आदेश (दिः 22/02/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.4 व 5 हे मौजे माजीवाडे येथील सिटी सर्व्हे क्र. 482, 483, 484, 485, 486 मधील तक्रारीत नमुद केलेल्या क्षेत्रफळाचे मुळ मालक होते. दि.18/10/2010 रोजी विरुध्द पक्षाने भुखंड विकसीत करुन इमारत बाधण्याचा करारनामा केला. मोबदला म्हणुन 3,50,000/- रोख व 1650 चौ.फु बिल्ट अप क्षेत्रफळाच्या तळ मजल्यावर चार सदनिका कोणतीही रक्कम न आकारता तक्रारकर्त्याला देण्याचे विरुध्द पक्षाने कबुल केले. तक्रारकर्त्याकडुन विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी मुखत्यारनामा घेतला. बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी इमारत बांधली मात्र तळ मजल्यावर सदनिकेचे बांधकाम केले नाही. वापर ... 2 ... ( तक्रार क्र.,277/2006) परवाना मिळाल्यानंतर तळ मजल्यावर सदनिकेचे बांधकाम करणेत येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले. त्यांनी वारंवार करारात कबुल केलेल्या चार सदनिकेची मागणी विरुध्द पक्ष 1 ते 3 यांचेकडे केली पण त्याची दखल घेतल्या गेली नाही. महानगर पालिकेतुन तक्रारकर्त्याने मिळविलेल्या मंजुर नकाशात तळ मजल्यावर स्टिल्ट दाखवलेले आहे. विरुध्द पक्षाने बांधकाम केलेल्या 7 सदनिकांनपैकी चार सदनिकांची विक्री केली व 3 शिल्लक आहेत. विरुध्द पक्षाने दि.18/10/2000 रोजीच्या कराराचा भंग केला. आजच्या बाजारभावानुसार रु.1800चौ.फुट भाव त्या भागात आहे. 825 चौ.फुटाचे रु.1800 प्रमाणे 14,85,000/- ऐवढी रक्कम होते. अद्याप पर्यंत वापर परवाना महानगर पालिकेकडुन विरुध्दपक्षाने मिळवलेला नाही. प्रार्थनेत नमुद केल्यानुसार तक्रारकर्त्याला दोन सदनिका देण्याचा आदेश मंचाने विरुध्द पक्षाला द्यावा अथवा रु.14,85,000 देण्यात यावेत या व्यतिरिक्त नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजुर करण्यात यावा असे तक्रारकर्त्याची मागणी आहे. तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी 3(1) ते 3(3) अन्वये कागदपत्रे दाखल करण्यात आले. यात 18/10/2000 रोजीच्या कराराची प्रत, कुलमुखत्यारनामा तसेच दि.15/09/2003 रोजी मंजुरात मिळालेला नकाशा यांच्या प्रतींचा समावेश आहे.
2. विरुध्द पक्ष 1 व 2 ने दाखल केलेल्या जबाबात त्यांचे म्हणणे थोडक्यात खालील प्रमाणेः- तक्रारकर्त्याने मंचासमक्ष तक्रार प्रलंबित आहे ही बाब दडवुन ठेवली व 27/06/2006 रोजी त्याचे सोबत करारनामा केला. मुळ करारानुसार ज्या सदनिका तक्रारदारांना दिल्या होत्या त्यांची विक्री तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षाला केली व त्याचा मोबदला म्हणुन रु.3,00,000/- विरुध्द पक्षानी त्यांना द्यावे असे या करारानुसार ठरले. मात्र त्यानंतर सदर प्ररकणाची नोटिस विरुध्द पक्षाला मिळाली. तक्रार मागे घेण्यात येईल असे त्यांनी कबुल केले होते. मात्र तसे न करता एकतर्फी आदेश तक्रारकत्यांनी मिळवला, तक्रारकर्त्याच्या या चुकीच्या कृतीमुळे मंचाने तक्रार खारीज करावी.
3. तक्रारदार क्र. 2 ने दि.08/10/2007 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले व त्यात विरुध्द पक्षाने ताबा दिल्याचे कबुल केलले आहे. तसेच त्यांचा भावाला रक्कम मिळाल्याचे त्यात नमुद केले आहे. जी सदनिका तक्रारदार क्र. 2 ला देण्यात आली होती की त्याने विरुध्द पक्षाला परत विकली असाही त्यात उल्लेख आहे. दि.09/10/2007 रोजी पॅल जॉन विर यांनी देखील प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे त्यानुसार विरुध्द पक्षाने सदनिकेचा ताबा दिला असुन त्याचे भावाला रक्कम दिल्याचे नमुद केले आहे. कोणत्याही प्रकारची दोषपुर्ण सेवा विरुध्द पक्षाने तक्रारकत्र्याला दिलेली नसल्याने सदर प्रकरण मंचाने खारीज करावे. ग्राहक कायद्याच्या कलम 26 अन्वये खोटी तक्रार दाखल करण्याच्या कारणाखातर तक्रारकर्त्याला दंड करण्यात यावा असे नमुद केले आहे. ... 3 ... ( तक्रार क्र.,277/2006) लेखी जबाबासोबत विरुध्द पक्ष 3 ने दाखल केलेल्या कागदपत्रात विरुध्द पक्ष 2 चे मृत्यु प्रमाणपत्र, दि.27/06/2006चा करारनामा, प्रतीज्ञापत्रे व दि.21/06/2006 चा करारनाम्यांच्या प्रतींचा समावेश आहे.
4. लेखी जबाबासंदर्भात तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले तसेच स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर केले. मंचाने उभय पक्षांचे युक्तीवाद विचारात घेतले तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले असता खालील प्रमुख मुद्दयांचा विचार करण्यात आला. मुद्दा क्र. 1- विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याला पुरविलेल्या सेवेतील त्रृटींसाठी जबाबदार आहे काय ? उत्तर – नाही. मुद्दा क्र. 2- तक्रारकर्ता नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र आहे काय ? उत्तर - नाही. स्पष्टिकरण मुद्दा क्र.1 तक्रारदार व विरुध्द पक्ष 4 व 5 हे भाऊ आहेत. त्यांनी आपल्या सामायिक मालकीची मिळकत विकसीत करण्यासाठी दि.18/10/2000 रोजी विरुध्द पक्ष 1, 2 व 3 यांचे सोबत करारनामा केला. विरुध्द पक्ष 1 हे भागिदारी प्रतीष्ठान असुन 2 व 3 हे भागिदार होते. या करारानुसार इमारतीचे बांधकाम विरुध्द पक्षाने करायचे व त्या मोबल्यात इमारतीच्या तळमजल्यावरील 1650 चौ.फु बिल्टअप क्षेत्रफळाचे बांधकाम सदनिकांच्या स्वरुपात तक्रारकर्ता व त्यांच्या इतर भावांना द्यायच्या. कराराच्या परिच्छेद क्र. 9 मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. या 1650 चौ.फु व्यतीरिक्त रोख रु.3,50,000/- रक्कम विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी मुळ भुखंड मालक या नात्याने तक्रारकर्ता व त्यांच्या भावाला देण्याचे कबुल केले होते. इमारतीचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी आवश्यक परवाने मिळविण्याकरिता व इतर व्यवहार पुर्णकरण्यासाठी तक्रारकर्ता व त्यांचे भाऊ यांनी विरुध्द पक्ष 1 साठी विरुध्द पक्ष 2 व 3 ला नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र करुन दिले. या इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर या करारानुसार देणे लागत असलेल्या सदनिका आपल्याला दिलेल्या नाहीत त्यामुळे सदनिका अथवा त्यांची किंमत 14,85,000/- देण्याचा आदेश पारित करावा अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे. विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे स्पष्ट होते की 27/06/2006 रोजी तक्रारकर्ता क्र.1 सिडनी जॅर्ज विर व विरुध्द पक्ष 1 ते 3 यांच्यात करारनामा झाला या कराराची प्रत दाखल करण्यात आलेली आहे. या करारानुसार वादग्रस्त इमारतीतील विरुध्द पक्षाने बांधकाम केलेली सदनिका क्र.2 तळमजला क्षेत्रफळ 350 चौ.फु मारियन अपार्टमेंट, माजीवाडे, ठाणे मौजे पाचपाखाडी तक्रारकर्ता क्र.1 ने रु.3,00,000/- रकमेला विरुध्द पक्ष 1 ला विकली. या कराराखाली विरुध्द पक्ष 1 साठी विरुध्द पक्ष 2 ची स्वाक्षरी आहे. तसेच तक्रारकर्त्याची स्वतःची सही आहे. या कराराच्या पृष्ठ क्र. 8 वर रु.3,00,000/- रोख मिळाल्याची पावती ... 4 ... ( तक्रार क्र.,277/2006) तक्रारकर्त्याने दिलेली आहे. कराराखालील स्वराक्षरी सदर तक्रारीतील तक्रारकर्ता क्र. 1 ची आहे असे स्पष्ट होते. त्यामुळे ज्या सदनिकेची मागणी तक्रारकर्ता करतो ती सदनिका त्याने रु.3,00,000/- या रकमेला विरुध्द पक्षाला वर उल्लेख केलेल्या करारानुसार विकली. त्यामुळे मुळ इमारत विकसीत करण्याच्या मोबदल्यात त्याला जी सदनिका दिल्या जाणार हाती ती त्याला मिळाल्यानंतर त्याची पुनर विक्री त्याने विरुध्द पक्षाला केल्याचे आढळते. त्यामुळे विरुध्द पक्षाने कराराचा भंग केला व आपल्याला सदनिका दिली नाही हे त्याचे म्हणणे मंचाच्या मते योग्य नाही. मंचाला दुसरा नोंदणीकृत करारनामा दि.27/06/2006 निदर्शनास आला. याची प्रत दाखल करण्यात आलेली आहे. याच वादग्रस्त इमारतीतील 4था मजल्यावरील 401 क्रमांकाची सदनिका 400 चौ.फु तक्रारकर्त्याने याच विरुध्द पक्षाकडुन विकत घेतलेली आहे व ती त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची सदर तक्रार ही मंचाच्या मते योग्य नाही. त्यांच्या इतर भावाला करारानुसार जो मोबदला विरुध्द पक्षाकडु मिळावयाचा होता त्या संदर्भात त्यांनी प्रतीज्ञापत्र दाखल केलेले आहे. डेवीड जॉन, पॉल जॉन यांची प्रतिज्ञापत्रे अभिलेखात उपलब्ध आहेत. तक्रारकर्ता क्र.2 डेविट जॉन याने या आधिच तक्रारीतुन आपले नाव वगळावे असे निशाणी 8 अन्वये दाखल केला होता व तो मंचाने मंजुर केला होता. सबब उभयपक्षांच्या युक्तीवादांचा व दाखल कागदपत्रांचा विचार केले असता विरुध्द पक्ष हा कोणत्याही दोषपुर्ण सेवेसाठी जबाबदार नाही असे स्पष्ट होते. स्पष्टिकरण मुद्दा क्र.2 - विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला पुरविलेल्या सेवेसाठी जबाबदार नसल्याने तक्रारकर्ता हा नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळण्यास पात्र नाहीत. आदेश 1.तक्रार क्र. 277/2006 खारीज करण्यात येते. प्रकरण निकाली. 2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 22/02/2011 ठिकाण - ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |