Maharashtra

Nagpur

CC/213/2017

Rinku Subhash Pithade - Complainant(s)

Versus

M/s. Shri Swami Samarth Builders - Opp.Party(s)

Adv. G.K.Bhusari

09 Aug 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/213/2017
( Date of Filing : 09 May 2017 )
 
1. Rinku Subhash Pithade
R/o. Plot No. 37, Sonali Apartment, Kotwal Nagar, Ring road, Nagpur 440022
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Shri Swami Samarth Builders
Plot No. 54-A, Panalkar Bhavan, Lavkush Nagar, Near Tapasya highschool, Manewada Ring Road, Nagpur 440024
Nagpur
Maharashtra
2. Shri Bal Vinayak Pisal, Partner of M/s. Shri Swami Samarth Builder
R/o. Mahalaxmi Nagar-2, Manewada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Sau. Rupali Balasaheb Pisal, Partner of M/s. Shri Swami Samarth Builders
R/o. Mahalaxmi Nagar-2, Manewada Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:Adv. G.K.Bhusari, Advocate
For the Opp. Party:
Dated : 09 Aug 2018
Final Order / Judgement

 

(आदेश पारित व्दारा -श्री  नितीन माणिकराव घरडे,  मा.सदस्य  )

आदेश

  1. तक्रारकर्त्याने  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारीचे थोडक्यात स्वरुप असे आहे की,  तक्रारकर्त्याला राहण्‍याकरिता एका घराची आवश्‍यकता होती. त्याकरिता त्यांचा संपर्क विरुध्‍द पक्षाबरोबर झाला. विरुध्‍द पक्ष हे सदनिका उभारुन त्या सदनिका गरजू व्यक्तींना विकण्‍याचा व्यवसाय करतात. विरुध्‍द पक्ष यानी चिंतामणी काम्प्लेक्स नावाच्या इमारती मधील सदनिका क्रं.101, रुपये 26,25,000/- ला विकत घेण्‍याचे ठरविले. तक्रारकर्ता यांनी दिनांक 24.9.2015 रोजी धनादेश क्रं.544482 नुसार 30,000/- रुपये अग्रीम म्हणुन दिले त्याचा पावती क्रं.9 असा आहे. त्यानंतर दिनांक 03.01.2016 रोजी विरुध्‍दपक्षाचे मागणीनुसार सदनिकेचा करार करण्‍याकरिता 1,00,000/- रुपये धनादेश क्रं.544483 नुसार विरुध्‍द पक्षाला दिले. त्याचा पावती क्रं. 53 आहे.
  3. तक्रारकर्ता पूढे असे नमुद करतो की,तक्रारकर्त्याला सदनिका खरेदी करण्‍याकरिता कर्ज घ्‍यावयाचे होते त्या करिता त्यांनी विरुध्‍द पक्षाकडे दस्तऐवजाची मागणी केली. परंतु तक्रारकर्त्याचे हे लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाला 1500/- चे स्के.फुटाचे दोन भुखंड एकत्रित करुन तेथे सदनिका उभारण्‍याकरिता परवानगीच मिळालेली नाही व विरुध्‍द पक्षाचा भुखंड एकत्रिकराचा प्रस्ताव हा संबंधीत विभागाने मंजूर केलेला नव्हता. त्यामूळे तक्रारकर्त्याने दिनांक 18.2.2017 रोजी विरुध्‍द पक्ष यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांत सदनिकेपोटी अदा केलेली रक्कम रुपये1,30,000/-, 24 टक्के व्याजासह परत करावी अशी मागणी केली. परंतु नोटीसला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
  4. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाला आदेशीत करावे की, त्यांनी सदनिकेचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,30,000/-,24 टक्के व्याजासह दिनांक 24.9.2015 पासुन परत मिळावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 30,000/-  मिळण्याचा आदेश व्हावा. 
  5. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्याचा आदेश पारित करण्यात आला. विरुध्द पक्ष नोटीस प्राप्त होऊन सुध्‍दा तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन त्यांचे विरुध्‍द दिनांक 22.2.2018 रोजी नि.क्रं.1वर त्यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालिवण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. 
  6. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत 1 ते 7 दस्तऐवज दाखल केलेले आहे.त्यात प्रामुख्‍याने दिनांक 24.9.2015 व 3.1.2016 रोजी विरुध्‍द पक्षाने रक्कम स्वीकारल्याची पावती, तक्रारकर्त्याच्या बॅक खात्यांचे विवरण पत्र, दिनांक 18.2.2017 च्या कायदेशीर नोटीसची प्रत, त्यांची पावती व पोचपावती, इत्यादी दस्तऐवज दाखल केले.
  7. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद ऐकण्‍यात आला.

-// कारण मिमांसा // -

  1. तक्रारकर्त्याने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करता नि.क्रं.2 वरील दस्त क्रं.1 व 2 हे विरुध्‍द पक्षाने सदनिकेपोटीस स्वीकारलेल्या रक्कमेची पावत्या असुन त्यावर सदनिका क्रं. 101 चे विक्रीपोटी रक्कम स्वीकारल्याचे दिसून येते. यावरुन ही बाब स्पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे.तसेच नि.क्रं.2 वरील दस्त क्रं. 3 वर तक्रारकर्त्याचे बँकेच्या खात्यातुन धनादेशाची रक्कम विरुध्‍द पक्षाचे खात्यात वळती झाल्याचे दिसून येते. सदर तक्रारीचा वाद हा तक्रारकर्त्याने सदनिका क्रं. 101 खरेदी करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडे अग्रीम रक्कम देऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने प्रस्तावीत केलेल्या जागेवार इमारत उभी करु शकला व सदर इमारत बांधण्‍याकरिता संबंधी कार्यालयाने विरुध्‍द पक्षाला परवानगी दिली नाही. त्यामूळे तक्रारकर्त्याने जमा कलेली रक्कम 1,30,000/- व्याजासह विरुध्‍द पक्ष परत करण्‍यास बांधिल आहे असे मंचाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

-//-  अंतीम आदेश  -//-

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडुन सदनिकेचे विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 1,30,000/-,द.सा.द.शे 14 टक्के व्याजासह दिनांक 03.01.2016 पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो तक्रारकर्त्याला परत करावी.
  3. विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त)  व तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) तक्रारकर्त्यास  अदा करावा.
  4. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 ने संयुक्तीक अथवा वैयक्तीकरित्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30  दिवसाचे आत करावे.
  5. उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क देण्यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.