Maharashtra

Nagpur

CC/10/512

Shri Rajesh Ramchandran Nair - Complainant(s)

Versus

M/s. Soundarya Sansar - Opp.Party(s)

Adv. Smita Dongare

17 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/512
1. Shri Rajesh Ramchandran Nair301, 3rd floor, Sarswati Bhawan, North Bazar Road, Dharampeth, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Soundarya SansarKrushna Market, Modi No. 3, Sitabuldi, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. Smita Dongare, Advocate for Complainant

Dated : 17 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 17/08/2011)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 01.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.                     प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार त्‍याने गैअर्जदार क्र.3 नोकिया कंपनीचा भ्रमण दुरध्‍वनी संच क्र.3 (मॉडल-ई-72), आय.एम.ई.आय. नं.355239036161409, दि.10.02.2010 रोजी रु.20,000/- एवढया मोबदल्‍यास खरेदी केला होता व सदर संचावर एक वर्षाची वारंटी दिली होती. सदर संच खरेदी केल्‍यानंतर पहिल्‍याच दिवसापासुन त्‍यात बिघाड होता जसे चार्जिंग करीत असतांना संच गरम होणे, कॉल्‍स रिसीव्‍ड न होणे या तक्रारी होत्‍या व सदरचा संच बंद पडला. तसेच गैरअर्जदार क्र.3 यांचेशी संपर्क साधला असता त्‍यांचे सुचनेनुसार सदर संच गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दुरुस्‍ती करीता दिली. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर संच दुरुस्‍त करुन दि.06.04.2010 रोजी तक्रारकर्त्‍यास परत केला. त्‍यानंतरही त्‍यात बिघाड उत्‍पन्‍न झाला व पुन्‍हा सदर संच गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दिला असता त्‍यांनी दि.19.04.2010 रोजी भ्रमण दुरध्‍वनी संचामध्‍ये बिघाड असल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर गैरअर्जदाराला ई-मेलव्‍दारा दि.05.04.2010 व 28.04.2010 रोजी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु गैरअर्जदारांनी त्‍याला प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्‍याने पाठविलेल्‍या सदर नोटीसला आपले उत्‍तर दिले नाही व संच दुरुस्‍त करुन दिला नाही. त्‍यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास सदोष भ्रमण दुरध्‍वनी संच देऊन सेवेत कमतरता दिलेली आहे. याकरीता तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचात दाखल करुन ती व्‍दारे नोकिया कंपनीचा भ्रमण दुरध्‍वनी संच क्र.3 (मॉडल-ई-72), आय.एम.ई.आय. नं.355239036161409, बदलवुन द्यावा, गैरअर्जदारांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी र1.50,000/- नुकसान भरपाई म्‍हणून द्यावे व तक्रारीच्‍या खर्चाचे रु.10,000/- द्यावे अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
3.                     सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेल्‍या नोटीसची पोच प्रकरणात दाखल आहे, गैरअर्जदार क्र.2 ला पाठविलेल्‍या नोटीसबाबत पोष्‍टाचा ‘डिलेव्‍हरी’ रिपोर्ट दाखल आहे.
 
4.                     तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात नोटीस, पोच पावती, सर्विस जॉबशिट, बिल इत्‍यादींच्‍या छायांकीत प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
5.                     सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्‍तीवादाकरीता दि.05.08.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्‍यातर्फे त्‍यांचे वकील हजर त्‍यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी आदेश पारित. सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                                           -// निष्र्ष //-
 
 
 
 
6.                     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेज, शपथेवरील कथन, युक्तिवाद तसेच तक्रारीसोबत दाखल पावत्‍यांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, तक्रारकर्त्‍याने निर्वीवादपणे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून नोकिया कंपनीचा भ्रमण दुरध्‍वनी संच क्र.3 (मॉडल-ई-72), आय.एम.ई.आय. नं.355239036161409, एकूण रु.20,000/- ला खरेदी केला होता. तसेच दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, सदर भ्रमण दुरध्‍वनी संचात बिघाड झाला होता व सदर दोष हा वारंटी कालावधीतील आहे. त्‍यामुळे सदर दोष दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी ही गैरअर्जदारांची आहे. गैरअर्जदारांना वकीला मार्फत पाठविलेली नोटीस, तक्रारकर्त्‍याचे शपथेवरील कथन यांवरुन असे दिसुन येते की, सदरचा भ्रमण दुरध्‍वनी दुरुस्‍त करुन दिल्‍या नंतरही त्‍यात पुन्‍हा बिघाड झाला. त्‍यामुळे सदर संच दुरुस्‍त करुन दिल्‍यानंतरही चालू होत नसेल तर त्‍याच कंपनीचा त्‍याच मॉडेलचा दुसरा भ्रमण दुरध्‍वनी संच गैरअर्जदारांनी बदलवुन द्यावयास पाहीजे असे मंचाचे मत आहे.
 
7.          गैरअर्जदार क्र.3 यांचे नाव प्रकरणातुन वगळण्‍याबाबत दि.28.02.2011 रोजीचा तक्रारकर्त्‍याचा अर्ज मंजूर करुन, मंचाने गैरअर्जदार क्र.3 चे नाव वगळण्‍याचा आदेश पारित केला आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही व आपला जबाब दाखल केला नाही, त्‍यामुळे मंचाने दि.22.03.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
 
8.          वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी सदोष भ्रमण दुरध्‍वनी संच देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करुन सेवेत कमतरता दिलेली आहे. सबब आदेश.
 
-// अंति दे //-
 
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍यास सदर भ्रमण दुरध्‍वनी संच विनामुल्‍य  दुरुस्‍त करुन द्यावा. जर तो दुरुस्‍त होत नसेल तर त्‍याच मुल्‍याचा, त्‍याच  मॉडेलचा दुसरा भ्रमण दुरध्‍वनी संच तक्रारकर्त्‍यास विनामुल्‍य बदलवुन द्यावा.
3.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    गैरअर्जदार क्र.3 यांना सदर प्रकरणातून वगळण्‍यांत येते.
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT