Maharashtra

Nagpur

CC/211/2021

SHRI. PADMAKAR PRAKASHRAO WAHILE - Complainant(s)

Versus

M/S. TUK-TUK COMMERCIAL PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. KASTURE

11 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/211/2021
( Date of Filing : 22 Mar 2021 )
 
1. SHRI. PADMAKAR PRAKASHRAO WAHILE
R/O.C/O. SAWARBANDHE HOUSE, PLOT NO.J-1, BAPU NAGAR, BEHIND ABHINANDAN COLLAGE, UMRED ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. TUK-TUK COMMERCIAL PVT. LTD.
OFF.AT, 11, NAIDU CHAMBER, OPP. HITAVADA PRESS, WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. M/S. TUK-TUK COMMERCIAL PVT. LTD., THROUGH DIRECTOR MR. SUNIL JEETMAL CHHAJER
R/O. 39, EAST WARDHAMAN NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. KASTURE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्षाचा टुक टूक या नावाने सदनिका व दुकान विक्रीचा व जमीन विकसनाचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा- बोरी, खसरा क्रं. 70, तह.जि. नागपूर येथील 75240 चौ.फु. क्षेत्रफळाच्‍या भूखंडावर असलेल्‍या तुलसी सिटी या बहुमजली इमारती मधील दुसरा माळावरील सदनिका क्रं. 249, बांधकाम क्षेत्रफळ 17.170 चौ.मी. एकूण रुपये 3,40,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरले व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाला  तक्रारकर्त्‍याकडून धनादेशा द्वारे रक्‍कम रुपये 50,000/- प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे  सदनिका क्रं. 249 चे विक्रीपत्र करारनामा दि. 25.03.2010 रोजी करुन दिले होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला करारनामानुसार वेळोवेळी धनादेशाद्वारे दि. 21.02.2010 ते 25.09.2018 पर्यंत एकूण रक्‍कम रुपये 4,42,000/- अदा केलेले आहे व यात विक्रीपत्र नोंदणी, मीटर चार्जेस, मेन्‍टनेस चार्जेस इत्‍यादीचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला आवश्‍यक सोयीकरिता बांधकाम करुन देण्‍याची विनंती केली होती, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या सदनिकेचे बांधकाम केले नाही व आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्‍ध करुन दिल्‍या नाहीत. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्रुटीपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदनिकेचे नोंदणीकृत  विक्रीपत्र करुन द्यावे  व आवश्‍यक सोयी सुविधा उपलब्‍ध सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मासिक भाडे पोटी रुपये 10,000/- प्रतिमाह प्रमाणे सन 2012 पासून प्रत्‍यक्ष सदनिकेचा ताबा देईपर्यंत देण्‍याचे आदेशित करावे. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा. 
  2.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 14.01.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  3.     तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तऐवज, तसेच दि. 22.06.2022 ची पुरसीसवरुन सदर प्रकरण निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

1    तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?            होय

2    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय?     होय

3    विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय?  होय

4    आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

कारणमीमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा- बोरी, खसरा क्रं. 70, तह.जि. नागपूर येथील 75240 चौ.फु. क्षेत्रफळाच्‍या भूखंडावर असलेल्‍या तुलसी सिटी या बहुमजली इमारती मधील दुसरा माळावरील सदनिका क्रं. 249, बांधकाम क्षेत्रफळ 17.170 चौ.मी. एकूण रुपये 3,40,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा विक्री करारनामा दि. 25.03.2010 ला करुन दिल्‍याचे दाखल दस्‍तावेज नि.क्रं. 2(1) वरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 21.02.2010 ते दि. 25.09.2018 पर्यंत सदनिका क्रं. 249 पोटी रुपये 3,40,000/- व या व्‍यतिरिक्‍त मीटर चार्जेस, मेन्‍टनेस चार्जेस व नोंदणी पोटी रुपये 1,02,000/- एवढी रक्‍कम स्‍वीकारुन देखील तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदनिकेचे कायदेशीर विक्रीपत्र करुन दिले नाही, ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते असे आयोगाचे मत आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने दि. 22.06.2022 ला सदनिकेकरिता आवश्‍यक असलेली सोयी सुविधा उपलब्‍ध करुन दिले असल्‍याचे पुरसीस अभिलेखावर दाखल केलेले आहे.
  3.      तक्रारकर्त्‍याने प्रतिमाह मासिक भाडे रुपये 10,000/- मिळावे अशी केलेली मागणी आहे परंतु त्‍या समर्थनार्थ कुठलेही दस्‍तावेज अभिलेखावर दाखल केलेले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याची सदरची मागणी अमान्‍य करण्‍यात येते.

          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे मौजा- बोरी, खसरा क्रं. 70, तह.जि. नागपूर येथील तुलसी सिटी या बहुमजली इमारती मधील दुसरा माळावरील सदनिका क्रं. 249, बांधकाम क्षेत्रफळ 17.170 चौ.मी.चे कायदेशीर विक्रीपत्र करुन द्यावे व सदरच्‍या सदनिकेकरिता लागणारा विक्रीपत्राचा खर्च विरुध्‍द पक्षाने सोसावा. तसेच सदरच्‍या सदनिकेचा प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. 

किंवा

उपरोक्‍त सदनिकेचे कायदेशीररित्‍या किंवा तांत्रिक दृष्‍टया विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास किंवा अडचण असल्‍यासविरुध्‍द पक्षाने17.170 चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेल्‍या सदनिकेसाठी शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या रोजी असलेली किंमत तक्रारकर्त्‍याला आदेशाच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याच्‍या आंत द्यावी आणिसदरहू रक्‍कम एक महिन्‍याच्‍या आत न दिल्‍यास त्‍या रक्‍कमेवर आदेशाच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 14 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई करिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 30,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसांच्‍या  आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.