Maharashtra

Nagpur

CC/418/2020

SHRI. RAMESH RAMAJI DAHIWALE - Complainant(s)

Versus

M/S. VYANKATESH FORTUNE MAXIMIZER PVT. LTD. PVT. LTD., THROUGH DIRECTOR - Opp.Party(s)

ADV. C.F. BHAGWANI

30 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/418/2020
( Date of Filing : 20 Oct 2020 )
 
1. SHRI. RAMESH RAMAJI DAHIWALE
R/O. GOND MOHALLA, RANI DURGAWATI NAGAR, BINAKI MANGALWARI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. VYANKATESH FORTUNE MAXIMIZER PVT. LTD. PVT. LTD., THROUGH DIRECTOR
VYANKATESH CITY, SHRI. TOWER, IN FRONT PRIMARY SCHOOL, SOMALWADA CHOWK, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Jul 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाण..
  2. विरुध्‍द पक्षाचा लेआऊट तयार करुन प्‍लॉट विक्रीचा व्‍यवसाय आहे. श्री उमाजी गजभिये यांनी विरुध्‍द पक्षाकडून मौजा गिरड, खसरा क्रमांक २८२, प.ह.क्र. ६१/२०, गिरड सेक्‍टर ५ मधील भूखंड क्रमांक ५, एकूण क्षेञफळ ११००० चौरस फुट (१०२१.९२ चौरस मीटर) एकूण रुपये २,२०,०००/- एवढ्या किंमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १७/२/२०१४ रोजी केला आहे. करारनाम्‍यानुसार श्री उमाजी गजभिये यांनी प्‍लॉट खरेदी पोटी विरुध्‍द पक्षाला दिनांक २३/०२/२०१२ रोजी रुपये १०,०००/-, दिनांक २९/२/२०१२ रोजी रुपये ४०,०००/- व दिनांक २१/११/२०१३ रोजी रुपये ४०,०००/- व दिनांक १३/२/२०१४ रोजी रुपये २०,०००/- असे एकूण रुपये १,१०,०००/- अदा केले व करारानुसार उर्वरीत रक्‍कम रुपये ४,५००/- प्रतिमहा प्रमाणे एकूण २३ हफ्यात अदा करावयाची होती व शेवटचा हफ्ता रुपये ६,५००/- तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला अदा करावयाचा होता. करारानुसार तक्रारकर्त्‍यास प्‍लॉट चे विकसनापोटी विकसनशुल्‍क रुपये १०/- प्रति चौरस फुटाप्रमाणे विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट बुकींगपासून २४ महिण्‍यांत अदा करावयाचे होते.
  3. करारात नमुद करण्‍यात आले होते की, जर प्‍लॉट खरेदी करणा-यास करारनामा रद्द करावयाचा असल्‍यास प्‍लॉट खरेदी दराने दिलेली रक्‍कम दिलेल्‍या रकमेपैकी २० टक्‍के रक्‍कम अदा करुन परत केली जाईल.
  4. काही आर्थिक अडचणीमुळे श्री उमाजी गजभिये विरुध्‍द पक्षास भूखंडापोटी देय असलेली रक्‍कम देण्‍यास असमर्थ ठरल्‍यामुळे भूखंड क्रमांक ५ मौजा गिरड (वरीलप्रमाणे) दिनांक ३/१/२०१५ रोजी तक्रारकर्त्‍यास हस्‍तांतरीत केला. सदर प्‍लॉट हस्‍तांतरीत करतांना प्‍लॉट खरेदीपोटी विरुध्‍द पक्षास दिलेली रक्‍कम रुपये १,१०,०००/- श्री उमाजी गजभिये यांना देण्‍यात आली. त्‍याबाबतचे लेखी पञ व संमतीपञ तक्रारकर्त्‍याचे नावे देण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट खरेदीपोटी द्यावयाची उर्वरीत रक्‍कम रुपये १,१०,०००/- धनादेश क्रमांक २४५७१४ अन्‍वये विरुध्‍द पक्षास अदा केली.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून प्‍लॉट खरेदीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला भूखंडाचे विक्रीपञ करुन दिले नाही व ताबा दिला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक १२/१/२०२० रोजी रजिस्‍टर्ड पञाव्‍दारे‍ विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍द  पक्षाने पञाची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. आयोगासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने भूखंड क्रमांक ५, मौजा गिरड, खसरा क्रमांक २८२ चे तक्रारकर्त्‍याचे नावे विक्रीपञ नोंदणीकरण करुन ताबा देण्‍याचे आदेश करावे.
  2. काही तांञिक अडचणीमुळे भूखंडाचे विक्रीपञ करणे शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍यास  आजच्‍या बाजारभावाप्रमाणे भरपाई रक्‍कम व नुकसान भरपाई देण्‍यात यावे व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावे.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत आर.पी.ए.डी. व्‍दारे नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस विरुध्‍द पक्षाल प्राप्‍त होऊनही विरुध्‍द  पक्ष मंचात हजर झाले नाही. करिता विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक १२/२/२०२१ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत सादर केलेले दस्‍ताऐवज व लेखी युक्तिवाद याचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                    निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा गिरड, खसरा क्रमांक २८२, प.ह.क्र. ६१/२०, गिरड सेक्‍टर ५ मधील भूखंड क्रमांक ५, एकूण क्षेञफळ ११००० चौरस फुट (१०२१.९२ चौरस मीटर) एकूण रुपये २,२०,०००/- एवढ्या किंमतीमध्‍ये विकत घेण्‍याचा करार विरुध्‍द पक्षाशी दिनांक १७/२/२०१४ रोजी केला आहे. करारनाम्‍यानुसार श्री उमाजी गजभिये यांनी प्‍लॉट खरेदी पोटी विरुध्‍द पक्षाला दिनांक २३/०२/२०१२ रोजी रुपये १०,०००/-, दिनांक २९/२/२०१२ रोजी रुपये ४०,०००/- व दिनांक २१/११/२०१३ रोजी रुपये ४०,०००/- व दिनांक १३/२/२०१४ रोजी रुपये २०,०००/- असे एकूण रुपये १,१०,०००/- अदा केले व करारानुसार उर्वरीत रक्‍कम रुपये ४,५००/- प्रतिमहा प्रमाणे एकूण २३ हफ्यात अदा करावयाची होती व शेवटचा हफ्ता रुपये ६,५००/- तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाला अदा करावयाचा होता. करारानुसार तक्रारकर्त्‍यास प्‍लॉट चे विकसनापोटी विकसनशुल्‍क रुपये १०/- प्रति चौरस फुटाप्रमाणे विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट बुकींगपासून २४ महिण्‍यांत अदा करावयाचे होते. काही आर्थिक अडचणीमुळे श्री उमाजी गजभिये विरुध्‍द पक्षास भूखंडापोटी देय असलेली रक्‍कम देण्‍यास असमर्थ ठरल्‍यामुळे भूखंड क्रमांक ५ मौजा गिरड (वरीलप्रमाणे) दिनांक ३/१/२०१५ रोजी तक्रारकर्त्‍यास हस्‍तांतरीत केला. सदर प्‍लॉट हस्‍तांतरीत करतांना प्‍लॉट खरेदीपोटी विरुध्‍द पक्षास दिलेली रक्‍कम रुपये १,१०,०००/- श्री उमाजी गजभिये यांना देण्‍यात आली. त्‍याबाबतचे लेखी पञ व संमतीपञ तक्रारकर्त्‍याचे नावे देण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट खरेदीपोटी द्यावयाची उर्वरीत रक्‍कम रुपये १,१०,०००/- धनादेश क्रमांक २४५७१४ अन्‍वये विरुध्‍द पक्षास अदा केले.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २(१) वर दाखल करारनामा, निशानी क्रमांक २(२) वर दाखल रक्‍कम मिळाल्‍याबाबतच्‍या पावत्‍या तसेच निशानी क्रमांक २(३)वर दाखल हमीपञ तसेच निशानी क्रमांक २(४) वर दाखल रमेश रामाजी दहीवाले यांना अदा करण्‍यात आलेली पावती याचे अवलोकन केल्‍यावर हे सिध्‍द होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर मिळकत अकृषक करुन देऊन विकसनाबाबत सेवा देण्‍याचा करार केला आहे. तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या M/s Narne Construction Pvt. Ltd. Vs. Union of India and Ors. Etc. II (2012) CPJ 4 (SC)  या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्‍तुत प्रकरण चालविण्‍याचे अधिकार आहे.
  3. विरुध्‍द पक्षाने श्री उमाजी रामजी दहीवाले यांचेसोबत दिनांक १७/२/२०१४ रोजी मौजा गिरड, पटवारी हलका क्रमांक ६१/२० मधील भूखंड क्रमांक ५ चा विक्रीचा करारनामा केला होता व सदरचा प्‍लॉट श्री उमाजी रामजी दहीवाले यांनी हमीपञाव्‍दारे श्री रमेश रामजी दहीवाले यांना दिनांक ३/१२/२०१५ रोजी हस्‍तांतरीत केला व हस्‍तांतरीत करतांना श्री उमाजी रामाजी द‍हीवाले यांना श्री रमेश रामाजी दहीवाले यांचेकडून प्‍लॉट हस्‍तांतरण पोटी रक्‍कम रुपये १,१०,०००/- प्राप्‍त झाले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने श्री रमेश रामाजी दहीवाले यांचेकडून मौजा गिरड, पटवारी हलका क्रमांक ६१/२०, भूखंड क्रमांक ५ चे विक्रीपोटी उर्वरीत रक्‍कम रुपये १,१०,०००/- स्विकारली त्‍यामुळे तक्रारकर्ता व विरुध्द पक्षकार यांचेमधील करारनाम्‍यातील बदल स्विकारलेला आहे. म्‍हणून करारनामा दिनांक ३/१२/२०१५ आजही अस्तित्‍वात आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून संपूर्ण रक्‍कम स्विकारुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला भूखंडाचे विक्रीपञ नोंदणी करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्‍यापार प्रथेचा वापर करणारी कृती आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने मौजा गिरड, खसरा क्रमांक २८२, प.ह.क्र. ६१/२०, गिरडी सेक्‍टर ५ मधील भूखंड क्रमांक ५, एकूण क्षेञफळ ११००० चौरस फुट (१०२१.९२ चौरस मीटर) चे तक्रारकर्त्‍याचे नावे विक्रीपञ नोंदणी करुन देवून तक्रारकर्त्‍याला ताबा देण्‍यात यावा. विक्रीपञाचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

किंवा

     विरुध्‍द पक्षाला काही तांञिक अडचणीमुळे विक्रीपञ करुन देणे शक्‍य नसल्‍यास सदर भुखंड क्रमांक ५ चे नोंदनी करण्‍यास कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर व तांञिक अडचण आल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी एकूण क्षेञफळ ११००० चौरस फुट (१०२१.९२ चौरस मीटर) इतके क्षेञफळ असलेल्‍या  भुखंडासाठी मौजा गिरड  तह.जिल्‍हा नागपूर  झोनमधील अथवा नजीकच्‍या   इतर झोनमध्‍ये एकूण क्षेञफळ ११००० चौरस फुट (१०२१.९२ चौरस मीटर) चे कृषक भुखंडासाठी शासकीय दराने आदेशाच्‍या  दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या   दिनांकापासुन एक महिण्‍याच्‍या आत द्यावी आणि सदरहू रक्‍कम एक महिण्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रकमेवर दिनांक ३०/०७/२०२१ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावी.

  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मा‍नसिक व शारीरिक ञासापोटी रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  2. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  3. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4.    . तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.