Maharashtra

Nagpur

CC/523/2021

DR. JITENDRA BISHAMBARLAL KANSAL (AGRAWAL) - Complainant(s)

Versus

M/S. SHRI. RADHA VALLABH CORPORATION, THROUGH ACTIVE PARTNER MR. SOORAJ HANDA - Opp.Party(s)

ADV. A.A. BADE

04 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/523/2021
( Date of Filing : 15 Sep 2021 )
 
1. DR. JITENDRA BISHAMBARLAL KANSAL (AGRAWAL)
R/O. FLAT NO.201, ARYA HOME, PLOT NO.87, GOKUL SOCIETY, GOREWADA ROAD, BORGAON, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. SHRI. RADHA VALLABH CORPORATION, THROUGH ACTIVE PARTNER MR. SOORAJ HANDA
80 A, HANDA COMPLEX GMC SQUARE, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
2. MR. SOORAJ HANDA, ACTIVE PARNTNER M/S. SHRI RADHA VALLABH CORPORATION
80 A, HANDA COMPLEX GMC SQUARE, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.A. BADE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 04 May 2022
Final Order / Judgement

 आदेश

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35  नुसार दाखल केलेली आहे.
  2. विरुध्‍द पक्षाचा मे.श्री राधावल्लभ कॉरपोरेशन या नावाने साऊंडप्रुफ विंडो व्यवसाय आहे व वि.प.क्रं.2 हे सदर फर्म चे भागीदार असुन फर्म चा व्यवहार बघतात. वि.प.ने तक्रारदाराचे सदनिकेतील तीन साऊड प्रुफ विंडो फिटींगचे काम सन 2020 ला घेतले व त्याकरिता दिनांक 9.12.2020 ला आगाऊ रक्कम रुपये 15,000/- स्व‍िकारली व त्याबाबत पावती/स्वीकृती श्री राधावल्लभ कॉरपोरेशन व्हाऊचर क्रं.87 ही देण्‍यात आली. वि.प.ने एक साऊंडप्रुफ विंडोचे काम केले व दिनांक 7.1.2021 व्हाऊचर क्रं.100 नुसार पूढील अगाऊ रक्कम रुपये 25,000/- काम पूर्ण करण्‍याकरिता स्वीकारले. तकारकर्ता व वि.प. यांचेमधील करारानूसार तीन खिडकीचे काम पूर्ण करण्‍याकरिता रुपये 40,000/- अदा करण्‍यात आले आणि वि.प.ने ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्‍याचे आश्‍वासित केले. वि.प.ने एका साऊंडप्रुफ खिडकीचे कामापोटी टॅक्स इनव्हाइस 30.12.2002 नुसार रुपये 17,261/- घेऊन पूर्ण केले व उर्वरित काम अपूर्ण राहिले. त्यानंतर वि.प.ने उर्वरित काम पूर्ण करण्‍यास इच्छुकता दाखविली नाही आणि स्वीकारलेली रक्कम रुपये 22,739/- परत करण्‍याचे ठरविले आणि कबुलीप्रमाणे वि.प.ने तक्रारदाराचे नावे एक्सीस बॅंक, स्वावलंबीनगर शाखा, नागपूर याबॅंकेचा रुपये 22,739/- इतक्या रक्कमेचा धनादेश दिला. (राधावल्लभ कॉरपोरेशन-खाते क्रं.917020074278502 दिनांक 15.2.2021, धनादेश क्रं.128839,रुपये 22,739/-).
  3. तक्रारदाराने वि.प.चा धनादेश क्रं.128839, दिनांक-15.2.2021 बॅंकेत वटविण्‍याकरिता दिनांक 16.2.2021 ला सादर केला असता तो धनादेश अपुरी रक्कम या कारणास्तव अनादरित झाला. तक्रारदाराने वि.प.शी दुरध्‍वनीवर धनादेश न वटविल्याबाबत संपर्क साधला असता वि.प.ने दोन दिवसांनी परत सादर करावा असे सांगीतले. त्यानंतर दिनांक 22.2.2021 ला सदर धनादेश परत बॅंकेत सादर केला असता धनादेश वि.प.चे खात्यात पूरेशी रक्कम नाही या कारणास्तव वटला नाही. त्यांनतर परत दिनांक 3.4.2021,5.4.2021 ला धनादेश सादर करण्‍यात आला परंतु तो अनादरीत झाला. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 23.4.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीस लेफ्ट शे-यासह परत आली. त्यामूळे तक्रारदाराने सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन वि.प. ने आदेशाचे दिनांपासून 15 दिवसाचे आत साऊंडपुफ खीडकी बसविण्‍याचे काम पूर्ण करावे अथवा खिडकीचे कामापोटी स्वीकारलेल्या रक्कमेपैकी न उपयोगात आलेली रक्कम  रुपये 22,739/- तक्रारदाराला परत करावी व सदर रक्कमेवर 1.7.2021 पासुन द.सा.द.शे. 18टक्के व्याजदराने दिनांक 30.6.2021 पर्यत व्याज द्यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  4. वि.प.क्रं.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली परंतु नोटीस प्राप्त होऊनही वि.प. तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 8.12.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व व दाखल पुरसिस वरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                                                 उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?                  होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी पध्‍दतीचा

अवलंब केला आहे काय ?                                                                           होय .

  1. काय आदेश                                                                               अंतिम आदेशानुसार

                               का र ण मि मां सा

  1. वि.प.ने तक्रारदाराचे सदनिकेतील तीन साऊंड प्रुफ खिडकी बसविण्‍याकरिता एकूण रुपये 40,000/- स्वीकारल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवतांवरुन स्पष्‍ट होते. तसेच तक्रारकर्ता व वि.प. यांचेमध्‍ये सदनिकेतील खिडकीचे कामाबाबत करार झाल्याचे स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.पचा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. वि.प.ने तक्रारदाराचे सदनिकेतील तीन खिडकीपैकी एका साऊंड प्रुफ खिडकीचे काम केले व उर्वरित दोन खिडक्या बसवुन दिल्या नाहीत व तक्रारदाराने त्यापोटी दिलेली रक्कम रुपये 22,739/- तक्रारदाराला परत केली नाही. तसेच वि.प.ने तक्रारदाराला दिलेले धनादेश 128839 दिनांक 15.2.2021  बॅंकेत सादर केला असता तो वि.प.चे खात्यात पूरेशी रक्कम नसल्याकारणास्त अनादरित झाले हे नि.कं.2 वरील दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते. वि.प. ने तक्रारदाराकडुन सदनिकेतील तीन साऊंड प्रुफ खिडकी बसविण्‍याकरिता रुपये 40,000/- स्व‍िकारुनही खिडकी बसविण्‍याचे काम पूर्ण केले नाही व उपयोगात न आणलेली रक्कमही परत केली नाही ही वि.प.ची तक्रादाराचे प्रती त्रुटी पूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवंलब करणारी कृती होय असे आयोगाचे मत आहे.  सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

                               अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.क्रं.1 व 2 ने आदेश पारित दिनांका पासुन तक्रारदाराचे सदनिकेतील दोन साऊंड प्रुफ खिडकी बसविण्‍याचे काम पूर्ण करावे किंवा खिडकी बसविण्‍याचे कामाकरिता स्वीकारलेल्या रक्कमेपैकी न उपयोगात आलेली रक्कम रुपये 22,739/- तक्रारदराला परत करावी व त्यावर दिनांक 7.1.2021 पासुन  द.सा.द.शे.9 टक्के दराने मिळुन येणारी रक्कम परत करावी.
  3. वि.प.क्रं.1 व 2 ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं.1 व 2 यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावे.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.