Maharashtra

Kolhapur

CC/18/285

B.M.Industries Propra. Balasaheb Maruti Patil - Complainant(s)

Versus

M/S. Trimurti Enjeenears Tarfe Propra. Uttam Eknatha Patil - Opp.Party(s)

Namdev Kamble

18 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/285
( Date of Filing : 01 Sep 2018 )
 
1. B.M.Industries Propra. Balasaheb Maruti Patil
Plot No.549,Vijaynagar,Nerli,Behind Jadhav Foundry,MIDC,Gokul Shirgaon,Tal.Karveer,Kolhapur
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. M/S. Trimurti Enjeenears Tarfe Propra. Uttam Eknatha Patil
Panhalkar Wasahat,Maratha Nagar,Near Holi Mother English School,Peth Wadgaon,Tal.Hatkanangale,Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 18 Feb 2020
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांची बी.एम. इंडस्‍ट्रीज नावाची फर्म असून ते सदर फर्मचे चालक व मालक या नात्‍याने सर्वतोपरी काम पाहतात व सदरची फर्म हेच तक्रारदाराचे एकमेव उपजिविकेचे साधन आहे.  तक्रारदार यांचे फर्ममध्‍ये लेथ मशिनरीवर महिंद्रा कंपनीची ड्रमबाबतचे काम चालते. तक्रारदार यांना त्‍यांचे लेथ मशिनरीचे स्‍पीड व अचूकता वाढवून तसेच कामगारांचा त्रास कमी करण्‍यासाठी पॉवर चेक मशिनरीची आवश्‍यकता होती.  त्‍यानुसार वि.प. यांनी तक्रारदार यांना दि. 9/12/2015 रोजी सदर मशिनचे कोटेशन दिले. सदर कोटेशनमधील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदार यांनी दि. 15/12/2015 रोजी सदर मशिनचे खरेदीसाठी वि.प. यांना रु.75,000/- अॅडव्‍हान्‍स रोख स्‍वरुपात दिला व मशिन बुक केले.  सदर मशिनची किंमत रु.2,69,620/- इतकी होती.  यातील अॅडव्‍हान्‍स रक्‍कम सोडून उर्वरीत रक्‍कम मिळालेनंतर बारा दिवसांचे आत सदर मशिनरीची डिलीव्‍हरी देण्‍याचे वि.प. यांनी मान्‍य केले होते.  तदनंतर तक्रारदाराने फायनान्‍स कंपनीकडून रु.2 लाख इतक्‍या रकमेचे कर्ज घेतले व त्‍यातील रु. 1,50,000/- वि.प. यांना अदा केले.  उर्वरीत रक्‍कम देणेस तक्रारदार तयार होते.  असे असतानाही वि.प. यांनी दि.9/2/16 रोजी सदर मशिनचे डिलीव्‍हरी बाबत असमर्थ असलेचे तसेच स्‍वीकारलेली रक्‍कम रु.2,25,000/- तीन ते चार दिवसांत परत देणेबाबत तक्रारदार व फायनान्‍स कंपनीस तोंडी व लेखी कळविले.  परंतु वि.प यांनी रक्‍कम परत केली नाही.  तदनंतर वि.प. यांनी दि.2/8/16 रोजी तक्रारदारास रु. 75,000/- चा चेक दिला परंतु सदरचा चेक न वटता परत आला.  म्‍हणून तक्रारदारांनी वि.प. यांना दि. 2/9/16 रोजी नोटीस पाठविली.  परंतु तरीही वि.प. यांनी चेकची रक्‍कम तसेच उर्वरीत रक्‍कम यापैकी कोणतीही रक्‍कम तक्रारदारास अदा केली नाही.  तक्रारदारांनी याबाबत प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी, कोल्‍हापूर यांचे कोर्टात समरी क्रि.केस नं. 3587/16 दाखल केली आहे.  सबब, तक्रारदाराने वि.प. यांचेकडून रक्‍कम रु. 2,25,000/- परत मिळावी, सदर रकमेवर द.सा.द.शे. 28 टक्‍के प्रमाणे व्‍याज, व्‍यावसायिक नुकसानीपोटी प्रतिमहिना रु.3,000/-,  मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु. 20,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत वि.प. यांनी फायनान्‍स कंपनीस पाठविलेले पत्र, तक्रारदार यांचे कर्ज मंजूरी पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांना मंचाचे नोटीसीची बजावणी होवून देखील त्‍यांनी मुदतीत म्‍हणणे दाखल केलेले नाही. तसेच मंचात वारंवार पुकारता गैरहजर.  सबब, वि.प. यांचेविरुध्‍द ता. 12/11/2018 रोजी एकतर्फा आदेश पारीत केलेला आहे.

 

4.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्‍याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे काय ?

होय.

4

तक्रारदार हे सदरचे मशिनची रक्‍कम व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

6

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

5.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांची बी.एम.इंडस्‍ट्रीज नावाची फर्म असून ते त्‍याचे प्रोप्रायटर आहेत.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांची सदरची फर्म हेच तक्रारदार यांचे एकमेव उपजिविकेचे साधन आहे असे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये कथन केले आहे.  सदरची बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही.  तक्रारदार यांना पॉवर चेक मशिनरीची आवश्‍यकता होती.  त्‍यानुसार वि.प. याने कोटेशन क्र. टी.ई. 2015/20161018 अन्‍वये ता. 9/12/15 रोजी पॉवर चेक मशिनरी विकणेबाबत कोटेशन दिले होते. सदरचे कोटेशनची झेरॉक्‍स प्रत तक्रारदारांनी दाखल केलेली आहे.  त्‍याचे या मंचाने अवलोकन करता, सदरचे Hyd. System with Hyd. Power check ची किंमत रक्‍कम रु. 2,75,000/- नमूद असून त्‍यावर वि.प. यांची सही आहे.  ता. 15/12/2015 रोजी प्रस्‍तुत वि.प याने रक्‍कम रु.75,000/- अॅडव्‍हान्‍सपोटी रोख स्‍वरुपात देवून सदरची मशिनरी बुक केलेची पावती तक्रारदार यांनी मंचात दाखल केलेली आहे.  सदरची रक्‍कम स्‍वीकारलेचे वि.प. यांनी सदरचे पावतीवर सही केलेली आहे.  वि.प. यांनी सदरची पावती नाकारलेली नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून सदरचे मशिनरीपोटी मोबदला स्‍वीकारला असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहत.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

6.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता, सदरचे मशिनरीची एकूण किंमत रक्‍कम रु.2,69,620/- इतकी होते.  प्रस्‍तुत वि.प. यांनी स्‍वीकारलेली अॅडव्‍हान्‍स रक्‍कम सोडून उर्वरीत रक्‍कम मिळालेनंतर बारा दिवसांचे आत सदरची मशिनरीची डिलीव्‍हरी तक्रारदार यांना देणेचे अन्‍यथा स्‍वीकारलेली रक्‍कम परत करणेचे कबूल केले होते.  तक्रारदार यांनी मशिनची रक्‍कम रु.2,25,000/- अदा केलेली असताना देखील तसेच उर्वरीत रक्‍कम वि.प. यांना अदा करणेस तयार असताना देखील वि.प. याने ता. 9/2/16 रोजी सदरचे मशिनरीची डिलीव्‍हरी देणेस असमर्थता दर्शवून तसेच तक्रारदार यांचेकडून सदरचे मशिनपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रु. 2,25,000/- परत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तक्रारदार यांनी सदरची मशिनचे खरेदीपोटी उर्वरीत रकमेसाठी व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. यांचेकडून 28 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम रु.2,00,000/- कर्ज घेतले होते.  त्‍याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत ता. 24/12/15 रोजीचे कर्ज मंजुरी पत्र दाखल केले आहे.  सदर कर्ज मंजूरी पत्रामध्‍ये व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. कंपनीने तक्रारदारास रु.2,00,000/- कर्ज द.सा.द.शे. 28 टक्‍केने अदा केलेचे दिसून येते.  ता.29/12/15 रोजी तक्रारदार यांनी सदर कर्ज रकमेतून वि.प. यांचे सदर मशिनरीची उर्वरीत रकमेपैकी रक्‍कम रु.1,50,000/- व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. यांनी वि.प. यांचे खातेवर जमा केलेली होती.  त्‍याअनुषंगाने तक्रारदार यांनी ता. 29/12/15 रोजी व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. यांनी वि.प यांना सदरची रक्‍कम रु.1,50,000/- NEFT द्वारे वि.प. यांचे खातेवर जमा केलेची पावती दाखल केलेली आहे.  सदरची रक्‍कम वि.प. यांनी नाकारलेली नाही.  तसेच तक्रारदार यांनी दि.10/10/19 रोजी पावती नं. 54 दाखल केलेली आहे.  सदरचे पावतीचे अवलोकन करता ता.15/12/15 रोजी वि.प. यांनी सदरचे मशिनरीपोटी रक्‍कम रु. 75,000/- तक्रारदार यांचेकडून मिळालेची नोंद असून त्‍यावर सदर रक्‍कम रु. 75,000/- वि.प. यांनी स्‍वीकारलेचे वि.प. यांची सही आहे.  सदरची पावती वि.प. यांनी नाकारलेली नाही.  सबब, वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प यांना सदर मशिनपोटी रक्‍कम रु. 2,25,000/- अदा केलेचे शाबीत होते.  सदर बाब वि.प. यांनी मंचात हजर होवून नाकारलेली नाही.

 

7.    तथापि, ता. 9/2/16 रोजी वि.प. यांनी व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. यांना सदरचे मशिनचे डिलीव्‍हरी बाबत असमर्थतता दर्शविली तसेच स्‍वीकारलेली रक्‍कम रु.3 ते 4 दिवसांत परत देणेबाबत कळविले.  ता. 24/12/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांचे व्हिसाज होल्‍डींग अॅण्‍ड फायनान्‍स प्रा.लि. कंपनीला पत्र पाठविलेची प्रत दाखल केलेली आहे.  सदरचे पत्राचे अवलोकन करता, We have received an advanced payment of Rs. 75,000/- from customer on 15/12/2015 against our quotation.  Also the balance amount of Rs. 1,94,620/- has been sanctioned from Visage Holdings and Finance Private Limited on 24/12/15.  We hereby undertake to deliver the machine within 12 days (as per T & C) from the date of money received from the Kinara.  In case of our failure to deliver the machine within the time limit, we agree to refund the advance payment received from the customer and balance amount received from Visage entirely to the credit of “Visage Holdings and Finance Private Ltd.” on the expiration of the time limit. असे नमूद असून त्‍यावर वि.प. यांची सही आहे.  सदरचे पत्रावरुन सदरचे मशिनपोटी रक्‍कम मिळालेपासून 12 दिवसांचे आत सदरचे मशिन तक्रारदार यांना देणेचे वि.प. यांनी मान्‍य व कबूल केले होते.  तसेच सदरचे मशिन देणेस असमर्थ असलेने सदरचे मशिनची रक्‍कम परत देणेचे वि.प. यांनी मान्‍य केलेले आहे.  वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार यांनी सदर मशिनपोटी वि.प. यांना एकूण रक्‍कम रु. 2,25,000/- अदा केलेले होते.  उर्वरीत रक्‍कम तक्रारदार हे देणेस तयार असलेचे तक्रारदार यांनी कथन केलेले आहे.  तथापि वि.प. यांनी ता. 9/2/16 रोजी सदरचे मशिन देणेस असमर्थतता दर्शविली. तदनंतर तक्रारदार यांचे फायनान्‍स कंपनीने ता. 10/8/16 रोजी वि.प. यांना सदर फायनान्‍स कंपनीने वि.प. यांचे खातेवर सदरचे मशिनपोटी वर्ग केलेली रक्‍कम रु.1,50,000/- तक्रारदार यांचे फायनान्‍स कंपनीचे खातेवर वर्ग करण्‍यास लेखी कळविले असताना देखील वि.प. यांनी सदरचे मशिनपोटी घेतलेली रक्‍कम रु. 2,25,000/- अद्याप तक्रारदार यांना अदा न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3 

 

8.    तक्रारदाराचे तक्रारीचे अवलोकन करता वि.प. यांनी व्‍यावसायीक मंदीचे कारण सांगून सदर रक्‍कम रु.2,25,000/- ठरलेप्रमाणे वेळेत न देता सदर रक्‍कम देणेची ग्‍वाही देत राहिले.  ता. 2/8/16 रोजी रक्‍कम रु. 2,25,000/- चे पोटी वि.प. यांनी रक्‍कम रु. 75,000/- चा आय.डी.बी.आय. शाखा शिरोली टोप या बँकेचा चेक दिला.  सदरचा चेक न वटता परत आला असलेने ता. 2/9/16 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना चेकची मागणी नोटीसने केली.  सदरचे न वटले चेकची झेरॉक्‍स तसेच नोटीसीची प्रत, पोस्‍टाची पोहोच पावती तक्रारदार यांनी दाखल केलेली आहे.  ता. 25/9/16 पर्यंत तक्रारदार यांना वि.प. यांनी चेक रक्‍कम अथवा देय रकमेपैकी उर्वरीत कोणतीही रक्‍कम अदा केलेली नाही.  त्‍याकारणाने तक्रारदार यांनी वि.प यांचेविरुध्‍द मे. प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी सो, कोल्‍हापूर यांचे कोर्टात समरी क्रि.केस नं. 3587/2016 दाखल केली आहे.  सदरचे दाव्‍याची प्रत तक्रारदार यांनी मंचात दाखल केलेली आहे.  सबब, ता. 25/9/16 रोजी पर्यंत चेक रक्‍कम अथवा देय रक्‍कम तक्रारदार यांना वि.प. यांनी अद्याप अदा न केलेने सदरचे तक्रारीस कारण घडले आहे.  तक्रारदार यांनी सदरची तक्रार सदरचे तक्रारीस कारण घडलेपासून दोन वर्षाचे आत दाखल केली असलेने सदरची तक्रार मुदतीत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4 व 5

