Maharashtra

Additional DCF, Thane

CC/17/91

Mrs. Pallavi Kantilal Patil - Complainant(s)

Versus

M/s. Shree Shantinath Enterprises - Opp.Party(s)

Vijay Shinde

08 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/17/91
( Date of Filing : 02 May 2017 )
 
1. Mrs. Pallavi Kantilal Patil
Res. at A/45/6, Sec. 1, J.N.P.T. Colony, Tal. Uran, Dist. Raigad, Navi Mumbai 400 702.
Navi Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Shree Shantinath Enterprises
Through its Partners, A) Mr. Ashok Ramji Gala, B) Mr. Rajesh Jayantilal Mehta, C) Mrs. Hetal Rajesh Mehta, D) Shree. Praful Patel, E) Shree Bhaven Thakkar,Om Bhairavnath CHS, RH 7, VS2-24, Ganesh Marg, Juhu Village, Sector 10, Vashi Navi Mumbai 400703
Navi Mumbai
Maharashtra
2. Om Bhairavnath CHS
RH 7 VS2-24, Ganesh Marg, Juhu Village, Sector 10, Vashi Navi Mumbai 400703
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 08 Aug 2019
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचेतर्फे वकील रॉकेश गुप्‍ता हजर.

सर्व सामनेवालेंना पूर्वी तक्रारीच्‍या नोटासा डाक देय पोस्‍टाने पाठविल्या असतांना ते पत्‍ता सोडून गेले म्‍हणून परत आल्‍या आहेत. त्‍यानंतर तक्रारदाराने सामनेवाले हे जाणूनबुजून नोटीस घेण्‍यास टाळाटाळ करतात म्‍हणून दैनिक सकाळ मध्‍ये जाहिर नोटीस प्रसिध्‍द करणेसाठी अर्ज प्रतिज्ञापत्रासह दिला, तो अर्ज दिनांक 19/06/2019 रोजी मंजूर केला होता. सबब कोकण सकाळमध्‍ये कुठल्‍याही परिस्थितीत तारीख 03/07/2019 पावेतो जाहिर नोटीस प्रसिध्‍द करुन त्‍या दैनिकाची एक प्रत स्‍पीड पोस्‍टाने सामनेवाले यांच्या तक्रारदारास माहिती असलेल्‍या शेवटच्‍या पत्‍त्‍यावर पाठविण्‍याचा आदेश पारीत झाला होता.   सदर नोटीसची बजावणी विधिवत पध्‍दतीने 30 दिवस सामनेवाले यास कालावधी मिळेल अशा पध्‍दतीने प्रसिध्‍द न केल्‍याने नोटीसचा कालावधी, जाहिर नोटीस प्रसिध्‍द केल्‍यापासून फक्‍त 28 दिवसाचा  असल्‍याने नोटीसची बाजावणी विधिवत पध्‍दतीने झाली असे मानता येत नाही. वरील बाबतीत दिनांक 19/06/2019 पासून ते आजपावेतो प्रत्‍येक वेळी नोटीसची बजावणी करणेसाठी किमान 30 दिवसांचा कालावधी किंवा त्‍यापेक्षा जास्‍त कालावधी देणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिबिबिंत केले आहे, तरीही ते त्‍या स्‍वरुपाच्‍या चूका करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले त्‍यामुळे तक्रारदाराचे वकील कायद्याच्‍या तरतुदीचे पालन करीत नसल्‍याने विनाकारण तक्रारदाराच्‍या तक्रारीमध्‍ये नोटीस काढण्‍याच्‍या खर्चामध्‍ये वाढ करीत असल्‍याचे दिसते. सदरची बाब अॅडव्‍होकट अॅक्‍च्‍या तरतुदीप्रमाणे बेकायेदशीर आहे.

सामनेवाले हे मेसर्स श्री शांतीनाथ बिल्‍डर्स व भागिदारी संस्‍था असल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे. परंतु दिवाणी  संहितेचे आदेशिका क्रमांक 29 व 30 चे पालन केलेले नाही, त्‍यामुळे खरोखरच सामनेवाले ही भागिदारी संस्‍था आहे किंवा कंपनी आहे किंवा मालकी संस्‍था आहे याबाबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे सदर सामनेवाले क्रमांक 1 चे तक्रार दाखल केली त्‍या दिवशी तक्रारीत नमूद केलेले 5 भागिदार होते की नाही याबाबत तक्रारीतील कथनाशिवाय दुसरा लेखी पुरावा नाही. सबब वर नमूद केलेल्‍या सर्व गलथाण काराभारामुळे तक्रारीमध्‍ये नोटीसा पुरेशी संधी देऊनही न बजावण्‍याच्‍या कारणास्‍तव तक्रारदाराच्‍या वकीलांच्‍या खर्चासह रद्द करण्‍यात आल्‍या. तक्रारीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.