तक्रारकर्त्याचे वकील हजर, त्यांचा युक्तिवाद ऐकला, त्यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांसोबत मौजा-बेलपेठ, तह. उमरेड, जिल्हा नागपूर, खसरा नं.70, प.ह.नं.30 येथील प्रस्तावीत लेआऊट मधील भुखंड क्र.25 रु.2,25,000/- ला घेण्याचा करारकरुन रु.67,500/- इतकी रक्कम दिली. पुढील रक्कमही ते वेळोवेळी देण्यांस तयार होते, मात्र गैरअर्जदारानी जमीनीचे अकृषकात रुपांतर केले नाही आणि त्यांनी रक्कमही स्विकारली नाही. शेवटी तक्रारकर्त्याने दि.26.04.2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस देऊन त्याची इसाराची रक्कम परत मागितली. गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त झाली मात्र त्यांनी काहीही केले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे गैरअर्जदारांस दिलेले रु.67,500/- त्यावर दि.25.04.2009 पासुन द.सा.द.शे.12 टक्के व्याजासह परत मिळावे आणि मानसिक, शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- मिळावी अश्या मागण्या केलेल्या आहेत.
वरील सर्व दस्तावेजांव्दारे तक्रारकर्त्याने आपले निवेदन सिध्द केलेले आहे आणि गैरअर्जदारांनी मंचात उपस्थित होऊन कोणत्याही प्रकारे जबाब दाखल केलेला नाही, विक्रीपत्र करुन दिलेले नाही तसेच जमीनीचे अकृषकात रुपांतर झाल्याबाबतचा कुठलाही दस्तावेज प्रकरणात दाखल नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या सेवेत गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे असा मंचाचा निष्कर्ष आहे. करीता खालिल प्रमाणे आदेश देण्यांत येतो.
- आदेश -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून स्विकारलेली प्लॉटच्या इसाराची रक्कम रु.67,500/- दि.13.02.2009 पासुन द.सा.द.शे.12 टक्के दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा वरील रकमेवर 12 टक्के ऐवजी 15 टक्के व्याज देय राहील.