तक्रारदार : स्वतः हजर
सामनेवाले : एकतर्फा.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर सदस्या ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरूप खालीलप्रमाणे
1. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले 1 हे tour operator/ travel agent असून सा.वाले क्रं 2 व 3 हे सा.वाले 1 चा व्यवसाय पाहतात.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार Times of India या वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झालेल्या जाहीरातीनूसार व सा.वाले 1 चे प्रतिनीधी श्री हिमांशू शहा यांनी गंगटोक/दार्जीलींगच्या पर्यटनाबद्दल दिलेल्या माहितीनूसार व तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे दि.04.02.2008 रोजी रू 15,000/-, रोखीने व दि.11.03.2008 रोजी रूपये रक्कम 32,000/-,धनादेशाद्वारे असे एकूण 47,000/-, पर्यटनासाठी भरले.
3. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांना त्यांच्या पत्नीस अचानकपणे उद्भभवलेल्या आजारामूळे त्यांना व त्यांच्या पत्नीस ठरलेला प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामूळे दि.20.04.2008 रोजी तक्रारदार यांनी सा.वाले यांना दुरध्वनीवरून त्याबाबत कळविले. त्यावर सा.वाले यांनी ते पैसे परत करू शकत नसल्याचे सांगीतले. त्याऐवजी त्यांनी तक्रारदारांना असे सूचविले की, ते डिसेंबर 2008 किंवा में 2009 मध्ये निघणा-या पर्यटनास जाऊ शकतील. तोपर्यत सा.वाले हे तक्रारदारांनी भरलेले पैसे (Deposit) जमा करून घेतील. त्यावर तक्रारदारांनी वारंवार सा.वाले यांना भरलेले पैसे परत देण्याबद्दल विनंती केली परंतू सा.वाले यांनी त्यास नकार दिला म्हणून तक्रारदारांना सा.वाले यांचेकडे रक्कम जमा ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.
4. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार पर्यटनाचे बुकींग करतेवेळी सा.वाले यांनी प्रवास रद्द झाला तर पैसे परत मिळणार नाही याबद्दल काहीही कळविले नव्हते.
5. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा झालेली रक्कम वसूल करण्यासाठी सा.वाले यांचेकडुन गोव्यास जाण्यासाठी विमानाची चार तिकीटे त्यांच्या कुटुंबियांसाठी खरेदी केली. त्यानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांना मुंबई ते गोवा असे चार विमानाची तिकीटे दिली. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार मुंबई गोवा यासाठी लागणारे विमानाच्या तिकीटाची किंमत रू.10,900/-,च्या ऐवजी सा.वाले यांनी तक्रारदारांकडुन 11,200/-,रू. घेतले. यावरून सुध्दा सा.वाले यांनी अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे दिसून येते. तसेच सा.वाले यांनी तक्रारदारांकडुन 2,000/-रू. तिकीट रद्द करण्याबद्दलचा मोबदला घेतला. असे एकुण सा.वाले यांनी तक्रारदार यांचेकडुन एकूण रू.13,200/-,घेतले. प्रथम जमा झालेली रक्कम रूपये 47,000/-,मधून 13,200/-रू. वळते केल्यानंतरही सा.वाले यांचेकडे तक्रारदारांची एकुण
रक्कम 33,800/-,जमा आहेत. तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे शिल्लक रक्कम परत करण्याबद्दल विनंती केली परंतू सा.वाले यांचेकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तक्रारदार सा.वाले यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेटण्यास गेले असता त्यांना असे आढळून आले की, सा.वाले यांनी त्यांचे कार्यालय पूर्णपणे बंद केले आहे. त्यानंतर सा.वाले यांनी सा.वाले क्रं 2 व 3 यांना फोनवरून व प्रत्यक्ष सपंर्क साधून वारंवार पैशाची मागणी केली. परंतू सा.वाले यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदार यांनी कंझ्युमर गायडन्स सोसायटीकडुन दोन वेळा संपर्क साधून पैसे परत करण्याबद्दल कळविले. परंतू सा.वाले यांचेकडुन कोणतेच उत्तर मिळाले नाही.
6. शेवटी तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक मंचापूढे सादर करून सा.वाले यांनी सेवा देण्यात कसूर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करावे. सा.वाले यांनी 33,800/-,रू. 18%, व्याजदराने पैसे देईपर्यत व्याजासह परत करावे. तसेच 50,000/-,रू. मानसिक त्रासापोटी व 10,000/-,रू. तक्रार अर्ज खर्च द्यावा अशी मागणी केली.
7. तक्रार अर्ज,शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केलेले आहेत.
8. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. तक्रारदाराला नोटीस मिळाल्याची पोचपावती अभिलेखावर दाखल आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांना नोटीस
बजावल्याबद्दलचे शपथपत्र दाखल केले नोटीस मिळवूनही सा.वाले गैरहजर राहीले. म्हणून तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश मंचाकडुन पारीत करण्यात आला.
9. तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रांची पडताळणी करून पाहीली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी सेवेत कसुर केली व तसेच व्यापारी अनुचित प्रथेचा अवलंब केला हे तक्रारदार सिध्द करू शकतात काय? | होय. |
2 | तक्रारदार सा.वाले यांचे कडुन रू.33,800/-,18%, व्याजदराने व्याजासह मागु शकतात काय? | होय. 9% व्याजदराने |
3 | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येतो. |
कारण मिमांसा
10. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे गंगटोक/दार्जीलींग च्या पर्यटनासाठी दि.04.02.2008 रोजी रू.15,000/-,रोखीने व दि 11.03.2008 रोजी 32,000/-,रू.धनादेशाद्वारे दिले. त्याबाबत पृष्ट क्र. 19 निशाणी क्रं सी-2 व सी-3 वर पोचपावती दाखल केलेली आहे.
11. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांच्या पत्नीच्या आजारामूळे तक्रारदार व त्यांची पत्नी ठरल्याप्रमाण्ो पर्यटनास जाऊ शकत नव्हते त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना दि 20.04.2008 रोजी संपर्क साधून कळविले व पर्यटनासाठीभरलेली रक्कम परत करण्याबाबत मागणी केली त्यास सा.वाले यांनी रक्कम परत करण्यास नकार दिला. सा.वाले यांनी तक्रारदार यांना नंतर ऑक्टोंबर/नोव्हेंबर 2008 किंवा एप्रिल/में 2009 मध्ये आयोजित करण्यात येणा-या पर्यटनासाठी तक्रारदार जाऊ शकतील असे सूचविले व तोपर्यंत भरलेली रक्कम सा.वाले यांनी त्यांचेकडे जमा करून घेतली. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार भरलेली रक्कम वसूल करण्याच्या उद्देशाने सा.वाले यांचेकडुन मुंबई/गोव्याची चार हवाई तिकीटे खरेदी केली. त्यासाठी लागणारे एकूण मोबदला रू.11,200/-, व आधीचे तिकीटे रद्द करण्याचा मोबदला रू. 2,000/-, असे एकुण 13,200/-, मूळ जमा रक्कमेतून वळतेकरता सा.वाले यांचेकडे एकुण रू. 33,800/-, जमा आहेत. ही रक्कम परत करण्याबाबत सा.वाले यांचेकडे वारंवार पत्रे पाठवून/संपर्क साधून मागणी केली असता सा.वाले यांनी त्यांच्या मागणीस कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे प्रत्यक्ष जाऊन संपर्क साधला असता असे समजले की, सा.वाले यांनी त्यांचे कार्यालय पूर्णपणे बंद केले आहे. सा.वाले यांनी कंझ्युमर गाईडन्स,सोसायटी तर्फे पाठवलेल्या मागणी पत्रासही उत्तर पाठविले नाही.
12. तक्रारदार यांचे तक्रार अर्ज, शपथपत्र व अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केलेले आहेत. सा.वाले यांना संधी देऊनही सा.वाले हजर राहिले नाही व तक्रारदारांचे म्हणणे नाकारले नाही. तसेच तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील म्हणण्यास दाखले केलेल्या कागदपत्रांवरून पुष्टी मिळते. म्हणून तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते. तक्रारदारांनी मागणी केल्यानंतरही सा.वाले यांनी तक्रारदारांची जमा रक्कम परत केली नाही यावरून सा.वाले यांनी सेवा देण्यात कसूर केली हे स्पष्ट होते.
13. म्हणून सा.वाले 1 ते 3 हे तक्रारदारांची जमा रक्कम रूपये 33,800/5, 9% व्याजदराने पैसे भरल्यापासून ते पैसेदेईपर्यत व्याजासह परत करण्यास जबाबदार आहेत.
14. सा.वाले यांनी नुकसान भरपाई म्हणून 50,000/-,ची मागणी केली आहे परंतू रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश दिल्याकारणाने वेगळी नुकसान भरपाई देणे योग्य होणार नाही.
15. तक्रारदारांनी तक्रार अर्ज खर्च 10,000/-,रू.ची मागणी केली आहे. परंतू ही मागणी अवास्तव वाटते. म्हणून सा.वाले यांनी तक्रार अर्ज खर्च रू.2,000/-,तक्रारदारांना द्यावेत असा आदेश देणे योग्य राहील.
16. वरील विवेचनावरून खालीलप्रमाण्ो आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 696/2010 अंशतः मान्य करण्यात येतो.
करण्यात येते.
2. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.33,800/-,9% व्याजदराने पैसे भरल्यापासून पासून ते पैसे देईपर्यत व्याजासह परत द्यावेत.
3. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.2,000/-,तक्रार अर्ज खर्च द्यावा
4. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.