 

9.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1, 2 व 3 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांना रक्‍कम रु.2,25,000/- अदा केलेली होती.  तक्रारदार यांनी त्‍यांचे विनंती कलमामध्‍ये मशिनरीची एकूण रक्‍कम रु. 2,25,000/- व सदर रकमेवर 28 टक्‍के प्रमाणे होणारी रकमेची मागणी केलेली आहे.  याचा विचार करता, सदर रकमेपैकी तक्रारदार यांनी त्‍यांचे फायनान्‍स कंपनीकडून रक्‍कम रु.2,00,000/- इतकी रक्‍कम 28 टक्‍के व्‍याजाने मंजूर केलेचे कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते.  सदरचे कर्ज रकमेपैकी रक्‍कम रु.1,50,000/- वि.प. यांचे खातेवर जमा केलेली होती.  सदरच्‍या बाबी वि.प. यांनी नाकारलेल्‍या नाहीत.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने सदरचे मशिनपोटी वि.प. यांना दिलेली रक्‍कम रु. 2,25,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.  तसेच सदर रकमेपैकी रक्‍कम रु.1,50,000/- रकमेवर ता. 29/12/15 रोजीपासून 28 टक्‍के व्‍याजाप्रमाणे तर उर्वरीत रक्‍कम रु.75,000/- रकमेवर दि. 29/12/15 पासून 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

10.   प्रस्‍तुतकामी तक्रारदार याने मशिनरी बुक केले तारखेपासून तक्रारदार यांचे प्रतिमहिना प्रमाणे होणारे व्‍यावसायिक नुकसानीचे रकमेची मागणी केलेली आहे.  त्‍याअनुषंगाने तक्रारदाराने ता. 18/11/2019 रोजीचा कोर्ट कमिशन अहवाल दाखल केलेला आहे.  सदर अहवालातील कलम 6 चे अवलोकन करता,

         तक्रारदाराचे फर्ममध्‍ये मशिनींग होणारे साठ नगाचे पाठीमागे प्रत्‍येकी एक मिनिटाप्रमाणे साठ मिनिटे वेळेचा अर्थात 1 मिनीटाचा रक्‍कम रु.2.50 पैसे मशिनिंग दरामध्‍ये बचत प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये रक्‍कम रु.150/- इतक्‍या रकमेची बचत त्‍याप्रमाणे प्रत्‍येक दिवसाच्‍या दोन शिफ्टची रक्‍कम रु.300/- अशा प्रकारे प्रत्‍येक महिन्‍याचे एकूण कामाचे दिवस 26 x रक्‍कम रु. 300/- = 7,800/- इतक्‍या मशिनींग दराची बचत/नफा तक्रारदार यांना झाला असता.

तक्रारदार यांना वादातील मशिन वेळेत न दिलेमुळे तक्रारदार यांना प्रतिमहिना रक्‍कम रु. 7,800/- इतके रकमेचे नुकसान झाले आहे हे स्‍पष्‍ट आहे असे कोर्ट कमिशन अहवालात नमूद आहे.  सदरचा अहवाल वि.प. यांनी मंचात हजर राहून नाकारलेला नाही.  सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्‍कम रु.7,800/- प्रतिमहिना मिळणेस पात्र आहेत.  सबब, तक्रारार हे मशिन बुक केलेली ता. 9/12/2015 रोजीपासून प्रतिमहिना रक्‍कम रु. 7,800/- मिळणेस पात्र आहेत.  प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला व प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र. 4 व 5 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.6  -  सबब आदेश.

 

- आ दे श -                     

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. यांनी संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना कोटेशनप्रमाणे मशिनरीचे एकूण रकमेपैकी स्‍वीकारलेली रक्‍कम रु.2,25,000/- अदा करावी.  सदर रकमेपैकी रक्‍कम रु.1,50,000/- रकमेवर ता. 29/12/2015 पासून द.सा.द.शे. 28 टक्‍के प्रमाणे व्‍याज व उर्वरीत रक्‍कम रु.75,000/- रकमेवर ता. 29/12/2015 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपर्यंत अदा करावे.
  2. वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची मशिनरी बुक केले ता. 9/12/2015 पासून प्रतिमहिना रक्‍कम रु.7,800/- प्रमाणे होणारी नुकसानीची रक्‍कम अदा करावी.
  3. वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 
  4. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
  5. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
  6. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.