Maharashtra

Mumbai(Suburban)

2008/99

MAXIE AUGUSTIN D'SOUZA AND OTHERS - Complainant(s)

Versus

M/S.COWFORCE ENGINEER AND CONTRACTOR AND OTHERS - Opp.Party(s)

Mr.Nizamuddin Khan & Miss Rahimunnisa Shaikh

02 Apr 2013

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. 2008/99
 
1. MAXIE AUGUSTIN D'SOUZA AND OTHERS
TARUN BHARAT CO.OP.HSG. SOCIETY, A WING, AT THE 7 TH ROAD, GOLIBAR NAKA, SANTACRUZ (E) MUMBAI 400 05
...........Complainant(s)
Versus
1. M/S.COWFORCE ENGINEER AND CONTRACTOR AND OTHERS
3,MEHER HOMES CO.OP.HSG.SOCIETY, JOGESHWARI (W) MUMBAI 400 102
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MR. N. D. KADAM MEMBER
 
PRESENT:
वकील श्री.निजामउद्दीन खान हजर.
......for the Complainant
 
वकील श्री.एस.एस.कोंडाळकर हजर.
......for the Opp. Party
ORDER

तक्रारदार          :       गैरहजर

                    सामनेवाले          :      गैरहजर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* 
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष             ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*                                        
                                   आदेश
1.    उभयपक्षकार गैरहजर. तक्रारदारास तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही असे दिसते. ते सातत्‍याने गैरहजर आहेत.
2.    29/जुलै/11 च्‍या रोजनाम्‍यामध्‍ये अपुर्ण काम पूर्ण होत असल्‍याबद्दलची नोंद आहे. यावरून तक्रारदारांनी पुढील कार्यवाही न केल्‍याने व पुराव्‍याचे शपथपत्र न दाखल केल्‍याने तक्रार कलम 13(3) क प्रमाणे रद्द करण्‍यात येते. प्रकरण समाप्‍त
 3.      आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
 
तक्रारदार :वकील श्री.निजामउद्दीन खान हजर.
सामनेवाले :वकील श्री.एस.एस.कोंडाळकर हजर.

*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्‍यक्ष ठिकाणः बांद्रा

*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

आदेश

प्रस्‍तुतचे प्रकरणामध्‍ये तक्रार दिनांक 18.1.2012 रोजी रद्द करण्‍यात आली. तसा आदेश रोजनाम्‍यामध्‍ये करण्‍यात आला. तसेच वेगळा आदेश करण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदारांनी दिनांक 6.3.2012 रोजी प्रकरण बोर्डावर घेऊन तक्रार पुन्‍हा फाईलवर घेण्‍यात यावी असा वेगळा अर्ज दिला. त्‍यावर सा.वाले यांनी दिनांक 27.4.2012 रोजी आपले म्‍हणणे दाखल केले व त्‍यामध्‍ये सा.वाले यांनी काम पूर्ण केले असून तक्रार पुन्‍हा फाईलवर घेण्‍यास त्‍यांचा आक्षेप नाही असे लिहून दिले. त्‍यानंतर प्रस्‍तुत मंचाकडे सदस्‍य उपलब्‍ध नसल्‍याने प्रकरणात आदेश होऊ शकला नाही. त्‍यानंतर मंच पूर्ण झाल्‍यानंतर अर्जाचे सुनावणी दरम्‍यान सा.वाले यांचे वकीलांनी अर्जास आक्षेप नोंदविला व प्रकरण युक्‍तीवादानंतर निकाली करावे अशी विनती केली. त्‍याप्रमाणे आज दोन्‍ही बाजुचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

वर नमुद केल्‍याप्रमाणे मंचाने दिनांक 18.1.2012 रोजीच्‍या आदेशान्‍वये प्रस्‍तुतची तक्रार रद्द केलेली आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे राजीव हितेंद्र पाठक व इतर विरुध्‍द अच्‍युत काशिनाथ कारेकर व इतर (2011) 9 एससीसी 541 या निकालपत्राप्रमाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचास मंचाने केलेला आदेश रद्द करण्‍याचा अधिकार नाही. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयचा वरील निकाल ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 22 (अ) वर आधारीत आहे. यामध्‍ये केवळ मा.राष्‍ट्रीय आयोगाचा उल्‍लेख आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामध्‍ये ग्राहक तक्रार निवारण मंचास या प्रकारची अधिकार देणारी कुठलीही तरतुद नाही. दिवाणी प्रक्रीये संहीतेच्‍या तरतुदी ज्‍या केवळ कलम 13(4) मध्‍ये नमुद केलेल्‍या आहेत त्‍याच फक्‍त लागू होतात. अन्‍य तरतुदी नव्‍हेत. येवढेच नव्‍हेतर नियमावलीमध्‍ये ( रेग्‍युलेशन ) दिवाणी प्रक्रीये सहीतेच्‍या तरतुदींचा वापर ग्राहक मंचाने करु नये अशी तरतुद आहे. नियमावलीचे नियम 15 मध्‍ये जो पुर्नविलेखन (रिव्‍हू) त्‍यामध्‍ये देखील मा.राष्‍ट्रीय आयोगाचा उल्‍लेख आहे. त्‍यामध्‍ये जिल्‍हा ग्राहक मंचाचा उल्‍लेख नाही. यावरुन जिल्‍हा ग्राहक मंचास तक्रार रद्द केल्‍यानंतर ती पुन्‍हा फाईलवर घेण्‍याचा अधिकार नाही असा निष्‍कर्ष काढावा लागतो.

सा.वाले यांनी अर्ज मंजूर करण्‍यास आपली संमती दिली असली तरी देखील ग्राहक मंचास स्‍वेच्‍छाधिकार वापरुन असा आदेश करता येणार नाही. सबब नाईलाजाने व खेदपूर्वक मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे.

अर्ज रद्द करण्‍यात येतो.

ठिकाणः मुंबई.

दिनांकः 02/04/2013


 
 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N. D. KADAM]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.