तक्रार क्रमांक – 110/2009 तक्रार दाखल दिनांक – 17/03/2009 निकालपञ दिनांक – 10/02/2010 कालावधी - 00 वर्ष 10महिने 24 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. प्रकाश ओधवजी दमानी रा. C-18,जय जय श्रीराम को.ऑप.हॉ.सो.लि., राजाजी पाथ, ओवर ब्रिज जवळ, डोंबिवली(पुर्व) 421 201. .. तक्रारदार विरूध्द 1.मे.सुयश बिल्डर्स आणि डेव्हलपर्स 6, सुरेखा भवन, तिलक नगर पोस्ट ऑफिस, राजेंद्र प्रसाद रोड, तिलक नगर, डोंबिवली(पुर्व). 2. श्री.मंगेश विष्णु कुलकर्णी, पार्टनर मे.सुयश बिलडर्स आणि डेव्हलपर्स 6, सुरेखा भवन, तिलक नगर पोस्ट ऑफिस, राजेंद्र प्रसाद रोड, तिलक नगर, डोंबिवली(पुर्व). .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल पुनम माखिजानी वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 10 /02/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. प्रकाश्ा दमानी यांनी सुयश बिल्डर व डेव्हलपस व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे विरुध्द C.C, O.C सोसायटी बनवुन देणे व 5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. प्रकाश्ा दमानी यांनी सुयश बिल्डर व डेव्हलपस व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे विरुध्द C.C, O.C सोसायटी बनवुन देणे व कन्व्हेयन्स करुन देण्यासाठी दाखल केली आहे.
2. तक्रारदार सोसायटीचे सदर विरुध्द पक्षकार हे डेव्हलपर व बिल्डर आहेत. विरुध्द पक्षकार यांची हि भागिदारी फर्म आहे. तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्यामध्ये दि.04/11/2002 मध्ये सदर दुकानाबद्दल नोंदणीकृत करारनामा झाला. सदर दुकारन नं. 401, चौथा मजला, सुयश प्लाझा इमारती मध्ये असुन त्याची किंमत एक लाख ठरली. तक्रारदार यांनी पुर्ण किंमत विरुध्द पक्षकार यांना अदा करुन सुध्दा करारनाम्यातील अटी पुर्ण करण्यास विरुध्द पक्षकार असमर्थ ठरले. अनेकदा तक्रारदार यांनी तत्सम स्मरण पत्रे, नोटिस देऊनही विरुध्द पक्षकार यांनी सदर दुकान असलेल्या इमारतीच्या जागेचे कन्व्हेयन्स करुन दिलेले नाही तसेच त्यातील सदस्यांना घेऊन सोसायटी बनवलेली नाही व OC, CC .. 2 .. दिलेली नाही. म्हणुन तक्रारदारानी या सर्व मागण्यांनी पुर्तता करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. सद्या परिस्थितीत तक्रार दाखल करण्याचे कारणे सातत्याने चालु आहे.
3. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटिस बजावुनही विरुध्द पक्षकार हजर राहिले नाहीत व त्याची लेखी कैफीयत त्यांनी दाखल केली नाही म्हणुन दि.10/08/2009 रोजी विरुध्द पक्षकार विरुध्द एकतर्फा आदेश पारित केला. हे मंच पुढील प्रमाणे एकतर्फा अंतीम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 110/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांचे दुकान असलेल्या इतारतीची सोसायटी बनवुन देणे व त्यांच्या नावे कन्व्हेयन्स करुन देणे तसेच तक्रारदार यांच्या दुकानाचे व OC, CC करुन देणे या आदेशाची अमलबजावनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्यांच्या आत करावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटीस मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 1,000/-(रु.एक हजार फक्त) द्यावे. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 10/02/2010 ठिकान - ठाणे
(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|