Maharashtra

Bhandara

CC/11/42

GANESH S/o. BAPURAO BRAMHANKAR - Complainant(s)

Versus

M/S. VARMA TRACTORS - Opp.Party(s)

MR. N.P.DEOGADE

15 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/11/42
 
1. GANESH S/o. BAPURAO BRAMHANKAR
R/o. AERANDI, PO. BAKTI, TAH. ARJUNI MORGAON, DISTT. GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. VARMA TRACTORS
C/o. PROP. MOHIT VARMA, NATIONAL HIGHWAY NO. 6, SAKOLI, TAH SAKOLI, DISTT. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. Geeta R Badwaik Member
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

तक्रार क्र. CC/ 11/ 42                             दाखल दि. 29.03.2011     

                                                                                           आदेश दि. 15.09.2014

 

 

                                              

 

तक्रारकर्ता          :-           श्री गणेश बापूराव ब्राम्‍हणकर

                              वय – 26 वर्षे, धंदा – शेती

                              रा. एरंडी, पो. बाक्‍टी

                              ता.अर्जुनी मोरगांव, जि.गोंदिया

 

 

       

-: विरुद्ध :-

 

 

 

 

 

विरुद्ध पक्ष          :-     1.    वर्मा ट्रॅक्‍टर्स,

                              द्वारा प्रोप्रा मोहीत वर्मा

                              राष्‍ट्रीय महामार्ग क्र.6, साकोली,

                              ता.साकोली जि.भंडारा

 

 

                                                                                                                                                                                                                                        

                              

गणपूर्ती            :-           मा. अध्‍यक्ष श्री अतुल दि. आळशी

                              मा. सदस्‍या श्रीमती गीता रा. बडवाईक

                              मा.सदस्‍य हेमंतकुमार पटेरिया                       

 

 

 

उपस्थिती           :-           तक्रारकर्त्‍यातर्फे अॅड.एन.पी.देवगडे

                              वि.प. तर्फे अॅड.डी.आर.निर्वाण

                             

                              .

 (आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष श्री अतुल दि. आळशी )

 

-//    दे    //-

(पारित दिनांक 15 सप्‍टेंबर 2014)

 

 

 

 1.     तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून आयशर कंपनीचा 39 अश्‍वशक्‍तीचा (Horsepower) ट्रॅक्‍टर विकत घेतला व तो बदलून न दिल्‍यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरहू प्रकरण तक्रारकर्त्‍याने न्‍यायमंचामध्‍ये दाखल केलेले आहे.

 

     तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे

 

2.    तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून विरुध्‍द पक्ष वर्मा ट्रॅक्‍टर्स, ता.साकोली, जि.भंडारा यांना आयशर कंपनीने ट्रॅक्‍टर विक्रीकरीता कंपनीचे अधिकृत विक्रेता/प्रतिनीधी म्‍हणुन नियुक्‍त केले आहे.

      

         तक्रारकर्त्‍याला आयशर कंपनीचा 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर त्‍याच्‍या शेतीच्‍या कामाकरीता त्‍याला विकत घ्‍यायचा होता. विरुध्‍द पक्ष हे एकमेव कंपनीचे अधिकृत विक्रेता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सप्‍टे.2009 मध्‍ये आयशर कंपनीचा 333 SDI या नावाने ओळखला जाणारा 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर विकत घ्‍यायचा आहे असे विरुध्‍द पक्षास सांगितले. तक्रारकर्त्‍याने दिनांक 28/9/2009 ला आयशर 333 SDI 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर विरुध्‍द पक्षाचे सांगण्‍यावरुन विकत घेतला. सदरहू ट्रॅक्‍टरची किंमत 4,25,000/-(चार लाख पंचवीस हजार) ही होती. ट्रॅक्‍टरच्‍या R.T.O. नोंदणीकरीता व विम्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने 20,000/- रुपये अतिरिक्‍त रक्‍कम रोख स्‍वरुपात दिली. विरुध्‍द पक्षाने त्‍याचे अधिकृत एजन्‍ट मार्फत ट्रक्‍टरची नोंदणी दिनांक 21/12/2009 ला करुन दिली व ट्रॅक्‍टरचा विमा दिनांक 29/10/2009 ला काढून दिला. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.

 

3.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सदरहू ट्रॅक्‍टर हा आयशर कंपनाचा 333 SDI व 39 अश्‍वशक्‍तीचा असल्‍याचे विकत घेतांना सांगितले तसेच ट्रॅक्‍टरची नोंदणी करतांना R.T.O. च्‍या अर्जामध्‍ये ट्रॅक्‍टर हा 39 अश्‍वशक्‍तीचा आहे अशी माहिती दिली होती. त्‍यानुसार R.T.O. यांनी ट्रॅक्‍टर नोंदणी करतेवेळी तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर हा 39 अश्‍वशक्‍तीचा आहे असे दर्शवून ट्रॅक्‍टरची नोंदणी केली.

 

4.      तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर हा त्‍याच्‍या शेतकी कामासाठी हंगामी पीक घेण्‍यासाठी उपयोगात आणला जात होता. तक्रारकर्ता हा 2010 मध्‍ये खरीप हंगामात ट्रॅक्‍टरची नांगरणी करीत असता ट्रॅक्‍टरची चाके शेतामध्‍ये नुसती फिरत राहिली व ट्रॅक्‍टर सतत बंद पडत होता. सदरहू ट्रॅक्‍टरला ट्रॉली जोडली असता व माल त्‍यामध्‍ये भरला असता ट्रॅक्‍टर हा जागच्‍या जागी फिरतो व ट्रॉली ओढण्‍यास वारंवार असमर्थ ठरतो.

 

5.    त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने नोव्‍हे.2010 ला आयशर 333 SDI ट्रॅक्‍टर बद्दल माहिती गोळा केली तसेच विविध तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या भेटी घेवून ट्रॅक्‍टर बद्दल चौकशी केली असता तक्रारकर्त्‍याला 39 अश्‍वशक्‍तीचा 333 SDI म्‍हणुन दिलेला ट्रॅक्‍टर हा 33 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर आहे असे कळले.

 

6.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास खोटी माहिती देवून व जास्‍त पैसे घेवून कमी अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर देणे म्‍हणजेच सेवेतील गंभीर त्रृटी आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारीरिक, मानसिक हाल अपेष्‍ट सहन कराव्‍या लागल्‍या. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने रुपये 2,00,000/- (दोन लाख) नुकसान भरपाई मिळण्‍याची मागणी केली आहे किंवा ट्रॅक्‍टर बदलून दयावा ही सुध्‍दा मागणी केलेली आहे.

 

7.    तक्रारकर्त्‍याने आयशर कंपनीच्‍या विविध Models बद्दल माहिती घेतली असता त्‍याला असे कळले की आयशर कंपनी ही 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर बनवित नसुन तो केवळ 33 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर आहे. तसेच आयशर कंपनीचा 380 Super DI हा 38 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर असून आयशर 480 Super DI हा ट्रॅक्‍टर 42 अश्‍वशक्‍तीचा आहे व तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्षाने मागणी प्रमाणे ट्रॅक्‍टर न देता कमी अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर देणे म्‍हणजेच सेवेतील त्रृटी आहे. करीता तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर बदलून देवून 2,00,000/- (दोन लाख) रुपये नुकसान भरपाई खर्चासह देण्‍यासाठी सदरहू तक्रार न्‍यायमंचात दाखल केली आहे.

 

8.    तक्रारकर्त्‍याची तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षास दिनांक 29/3/2011 ला नोटीस काढण्‍यात आल्‍या.

 

9.    विरुध्‍द पक्षाने आपला जबाब प्रारंभीक आक्षेपासह दिनांक 22/5/2011 ला दाखल केला.

 

10.    विरुध्‍द पक्षाने आपल्‍या जबाबामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचे खंडन केले आहे. 

     

11.     विरुध्‍द पक्षाने  आपल्‍या  जबाबामध्‍ये असे  म्‍हटले आहे की  तक्रारीमध्‍ये असलेला आरोप हा गंभीर स्‍वरुपाचा असल्‍याने त्‍यासाठी भक्‍कम पुराव्‍याची गरज, उलट तपासणी, साक्षपुरावे व तज्ञाचे मत घेणे आवश्‍यक आहे. तसेच साक्षपुरावा घेण्‍यासाठी सदरहू प्रकरण दिवाणी न्‍यायालयात पाठविण्‍यात यावे. करीता सदरहू प्रकरण फेटाळण्‍यात यावे असे म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याचा गैरसमज दुर करण्‍यासाठी Automobile क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींचे पुरावे घेणे जरुरी असून ट्रॅक्‍टरची तपासणी ही कमिशनर द्वारे करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने सदरहू तक्रार फेटाळण्‍यात यावी, असे म्‍हटले आहे. तक्रारकर्ता हा ग्राहक या संज्ञेत मोडत नाही तसेच सदरहू प्रकरणात उत्‍पादकास गैरअर्जदार करणे आवश्‍यक होते.     तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर विकत घेतल्‍यापासून 17 महिन्‍यानंतर केलेली तक्रार खोटी असून फक्‍त पैसा उकळण्‍याच्‍या दृष्‍टीने सदरहू तक्रार केली आहे व तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टरच्‍या क्षमतेबद्दल यापुर्वी तक्रार न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.

 

     

12.           तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत ट्रॅक्‍टरचे रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट पान नं.8 वर दाखल केले आहे. आयशर कंपनीच्‍या विविध Models बद्दलची इंटरनेट द्वारे काढलेली माहिती पान नं.9 ते 12 वर दाखल केली आहे. विरुध्‍द पक्षाने सदरहू प्रकरणात दिनांक 23/5/2011 ला ट्रॅक्‍टरच्‍या रजिस्‍ट्रेशनची कागदपत्रे पान नं.31,32 वर दाखल केले आहे. ट्रॅक्‍टरचे बील पान न.33 वर दाखल केले आहे. अधिकृत रसीद व डिलीवरी नोट पान नं.35 वर, आयशर 333 SDI ची Technical माहिती 36 वर तसेच Trade Certificate पान नं.37 वर दाखल आहे. Chartered Engineer चा दाखला पान न.38 वर, Engine Power Test Code पान नं.41 वर, Central Government चे ट्रॅक्‍टर संबंधीचे शेती करण्‍यासंबंधी वापरण्‍याचे प्रमाणत्र पान नं.46 वर दाखल केले आहे. आयशर 333 या ट्रॅक्‍टरचे Technical Specification पान नं.47 वर दाखल आहे. HMT ट्रॅक्‍टरचे माहिती पत्रक पान नं.57 वर तसेच स्‍वराज ट्रॅक्‍टरचे माहिती पत्रक पान नं.58 ते 60 वर, महिन्‍द्रा ट्रॅक्‍टरचे माहितीपत्रक पान न.62 वर दाखल केले आहे.

 

13.    तक्रारकर्त्‍याचे वकील अॅड.एन.पी.देवगडे यांनी युक्‍तीवाद केला की तक्रारकर्ता शेतकरी असून त्‍याला विरुध्‍द पक्षाने 39 अश्‍वशक्‍तीचा आयशर कंपनीचा 333 हा ट्रॅक्‍टर असल्‍याचे सांगून विरुध्‍द पक्षाने कमी अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर देवून तक्रारकर्त्‍याचे रुपये 4,25,000/-(चार लाख पंचवीस हजार) घेवून फसवणूक  केली  आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या   ट्रॅक्‍टरच्‍या  R.T.O.Passing  मध्‍ये  सुध्‍दा आयशर 333 हा ट्रॅक्‍टर 39 अश्‍वशक्‍तीचा आयशर कंपनीचा असल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर संबंधी तांत्रिक माहिती गोळा केली असता त्‍याला असे कळले की आयशर कंपनी ही 333 SDI हा 39 अश्‍वशक्‍तीच्‍या ट्रॅक्‍टरची निर्मीतीच करीत नाही. तक्रारकर्त्‍याला दिलेला ट्रॅक्‍टर हा 39 अश्‍वशक्‍तीचा नसून तो 33 अश्‍वशक्‍तीचा असल्‍यामुळे तो तक्रारकर्त्‍यास उपजीविकेसाठी शेतीमध्‍ये काम करण्‍यासाठी असमर्थ असल्‍यामुळे व तक्रारकर्त्‍याने त्‍यासंबंधी आयशर कंपनीचे ‘Broucher’ सदरहू प्रकरणात दाखल केल्‍यामुळे व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची फसवणूक केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास ट्रॅक्‍टर बदलून दयावा व नुकसान भरपाई म्‍हणुन 2,00,000/-(दोन लाख) देण्‍याचा युक्‍तीवाद केला.

 

14.     विरुध्‍द पक्षाचे वकील अॅड.डी.आर.निर्वाण यांनी युक्‍तीवाद केला की विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ट्रॅक्‍टर विकला आहे ही बाब मान्‍य आहे. तक्रारकर्त्‍याने उत्‍पादकाला सदरहू प्रकरणामध्‍ये जोडले नाही. तक्रारकर्त्‍याने लावलेला आरोप संपुर्णतः खोटा असून सदरहू प्रकरणामध्‍ये Expert Opinion तांत्रिक मुद्दयावर दाखल न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दिलेला ट्रॅक्‍टर हा कमी अश्‍वशक्‍तीचा आहे हे सिध्‍द् होत नाही. तक्रारकर्त्‍याला दिलेला ट्रॅक्‍टर हा 39 अश्‍वशक्‍तीचा असून जेव्‍हा त्‍याचा प्रत्‍यक्षात वापर केला जातो तेव्‍हा तो ट्रॅक्‍टर 33 अश्‍वशक्‍ती (Horsepower) use करतो व ही बाब इतर कंपनीच्‍या ट्रॅक्‍टरमध्‍ये सुध्‍दा अंतर्भुत असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खोटया स्‍वरुपाची असून ती खारीज करण्‍यात यावी असा युक्‍तीवाद केला. 

 

15.     तक्रारकर्त्‍याचा तक्रार अर्ज व तक्रारीमधील कागदपत्रे, दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.

 echnical Specification 1णजेच 24

      1. तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे का? – नाही.

      2. विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेमध्‍ये त्रृटी आहे का? – नाही.

कारणमिमांसा

 

16.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दिनांक 28/9/2009 ला आयशर कंपनीचा ट्रॅक्‍टर Model 333, 39 अश्‍वशक्‍तीचा (SAE) HP 3 सिलेंडर डिझेल ट्रॅक्‍टर रुपये 4,65,990/-(चार लाख पासष्‍ट हजार नऊशे नव्‍वद) रुपयाला बिल क्र.1539 नुसार खरेदी केला. हे विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या बिल क्र.VTS/094/09-10 दिनांक 26/10/2009 वरुन सिध्‍द् होते. विरुध्‍द पक्षाने व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर नं. MH 35 G 3447 जो तक्रारकर्त्‍याच्‍या नांवाने R.T.O. मध्‍ये नोंदणी केला आहे त्‍यामध्‍ये आयशर ट्रॅक्‍टर हा 39 Horsepower (SAE) असे नमुद आहे व सदरहू ट्रॅक्‍टर हा Magna Finance Corporation Ltd, Branch,Nagpur यांच्‍याकडून कर्जाद्वारे विकत घेतल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे Hypothicated म्‍हणुन दिनांक 20/5/2011 च्‍या R.T.O. गोंदिया यांच्‍या रजिस्‍ट्रीचे Particulars पान नं.31 वर दाखल केलेले आहे, त्‍यावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने इंटरनेट द्वारे घेतलेली आयशर कंपनीच्‍या ट्रॅक्‍टरच्‍या संपुर्ण Models ची माहिती पान नं.9 वर दाखल केलेली आहे. त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेला ट्रॅक्‍टर हा आयशर 333 Super DI याचा Horsepower 33 HP दाखविला आहे. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या जबाबामध्‍ये परिच्‍छेद 10 मध्‍ये असे म्‍हटले आहे की ट्रॅक्‍टर जेव्‍हा काम करण्‍यासाठी वापरला जातो तेव्‍हा तांत्रिकदृष्‍टया Clutch, Gear Box, Transcation व Reduction च्‍या हालचालीमुळे व वापरावेळी ट्रॅक्‍टरच्‍या अश्‍वशक्‍तीमध्‍ये घट होते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर हा 33.30 अश्‍वशक्‍तीचा (Power Take off) एवढया क्षमतेचे कार्य करतो.

 

17.       विरुध्‍द पक्षाने आयशर 333 SDI चे Technical Specification पान नं.36 वर दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचा ट्रॅक्‍टर हा HP 39 ए.अे.ई या श्रेणीचा दाखविला आहे. PTO HP ए.अे.ई. 33.30 असा दाखविला आहे. विरुध्‍द पक्षाने विकलेला ट्रॅक्‍टर 39 HP चा असून त्‍याच्‍या वापराची क्षमता ही 33.30 अश्‍वशक्‍ती आहे, असे संबंधित कागदपत्रांवरुन निदर्शनास येते.

 

18.     तक्रारकर्त्‍याने त्‍यास आयशर कंपनीचा 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर विकत घ्‍यावयाचा होता हयाबद्दल तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे लेखी मागणी केलेली नव्‍हती. ट्रॅक्‍टर विकत घेते वेळेस विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला 39 अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्‍टर पाहिजे हया बद्दलच्‍या मागणीला सबळ पुरावा म्‍हणून कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची 39 अश्‍वशक्‍तीच्‍या ट्रॅक्‍टर बद्दलची मागणी सदरहू प्रकरणात सिध्‍द् होत नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक 26/10/2009 ला ट्रक्‍टरची Delivery घेतांना विकी Delivery Note मध्‍ये जे पान नं.35 वर दाखल केले आहे त्‍यात आयशर ट्रॅक्‍टर 333, 39 (SAE) HP असे लिहीले असून ट्रॅक्‍टर संबंधी सर्व जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची राहील तसेच Accident, Police Case, Challan याची जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची राहील तसेच सदरहू Delivery Note वर तक्रारकर्त्‍याची सही सुध्‍दा आहे. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या आयशर 333 SDI ची तांत्रिक माहिती पत्रक जे पान नं.36 वर दाखल केले आहे, त्‍यामध्‍ये ट्रॅक्‍टरची HP श्रेणी 39 ए.अे.ई. (26.85 k.w.)  तसेच P.T.O. Horsepower 33.30 असे लिहीलेले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला ट्रॅक्‍टरची Delivery घेतांना कुठलीही तक्रार नव्‍हती हे सिध्‍द् होते.

         विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या Khedkar And Associated Consultant Private Limited यांनी SAE Standard हा Technical Conversion & Standard Factors याबद्दल दिनांक 23/11/2010 ला Expert Opinion, Chartered Engineer म्‍हणुन सदरहू प्रकरणात पान न.38 वर दाखल केले आहे. Chartered Accountant श्री एस.दास.गुप्‍ता यांनी असे म्‍हटले आहे की आयशर 333 ट्रॅक्‍टर हा 28.43 kilowat किंवा 38.65 Metric HP म्‍हणजेच 39 SAE  HP असा आहे. त्‍यांनी आपल्‍या सर्टिफिकेट मध्‍ये असे म्‍हटले आहे की सदरहू सर्टिफिकेट त्‍यांनी Central Farm Machinery Training & Testing institute, Budni CFMT & TI/BIS/Tractors यांचा Reference घेवून व मापदंड घेवून Calculation केले आहे, असे म्‍हटले आहे.

 

19.     ट्रॅक्‍टरच्‍या इंजिन चे Horsepower करण्‍याच्‍या Methods या वेगवेगळया प्रकारच्‍या आहेत. सदरहू Calculations च्‍या Methods या मान्‍यताप्राप्‍त असून इंजिनची Power ही BHP,PS व (pterdestarke = horse strength) SAE, KW  इत्‍यादी प्रकारच्‍या आहेत.  काही ट्रक्‍टर कंपनीचे इंजिन HP ‘bhp’ या Term मध्‍ये व काही कंपनीचे ट्रॅक्‍टरर्स हे Power SE या Term मध्‍ये येतात. ट्रॅक्‍टरचा Horsepower किती व कोणत्‍या प्रकारचा आहे हयाचा बोध वरील मापदंडानुसार साधारण माणसाला होतो. ट्रॅक्‍टरचा Horsepower SAE द्वारे Calculate करणे ही अमेरिकन पध्‍दत (Method) आहे. तसेच जर्मन पध्‍दत (Method) द्वारे HP हा PS या द्वारे मोजल्‍या जातो. त्‍यामुळे ट्रॅक्‍टरचा Hp  हा वेगवेगळया मापदंडानुसार म्‍हणजेच bhp/SAE/Ps हया मापदंडानुसार वेगवेगळया कंपन्‍या हया Marketing व Advertisement करीता वापरतात. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विकलेला ट्रॅक्‍टर हा त्‍यांच्‍या बिलावर लिहील्‍या प्रमाणे 39 SAE HP उल्‍लेखित आहे तसेच Registration Particular मध्‍ये सुध्‍दा 39 HP (SAE) असे लिहीलेले आहे तसेच  विरुध्‍द पक्षाच्‍या Technical Specification ‘Chart’ मध्‍ये सुध्‍दा Icher Tractor 333 39 (SAE) H.P. व Power Take Off क्षमता ही 33.30 अश्‍वशक्‍ती Specifically  लिहीले असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विकलेला ट्रॅक्‍टर हा कमी अश्‍वशक्‍तीचा दर्शवून विक्री करण्‍यात आलेली नाही, हे सिध्‍द् होते.

 

20.       तक्रारकर्त्‍याने दिनांक 28/2/2002 ला ट्रॅक्‍टर विकत घेतल्‍यापासून दीड वर्षापर्यंत ट्रॅक्‍टरच्‍या क्षमतेबद्दल व तांत्रिक दोषाबद्दल व अश्‍वशक्‍ती बद्दल विरुध्‍द पक्षाकडे किंवा ट्रॅक्‍टर उत्‍पादकाकडे लेखी तक्रार केलेली नाही व तक्रार केल्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याने कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सतत व ब-याच कालावधीपर्यंत ट्रॅक्‍टरच्‍या Performance बद्दल व त्‍याला पुरावा म्‍हणुन Expert Opinion सादर न करणे म्‍हणजेच तक्रारकर्त्‍याला त्‍या कालावधीसाठी ट्रॅक्‍टर बद्दल  कुठलीही  तक्रार  नव्‍हती हे सिध्‍द् होते. विरुध्‍द पक्षाने दाखल केलेला State Consumer Redressal Commission, Mumbai, Bench Nagpur, Appeal Case No A/03/392 दिनांक 16/8/2013,  International Tractors Limited Vs. Mr.Kaushik Abaji Gosavi  हयामध्‍ये मा.राज्‍य आयोगाने असे म्‍हटले आहे की, ‘It is crystal clear that the mentioning horsepower in different terms bhp, SAE, Ps  are for marketing and advertisement purposes which can be easily understand by the common man.  The Complainant used the tractor for two years and after obtaining letter from the Central Farm Machinery and Training and Testing Institute, Bundi (M.P.) claiming damages is without considering performance of the tractor is unwarranted’. त्‍यामुळे सदरहू न्‍यायनिवाडा हा सदरहू प्रकरणाशी सुसंगत असल्‍यामुळे व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या Unfair Trader Practice बद्दल कुठलाही Cogent & Reliable Evidence सादर न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार पुराव्‍याअभावी खारीज करण्‍यात यावी, असे मंचाचे मत आहे.

करीता आदेश पारीत.

 

अंतीम आदेश

 

 

1.तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.

 

2.खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.

2.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Geeta R Badwaik]
Member
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.