आ दे श : (दि. 25-03-2013) ( द्वारा-. श्री. संजय पी. बोरवाल,अध्यक्ष)
1. सदर अंमलबजावणी अर्ज तक्रारदार यांनी मुळ तक्रार अर्ज क्र. 610/2009, निकाल दि. 16-02-2010 रोजीच्या आदेशाअन्वये विरुध्द पक्षकारांनी आदेशाची पुर्तता न केल्यानेअमंलबजावणी अर्ज क्र. 131/10 दि. 31/05/2010 रोजी दाखल केला होता. व दि. 1-06-2010 रोजी स्विकृत करण्यात आला आहे.
2. प्रस्तुत मुळ तक्रार अर्ज क्र. 610/2009 चा दि. 16-02-2010 रोजी निकाल पारीत केलेला होता. सदर आदेशाविरुध्द यातील वि.पक्षकार यांनी मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांचेकडे पहिले अपिल नं. A/10/495 दाखल केले होते. सदर अपिलाचा निकाल दि. 13-02-2013 रोजी मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी आदेश पारीत करुन तक्रार अर्ज क्र. 610/2009 मधील दि. 16-02-2010 रोजीचा जिल्हा मंचाने केलेला आदेश रद्दबातल केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणी पहिले अपिल नं. A/10/495 मधील दि. 13-02-2013 रोजी मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांच्या आदेशाची प्रत वि.पक्षकार यांनी मे. मंचापुढे प्रस्तुत अमंलबजावणी अर्जात दाखल केली आहे.
3. प्रस्तुत अमंलबजावणी अर्जात वि. पक्षकार तर्फे दि. 5-03-2013 रोजी दाखल केलेल्या अर्जात नमूद केलेप्रमाणे प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज चालविणेचे कोणतेही कारण राहिले नसलेने प्रस्तुतचा अर्ज निकाली काढणेत यावा असा अर्ज देऊन विनंती केली आहे. सदर अर्जावर वि. पक्षकार तर्फे त्यांचे विधितज्ञांची स्वाक्षरी आहे. मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांनी पुराव्याकामी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूर यांचेकडे पाठविलेला आहे. वर नमूद केलेप्रमाणे सदरचा अंमलबजावणी अर्ज पुढे चालविणेकरीता कोणतेही संयुक्तिक कारण व वाद राहीलेले नाहीत. सबब, सदर अंमलबजावणी अर्ज निकाली काढणेत येतो.
- आ दे श –
1. तक्रारदाराचा प्रस्तुतचा अमंलबजावणी अर्ज निकाली काढणेत येतो.
2. सदर अंमलबजावणी अर्जामध्ये दि. 05-03-2013 रोजी दाखल केलेला अर्ज हा या आदेशाचा एक भाग आहे.
3. सदर आदेशाच्या सही शिक्काच्या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्क देण्यात यावी.