्याकडे पिकास पाणी पूरवठा करण्यासाठी विहीरीवर 7.5 एच. पी. चा पंप बसवला आहे. अर्जदार जरी म्हणत असले की ते चालू थकबाकीदार आहेत तरी त्यांनीच दाखल केलेले दि.19.1,2008 रोजीच्या बिलावरुन त्यांच्याकडे रु.1,40,560/- थकबाकी असल्याचे दिसून येते. व या थकबाकीपोटी त्यांनी केवळ रु.2,000/- भरले आहे जी की अतीशय कमी रक्कम आहे. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जातील परिच्छेद नंबर 11 मध्ये डिसेंबर 2007 या महिन्यात विज कायदा 2003 प्रमाणे कलम 56 (1) अन्वये अर्जदारास कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता थकबाकी बिल न भरल्यापोटी अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला आहे असे म्हटले आहे. यांस उत्तर देताना गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जवाबाच्या परिच्छेद नंबर 15 मध्ये विज पूरवठा खंडीत केलाच नाही त्यामूळे पूर्वसूचना देण्याची गरजच नाही असे म्हटले आहे. अर्जदार यांच्याकडे प्रचंड थकबाकी आहे. त्यामूळे ते जाणूनबूजून खोटी तक्रार दाखल करुन वेळ काढीत आहेत असे म्हटले आहे. अर्जदार स्वतः आपल्या तक्रार अर्जात म्हणतात की, त्यांच्याकडे प्रचंड थकबाकी आहे असे असताना तसेच विज बिलाची रक्कम माहीती असताना भरणा न करणे हे देखील चूकीचे आहे. त्यांचा विज पूरवठा खंडीत केला हे ही ते सिध्द करु शकले नाहीत. अर्जदाराने जी आपली तक्रार दाखल केलेली आहे. त्यांचा मूख्य रोष हा पूर्वसूचना न देता विज पूरवठा खंडीत केला असे म्हटले आहे. असे असताना त्यांनी जी विनंती केली आहे, त्यात विज पूरवठा पूर्ववत सूरु करावा असे कूठेही म्हटलेले नाही. त्यांची मागणी फक्त ऊस व गहू हे पिक वाळून गेल्याबददल त्यांचे नूकसान मिळावे अशी आहे. जर एखादा ग्राहक त्यांच्याकडे प्रचंड थकबाकी असेल व ते ती माहीत असताना जाणीवपूर्वक बिल भरत नसेल तर विज पूरवठा खंडीत करणे हे कायदयाने चूक नाही. जर तूम्ही बिज बिल नियमित भरत असलात तरच तूम्ही सेवेवीषयी मागणी करु शकता. तूमच्या वागण्यात जर ञूटी असेल तर अशा मागणीस अर्जदार पाञ ठरणार नाही. याशिवाय विज पूरवठा बंद केला या म्हणण्यास पूष्ठी मिळण्यासाठी त्यांने तहसील कार्यालयाचा पंचनामा व श्री. गणपत सागरे, श्री. कीशन जाधव, श्री. शंकर भास्करे, श्री. दादाराव जाधव, व श्री. माधव गजेले यांचे शपथपञ दाखल केलेले आहे व या विरुध्द गैरअर्जदार यांनी देखील विज पूरवठा खंडीत केला नसल्याबददल पूरावा म्हणून श्री. गंगाराम जायनुरे, श्री.रावसाहेब जाधव, श्री. हणमंत गोरे, श्री.उत्तम गोरे, श्री.भानुदास जायनुरे यांचे शपथपञ विज पूरवठा खंडीत केला नाही व अर्जदाराच्या पिकाचे नूकसान झाले नाही अशा प्रकारचे शपथपञ दाखल केलेले आहे. दोघाचे ऐकमेकांच्या विरुध्द परस्पर पूरावे आहेत. त्यामूळे खरे व खोटे काय काय आहे हे तपासणे अवघड काम आहे. तरी देखील अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी माहीतीच्या अधिकाराखाली जे गैरअर्जदार कंपनीचे कागदपञ दाखल केले आहे. यात गैरअर्जदार कंपनीने थकबाकीदार यांची यादी दाखल केलेली आहे. यात अर्जदार यांचे नांव आहे. व यांच्याकडे प्रचंड थकबाकी दिसते. याशिवाय किती कृषी पंपाचा विज पूरवठा खंडीत केला आहे यांच्या माहीती बददल त्यांनी निरंक असा रिपोर्ट लिहीलेला आहे. यांचा अर्थ एकाही कृषी पंपाचा विज पूरवठा खंडीत केलेला नाही. गैरअर्जदार कंपनीचे कागदपञ हे ही माहीतीच्या अधिकाराखाली दिलेले खोटे ठरवणिे उचित नाही. ते कागदपञ जर खरे धरले तर अर्जदाराचे आरोप सिध्द होत नाही. शिवाय अर्जदाराचे एक प्रकरण जे.एम.एफ. सी. मूखेड येथे चालू आहे. पोलिस स्टेशनला गून्हा दाखल झाल्यानंतर आणि त्यांचा गैरअर्जदार कंपनीच्या कर्मचा-यानी जवाब घेतलेला आहे. यास फारसा पूरावा म्हणून महत्व देण्यात तथ्य नाही. गावांतील शेतक-यांनी मंचास संबोधून जो अर्ज केलेला आहे त्यांस गावक-यांनी अर्जदाराचे केवळ स्टार्टर बॉक्स, किटकॅट, व वायर नेलेला खरे आहे व विज पूरवठा ही खंडीत केला आहे असे म्हणून गावकं-याचे सहया असलेले निवेदन दिलेले आहे. असे असले तरी अर्जदारांनी आपल्या तक्रार अर्जात बिलातील रक्कम भरल्यासाठी हप्ते पाडून दयावेत व विज पूरवठा पूर्ववत सूरु करावा अशी मागणीच केलेली नाही. त्यामूळे त्यांचा तक्रार अर्जातील नूकसानी बददलची मागणी ते स्वतः बिल न भरल्यामूळे अपाञ ग्राहकात मोडतात. म्हणून झालेले नूकसान हे ते डिफॉल्टर असल्याकारणने झालेले आहे. त्यामूळे त्याना नूकसान भरपाई मागण्याचा अधिकार पोहचत नाही. म्हणून त्यांचा तक्रार अर्ज खारीज करण्या योग्यतेचा आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो. 2. पक्षकारानी खर्च आपआपला सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक. |