Maharashtra

Thane

CC/199/2015

Mr. Narayan Vasant Joshi - Complainant(s)

Versus

M/s. Cholamandalam MS GIC Limited - Opp.Party(s)

Adv. K nT Teskcon

25 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/199/2015
 
1. Mr. Narayan Vasant Joshi
At. Anuparita society, Room No 105, B No 6, MIDC Residential zone, Dombivali east 421201, Dist Thane
Thane
Maharashtra
2. Mr. Prahlad Keshav Chipkar
At-1/8, Suresh Patil Bldg, Patharli Road, Near Balaji temple, Gogreswadi, Dombivli east 421201
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Cholamandalam MS GIC Limited
At. 1st floor, old Suchak Niwas, Above Axis Bank, Murbad Road, Kalyan west 421301, Dist Thane
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 25 Aug 2015
Final Order / Judgement

Dated the 25 Aug 2015

तक्रार दाखल कामी आदेश   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)

                                                           

  1.        तक्रारदार क्र. 1 हे महिंद्रा वाहन क्र. MH-03-AM-6325 या वाहनाचे मूळ मालक आहेत. तक्रारदार क्र. 1 यांनी सदर वाहनाची विमा पॉलिसी सामनेवाले यांचेकडे दि. 28/02/2014 ते 27/02/2015 या कालावधीची घेतली.
  2.          तक्रारदार क्र. 1 यांनी सदर वाहन तक्रारदार क्र. 2 यांना विक्री केले. तक्रारदार क्र. 2 यांनी दि. 12/7/2014 पासून वाहनाचा ताबा घेतला. सदर वाहन तक्रारदार क्र. 2 यांचे नांवावर R.T.O. रेकॉर्डमध्‍ये         दि. 02/08/2014 रोजी ट्रान्‍सफर करण्‍यात आले.
  3.       विमा पॉलिसी तक्रारदार क्र. 2 यांचे नांवावर ट्रान्‍सफर करण्‍याचेआधी सदर वाहन मोकळया जागेत डोंबिवली येथे पार्क केले असता दि. 12/11/2014 रोजी दु. 3.00 वाजता जळून गेले.
  4.         सदर घटनेची माहिती टिळकनगर पोलिस स्‍टेशन, डोंबिवली यांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी कल्‍याण महानगरपालिका फायर ब्रिगेड यांना कळविले. पोलिसांनी जळीत घटनेचा पंचनामा केला. वाहनाचे रु. 2.25 लाख एवढया रकमेचे नुकसान झाल्‍याचे पंचनाम्‍यामध्‍ये नमूद केले. सामनेवाले यांनी घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर सर्व्‍हेअर यांची नेमणूक केली. सर्व्‍हेअर ओम.एन. कुलकर्णी यांनी अहवाल दिला.
  5.         सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. 2 यांना दि. 8/12/2014 रोजीच्‍या पत्रान्‍वये विमा प्रस्‍ताव पॉलिसी त्‍यांचे नांवावर नसल्‍याचे अयोग्‍य कारणास्‍तव नामंजूर केला. तसेच तक्रारदार क्र. 1 यांना दि. 29/11/2014 रोजीच्‍या पत्रान्‍वये तक्रारदार क्र. 2 यांना सदर विमा पॉलिसीमध्‍ये अपघाताचेवेळी कोणताही हक्‍क नाही असे कळविले. सामनेवाले यांनी अयोग्‍यरित्‍या तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
  6.       तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. चर्चेनुरुप मंच खालीलप्रमाणे निष्‍कर्ष काढत आहे. 
  1. इंडियन मोटार वाहन टेरिफ GR-10 दि. 30/06/2002 पर्यंत अस्तित्‍वात (existence) होते.
  1.  इंडियन मोटार वाहन टेरिफ GR-17 दि. 01/07/2002 पासून (existence) मध्‍ये आहे. प्रस्‍तुत तक्रारीस GR-17 लागू होतो.
  1.  तक्रारदारांनी मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या रिव्‍हीजन पिटीशन क्र. 556/2002 (श्री. नारायण सिंग वि. न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स क‍ं. दि. 22/5/2007 रोजीचा न्‍यायनिर्णय दाखल  केला आहे. सदर न्‍यायनिवाडा मोटार वाहन टेरिफ GR-10 वर आधारीत आहे. GR-10 दि. 30/06/2002 पर्यंत अस्तित्‍वात होते. प्रस्‍तुत तक्रारीतील अपघात दि. 13/11/2014 रोजीचा आहे. अशा परिस्थिीत सदर न्‍यायनिवाडा प्रस्‍तुत तक्रारीस लागू होत नाही असे मंचाचे मत आहे. या कारणास्‍तव मंचाने खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.     
  1.       मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या रिव्‍हीजन पिटीशन 2229/2005 ओरिएण्टल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी विरुध्‍द रिता (1)2013 CPJ 24 B (NC)(CN)  या न्‍यायनिवाडयाचा मंचाने आधार घेतला आहे.
  2.      सदर न्‍यायनिवाडयाचे परिच्‍छेद 6 प्रमाणे

   GR 17 shows that in case of Package Policy the policy will be transferred only on compliance with the following conditions:

  1. On Special request of transferee with consent letter of transferor.
  2. Fresh Proposal Form from transferee duly signed.
  3. Acceptable evidence of sale.
  4. Surrender of fresh certificate in the name of the transferee.
  5.        तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी वरीलप्रमाणे नमूद केलेल्‍या GR-17 मधील तरतुदींचे पालन केले नाही. तसेच मोटर वाहन कायदा,1988 कलम 157 नुसार विमा पॉलिसीचे हस्‍तांतरण वाहनाची विक्री करतांना automatic होत नाही.

मा. राष्‍ट्रीय आयोगाने वर नमूद केलेल्‍या न्‍यायनिर्णयामध्‍ये मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहेः

  1. Complete Insurance Private Ltd. Vs. New India Assurance Co. Ltd.  1996 CPJ 1 (SC):

या न्‍यायनिवाडयानुसार

deemed transfer U/s 157 of Motor Vehicle Act is restricted to third party risks and does not apply to other risks like damage caused to the vehicle of the insured himself, falls outside Chapter XI of the New Act and is in the realm of the contract for which there must be an agreement between the insurer and the transferee, the former undertaking to cover the risk or damage to the vehicle.

 

प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार क्र. 1 यांनी तक्रारदार क्र. 1 यांचे नांवावर विमा पॉलिसी हस्‍तांतरण केली नाही. तक्रारदारांची तक्रार वाहनाच्‍या नुकसान (own damage) भरपाईकरीता दाखल केली आहे. वरील न्‍यायनिवाडयानुसार तसेच मोटर वाहन कायदयातील तरतुदीनुसार वाहनाच्‍या नुकसानीकरीता दाखल असलेल्‍या प्रकरणात विमा पॉलिसीचे अॅटोमॅटीक हस्‍तांतरण होत नाही.

  1. G. Govindan V/s. National Insurance Co. Ltd. (1993)2 SCC 754 या न्‍यायनिवाडयामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे नमूद केले आहे.
  2. “Insurance Policy remains effective in respect of third party risk but not in respect of the transferee and own damage claim.”                

ई.                     तक्रारदार क्र. 1 यांनी वादग्रस्‍त वाहनाची विक्री तक्रारदार क्र. 2  यांना केली आहे. तसेच तक्रारदार क्र. 2 यांना वाहन हस्‍तांतरण झालेबाबतची नोंद R.T.O. रेकॉर्डवर झाली आहे. परंतु विमा पॉलिसीचे हस्‍तांतरण झाले नाही. वादग्रस्‍त वाहनाचे दि. 13/11/2014 रोजी जळाल्‍यामुळे नुकसान झाले. त्‍यावेळी वाहनाची पॉलिसी तक्रारदार क्र. 2 यांचे नांवावर हस्‍तांतरीत झालेली नव्‍हती. त्‍यावेळी तक्रारदार क्र. 2 यांना वाहनाची नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर नसल्‍यामुळे सामनेवाले यांनी योग्‍य कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नामंजूर केला. मोटार वाहन टेरिफ GR-17 व मोटर वाहन कायदा कलम 157 मधील तरतुदीनुसार तसेच वरील सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या व मा. राष्‍ट्रीय आयोगाच्‍या न्‍यायनिवाडयानुसार वादग्रस्‍त वाहनाच्‍या नुकसान भरपाईची जबाबदारी सामनेवाले यांचेवर येत नाही. त्‍यामुळे सामनेवाले विमा कंपनीची सेवेतील त्रुटी स्‍पष्‍ट होत नाही असे मंचाचे मत आहे.

सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

        आ दे श

  1. तक्रार क्र. 199/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे 

    फेटाळण्‍यात येते.

  1. खर्चाबाबत आदेश नाही.
  2. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.
  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.  

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.