तक्रारदार : वकील किर्ती शेट्टी हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 हे विकासक/बिल्डर कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 कंपनीचे संचालक आहेत. सा.वाले क्र.3 हे त्याच इतारतीमध्ये राहणारे एक अन्य सदनिकाधारक आहेत. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 2 यांनी विकसीत केलेल्या प्रकल्पातील एका इमारतीमध्ये सदनिका क्र.74 करारनामा दिनांक 23.4.2004 प्रमाणे विकत घेतली. व तक्रारदारांना सदनिकेचा ताबा जून 2006 मध्ये मिळाला. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे सा.वाले क्र.1 व 2 यांचे प्रतिनिधींनी तक्रारदारांना असे सांगीतले की, रु.4 लाख जास्तीचे अदा केल्यास तक्रारदारांना ज्यादा वाहनतळ पुरविण्यात येईल. त्या माहितीवर विसंबून व तक्रारदारांना वाहनतळाची गरज असल्याने तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 व 2 यांचेकडे रोख रु.4 लाख जमा केले. सा.वाले यांचे प्रतिनिधी श्री.लहेजा यांनी रक्कम स्विकारली परंतु पावती देण्यास नकार दिला. त्यानंतर सा.वाले क्र.1 व 2 यांनी त्यांचे पत्र दिनांक 24.6.2006 प्रमाणे तक्रारदारांना पार्किंग क्र.58 वाटप केले. तक्रारदार आपले दुसरे वाहन पार्किंग क्र.58 मध्ये लावीत होते. परंतू जुलै, ऑगस्ट,2007 मध्ये तक्रारदारांना असे दिसून आले की, त्याच इमारतीत राहणारे श्री.अमीत टंडन हे आपले वाहन पार्किंग क्र.58 मध्ये लावीत असतात. त्यानंतर तक्रारदारांनी टंडन यांचेशी संपर्क साधला असता श्री.टंडन यांना तक्रारदारांना असे सांगीतले की, त्यांनी पार्किंग क्र.58 हे त्यांनी सा.वाले 1 व 2 यांचेकडून विकत घेतले. त्यानंतर तक्रारदारांचे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे संपर्क साधला. परंतू सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांचे मागणीस प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 23.6.2009 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने कायदेशीर नोटीस दिली. त्यास देखील सा.वाले यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली.
2. तक्रार प्रलंबीत असतांना तक्रारदारांनी श्री.अमित टंडन यांना सा.वाले क्र.3 म्हणून तक्रारीमध्ये संम्मलीत केले.
3. तक्रारीच्या नोटीसा सा.वाले यांना पाठविण्यात आल्या. नोटीसाची बजावणी होऊन देखील सा.वाले मंचासमोर गैर हजर असल्याने सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले.
4. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत नशिाणी ब येथे दिनांक 24.6.2006 रोजी सा.वाले 1 व 2 यांनी तक्रारदारांना पार्किंक क्र.58 वाटप केल्याचे पत्राची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील मजकूर तक्रारदारांच्या तक्रारीतील पार्किंक क्र.58 चे संदर्भात पुष्टी देतो. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, वाहनतळ क्र.58 हा सा.वाले क्र.1 व 2 यांनी श्री.अमित टंडन यांना पूर्वीच विक्री केलेला होता व तोच वाहनतळ तक्रारदारांकडून रु.4 लाख वसूल करुन तक्रारदारांना विक्री केला. या प्रकारे सा.वाले क्र.1 व 2 यांनी वाहनतळाचे संदर्भात तक्रारदारांची फसवणूक केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. सा.वाले यांनी प्रकरणात हजर होऊन आपली कैफीयत दाखल केलेली नसल्याने तक्रारदारांची सर्व कथने अबाधित रहातात.
5. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये वाहनतळ क्र.58 ताबा मागीतलेला आहे. परंतु त्या वाहन तळाचे संदर्भात सा.वाले क्र.3 यांचे हितसंबंध पूर्वीच निर्माण झालेले असल्याने तक्रारदारांना वाहनतळ क्र.58 चे संदर्भात आदेश देणे योग्य होणार नाही असे मंचाचे मत झाले आहे. प्रकरणातील पुराव्यांचा एकंदर विचार करता सा.वाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना त्यांचेकडून वसुल केलेली रक्कम रु.4 लाख वाटप दिनांक 24.6.2006 पासून 12 टक्के व्याजाने परत करावी असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
6. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 884/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना पार्किंगच्या संदर्भात अनुचित व्यापारी
प्रथेचा अवलंब केला व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मुळची रक्कम रु.4,00,000/- त्यावर
दिनांक 24.6.2006 पासून 12 टक्के दराने व्याज या प्रमाणे अदा
करावी असे आदेश सामनेवाले क्र.1 व 2 यांना देण्यात येतात.
4. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5,000/-
तक्रारदारांना अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 29/07/2013