(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 11/08/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 05.11.2009 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे संपूर्ण विदर्भ भागाचे अधिकृत वितरक असुन त्यांचे मुख्य कार्यालय सिटी पोष्ट ऑफिस, इतवारी, नागपूर येथे आहे. गैरअर्जदार क्र.2 हे बॅटरीचे निर्माते असुन त्यांच्या बॅटरीज संपूर्ण भारतभर पुरविल्या जातात तसेच गैरअर्जदार क्र.3 हे इन्हरटरचे निर्माते आहेत व ते माइक्रोटेक या नावाने पुरवतात. 3. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीत नमुद केले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लोड शेडींगच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.29.11.2008 रोजी गैरअर्जदार क्र.3 ने बनविलेला इर्न्हरटर व गैरअर्जदार क्र.2 ने बनविलेल्या बॅटरीसह रु.14,900/- ला खरेदी केले. सदर इनर्व्हटर गैरअर्जदार क्र.1 यांचे इलेक्ट्रीशियनने तक्रारकर्त्याचे घरी बसवुन दिल्यानंतर इलेक्ट्रीशियनने सांगितलेल्या सूचना व इनर्व्हटरसोबत दिलेल्या सुचना पुस्तिकेतील सुचनांचे पालन करुन सुध्दा सदर इनर्व्हटर अर्ध्या तासापेक्षा जास्त चालला नाही व ज्या उद्देशाने इनर्व्हरटर विकत घेतले होते तो उद्देश पूर्णपणे विफल झाल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने याबाबत अनेकदा गैरअर्जदार क्र.1 ला बॅटरी सदोष निघाल्यामुळे ती बदलवून देण्यासाठी तोंडी तक्रारी केल्या असता त्यांनी प्रत्येक वेळी खात्री न पटणारी कारणे सांगितली. 4. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे बॅटरीच्या बॅकअप बद्दल तक्रार केली असता त्यांचे इंजिनिअर श्री. झुल्फीकार अली यांनी दि.11.06.2009 रोजी तक्रारकर्त्याचे घरी भेट देऊन बॅटरीची तपासणी करुन आपल्या फिल्ड सर्विस रिपोर्टमध्ये ‘संपूर्ण चार्ज असून फक्त अर्धा तास चालते. बॅकअप चा त्रास आहे. दोन सेल निकामी आहेत’ असे नमुद केले असुन सदर दस्तावेज क्र.3 तक्रारीसोबत दाखल केले आहे. तक्रारकर्त्याचे असे निर्दशनास आले की, गैरअर्जदार क्र.1 यांनी इनर्व्हटरसोबत पाठविलेल्या बॅटरीचा नं. डिएलएलएचएफ03066 असुन वारंटी कार्ड वरील नं.डीएलएलएचजी06043 असा आहे. यावरुन असे स्पष्ट होती की गैरअर्जदार क्र.1 ने आधी वापरलेली बॅटरी व खोटे वारंटी कार्ड तक्रारकर्त्याला दिलेले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्याची फसवणुक केलेली आहे व पूर्ण पैसे देऊन सुध्दा दुय्यम दर्जाची वस्तु दिल्यामुळे अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते, असे नमुद केले आहे. 5. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 ने इनर्व्हरटरसोबत अगोदर वापरलेली खराब बॅटरी देऊन फसवणूक केलेली आहे व अनेकदा गैरअर्जदाराकडे तक्रार करुन सुध्दा ती बदलवुन दिली नाही व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांना वकीला मार्फत पाठविली असता त्यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली असून सद्य स्थितीत असलेली बॅटरी बदलवून नवीन बॅटरीची मागणी केलेली आहे. तसेच त्याला झालेल्या आर्थीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी प्रस्तुत तक्रारीव्दारा केलेली आहे. 6. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांना नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 7. गैरअर्जदार क्र.1 चे लेखी उत्तरः- गैरअर्जदार क्र.1 ने ते गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विदर्भ विभागाचे अधिकृत वितरक असुन ते माईक्रोटेक या नावाने संपूर्ण भारतभर माल पुरवितात ही बाब मान्य केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्यांचे कडून इनर्व्हटर खरेदी केल्याचे व त्यांचे इलेक्ट्रिशियनने सदर इनर्व्हरटर तक्रारकर्त्याचे घरी बसवुन दिल्याचे मान्य केले आहे. तसेच गैरअर्जदाराने आधी वापरलेली बॅटीरी व खोटे वारंटी कार्ड दिले, हे तक्रारकर्त्याचे म्हणणे अमान्य केले व तक्रारकर्त्याने कुठेही वारंटी कार्ड व बॅटरीचा अनुक्रमांक सादर केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने आपल्या चुकीच्या वापरामुळे बॅटरी खराब केल्याचे नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार वाईट हेतुने पैसे उकळण्याकरिता केली असल्यामुळे ती दंडासह खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 8. गैरअर्जदार क्र.2 चे लेखी उत्तरः- गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्त्याने दि.29.11.2008 ला बॅटरी खरेदी केल्यानंतर 5 महिन्यांनंतर तक्रार केल्याचे नमुद केले आहे. तसेच सदर बॅटरीची तपासणी केली असता त्यातील डिस्टील वॉटरच्या पातळी योग्य नसल्यामुळे दोन सेल निकामी झाले असुन त्यात उत्पादकतेचा दोष नसल्याचे म्हटले आहे. तसेच सदर दोष सुचना पुस्तिकेत सांगितलेल्या सुचनांचे व वारंटी कार्डवरील सुचनांचे पालन न केल्याने व बॅटरीची काळजी न घेतल्यामुळे सदर समस्या निर्माण झाल्याचे आपल्या लेखी उत्तरात नमुद केले आहे. 9. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याला बॅटरी बदलवुन देण्याचे मान्य केले होते परंतु तक्रारकर्त्याने दुस-या प्रकारच्या बॅटरीची मागणी केली व सदर बाब कंपनीचे पॉलिसीमध्ये बसत नसल्यामुळे दि.19.03.2010 रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठवुन बॅटरी 15 दिवसांत घेऊन जाण्या बाबत कळविले. परंतु तक्रारकर्त्याने चुकीच्या मार्गानी पैस उकळण्याचे उद्देशाने मंचापुढे खोटी तक्रार दाखल केलेली असुन ती रु.10,000/- खर्चासह खारिज करावी अशी गैरअर्जदार क्र.2 ने मंचास विनंती केली आहे. 10. गैरअर्जदार क्र.3 चे लेखी उत्तरः- गैरअर्जदार क्र.3 ने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, ते मायक्रोटेक इनर्व्हटरचे उत्पादक आहेत व तक्रारकर्त्याचा जो प्रश्न उपस्थित झाला तो बॅटरीमुळे उद्भवला असुन सदर बॅटरीचे गैरअर्जदार क्र.1 उत्पादक आहेत. त्यामुळे इनर्व्हटरमध्ये कुठलाही अभाव नसुन गैरअर्जदार क्र.3 चा काहीही संबंध नसल्याचे नमुद केले आहे. 11. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.05.08..2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 1. तक्रारकर्त्याचे कथन व तक्रारीत दाखल दस्तावेजांवरुन त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.29.11.2008 रोजी लोड शेडिंगच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी इनर्व्हटर खरेदी केल्याचे सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरतो. 2. तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रकरणात इनर्व्हटरसोबत दिलेल्या सुचना पुस्तिकेतील सुचनांचे पालन करुनही ते अर्ध्या तासापोक्षा जास्त चालन नसल्यामुळे त्याने ज्या उद्देशाने इनर्व्हटर खरेदी केले तो उद्देश पूर्णपणे विफल झाल्याचे नमुद केले आहे. तसेच गैरअर्जदार क्र.1 कडे अनेकदा तक्रारी केल्या असता खात्री न पटणारी कारणे सांगून ते टाळाटाळ करीत असल्याचे म्हटले आहे. मंचाने तक्रारीत दाखल दस्तावेज क्र.3 चे अवलोकन केले असता ते गैरअर्जदार क्र.2 यांचे इंजिनिअर श्री. झुल्फीकार अली यांचा फिल्ड सर्विस रिपोर्ट असुन त्यात “Full load on only half hours backup. So backup problem. 2 Nos cell are faulty” अशी नोंद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला पुरविण्यांत आलेल्या बॅटरी सदोष असल्याचे मंचाचे असे मत आहे. 3. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याने बॅटरीचा चुकीच्या पध्दतीने वापर केल्यामुळे, तसेच संचना पुस्तिकेत दिलेल्या सुचनांप्रमाणे काळजी न घेतल्यामुळे सदर समस्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे. परंतु त्यांनी आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही व बचावात्मक कथन सिध्द केले नाही त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला सदोष बॅटरी पुरविली. 4. गैरअर्जदार क्र.2 सुकाम पावर सिस्टीमस् लिमीटेड यांनी निशाणी क्र.26 वर पुरसीस दाखल करुन नमुद केले की, सदर गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला नवीन सर्विस बॅटरी वारंटी कार्ड न देता पूरविण्यास तयार आहेत. परंतु खराब झालेल्या बॅटरी ऐवजी गैरअर्जदार क्र.2 ने नवीन बॅटरी वारंटीसह देण्याचे आदेशीत करणे प्रस्तुत प्रकरणात कायदेशिर व न्यायोचित राहील असे मंचाचे स्पष्ट मत आहे. 5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रकरणात आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्या खर्च रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर मागणीचे पृष्ठयर्थ कोणताही पुरावा दाखल न केल्यामुळे प्रस्तुत मागणी अमान्य करण्यांत येते. परंतु न्यायोचितदृष्टया तो आर्थीक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.1,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून मिळण्यांस पात्र ठरतो. गैरअर्जदारक्र.3 ह्यांचे विरुध्द तक्रारीतील आक्षेप सिध्द होत नसल्याने त्यांचे विरुध्द तक्रार खारिज करण्यांत येते. सबब मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. तक्रारकर्त्याला गैरअर्जदार क्र.1 व 2 ह्यांनी सदोष बॅटरी पूरवुन दोषपूर्ण सेवा दिली आहे. 3. गैरअर्जदार क्र.2 ला आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला सदोष बॅटरी बदलवुन त्याच वर्णनाची नवीन बॅटरी वारंटी कार्डसह द्यावी. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला आर्थीक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- संयुक्त व एकत्रीतरित्या अदा करावे. 5. गैरअर्जदार क्र.3 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते आहे. 6. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिकपणे किंवा संयुक्तपणे आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 7. तक्रारकर्त्याला मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति परत कराव्यात. (मिलींद केदार) (रामलाल सोमाणी) सदस्य प्रभारी अध्यक्ष
| [HONABLE MR. Mr. Milind R. Kedar] Member[HONABLE MR. Ramlal Somani] PRESIDENT | |