तक्रार क्रमांक – 356/2008 तक्रार दाखल दिनांक – 14/08/2008 निकालपञ दिनांक – 31/03/2010 कालावधी - 01 वर्ष 07 महिने 17 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्रीमती. डॉली जयंता रॉय, 11, कल्पतरु अपार्टमेंट, शिवाजी नगर, आकासगंगा जवळ, ठाणे(पश्चिम). .. तक्रारदार विरूध्द मे. श्रि साई डेव्हलपर्स 109, भारत इंडस्ट्रीयल इस्टेट, एल.बी.एस मार्ग, भांडुप(पश्चिम), मुंबई(पश्चिम). कार्यालयः- गोल्डन पार्क, पाचपाखाडी, एल.बी.एस मार्ग, ठाणे (पश्चिम) .. सामनेवाला
उपस्थिती - मा. श्रीमती. शशिकला श. पाटील - अध्यक्षा मा. श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- तक्रारकर्ता बि.एम.लिमये विरुध्द पक्षकार पुनम माखिजानी निकालपत्र (दिनांकः 31/03/2010 ) मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्य यांचेनुसार निकालपत्र 1. तक्रारकर्तीने हि तक्रार विरुध्द पक्षकाराकडुन सदनिका विकत घेण्यासाठी प्रचंड रक्कम दिली. परंतु विरुध्द पक्षकाराने सदनिकेचा ताबा दिला नाही व त्या प्रित्यर्थ सदनिका विक्री करारतानामा केला नाही म्हणुन सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यातील कथन संक्षिप्तपणे खालील प्रमाणेः- तक्रारकर्तीने विरुध्द पक्षकाराकडुन 'गोल्डन पार्क, कॉम्प्लेक्स फ्लॉट नं. 36 A/1, 36B/2, 37A/1, पाचपाखाडी, हरदास नगर एल.बी.एस रोड ठाणे येथील डि टाईप मधिल सदनिका नं. 801, 8वा मजल्यावरील सदनिका विकत घेण्यासंबंधी दिनांक 12/02/2004 रोजी रु.51,000/- आगावु रक्कम दिली व नंतर तिने धनादेश नं.087390 दि.28/03/2004 रोजी रु.2,50,000/- असे एकुण विरुध्द पक्षकारास रु.4,01,000/- दिले व त्यासंबंधी विरुध्द पक्षकाराने दिनांक 16/08/2005 रोजी वरील रक्कम मिळाली असे पोच पत्र दिले. तसेच तक्रारकर्तीने धनादेशाद्वारे नं. 087395 दि.06/09/2005 रोजी 212785/- एवढी रक्कम विरुध्द पक्षकारास दिली त्याची विरुध्द पक्षकाराने पोच पावती दिली. विरुध्द पक्षकारास एकंदर रु.6,13,785/- एवढी रक्कम मिळुनही विरुध्द पक्षकराने सदनिकेचा ताबा दिला नाही व विक्री करारनामाही केला नाही. .. 2 .. दिनांक 19/09/2007 रोजी विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस नोटिस पाठवुन वरील सदनिकेचा व्यवहार रद्द करण्यासंबंधी कळविले. तक्रारकर्ती असे कथन करते की, सदनिकेचा व्यवहार व 1950 प्रति चौ.फुट प्रमाणे ठरला होता. परंतु आता विरुध्द पक्षकार आता प्रति चौरस फुट रु.4,200/- प्रमाणे मागणी करीत आहेत. विरुध्द पक्षकाराने वरील इमारतीचे 2 वर्ष पर्यंत बांधकाम केले नाही त्यांमुळे बांधकाम वेळेवर न केल्यामुळे विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला होते व आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने त्यांच्या नोटीसचे उत्तर दि.01/11/2007 व पुन्हा दि 06/02/2008 रोजी देऊन सदनिकेचा ताबा दिला नाही व विक्री करारनामा केला नाही म्हणुन तक्रार दाखल केली आहे. तक्रार हि स्थळ व काळाच्या सिमेत आहे त्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले. तक्रारकर्तीने खालील प्रमाणे प्रार्थना केली. 