Maharashtra

Central Mumbai

CC/21/208

Vincent D'souza - Complainant(s)

Versus

M/s. Suraj Estate Pvt. Ltd. - Opp.Party(s)

In Person

26 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, CENTRAL MUMBAI
Puravatha Bhavan, 2nd Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012 Phone No. 022-2417 1360
Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/21/208
( Date of Filing : 02 Aug 2021 )
 
1. Vincent D'souza
Pearl Colony, A-5, 1st Floor, Near St. Pauls Church, Dr. Ambedkar Road, Dadar East, Mumbai-400014
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Suraj Estate Pvt. Ltd.
Mahim West, Mumbai-400016
Mumbai
Maharashtra
2. The C. O. (Chief Officer)
MHADA/MBRRB, Bandra East, Mumbai-400051
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S. S. Mhatre PRESIDENT
 HON'BLE MR. M.P.KASAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Aug 2021
Final Order / Judgement

आदेशः- मा.एम.पी.कासार, सदस्‍य.

ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम (३६) २ नूसार तक्रार दाखलते कामी  आदेश-

     तक्रार दाखल करुन घेणे कामीच्‍या सुनावणी टप्‍यावर स्‍वतः तक्रारदारांचा दीर्घ तोंडी युक्‍तीवाद ऐकला व सुनावणीकामीची योग्‍य संधी देऊन तक्रारीसह दस्‍तऐवजांचे काळजीपुर्वक वाचन केले व तक्रार दाखल करुन घेण्‍याच्‍या टप्‍यावर योग्‍य तो निष्‍कर्षाप्रत येण्‍यासाठी आम्‍ही खालील मुद्दे उपस्थित केले.

मुद्दे

अक्र.

मुद्दा

निष्‍कर्ष

१.

प्रस्‍तुत ग्राहक तक्रार सामनेवालेंविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम ३६ नूसार दाखल करुन घेता येईल हे तक्रारदार सिध्‍द करतात काय?

 

नाही.

२.

आदेश काय?

ग्रा.स.अधिनियम कलम ३६(२) अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार नाकारण्‍यात येते.

कारण मिमांसाः-

मुद्दा क्र.१ व २ः-  तक्रारदाराने ग्राहक कायदयामधील तरतुदींनूसार दाखल केलेली तक्रार ही सामनेवालेंविरुध्‍द दाखल करुन घेण्‍यात यावी का? या प्रश्‍नाचे उत्‍तर होकारार्थी मिळण्‍याकामी आम्‍ही कायदयातील खालील तरतुदी विचारात घेतल्‍या. प्रथमतः तक्रारदार सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? हे तपासता ग्राहक अधिनियमातील कलम २ (७) नूसार तक्रारीतील तक्रारदारांचे सामनेवालेंविरुध्‍दचे आरोप व कथने विचारात घेता, प्रथमदर्शनी तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे प्रत्‍यक्ष ग्राहक होत असल्‍याबाबता कोणताही प्रथम दर्शनी पुरावा दिसून आलेला नाही  किंबहून तक्रारदाराने स्‍पष्‍टपणे आयोगाच्‍या  निदर्शनास आणून दिलेले नाही. ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम २(१०) व २ (११) अन्‍वये अनुक्रमे वस्‍तुतील दोष/ सेवेमधील त्रुटी याबाबत प्रथमदर्शनी कोणताही पुरावा तक्रारीत व तक्रारीतील दस्‍तऐवजांचे वाचन करता दिसून आलेला नाही  व तक्रारदाराने स्‍पष्‍टपणे निदर्शनास आणून दिलेला नाही. तसेच अधिनियमातील कलम २(४२) अन्‍वये सामनेवाले हे व्‍यक्‍तीगत व प्रत्‍यक्षरित्‍या तक्रारदारांचे सेवापुरवठादार आहेत काय? हे देखील स्‍पष्‍टपणे दिसून आलेले नाही.  तसेच तक्रारीतील तक्रारदारांचे आरोप व कथने विचारपुर्वक वाचता, तक्रारदारांना प्राप्‍त असलेले प्रत्यक्ष व व्‍यक्‍तीगत ग्राहक हक्‍कांचे उल्‍लंघन सामनेवालेंकडून झालेले असल्‍याबाबत तक्रारदारांनी स्‍पष्‍ट केलेले नाही. तसेच तक्रारीतील सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापार प्रथा तथा सेवेची कमतरता ठेवली असल्‍याबाबतचा स्‍पष्‍ट प्रथमदर्शनी पुरावा अभिलेखावर असल्‍याबाबत तक्रारदारांनी आयोगाच्‍या निदर्शनास आणून दिलेले नाही व प्रस्‍तुत तक्रार सामनेवालेंविरुध्‍द तक्रारीतील आरोपां अधिन चालविता येईल याबाबत योग्‍यते विश्‍लेषण तक्रारदारांनी केलेले नाही.उपरोक्‍त मुद्दे विचारात घेता, ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदींनूसार तक्रारदारांचे प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरण करता येईल हे तक्रारदार स्‍पष्‍ट करु शकले नाहीत व प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक वाद होवू शकते हे तक्रारदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार सामनेवालेंविरुध्‍द योग्‍य त्‍या स्‍वरुपात व पध्‍दतीने मांडलेली नसून त्‍यातील हरकती व विनंती मागण्‍या या ग्राहक कायदयातील तरतुदी व उद्देशानूसार दिसून येत नाही.   तसेच  तक्रारदाराची तक्रारीतील विनंती  परिछेद मधील विनंती प्रार्थना या ग्राहक संरक्षण अधिनीयम २०१९ मधील कलम ३९ नूसार विचारात घेता येतील काय हे तक्रारदारांनी स्‍पष्‍ट केलेले नाही  व प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण अधिनीयमचे कलम २(६) नुसार अभिप्रेत असलेले तक्रारीतील तक्रारदाराचे आरोप दिसून येत नाही.  सबब प्रस्‍तुत तक्रार ही सामनेवालेंविरुध्‍द दाखल करुन घेता येणार नाही हा मुद्दा क्र.१ चा निष्‍कर्ष आम्ही काढून मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने व्‍ही.एन.श्रीखंडे विरुध्‍द अमिता सेना फर्नांडिस या केस मधील न्‍याय निवाडयाच्‍या आधारे- २०१०(११) SCALE१३८ नुमूद न्‍याय निर्णयात मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, Rejection of complaint at threshold, complaint not disclosing any grievances for redressal under the Act deserves to be rejected at threshold. मुद्दा क्र.२ नूसार खालील आदेश पारित करीत आहोत.

आ दे श

१.ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ३६(२) नूसार तक्रार क्र.२१/२०८ ही दाखल करुन घेण्‍यास नाकारण्‍यात येते.

 

 

 
 
[HON'BLE MRS. S. S. Mhatre]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. M.P.KASAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.