Complaint Case No. CC/531/2021 | ( Date of Filing : 16 Sep 2021 ) |
| | 1. JYOTI SATISH DONGRE | R/O. B-1104, MONARCH GARDEN, SHEVRI CROSS ROAD, (R.A. KIDWAI MARG) BEHIND AARYA HONDA, SHEVRI WEST, SHEVRI, MUMBAI-400315 | MUMBAI | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S. SURAJ BUILDERS, THROUGH PARTNER SHRI. SADGURU SADORMAL CHAWLA | R/O. 6 SATYALOK, FAWARA CHOWK, CENTRAL AVENUE, GANDHIBAG, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजने, मा. सदस्य - तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 नुसार दाखल केलेली असुन तक्रारीचे थोडक्यात वर्णन खालीलप्रमाणे........
- तक्रारकर्तीने वि.प.चे मौजा-वडकापाड, भु.मा.क्र.544, शिट नं. 22/194 प.ह.नं. 17, रेव्हेन्य खसरा क्रं.97 आणि 98, म्युनसिपल हाऊस क्रं. 662 नवीन, (जूना -313), वार्ड न.-63, कामठी रोड,गड्डीगोदाम, नागपूर येथील जमीनीवर बांधलेल्या सदोदय पॅलेस, गड्डीगोदाम कामठी नागपूर येथील दुकान क्रं.217 एकुण रुपये 1,62,000/- इतक्या रक्कमेत विकत घेण्याचा विक्रीपत्र करारनामा वि.प. सोबत दिनांक 15.6.1996 रोजी केला. तक्रारदाराने दिनांक 5.6.1995 रोजी रुपये 25,000/- व त्यानंतर दिनांक 15.1.1996 पर्यत वेळोवेळी रुपये 1,37,000/- असे एकुण रुपये 1,62,000/- वि.प.ला अदा केल्यामूळे वि.प.ने तक्रारकर्तीला सदर दुकानाचा ताबा दिनाक 18.1.1996 रोजी दिला व ते दुकान तक्रारकर्तीचे ताब्यात आहे. सदर दुकानाचे वाटप वि.प.ने दिनांक 5.6.1995 चे पत्रान्वये तक्रारकर्तीला दिले आहे. तक्रारकर्तीने वि.प.ला दुकानाचे विक्रीपत्र नोंदणीकृत करुन देण्याकरिता विनंती केली परंतु वि.प.ने तक्रारकर्तीला दुकानाचे विक्रीपत्र नोंदणीकृत करुन दिले नाही. त्यामूळे तक्रारकर्ती दुकानाबाबत पुढील आर्थिक व्यवहार करु शकत नाही. त्यामूळे तक्रारकर्तीने वि.प.ला दिनांक 26.7.2019 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प.ने तक्रारकर्तीला सदोदय पॅलेसमधील दुकान क्रं. 217 चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दयावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तकारीचे खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
- सदर तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस पाठविण्यात आली. सदर नोटीस वि.प.ला प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 11.5.2022 रोजी पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजांचे व लेखी युक्तीवाद, तोंडी युक्तीवादाबाबत दाखल पुरसिस चे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.
मुद्दे उत्तरे - तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ? होय विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचे प्रती अनुचित व्यापारी
पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय - काय आदेश अंतिम आदेशानुसार
का र ण मि मां सा - तक्रारकर्तीने वि.प.चे मौजा-वडकापाड, भु.क्र.544, शिट नं. 22/194, प.ह.नं. 17, रेव्हेन्यु ख.क्रं. 97 आणि 98 म्युनसिपल हाऊस क्रं. 662 नवीन, (जूना -313), वार्ड-63, कामठी रोड, गड्डीगोदाम, नागपूर येथील जमीनीवर बांधलेल्या सदोदय पॅलेस, गड्डीगोदाम, कामठी नागपूर येथील दुकान क्रं. 217 एकुण रुपये 1,62,000/- इतक्या रक्कमेत विकत घेण्याचा विक्रीपत्र करारनामा वि.प.सोबत दिनांक 15.6.1996 रोजी केला. तक्रारकर्तीने दिनांक 5.6.1995 रोजी रुपये 25,000/- व त्यानंतर दिनांक 15.1.1996 पर्यत वेळोवेळी रुपये 1,37,000/- असे एकुण रुपये 1,62,000/- वि.प.ला अदा केल्यामूळे वि.प.ने तक्रारकर्तीला सदर दुकानाचा ताबा दिनाक 18.1.1996 रोजी दिला व ते दुकान तक्रारकर्तीचे ताब्यात आहे. सदर दुकानाचे वाटप वि.प.ने दिनांक 5.6.1995 चे पत्रान्वये तक्रारकर्तीला दिले असल्याचे अभिलेखावर दाखल नि.क्रं.2 वरील दस्तऐवजावरुन स्प्ष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्द होते. वि.प.ने तक्रारदाराकडुन दुकानाचे विक्रीपोटी संपूर्ण रक्कम स्विकारुनही दुकानाचे विक्रीपत्र नोंदणी करुन दिले नाही ही वि.प.ची तक्रारकर्तीचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब दर्शविणारी कृती आहे असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब आदेश खालीलप्रमाणे...... अंतीम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- वि.प.ने तक्रारकर्तीस वि.प.चे मौजा वडकापाड, भु.क्र.544, शिट नं. 22/194 प.ह.नं. 17, रेव्हेन्य ख.क्रं. 97 आणि 98 म्युनसिपल हाऊस क्रं. 662 नवीन, (जूना -313), वार्ड नं.-63, कामठी रोड, गड्डीगोदाम, नागपूर येथील जमीनीवर बांधलेल्या सदोदय पॅलेस,गड्डीगोदाम कामठी नागपूर येथील दुकान क्रं. 217 चे कायदेशीर विक्रीपत्र नोंदणीकृत करुन द्यावे. सदर विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्तीने सोसावा.
- वि.प.ने तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/-अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
| |