शुध्दीपत्रक – (Corrigendum Order)
1. अर्जदार / मूळ तक्रारदार यांनी या आयोगाने तक्रार क्र. 444/2019 मध्ये दि 15/02/2024 रोजी पारीत केलेल्या अंतीम आदेशाचे अनु. क्र. 2 याचे पुनरावलोकन (review) करण्याकामी सदर पुनरावलोकन अर्ज (review application) क्र. 5/2024 दाखल केला आहे. सदर पुनरावलोकन अर्जामध्ये दि 14/06/2024 रोजी पारीत केलेल्या आदेशाचे अनुषंगाने प्रस्तुत शुध्दीपत्रक काढण्यात येत आहे.
2. ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई उपनगर जिल्हा या आयोगाने तक्रार क्र. 444/2019 मध्ये दि. 15/02/2024 रोजी निकाल दिला होता. सदर निकालपत्रास पृष्ठ क्र. 1 ते 12 आहेत.
3. सदर तक्रार क्र. 444/2019 या प्रकरणाच्या अंतीम न्यायनिर्णयामधील अंतीम आदेशाच्या अ. क्र. 2 मध्ये खालीलप्रमाणे नजरचुकीने टंकलिखीत करण्यात आले आहे -
“ सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारदारांना सभासदत्व शुल्कापोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,20,000/- (रु. एक लाख वीस हजार मात्र) दिनांक 09/12/2019 पासून ते सदर संपूर्ण रक्कम तक्रारदारांना प्रत्यक्ष प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 60 दिवसांचे आत अदा करावेत.”
त्याऐवजी आता सदर तक्रार क्र. 444/2019 या प्रकरणाच्या अंतिम आदेशाच्या अ क्र. 2 मध्ये
“ सामनेवाले क्र. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे तक्रारदारांना सभासदत्व शुल्कापोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1 रक्कम रु 1,60,485/- (रु एक लाख साठ हजार चारशे पंच्याऐशी मात्र) दिनांक 09/12/2019 पासून ते सदर संपूर्ण रक्कम तक्रारदारांना प्रत्यक्ष प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह सदर आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 60 दिवसांचे आत अदा करावेत.” असे वाचण्यात यावे व रक्कम रु 1,60,485/- प्रमाणे आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश पारीत करण्यात येतात. तसेच सदर शुध्दीपत्रक आदेश हा तक्रार क्र. 444/2019 या प्रकरणाच्या मूळ अंतीम आदेशासोबत वाचण्यात यावा.
4. सबब तक्रार क्र. 444/2019 या प्रकरणाच्या अंतिम आदेशाच्या अ क्र. 2 मध्ये अंशत: बदल करुन सुधारित आदेश (निकालपत्र – शुध्दीपत्र) देण्यात येत आहेत. सबब सदर पुनरावलोकन अर्ज क्र. 5/2024 (review application 5/2024) निकाली काढण्यात येतो. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.