Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.14/2012
डॉ.ललितकुमार विजय विठलाणी
द्वारा भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविदयालय,
खासकीलवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
पिन- 416 510. ... तक्रारदार
विरुध्द
1) सिध्दीविनायक फ्रेट प्रा. लिमिटेड,
पहिला माळा, श्रीराम कॉम्प्लेक्स,
लोकमत ऑफिसच्या वर,
सकरी रोड, धुळे – 424 001
2) मुख्य अधिकारी,
एस.टी.पार्सल ऑफिस सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग – 416510 ... सामनेवाला.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदार – गैरहजर.
विरुद्ध पक्ष - गैरहजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारेश्री एम.डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.18/06/2012)
1) प्रस्तुत प्रकरण स्वीकृत करणेसाठी आहे. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरण दि.15/05/2012 रोजी दाखल केलेले आहे. प्रस्तुत प्रकरण आज रोजी स्वीकृत करणेसाठी आहे. तक्रारदाराने सदरची तक्रार स्वतः दाखल केलेली आहे. तक्रारदारास पुकारले असता आज रोजी गैरहजर आहेत. परंतु आज रोजी तक्रारदाराने या मंचाच्या कार्यालयात ई-मेल पाठविलेला आहे. सदरच्या ई-मेलचे अवलोकन केले असता सामनेवाला रक्कम देण्यास तयार आहेत असे कथन केलेले आहे.
2) प्रस्तुत प्रकरण दाखल झाल्यापासून 21 दिवस होऊन गेलेले आहेत व तक्रारदार आज रोजी गैरहजर आहेत. सबब, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास चालवायची नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब आदेश –
- आदेश –
1) तक्रारदाराची तक्रार काढून टाकण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 18/06/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग