Maharashtra

Nagpur

CC/404/2020

SURAJ ARUN BOBADE - Complainant(s)

Versus

M/S. VAIBHAV LAXMI BUILDERS AND DEVELOPERS THROUGH PARTNER, SHRI. PRASHANT NATTHUJI SHENDE - Opp.Party(s)

ADV. SHRI. SURESH A. KALE

19 Oct 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/404/2020
( Date of Filing : 15 Oct 2020 )
 
1. SURAJ ARUN BOBADE
R/O. PLOT NO.F-10, NEW KAILASH NAGAR, NEAR CHAUDHARI KIRANA STORES, MANEWADA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. CHINTAMAN TANBAJI BUTAKE
R/O. PLOT NO.F-10, NEW KAILASH NAGAR, NEAR CHAUDHARI KIRANA STORES, MANEWADA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. VAIBHAV LAXMI BUILDERS AND DEVELOPERS THROUGH PARTNER, SHRI. PRASHANT NATTHUJI SHENDE
OFF.AT, 2008, SATYAM APARTMENT, 2ND FLOOR, SITABUILDI, WARDHA RD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SMT. REKHA HARISH THAKKAR
OFF. AT, 2008, SATYAM APARTMENT, 2ND FLOOR SITABULDI, WARDHA RD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. SURESH A. KALE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 19 Oct 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्ता क्रं. 1 व 2 यांनी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 व 2 हे वैभव लक्ष्‍मी बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.लि. या नावाने व्‍यवसाय करीत असून ते जमीन खरेदी करुन त्‍यावर वेगवेगळे ले-आऊट पाडून भूखंड विकतात. तक्रारकर्त्‍यांनी  विरुध्‍द पक्षाने पाडलेल्‍या ले-आऊट मधील मौजा– निशानघाट, प.ह.नं.26, खसरा क्रं.72 ते 76, तह.उमरेड, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 8 A व 8-B, एकूण क्षेत्रफळ 5432.37 चौ.फु. असून त्‍याची एकूण किंमत रुपये 1,90,133/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 02.07.2016 रोजी रुपये 100/- च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर केला होता व तक्रारकर्ता क्रं. 1 सुरज बोबडे यांनी दि. 18.10.2017 पर्यंत रुपये 76,000/- आणि तक्रारकर्ता क्रं. 2 चिंतामन बुटके यांनी दि. 12.02.2018 पर्यंत रुपये 36,500/- अशा प्रकारे तक्रारकर्त्‍यांनी एकूण रक्‍कम रुपये 1,12,500/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केले आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍यांने विरुध्‍द पक्षाकडे प्‍लॉट खरेदी पोटी एकूण रक्‍कम रुपये 2,05,600 /-जमा केली असतांना देखील विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा भूखंडा पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 06.06.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली होती. परंतु सदरची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करावे. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त भूखंड क्रं. 8 अ व 8 ब चे कायदेशीररित्‍या विक्रीपत्र करुन द्यावे. अथवा उपरोक्‍त भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास कायदेशीर / तांत्रिक दृष्‍टया   अडचण असल्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडून भूखंडापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 2,05,600/-,  15 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब नमूद केले की, तो प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती असून तो 15 वर्षापासून सदरचा व्‍यवसाय करीत आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्रं. 6 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यांनी गुंतवणुकिच्‍या उद्देशाने सदरचा भूखंड खरेदी केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला करारपत्राप्रमाणे संपूर्ण रक्‍कम अदा केलेली नसल्‍यामुळे जास्‍तीची रक्‍कम अदा केल्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तसेच लक्ष्‍मीबाई पुरम या प्रकरणाचा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तक्रारकर्ते हे आयोगाची दिशाभूल करीत आहे. तक्रारकर्त्‍याने दि. 06.06.2020 रोजी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविली असल्‍याचे कथन मान्‍य केलेले आहे आणि विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या नोटीसला पाठविलेले उत्‍तर कोविड महामारीमुळे तक्रारकर्त्‍याला उशिरा प्राप्‍त झाल्‍याने विरुध्‍द पक्षाने पाठविलेले नोटीसचे उत्‍तर न स्‍वीकारता परत पाठविले. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ही विरुध्‍द पक्षाला जाणूनबुजून त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  2.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

 

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?होय

 

  1. विरुध्‍द पक्षानी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित 

व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

 

  1.  काय आदेश  ?  अंतिम आदेशानुसार 

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्त्‍यांनी  विरुध्‍द पक्षाकडून मौजा– निशानघाट, प.ह.नं.26, खसरा क्रं.72 ते 76, तह.उमरेड, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 8 ए व 8-बी, एकूण क्षेत्रफळ 5432.37 चौ.फु. असून त्‍याची एकूण किंमत रुपये 1,90,133./- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दिनांक 02.07.2016 रोजी रुपये 100/- च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर केला होता व तक्रारकर्ता क्रं. 1 सुरज बोबडे यांनी दि. 18.10.2017 पर्यंत रुपये 76,000/- आणि तक्रारकर्ता क्रं. 2 चिंतामन बुटके यांनी दि. 12.02.2018 पर्यंत रुपये 36,500/- अशा प्रकारे तक्रारकर्त्‍यांनी एकूण रक्‍कम रुपये 1,12,500/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केले आहे हे दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ते क्रं. 1 व 2 हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे रक्‍कम रुपये 2,05,600/- अदा केले असल्‍याबाबतचे दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेले नाही. परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून भूखंड विक्री पोटी जवळपास अधिकाधिक रक्‍कम स्‍वीकारल्‍यानंतर सुध्‍दा उपरोक्‍त भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे नोंदवून दिले नाही अथवा भूखंडा पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम देखील परत केली नाही, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  
  3.      विरुध्‍द पक्षाने युक्तिवादा दरम्‍यान कथन केले की, सदरच्‍या ले-आऊट हे एन.ए.टी.पी. झालेले असल्‍यामुळे तो तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे उपरोक्‍त नमूद भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने युक्तिवादा दरम्‍यान विरुध्‍द पक्षाकडे भूखंडा पोटी जमा केलेल्‍या रक्‍कमेची मागणी केलेली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीनुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून भूखंडा पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करणे योग्‍य आहे असे आयोगाचे मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्ते क्रं. 1 कडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 76000/- व त्‍यावर शेवटचा हप्‍ता स्‍वीकारल्‍याच्‍या दिनांका पासून म्‍हणजे दि. 18.10.2017 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.   

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्ते क्रं. 2 कडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 36,500/- व त्‍यावर शेवटचा हप्‍ता स्‍वीकारल्‍याच्‍या दिनांका पासून म्‍हणजे दि. 12.02.2018 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.   

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या प्रत्‍येक तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.