-ः निकालपत्र ः- द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रार सामनेवाले 1,2 विरुध्द आहेत. सामनेवाले 1 हे बिल्डर डेव्हलपर असून सामनेवाले 2 त्याचे मॅनेजर आहेत. 2. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेंल्या ओरिएंट एव्हेन्यू, प्लॉट नं.7, सेक्टर 16, कामोठे नवी मुंबई येथील फ्लॅट ए 305 एरिया 607 चौ.फूट खरेदी करण्याचे ठरवले होते. सामनेवाले हा सेलडीड एक्झीक्युट करुन देत नाही. त्याचे रजिस्ट्रेशन करुन देत नाही, तसेच सदनिकेचा ताबाही देत नाही. अशा प्रकारे त्यानी दोषपूर्ण सेवा दिली असल्याने त्यांची तक्रार आहे. 3. तक्रारदारांनी सामनेवालेस रु.2,50,000/-ची रक्कम दिली आहे. जुलै 08 पासून जुलै 10 अखेर त्याने सामनेवालेची अनेकदा गाठ घेऊन सेलडीड एक्झीक्युट करणेस सांगितले व सामनेवालेनी तक्रारदाराच्या मागणीकडे दुर्लक्ष केलें आहे. सामनेवालेनी त्याला फक्त आश्वासन दिले आहे. तक्रारदारास असेही समजले आहे की, अनेक लोक त्याचेकडे त्यांनी केलेले बुकींग रद्द करुन पैसे परत मागत आहेत. कारण सामनेवाला हा रजिस्टर्ड दस्त करत नसल्यामुळे सामनेवाले फसवणूक करत आहे. 3. सामनेवालेनी रजि.दस्त करुन दिला नाही, त्याला 2-6-10 रोजी कायदेशीर नोटीस दिली. ही नोटीस स्विकारत नसल्यामुळे परत आली. ती त्याने यासोबत जोडली आहे. सोबत त्याने भरलेले पैसे त्याला परत मिळावेत, त्याला झालेल्या शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.दोन लाख व व्याजापोटी रु.54,000/- मिळावेत अशी एकूण रु.5,24,000/- मिळणेसाठी त्यानी तक्रार दाखल केली आहे. 4. तक्रारदारानी तक्रारीसोबत पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि.2 अन्वये दिले आहे. नि.3 सोबत त्याने सामनेवालेस चेकने पैसे दिले व त्याच्या पावत्या याकामी दाखल आहेत तसेच अँग्रीमेंट टु सेलचा ड्राफ्ट व त्याने दिलेली नोटीस शे-यासह परत आलेली या कामी दाखल आहे. तक्रारदारांची तक्रार ही पॉवर ऑफ अटॉनी यांचेतर्फे दाखल केली असून ते याकामी हजर आहेत. 5. सामनेवालेना नि.6 अन्वये नोटीसा काढण्यात आल्या होत्या. सामनेंवाले 1 ची नोटीस रिफ्यूज्ड म्हणून परत आली तर सामनेवाले 2 ने नोटीस स्विकारली. सामनेवाले 2 तर्फे अँड.विजय शिंदे यानी आपले वकीलपत्र दाखल केले. त्यानी लेखी म्हणणे दिले नाही. सामनेवाले 2 विरुध्द नो से चा आदेश पारित करणेत आला. सामनेवाले 1 विरुध्द एकतर्फा चौकशी आदेश पारित करणेत आला. 6. तक्रारदारानी दिलेली कागदपत्रे वाचली. त्यानी सामनेवालेस रु.2,50,000/- दिल्याचे कागदपत्रावरुन दिसून येत आहे, तशा पावत्या सामनेवालेनी दिलेल्या आहेत. पावत्या या 19-7-08 व 6-11-08च्या आहेत. पावत्यांवरुन त्या सदनिकेपोटी खरेदी केल्याचे दिसून येते. तसे अँग्रीमेंट फॉर सेलची प्रत या कामी हजर आहे. ती एक्झीक्युट व रजिस्टर्ड केलेली नाहीत. बुकींग केल्यापासून सामनेवालेनी तक्रारदारास दाद दिलेली नाही. तक्रारदारांचे म्हणणे हे अनचॅलेंज्ड राहिलेले आहे. त्यांचे म्हणणे अमान्य करणेचे काहीच कारण नाही. सामनेवालेंचे अशा प्रकारचे वर्तन हे दोषपूर्ण सेवा आहे तसेच त्यानी तक्रारदारांची फसवणूक रक्कम घेऊन केली आहे तसेच त्यानी अनुचित व्यापारी प्रथा अवलंबली आहे. त्यांचे हे कृत्य अशोभनीय आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले आश्वासनांची पूर्तता करत नसतील तर तक्रारदारानी गुंतवलेली रक्कम त्यास व्याजासह परत देणेचा आदेश करणे न्यायोचित ठरेल. तसेच त्याला जो मानसिक शारिरीक त्रास झाला आहे त्यापोटी त्याला रक्कम देणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. त्याने केलेंल्या मागण्या अत्यंत रास्त आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी सामनेवालेकडून तक्रारीत नमूद केलेंल्या सदनिकेचा ताबा मागितला आहे. तसेच पैसेही परत मागितले आहेत. एकूण सर्व परिस्थितीचा विचार करता तकारदारास त्याने घेतलेले पैसे त्यास परत करावेत व मानसिक शारिरीक त्रास व न्यायिक खर्चापोटी त्याने केलेंल्या मागणीपोटी त्याला रक्कम दयावी असे मंचाचे मत आहे. सामनेवालेनी दोषपूर्ण सेवा दिली असल्याने तक्रारदारांचा अर्ज खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे- -ः आदेश ः- अ) सामनेवालनी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे- 1. तक्रारदारास सामनेवालेनी तक्रारीत नमूद केलेल्या सदनिकेचे अँग्रीमेंट टु सेल स्वखर्चाने रजिस्टर्ड करुन दयावे तसेच इमारत पूर्ण बांधली असेल तर सदनिकेचा ताबाही विनातक्रार सर्व कागदपत्रासह दयावा. 2. या आदेशाचे पालन त्याने 45 दिवासात न केल्यास त्याचेकडून घेतलेली रक्कम रु.2,50,000/- त्याला 10 टक्के व्याजाने त्याने घेतलेल्या तारखेपासून परत करावी. 3. त्याला झालेल्या मानसिक शारिरीक त्रासापोटी रु.1,00,000/- लाख दयावेत. 4. न्यायिक खर्चापोटी रु.5,000/- दयावेत. 5. कलम क मधील रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास ती द.सा.द.शे. 10 टक्के दराने वसूल करणेचा अधिकार तक्रारदारास राहील. 6. सदर आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकाराना पाठवण्यात याव्यात. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि. 3-3-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |