(मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये)
निकालपत्र
- तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, तक्रारकर्ता हा वैद्यकीय व्यवसायिक आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबासह दिनांक 26.12.2016 ते 30.12.2016 या कालावधीमध्ये अदमान व निकोबार येथे जाण्याकरिता यात्रा डॉट. कॉम यांच्याकडून Reference No. YJ3074592 या द्वारे आरक्षण केले व दिनांक 17.12.2016 रोजी विमानाचे तिकिट घेतले. त्यानंतर दिनांक 25.12.2016 रोजी विरुध्द पक्षाने सुधारित फ्लाईट ई-तिकिट मेल वर पाठविले. तसेच त्याचा दैनदिन कार्यक्रम खालीलप्रमाणे होता.
पहिला दिवस – विमानतळ येथून पिकअप करणे व त्यानंतर जेल
दाखविणे, कॅरबिनचे कोव्ह बीचला भेट देणे, लाईन साउन्ड शो
दाखविणे.
दुसरा दिवस - पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक + राधानगर
तिसरा दिवस – स्कुबा डायविंग + रिटर्न ते पोर्ट ब्लेअर
चौथा दिवस - अॅन्थ्रोपोलोजिकल अॅन्ड अॅक्वेरियम + समुद्रीका
पाचवा दिवस – विमानतळावर ड्रॉप करणे.
दिनांक 26.12.2016 रोजी तक्रारकर्ता अंदमान येथे पोहचले असता त्याला तेथील हॉटेल मधील व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्ज्याचे होते व तेव्हा तक्रारकर्ता हा आपल्या कुटुंबासह (पत्नी व 2 मुलांसह) अंदमान येथे दिनांक26.12.2016 रोजी पोहचले तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण विरुध्द पक्षाने त्यांना सांगितले की, त्याचे हवेलॉक बेट वर जायचे तिकिट अजून झालेले नाही. कारण वरील ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे तक्रारकर्त्याला दिनांक 27.12.2016 रोजी हवेलॉक येथे जायचे होते व त्याला सिम्फनी पाम्स येथे राहयाचा कार्यक्रम होता. परंतु त्याचे फेरी ते पोर्ट ब्लेअर व पोर्ट ब्लेअर ते हवेलॉक येथील तिकिट झालेले नसल्याने त्याचा पुढचा कार्यक्रम ते करु शकले नाही. सुरुवातीला तक्रारकर्त्याला असे सांगितले होते की, त्याचा फेरी ते हवेलॉकचे बुकिंग मकरुज कंपनी तर्फे होणार होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 26.12.2016 रोजी सायंकाळी 5 ते रात्रीच्या 11.45 वाजता पर्यंत विरुध्द पक्षाला सतत दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याला कुठल्याही प्रकारची दाद मिळाली नाही. विरुध्द पक्षाच्या अशा वर्तणुकीमुळे तक्रारकर्त्याला विनाकारण दिनांक 27.12.2016 रोजी देखील पोर्ट ब्लेअर येथेच घालवावे लागले व अंदमान येथे जाऊन ही ते तेथील प्रेक्षणीय स्थळ पाहू शकला नाही. त्यानंतर दुस-या दिवशी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सांगितले की, त्याने हवेलॉक येथे जायचे आहे त्या घाई गडबडीत तक्रारकर्त्याच्या गुडघ्याला झटका लागला त्यामुळे तक्रारकर्त्याला अनावश्यक शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तक्रारकर्ता हवेलॉक येथे पोहचल्यानंतर तेथील सिम्फनी पाम्स हॉटेलचा दर्जा देखील निकृष्ट होता. सुरुवातीला विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला हवेलॉक येथे वातानुकूलित कक्ष देण्याचे वचन दिले होते.परंतु विरुध्द पक्षाने सांगितले की, तक्रारकर्त्याने ज्या कालावधीत विरुध्द पक्षाकडे अंदमान निकोबार येथे जायचे ठरविले होते. त्यावेळी क्रिसमिस मुळे गर्दीचा मौसम असल्या कारणाने तक्रारकर्त्याला चांगले वातानुकूलित कक्ष मिळू शकले नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 27.12.2016 रोजी विरुध्द पक्षाला मेल पाठविला होता वत्याकरिता दि. 02.01.2017 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षासाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याशी भेटण्याचे टाळले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 05.01.2017 रोजी विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व त्यात रुपये 5,00,000/- ची नुकसान भरपाईची मागणी केली. विरुध्द पक्षाच्या अशा वागणूकीमुळे तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करावे. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या द्वारे घेतलेली रक्कम रुपये 1,88,000/- 18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावे. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 5,00,000/- 18 टक्के व्याजासह द्यावे अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 8 वर दाखल केला असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हे ग्राहकांच्या
- उभय पक्षाने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्यादीचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे उत्तर
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय.
- विरुध्द पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वर नमूद केल्याप्रमाणे दिनांक 26.12.2016 ते 30.12.2016 या कालावधीकरिता अंदमान निकोबार येथे यात्रा करण्याकरिता विरुध्द पक्षाकडे रुपये 1,88,000/- भरले होते व ठरल्याप्रमाणे दिनांक 26.12.2016 रोजी यात्रा आरंभ झाली. परंतु विरुध्द पक्ष 2 यांनी ठरल्याप्रमाणे तक्रारकर्त्याला दिनांक 27.12.2016 रोजी फेरी ते पोर्ट ब्लेअर व पोर्ट ब्लेअर ते हवेलॉक येथील वातानुकूलित कक्ष आरक्षित केले नाही. त्यामुळे तेथील तक्रारकर्त्याचा तो दिवस व रात्र तक्रारकर्त्याला विनाकारण पोर्ट ब्लेअर येथे घालवावी लागली. त्यानंतर दुस-या दिवशी विरुध्द पक्षाने गैरवातानुकूलित कक्ष हवेलॉकयेथे आरक्षित केले.त्या धावपळीत तक्रारकर्त्याच्या गुडघ्याला झटका बसला व त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागला तसेच त्याचा पुढचा प्रवास विस्कळीत झाले. तक्रारकर्ता व त्यांच्या कुटुंबाला जे स्थळ पाहावयाचे होते ते स्थळ पाहू शकले नाही. इतकी प्रचंड रक्कम खर्च करुन ही तक्रारकर्त्याला व त्याच्यामुलांना पर्यटनाचा आनंद घेता आला नाही व त्याचे हवेलॉक येथील वातानुकूलित कक्षाचे आरक्षण झाले नाही ही माहिती विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या पासून लपवून ठेवली आणि तक्रारकर्ता अंदमान येथे पोहचल्यावर त्याला ही माहिती देण्यात आली. यासर्व बाबी वरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट दिसून येते.
सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येते.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला यात्रे दरम्यान योग्य ती सेवा न पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.