Shri.Rajesh Shridhar Shirke filed a consumer case on 10 Mar 2011 against M/S.Avdhut Construction in the Additional DCF, Thane Consumer Court. The case no is CC/10/94 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
1.हे प्रकरण पूर्वी दि.4-1-11 रोजी सुनावणीसाठी नेमण्यात आले होते.आजरोजी मंचाने सकाळी पुकारले असता तक्रारदार व सामनेवाले दोघही गैरहजर होते.तक्रारदारांच्या गैरहजेरीमुळे प्रकरण डिसमिस्ड फॉर डिफॉल्ट करण्यात आले.
2.तक्रारदार विलंबाने पुन्हा हजर झज्ञले व त्यांनी पुन्हा ही तक्रार फैलावर घेणेबाबत अर्ज दिला, त्या अर्जावर सामनेवालेचे म्हणणे घेणेसाठी त्यांना नोटीस पाठवणेत आली.सामनेवाले 1 ने नोटीस घेण्याचे नाकारले.इतरांना नोटीसा प्राप्त झाल्या.आज दि.10-3-11 रोजी सामनेवाले 3 तर्फे अँड.आर.बी.शिंदे यांनी वकीलपत्र दाखल केले व त्यांनी लेखी म्हणणे न देता तोंडी युक्तीवाद करुन प्रकरण एकदा निकाली झाल्यावर पुन्हा फैलावर घेता येणारनाही असे म्हणून विरोध दर्शवला.उर्वरित सामनेवाले गैरहजर आहेत.सामनेवाले 3 नेमा.केरळ हायकोर्ट यांच्याकडील ए.आय.आर.09 मधील मा.जस्टीस शशीधरन नांबीया यांनी दिलेला निकाल दाखल केला, त्यानुसार सी.पी.अँक्टमध्येएकदा तक्रार डिसमिस्ड फॉर डिफॉल्टकेल्यावर ती पुन्हा रिस्टोअर करण्याचे अधिकार मंचाला किंवा मा.राज्य आयोगाला नाहीतव त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीने मा.राष्ट्रीय आयोग यांचेकडे आवश्यक असल्यास फक्त त्यांना अधिकार असल्याचे नमूद केले आहे.त्याचबरोबर केवळ न्यायाचे दृष्टीकोनातूनही अर्ज मंजूर करता येणार नाही असे त्या निवाडयात म्हटले आहे.
3.तक्रारदाराला संधी देणेत आली होती, त्याने अर्जात नमूद केलेल्या म्हणण्याशिवाय काहीही म्हटलेले नाही.एकूण पहाता एकदा आदेश पारित झाल्यानंतर परत त्याबाबत रिव्हयू घेणेचा अधिकार कायदयाने मंचालानाही.अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार पुन्हा फैलावर घेण्याचा अर्ज मंजूर करता येणार नसल्याचे स्पष्ट असल्यामुळे व एकदा प्रकरण निकाली काढण्यात आल्यामुळे ते अंतिमतः निकाली करण्यात येत आहे.