1.विरुध्द पक्षकाराने गोल्डन पार्क इमारतीमधील कॉम्प्लेक्स सदनिका नं. 801, 8वा मजला या यदनिकेचा विक्री दर रु.1950/- प्रति चौ.फुटाप्रमाणे विक्री करारनामा करुन द्यावा. 2.अथवा रु.6,13,785/- एवढी घेतलेली रक्कम 18% द.सा.द.शे व्याजासह परत करावी. 3.रु.5,00,000/- नुकसानीपोटी द्यावे. 4.अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत विरुध्द पक्षकाराने तृतिय पक्षिय करार करु नये. 5.तक्रारीचा खर्च द्यावा. 6.अन्य हुकुम तक्रारदाराचे लाभात व्हावेत.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस विरुध्द पक्षकारास निशाणी 7 वर वकिलपत्र दाखल केले. निशाणी 8 व 9 वर लेखी जबाब दाखल करण्यास पुन्हा वेळ मिळावा अशी विनंती केली. निशाणी 10 वर लेखी जबाब दाखल केला निशाणी 11 वर प्रतिज्ञापत्र दाखल केले व निशाणी 12 वर मंचामध्ये दाखल केलेल्या कागदपत्राची पडताळणी करण्याची विनंती केली. निशाणी 13 वर तक्रारदाराने लेखी युक्तीवाद दाखल करण्यास वेळ मिळण्याची विनंती केली.पुन्हा निशाणी 14 वर प्रत्युत्तर दाखल करण्याची विनंती केली. तक्रारकर्तीने निशाणी 15 वर लेखी युक्तमीवाद दाखल केला. निशाणी 16 वर विरुध्द पक्षकाराने लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्द पक्षकाराने दाखल केलेल्या लेखी जबाब व युक्तीवादातील कथन खालील प्रमाणेः- तक्रार खोटी, खोडसाळ व वाईट हेतुने दाखल केली. विरुध्द पक्षकाराकडुन पैसे उकळण्यासाठी तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये क्लीष्ट व गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित केले असल्याने फक्त प्रतिज्ञापत्रावरच तक्रार दाखल करता येणार नाही. महत्वाचे मुद्दे मंचापासून दडवुन ठेवले आहेत. तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत मोडत .. 3 .. नाहीत. विरुध्द पक्षकाराने कोणतीही सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, केली नाही. तक्रार कालबाह्य आहे. वेळेच्या सिमेच्या आत तक्रार दाखल केली नाही. तक्रारी संबंधी कोणताही पुरावा दाखल केला नाही. विरुध्द पक्षकाराची प्रतिमा, प्रतिष्ठा नष्ठ करण्यासाठी तक्रार दाखल केली. विरुध्द पक्षकाराने त्यांचे पत्र दिनांक 16/08/2005 नुसार वरील सदनिकेसंबंधी रु.6,13,785/- मिळाले आहेत हे मान्य केले. तक्रारकर्तीने पैसे गुंतवणुक करण्यासाठी सदनिका खरेदी करण्यासाठी सौदा केला परंतु संपुर्ण रक्कम दिली नाही. विक्री करारनामा करण्यासंबंधी तक्रारकर्तीने कोणतीही काळजी/दक्षता घेतली नाही. दिनांक 19/09/2007 चे विरुध्द पक्षकाराचे पत्रानुसार सदरच्या सदनिकेची व्यवहार रद्द ठरविला व त्यांनी रक्कम रु.6,13,785/- नोटिस मिळाल्यापासुन 15 दिवसाचे आत वरील रक्कम परत करण्यास तयार आहेत व त्याची रक्कम घेऊन जावे.
3. वरील तक्रारीसंबंधी तक्रारकर्तीने विरुध्द पक्षकाराकडे रु.6,13,785/- एवढी रक्कम जमा केल्याच्या पावत्या दाखल केल्या, तसेच, प्रतिज्ञालेख, प्रत्युत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच विरुध्द पक्षकाराने लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. वरील सर्व कागदपत्राची सुक्ष्मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो खालील प्रमाणेः- अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – होय. कारण मिमांसा अ)स्पष्टिकरणाचा मुद्दाः- तक्रारकर्तीने विरुध्द पक्षकाराकडुन 'गोल्डन पार्क कॉम्प्लेक्स' सर्व्हे नं.36A/1, 36B/2, 37A/A पाचपाखाडी, हरदास नगर एल.बी.एस रोड, ठाणे पश्चिम येथे सदनिका नं.801, 8वा मजल्यावरील सदनिका विकत घेण्यासंबंधी विरुध्द पक्षकाराने रु.51,000/-दिनांक 12/03/2004 रोजी स्विकारले व उर्वरित रक्कम खालील प्रमाणे स्विकारली. दिनांक धनादेश नबंर रक्कम 24/03/2004 152148 1,00,000/- 26/03/2004 087390 2,50,000/- 26/08/2005 087395 2,12,785/- एकंदर रक्कम रु.6,13,785/-स्विकारली परंतु विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीला सदनिकेचा ताबाही दिला नाही व सदरच्या सदनिकेचा विक्री करारनामाही केला नाही. विरुध्द पक्षकाराची वरील कृति न्यायोचित व विधीयुक्त नाही. तसेच नैसर्गिक न्यायाच्या दृष्टिकोनातुनही अनुचित आहे. सदनिकेची संपुर्ण रक्कम स्विकरणे व सदनिकेचा विक्री करारनामा न करणे व सदनिकेचा ताबा न देणे हि सेवेमध्ये त्रृटी, न्युनता व बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा आहे.
.. 4 .. विरुध्द पक्षकार त्यांचे लेखी जबाब व लेखी युक्तीवादामध्ये कबुल व मान्य करतात की, त्यांनी सदनिकेपोटी रक्कम रु.6,13,785/- एवढी रक्कम स्विकारली आहे. तसेच त्यांचे दिनांक 19/09/2007 रोजीच्या पत्रानुसार वरील सदनिकेचा व्यवहार एकतर्फा रद्दबातल करतात व तक्रारकर्तीस रु.6,13,785/- रक्कम परत न करण्याची नोटीस पाठवितात त्याअर्थी विरुध्द पक्षकाराने अनुचित प्रथेचाही अवलंब केला आहे असे स्पष्ट होते. तक्रारीमध्ये तथ्ये आणि सत्य आढळुन आल्याने हे मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. अंतिम आदेश 1. तक्रार क्र. 356/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस गोल्डन पार्क कॉम्प्लेक्स इमारतीमधील 1210 चौ.फुट सदनिका नं.801, 8वा मजला या सदनिकेचा विक्री दर रु.1,950/- प्रति चौरस फुटाप्रमाणे विक्री करारनामा करुन द्यावा. अथवा
3.विरुध्द पक्षकाराने रु.6,13,785/- (रु.सहा लाख तेरा हजार सातशे पंच्यानशी फक्त) एवढी घेतलेली रक्कम 9% द.सा.द.शे व्याजासहीत तक्रार दाखल तारखेपासुन परत करावी. 4.विरुध्द पक्षकाराने रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) नुकसान भरपाई तक्रारकर्तीस द्यावी. 5.विरुध्द पक्षकाराने रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) न्यायिक खर्च द्यावा. 6.वरील आदेशाची तामिली सही शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी (direct payment) अन्यथा वरील रकमेवर जादा दंडात्मक व्याज 3% द.सा.द.शे आदेश पारीत तारखेपासुन देय होईल. 7.या आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास निशुल्क द्यावी.
दिनांक – 31/03/2010 ठिकान - ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ. शशिकला श. पाटील) सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|