Maharashtra

Thane

CC/06/290

Prakash Dhondu Dangale & Oths. - Complainant(s)

Versus

M/s. Shamim Construction Co., - Opp.Party(s)

20 Sep 2008

ORDER


CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE DISTRICT THANE Room No.214, 2nd Floor, Collector office
consumer case(CC) No. CC/06/290

Prakash Dhondu Dangale & Oths.
...........Appellant(s)

Vs.

M/s. Shamim Construction Co.,
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

ग्राहक तक्रार क्रमांकः-290/2006

तक्रार दाखल दिनांकः-09/06/2006

निकाल तारीखः-20/09/2008

कालावधीः-02वर्ष03महिने11दिवस

समक्ष जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

1)श्री.प्रकाश धोंडू डांगळे

जय कृपा को..हौ.सोसायटी,

ब्‍लॉक नं.11,3रा मजला, टेंभी नाका,

तेल्‍ली गल्‍ली,ठाणे तर्फे मुख्‍यत्‍यार

सौ.संगीता प्रकाश डांगळे. ...तक्रारकर्ता.1

2)श्रीमती प्रभावती प्रभाकर येसारे

निनगडवाडी, कसारा रेल्‍वेस्‍टेशन जवळ,

ता.शहापूर जि.ठाणे. ...तक्रारकर्ता.2

3)श्रीमती अलका बबन अवारे

दुर्गानगर, चितलसार,मानपाडा,

ठाणे. ...तक्रारकर्ता.3

विरुध्‍द

1.मेसर्स.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी,

तर्फे मेहबूब आलम बिसमिल्‍ला चौधरी,

राहणार-''मेहबूब हाऊस नं.1,

किसन नगर नं.2, रोड नं.16,वागळे

इस्‍टेट, ठाणे 400 604 ...वि..1(एकतर्फा)

2.श्रीमती.इंदुमती रमेश पोतदार

तावडे‍‍ बिल्‍डींग, 1 ला मजला,

2/-

रुम नं.102,तेल्‍ली गल्‍ली,

टेंभीनाका,सिव्‍हील हॉस्‍पीटल समोर,

ठाणे.() ... वि..2

 

गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्‍यक्षा

2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्‍य

उपस्थितीः-तक्रारकर्त्‍यातर्फे वकीलः-श्री.एस.एल.बेलपाठक

विरुध्‍दपक्षातर्फे वकीलः-श्री.आर.पी.मुधोळकर

-निकालपत्र -

(पारित दिनांक-20/09/2008)

सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्‍यक्षा यांचेद्वारे आदेशः-

तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सदर तक्रार दिनांक09/06/2008 रोजी दाखल केली आहे त्‍याचे थोडक्‍यात कथन पुढील प्रमाणेः-

1)तक्रारदार यांनी मयत श्रीमती सावित्रीबाई धोंडु डांगळे यांचे वारसदार म्‍हणून तक्रार दाखल केली आहे. श्रीमती सावित्रीबाई हिचा मृत्‍यू दि.09/11/2006 रोजी झाला. मृत्‍यूपूर्वी सावित्रीबाई हे राहत असलेल्‍या घराबाबत दिवाणी न्‍यायालय येथे सिव्‍हील सुट नं.186/1996 हा मुळ घर मालक रघुनाथ बी.तावडे यांचे विरुध्‍द दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये श्रीमती सावित्रीबाई यांचे बाजुने डिक्री दि.09/01/1997 ला झाली. त्‍यानंतर त्‍यातील विरुध्‍दपक्ष नं.1 यांना तक्रारदार श्रीमती सावित्रीबाई यांना जागेचा ताबा दयावा असे आदेश करण्‍यात आले. परंतू आदेशाप्रमाणे /

3/-

डिक्रीप्रमाणे ताबा न मिळाल्‍याने दरखास्‍त नं.102/1999 हा दाखल केला. ही दरखास्‍त सुरु असतांना श्रीमती सावित्रीबाई व श्री.रघुनाथ बी.तावडे या उभयंताचे आपसात तडजोड झाली. श्री.तावडे यांनी त्‍यांची मिळकत मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांना बांधकाम व डेव्‍हलप करण्‍याकरता दिली आहे. त्‍यामध्‍ये श्रीमती सावित्रीबाई यांनी 320 स्‍क्‍वेअर फूट बिल्‍टअप एरीया व नविन बांधकामासह देण्‍याचे करारपत्र करण्‍यात आले. बांधकाम पुर्ण झाल्‍यानंतर मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांनी श्रीमती सावित्रीबाई यांना वादीत मिळकतीचा ताबा दिला नाही. व परस्‍पर श्रीमती इंदूमती रमेश पोतदार यांना देण्‍यात आला. परंतू अनेक वेळा श्री.तावडे यांचेकडे वाद मिळकतीचे डिक्रीप्रमाणे मागणी केली असता अखेरपर्यंत देय केली नाही.मधेच श्रीमती सावित्रीबाई डांगळे यांचा मृत्‍यू झाला.तदनंतर त्‍यांचे वारसांना डिक्रीप्रमाणे जागा मिळणे आवश्‍यक आहे ती मिळाली नाही. परंतू अशा मिळकतीचा ताबा मिळावा म्‍हणून सदरची तक्रार श्रीमती सावित्रीबाई डांगळे हिचे वारसांनी तक्रार मंचामध्‍ये विरुध्‍दपक्षकार मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांचे विरुध्‍द दाखल केली आहे. व विनंती केली आहे. 1)विरुपक्षकार नं.1 यांनी फ्लॅट नं.11, तीसरा माळा ही मिळकत श्रीमती पोतदार यांचे नावे दिली आहे हे म्‍युनसीपल रेकॉर्डवरुन समजून आल्‍याने त्‍या मिळकतीचा ताबा मिळावा. 2) 5,000/- रुपये सदर अर्जाचा खर्च म्‍हणून मिळावा. 3) इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी विनंती मागणी केली आहे.

2)मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार नं.1यांना नोटीस

4/-

रजिष्‍टर एडीने पाठविली असता ती पोहचल्‍यानंतर विरुध्‍द पक्षकार नं.1 यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणून दि.09/04/2007 रोजी ''एकतर्फा आदेश'' पारीत करण्‍यात आला.

3)विरुध्‍दपक्ष नं.2यांना मंचामार्फत नोटीस मिळाली व ते मंचात हजर होऊन दि.22/08/2007 रोजी नि.22 प्रमाणे लेखी जबाब विरुध्‍दपक्ष नं.2 यांनी दाखल केला आहे. त्‍याचे थोडक्‍यात कथन पुढील प्रमाणेः-

सदरची तक्रार मंचापुढे चालविण्‍यास पात्र नाही. विरुध्‍दपक्ष नं.2 हे कायदेशीर मिळकतीचे मालक आहे. 1,00,000/- रुपये मोबदला देऊन खरेदी घेतलेले आहे त्‍याची पावती आहे. नियमानुसार सोसायटी मेंटेनस चार्जेस व कार्पोरेशन टॅक्‍स भरत आलेले आहेत. सोयायटीने 21/09/1992 मध्‍ये फ्लॅट नांवे करुन दिलेला आहे. श्रीमती पोतदार यांचे नांवेही सोसायटीने सोसायटी सदस्‍य नं.54013 ने सदस्‍यत्‍व दिलेले आहे.विरुध्‍दपक्ष नं.2 यांनी रे.सि.सु.नं.159/1996 हा तक्रारदार यांचे विरुध्‍द दिवाणी न्‍यायालयात दावा दाखल केला आहे, तो प्रलंबित आहे ही बाब मंचापासून लपवून ठेवली आहे. तक्रारदार हे तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे बिल्‍डींगमध्‍ये दुसरा फ्लॅट देण्‍यासाठी तयारी दर्शविलेली आहे. सदरची तक्रार या मंचात चालवण्‍यास पात्र नसल्‍याने तक्रारदार यांचा तक्रार अर्जातील कथने व मुद्दे मान्‍य व कबूल नसल्‍याने खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.

5/-

4)सदर तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्‍दपक्षकार नं.2 यांचा लेखी जबाब व उभयंताची कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्‍तीवाद यांची सुक्ष्‍मरित्‍या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दे उपस्थित झाले व आदेश परीत करण्‍यात आले.

5) सदर तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदार हे मयत श्रीमती सावित्रीबाई धोंडू डांगळे यांचे कायदेशीर वारस आहेत.(मुलगा व मुलगी) हे जरी खरे व सत्‍य असलेतरी सदरची तक्रार या मंचात चालवण्‍यास पात्र नाही. तक्रारदार हे ''ग्राहक'' कुठेही सिध्‍द होत नाही. कारण श्रीमती सावित्रीबाई डांगळे हिने मृत्‍यू पूर्वी विरुध्‍दपक्ष श्री.रघुनाथ बी.तावडे यांचे विरुध्‍द दिवाणी दावा नं.159/1996 हा दिवाणी न्‍यायालयात दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये मयत श्रीमती सावित्रीबाई डांगळे ही ज्‍या जागेची भाडेकडून म्‍हणून राहत होती ती जागा कुळ नात्‍याने श्रीमती सावित्रीबाई हिस मिळाली होती. त्‍या दाव्‍यातील विरुध्‍दपक्षकार हे जरी जागेचे मुळ मालक असले तरी कुळ नात्‍याने डिक्री श्रीमती सावित्रीबाई डांगले हिच्‍या बाजूने मंजूर झाली आहे. त्‍यामध्‍ये 320 स्‍क्‍वेअर फूट बांधकामासह व सुविधासह फ्लॅट नविन बिल्‍डींगमध्‍ये तयार झाल्‍यानंतर देण्‍यात यावे अशी दावा डिक्री करण्‍यात आली होती. परंतू त्‍या आदेशाची अवहेलना केल्‍याने दरखास्‍त नं.102/1999 ही दाखल करण्‍यात आली आहे. त्‍यामध्‍ये दि.07/08/2001 रोजी 'कन्हेन्‍स' डीड करण्‍यात आले आहे व ताबा देण्‍याचे ठरले होते. कागदोपत्री ताबा दिल्‍याचे नमूद केले आहे. परंतू प्रत्‍यक्षात काय झाले या बाबतची माहिती

6/-

पुरावा अथवा तपशील सदर अर्जात नमूद नाही. परंतू सदरची तक्रार दाखल झाली आहे यावरुन श्रीमती सावित्रीबाई यांना वाद मिळकतीचा ताबा मिळाला नव्‍हता हे सिध्‍द होते व त्‍या मिळकतीचा ताबा या मंचाकडून तक्रारदार यांना मिळावा म्‍हणून सदरची तक्रार दाखल केली आहे. विरुध्‍दपक्ष मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांनी मुळ मालक रघुनाथ बी.तावडे यांना डेव्‍हलपमेंट ऍग्रीमेंट करुन दि.07/05/1992 रोजी संपूर्ण दाद मिळकत बांधकाम करण्‍याकरता ताब्‍यात दिली आहे व त्‍यांचे इच्‍छेनुसार त्‍यांनी मिळकतीची विल्‍हेवाट लावलेली आहे. वास्‍तवीकरित्‍या मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन यांनी श्रीमती सावित्रीबाई डांगळे यांना मुळ मालक यांचेविरुध्‍द झालेली डिक्रीप्रमाणे व मुळ मालक व मे.शमीम कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांना मिळकतीचा ताबा देण्‍याचा होता हे माहिती असूनही ताबा देण्‍यात आलेला नाही हे स्‍पष्‍ट होते असे असले तरीही सदरची तक्रार ही कुळ नात्‍याने श्रीमती सावित्रीबाई डांगळे हिला मिळाली होती म्‍हणून या ठिकाणी ''ग्राहक'' ठरु शकत नाही. या मंचाकडून जरी श्रीमती इंदूमती रमेश पोतदार यांना करारपत्राने दिले असेलतर त्‍यांच्‍या ताब्‍यातून दावा मिळकत काढून घेऊन तक्रारदार यांना देण्‍याबाबतचा कोणत्‍याही प्रकारचा आदेश करण्‍याचा अधिकार या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नसल्‍याने सदरची तक्रार या मंचात चालवण्‍यास पात्र नाही. म्‍हणून या मुद्दयावर सदरची तक्रार नामंजूर होण्‍यास पात्र आहे.

6)तक्रारदार यांनी अर्जास प्रथम कारण दिनांक 07/08/2001 रोजी घडले असे नमूद केले परंतू. तदनंतर

7/-

दि.09/06/2006 पर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. व सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे. म्‍हणून विनंती मागणीनुसार दखल घेतली तरी सदरची तक्रार मुदतबाहय आहे.(नॉट इन लिमिटेशन) म्‍हणून ती चालवण्‍यास पात्र नाही. तक्रारदार व विरुध्‍दपक्षकार यांचे नाते हे भाडेकरु व मालक डेव्‍हलपर्स असे असल्‍याने सदरची तक्रार या मंचात चालवण्‍यास पात्र नाही म्‍हणून आदेश.

आदेश

1)तक्रारदार यांची तक्रार मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात चालवण्‍यास पात्र नसल्‍याने व मुदत बाहय असल्‍याने नामंजूर करण्‍यात आली आहे.

2)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

3)तक्रारदार यांनी मा.सदस्‍य तक्रार दाखल केलेल्‍या दोन प्रती (फाईल)त्‍वरीत परत घेऊन जाव्‍यात.

दिनांकः-20/09/2008

ठिकाणः-ठाणे



 



 

(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील ) सदस्‍य अध्‍यक्षा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे