Maharashtra

Nagpur

CC/09/766

Chandraprakash B.Laddha - Complainant(s)

Versus

M/s. Suhasini Reality Mofisal - Opp.Party(s)

ADV.U.M.AURANGABADKAR

03 May 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/09/766
1. Chandraprakash B.LaddhaAkola ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Suhasini Reality MofisalNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 03 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये श्री. मिलिंद केदार, सदस्‍य
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 03/05/2011)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्‍याची तक्रार अशी आहे की, त्‍याने गैरअर्जदारांच्‍या ‘गार्डन एलक्‍लेव्‍ह’ या वैशिष्‍टयपूर्ण सोई सुविधेने युक्‍त अशा योजनेमध्‍ये रु.51,000/- अग्रीम देऊन चौथ्‍या माळयावरील गाळा क्र. 406 हा रु.43,50,000/- मध्‍ये घेण्‍याचे ठरविले. गाळयाची किंमत रु.2900/- प्रती चौ.फु. ठरविली असतांना, गाळयाची किंमत ही रु.43,35,000/- एवढी यावयास हवी होती. परंतू रु.43,50,000/- किंमत कशी काय ठरविली याबाबत खुलासा गैरअर्जदाराने आजपर्यंत केला नाही. जाहिरातीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने बांधकाम केलेले नसून, त्‍याबाबत विचारणा केली असता ते शंकाचे निरसन करु शकलेले नाही व उलट त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला पत्र पाठवून रु.51,000/- पचित करण्‍याची धमकी पत्राद्वारे दिलेली आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन बयानादाखल दिलेली रक्‍कम रु.51,000/- ही व्‍याजासह परत करावी, तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराने द्यावा अशा मागणी केलेली आहे.
 
2.    सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 5 यांनी संयुक्‍तपणे लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस मिळूनही ते मंचासमोर हजर झाले नाही किंवा लेखी उत्‍तरही दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने दि.06.03.2010 गैरअर्जदार क्र. 2 व 3 विरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र. 4 यांना तक्रारकर्त्‍याचे मागणीनुसार दि.22.06.2010 रोजीच्‍या आदेशांन्‍वये वगळण्‍यात आले.
 
3.    गैरअर्जदार क्र. 1 व 5 यांनी संयुक्‍तपणे लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍याने तक्रारीत योजनेबद्दल उपस्थित केलेले आक्षेप हे दस्‍तऐवजाअभावी केलेले असल्‍याने ते नाकारुन, तक्रारकर्त्‍याने रु.51,000/- अग्रीम देऊन गाळा क्र.406 नोंदणी केला होता. परंतू सांगितल्‍याप्रमाणे पुढील रकमा गैरअर्जदारांकडे अदा केलेल्‍या नाही व स्‍वतःची सदर चूक लपविण्‍याकरीता त्‍यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, स्‍वतःच्‍या चुकीचा फायदा तक्रारकर्ता घेत आहे. म्‍हणून सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी गैरअर्जदार क्र. 1 व 5 ने केलेली आहे.
 
4.    सदर प्रकरण मंचासमोर युक्‍तीवादाकरीता दि.26.04.2011 रोजी आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुरसिस दाखल करुन युक्‍तीवाद पूर्ण झाल्‍याबाबत नमूद केले. मंचाने सदर प्रकरण उपलब्‍ध कागदपत्रांचे आधारे गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍याचे ठरविले. दाखल दस्‍तऐवजांची छाननी केली असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
5.         सदर प्रकरणी उभय पक्षांकडून दाखल दस्‍तऐवजांवरुन तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांकडून गाळा क्र.406 खरेदी करण्‍याकरीता करार केला होता व त्‍यादाखल तक्रारकर्त्‍याने रु.51,000/- नोंदणीकरीता अग्रीम म्‍हणून गैरअर्जदारांना दिलेले आहे. पुढे उभयतांमध्‍ये सामंजस्‍य करारही झालेला आहे. या सर्वांवरुन तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे मंचाचे मत आहे.
6.    सदर प्रकरण मंचासमोर प्रलंबित असतांना दि.02.04.2011 रोजी तक्रारकर्त्‍यांनी पुरसिस दाखल करुन, ते तक्रारीत गाळयाबाबत उल्‍लेखित रक्‍कम गैरअर्जदाराकडे जमा करुन सदनिका खरेदी करण्‍यास तयार असून त्‍याबाबत आदेश पारित करण्‍याकरीता हरकत नाही असे नमूद केलेले आहे. सदर पुरसिसमधील मागणीचा विचार करता विवादित सदनिकेची किंमत तक्रारीत व दस्‍तऐवजांमध्‍ये नमूद असल्‍याप्रमाणे रु.43,50,000/- आहे. उभय पक्षांमध्‍ये या किमतीबाबत पुढे वाद नाही. परंतू मंचाचे आर्थिक क्षेत्राच्‍या मर्यादेचा विचार करता तक्रारकर्त्‍याची सदर मागणी मंचाचे आर्थिक अधिकार क्षेत्राबाहेर आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. तक्रारकर्ते आपली तक्रार योग्‍य न्‍यायालयासमोर दाखल करुन वाद सोडवून घेण्‍यास मुक्‍त आहेत. सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. तक्रारकर्ते आपली तक्रार योग्‍य      न्‍यायालयासमोर दाखल करुन वाद सोडवून घेण्‍यास मुक्‍त आहेत.
2)    खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT